एक वीडियो सध्या प्रचंड वायरल होतोय, एक मध्यमवयीन बाई एका पोरीला चांगलीच ओरडतांना दिसत होती. हा वीडियो दूसरा कुठला नसून कपल, आणि त्यांच्या प्रेमाच्या उघड प्रदर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या दिल्ली मेट्रोमधला होता. आता दिल्ली मेट्रोतून निच्छितच चांगले कार्य घडते म्हणजे त्यातून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करत असतील; पण मी दिल्लीला राहत नाही त्यामुळे दिल्ली मेट्रोशी संबंध दूरदूरचा नाही, आणि दिल्ली मेट्रोबद्दल काही वायरल झालेले विडीयो पाहूनच कदाचित हे माझे मत असावे.
तर हा, त्या वीडियोवर येऊया, ती बाई त्या कपलला चांगलीच ओरडतांना दिसत होती, की कसे त्यांच्या घरच्यांनी संस्कार दिलेले नाहीत ई. आणि काही गोष्टी कशा चार भिंतीच्या आड केल्यातरच बऱ्या असतात. वगैरे. तर पोरीने ही प्रत्युत्तर म्हणून, "18+ हो गयी हूँ।" असे म्हणत तिची कृतीला बळ द्यायचा प्रयत्न केला. त्या गावात राहणाऱ्या हरयाणवी बाईला काय कळणार त्यातलं, तिचं ते चालूच होतं. प्रचंड वीडियो वायरल झाला, आणि त्या बाईचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक होतांना दिसत आहे. काही उत्साही यूट्युबरनी त्या बाईचा पत्ता काढून नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला, आणि तीच्या मुलाखतीत तीच्या म्हणण्यानुसार, ती मुलगी आणि तो मुलगा "एकमेकांची तोंड खात होती" असं तिचं म्हणणं, म्हणजेच आपल्या चांगल्या भाषेत "किस" करत होती. हा वीडियो एवढ्यावरच झाला.
पण यानंतर वीडियो आला तो त्या पोरीचा, ती त्यात सांगत होती की ती फक्त फ्रेंड्स सोबत मस्ती करत होती, आणि त्या काकूने तिला कसा ओरडा केला आणि तिला खरंच आता त्याचं वाईट वाटत आहे, आणि ती विणवण्या करतांनाही दिसली की तिचा वीडियो कृपया कोणी वायरल करू नये कारण ती एक मुलगी आहे वगैरे वगैरे.. आता तिच्यात "18+ हो गयी हूँ।" हा एटिट्यूड नव्हता उलट आता ती सोज्वळ आणि काहीच न केल्याचा आविर्भावात होती, 18+ असण्याचा तिने मेट्रोत दाखवलेला बोल्डपणा पार निघून गेला होता. असो!
आपला समाज कितीही प्रगल्भ झाला तरी, काही गोष्टी या चार भिंतीच्या आतच व्हाव्यात ही मानसिकता वाईट आहे का?? पुरोगामी म्हणून लहान मुलांसमोर सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करणे किती योग्य, रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक वयोगटातील लोकं वावरतात त्यांचं भान ठेवून वागनं बरं नाही का?? यावर आपलं मत काय, हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
ही त्या वीडियोची लिंक, फक्त यात त्या मुलीचा चेहरा ब्लर केलेला आहे. बाकी इतर सोशल मिडीयात अपलोड झालेल्या वीडियोजमध्ये चेहरा स्पष्ट दिसतोय.
https://youtu.be/9Kqsn3fPDbg
ह्या त्यात काय एवढं ? हे तर
ह्या त्यात काय एवढं ? हे तर आम्ही हम दिल दे चुके सनम मध्ये 20 वर्षांपूर्वीच करून ठेवलय. त्या मुलीच्या जन्माच्याही आधी.
त्या हरियाणवी बाईला काय वाटते ते वाटते, त्यापेक्षा त्या मुलीची हा video पसरवू नका ही विनंती जास्त महत्वाची आहे.
त्या जोडप्यातील मुलाला ह्या टीकेचा फार काही त्रास होणार नाही. तसाच leeway त्या मुलीला पब्लिक देऊ शकत नाही?
ह्यावरून धडा घेत मुंबई मेट्रो स्टेशनात सूर्यफुले विकायला चालू केली पाहिजे म्हणजे जोडप्यांनी ती चेहर्या समोर धरली की 60 च्या फिल्मी जगात जाणार्या लोकांना त्रास होणार नाही.
आपला समाज कितीही प्रगल्भ झाला
आपला समाज कितीही प्रगल्भ झाला तरी, काही गोष्टी या चार भिंतीच्या आतच व्हाव्यात ही मानसिकता वाईट आहे का??>>>>>>>
अजिबात वाईट नाही. पण मग समाजाने/ घरच्यांनी त्या दोघांना चार भिंती आणि एकांत तरी द्यावा ना!
लोक स्वतःच्या खिशातून पैसे देऊन लॉज किंवा पब मध्ये जातात तिथेही पोलीस आणि संस्कृतीचे ठेकेदार जाऊन त्यांना त्रास देतात.
बिचारी मुलगी. तो व्हिडीओ नका
बिचारी मुलगी. तो व्हिडीओ नका फॉरवर्ड करु. किती कानकोंडं झालं असेल तिला.
बघितला व्हिडीओ - स्पष्ट दिसत
बघितला व्हिडीओ - स्पष्ट दिसत आहे ती हरयाणवी बाई जळत आहे. तिला पण वाटत असेल आपल्याला असे किस मिळावेत.
म्हणून फक्त त्या मुलीला ओरडत आहे. मुलाला काहीच बोलत नाहीय.
उगाच इतका अकांड तांडव कशाला करेल.
अशा थिल्लर वृत्तीच्या लोकांचे
अशा थिल्लर वृत्तीच्या लोकांचे मी निरीक्षण केले आहे चौपाटीवर चालताना ,किंवा दुसऱ्या तस्तम ठिकाणी.
ही थिल्लर वागणारी जमात ही शरीराने अर्ध
परिपक्व असते..
वय असते 14ते 23 chaya मध्ये.
आणि स्वतः शिक्षण,खेळ,वैचारिक लेव्हल ह्या सर्व बाबतीत एकदम खालच्या स्तरावर असतात.
Mature कपल सुद्धा बघतो मी सार्वजनिक ठिकाणी म्हणजे मुलगी उच्च शिक्षित डॉक्टर वैगेरे आहे मुलगा उच्च शिक्षित ca,mba किंवा खेळाडू आहे.
अशी matutre couples प्रेम व्यक्त करत असतात,त्याची मज्जा सुद्धा घेतात पण मर्यादेत राहून.
आणि अशी mature couples एकमेका विषयी अत्यंत गंभीर असतात.
वरचे सार्वजनिक ठिकाणी थिल्लर पना करणारे एकमेका विषयी सुद्धा गंभीर नसतात .
थोडक्यात बुध्दी नी अपरिपक्व,शरीराने अपरिपक्व,कौशल्य मध्ये अपरिपक्व .
समाजाच्या काहीच कामाचे नसलेले
Hariyana lady widow ahe ka ?
Hariyana lady widow ahe ka ? Frustrated watli bichari Ekandar jya tava tavane bolali tya mulila.
Sunflowers + १
Chraps + १
आपल्याकडे सार्वजनिक ठिकाणी
आपल्याकडे सार्वजनिक ठिकाणी किस करणे/ मुला-मुलींनी एकत्र येणे. या गोष्टींचा किती बाऊ केला जातोय याचेच हे एक उदाहरण.. पाश्चिमात्य देशात हे प्रकार सर्रास होतात.
या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी लिंक दिली जावी. धागा उघडला जावा. हे पटले नाही.
पाश्चिमात्य देश आणि आपला देश
पाश्चिमात्य देश आणि आपला देश ह्यांची तुलना करणेच गैर लागू आहे.
सार्वजनिक ठिकाणी ,पब्लिक transport मध्ये कसे वर्तन असावे
स्वच्छता राखली जावी म्हणून आपले सार्वजनिक ठिकाणी वावरताना कसे वर्तन असावे.
गर्दी मध्ये धक्काबुक्की होवू नये म्हणून रांगेचा वापर कसा करावा,
सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवताना आपली काय जाबदरी असते
ह्या सर्व प्रश्नाचे ऊतर पश्चिमात्य देशातील
लोक आणि आपली लोक अशी तुलना करून शोध घेतला तर आपण 0 मार्क मिळवू.
फक्त तिथे सार्वजनिक ठिकाणी किसींग चालते म्हणून इथे पण चालावे असला उथळ विचार का.
पाश्चिमात्य लोकांचे चांगले गुण घ्या.
आपल्याकडचे लैंगिक दमन नाहीसे
आपल्याकडचे लैंगिक दमन नाहीसे केले पाहीजे. सोशल इश्यु आहे हा. या दमनामुळे बस-ट्रेनमध्ये धक्के मारणे, वेडेवाकडे ओंगळवाणे स्पर्श करणे आदि प्रकार होतात की काय कोणास ठाउक
तो एक संशोधनाचाच विषय आहे की लैंगिक दमनामुळे ओंगळवाणे स्पर्श करण्याकडे वृत्ती वाढते की ती एक विकृती मूळातच दबा धरुन असते.
____________
पण पाश्चिमात्य देशात हे असले अनुभव नाहीत. हां इथे सर्व आलबेल आहे असेही नाही. टीनएजर्सना पळवुन नेउन अंधारकोठडीत डांबणे, अतोनात घृणास्पद तसेच अमानुष अत्याचार त्यांच्यावर करणे हे इथेही होते पण गर्दीतले प्रकार नाही होत ब्वॉ. असो.
आणि ती दोघे स्वच्छता राखत
आणि ती दोघे स्वच्छता राखत असतील, नेहमी रांगेची शिस्त पाळत असतील, वाहतुकीचे नियम पाळत असतील तर?
पाहीजे. सोशल इश्यु आहे हा. या
पाहीजे. सोशल इश्यु आहे हा. या दमनामुळे बस-ट्रेनमध्ये धक्के मारणे, वेडेवाकडे ओंगळवाणे स्पर्श करणे आदि प्रकार होतात की काय कोणास ठाउक
हा एक छान मुद्दा आहे.
आपण भारतीय सार्वजनिक वाहनात स्त्री ला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो.
गर्दीचा फायदा घेवून विकृत हरकत करतो ते पश्चिमात्य देशात होत नाही.
त्या विषयी आग्रह धरा.
त्या मुलीने समजा मुलाच्या
त्या मुलीने समजा मुलाच्या कानफटात वाजवली असती तर ? तशी कृती करण्यामागे नक्कीच काहीतरी दोघांमध्ये घडले असणार असेल आणि आजूबाजूच्या लोकांचा त्यावेळी तिने विचार केला नसेल असं समजून कोणीही तिला दटावले नसते, किस घेण्याच्या कृतीमागेही असंच काही घडले असावे.
सामो+११,
सामो+११,
राजेश कुणी, कुठे आणि कश्याप्रकारे प्रेम व्यक्त कराव. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे.
तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आपले सार्वजनिक ठिकाणी शिस्तीने वागायला हवे पटले.याची सुरवात स्वतःपासुन करायला हवी.
https://www.quora.com/Is
https://www.quora.com/Is-kissing-in-public-in-India-a-criminal-offence-I...
इज किसिंग इन पब्लिक प्लेस अ क्राईम इन इंडिया या प्रश्नाला काही ठोस उत्तर दिसत नाहीये ... The Indian Penal Code states that anyone who “does any obscene act in any public place” may be subject to arrest. .. या ऑबसिन ऍक्ट मध्ये सार्वजनिक ठिकाणी / उघड्यावर जिथे लोक पाहू शकतील अशा ठिकाणी एक नंबर - दोन नंबर करणे येत नसावेत बहुधा .. ठीक आहे ते नेचर कॉल्स आहेत आणि सरकार त्यांच्यासाठी पुरेशा व्यवस्था उपलब्ध करून देऊ शकत नाही ... त्यावेळी पब्लिक जास्त करून स्त्रियांना नजर फिरवून घ्यावी लागते याबाबत कोणाला आजवर काही फरक पडलेला नाही किंवा धागा काढण्याइतपत त्यात काही गंभीर वाटलेलं नाही .
निम्नवर्गीय , निम्नमध्यमवर्गीय 14 - 15 वर्षांच्या किंवा कायद्यापुढे अगदीच नाईलाज म्हणून 18 झाल्या झाल्या अजूनही पोरींचे हात पिवळे करून मोकळे होतात , काही राज्यांमध्ये तर अगदी सधन कुटुंबातल्या मुलींचीही .... मग वर्ष दोन वर्षात कडेवर एखादं लेकरू खेळू लागतं ... त्याबद्दल कोणाला काही पडलेली नसते , त्यांचं ते पाहून घेतील आपला काय संबंध हाच ऍटीट्यूड असतो .. हाडामांसाच्या लाखो जिवंत पोरींच्या आयुष्यांचे निर्णय त्यांची मर्जी विचारात न घेता घेतले जातात ( त्यात मॅरीटल रेपही आले ) त्याच्याशीही आपला काय संबंध असंच वाटत असतं , फक्त यांच्या स्वर्णिम उज्जवल संस्कृतीला धक्का लागता नये - तिथे फक्त यांचा संबंध येतो ... जे काही करायचं ते लग्न करून करा , चार भिंतीच्या आत करा .. मग आमची संस्कृती सुरक्षित राहील ..
असो .. ही जुनाट , भंगार विचारांची पिढी आणखी फारतर अर्धशतकात काळाच्या पडद्याआड होणार आहे , ही समाधानाची बाब आहे .. जास्तीत जास्त 1 शतक .. त्यानंतरच्या पिढ्यांना तरी भारतात मनासारखं आयुष्य जगता येईल .
किसिंग वरून ओंगळवाणे स्पर्श
किसिंग वरून ओंगळवाणे स्पर्श वरून लैंगिक दमन वरून मॅरिटल रेप -> शिकलया सवरल्या लोकांच्या विचारांची ऊड्डाणे पाहून त्या पॉसिबली अल्पशिक्षित हरियाणवी बाईला आजिबात दोष देववत नाही.
ही जुनाट , भंगार विचारांची पिढी आणखी फारतर अर्धशतकात काळाच्या पडद्याआड होणार आहे , ही समाधानाची बाब आहे .. >> नोप. संस्कृती कमॉडिटी सारखी वापरून फायदा मिळवणारे सगळ्या शतकात असतात. २१२१ मध्ये सुद्धा असतील.
परक्या स्त्री ला गर्दीचा
परक्या स्त्री ला गर्दीचा फायदा उचलत हलकासा का होईना तिच्या मर्जीविरुद्ध स्पर्श करणे आणि सार्वजनिक जागी आपल्या हक्काच्या गर्लफ्रेंडचे तिच्या संमतीने चुंबन घेणे हे एकूणच दोन भिन्न विषय आहेत. मिसळू नका. दोघांना एकाच पिंजरयात उभे करू नका.
https://www.akkarbakkar.com
https://www.akkarbakkar.com/confessions/my-mother-got-me-married-to-my-c... विषय वेगळा चालू आहे , आणखी कमेंट्स करून दुसरीकडे नेणार नाही , फक्त शिकल्यासवरलेल्या मुलीच्या बाबतीत घडलेली ही एक घटना इथे देत आहे , त्यावरून अल्पशिक्षित , आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभ्या नसलेल्या हजारो मुलींची काय अवस्था असेल याची कल्पना येईल , अनेकजणी सुखी होत असतीलही पण 100 % सुखी होत आहेत असा गैरसमज फक्त लोकांनी ठेवू नये असं वाटतं .
संस्कृती कमॉडिटी सारखी वापरून फायदा मिळवणारे सगळ्या शतकात असतात >>> युरोपीय देशात कुठे राहिले आहेत आता ..?
>>>>> परक्या स्त्री ला
>>>>> परक्या स्त्री ला गर्दीचा फायदा उचलत हलकासा का होईना तिच्या मर्जीविरुद्ध स्पर्श करणे आणि सार्वजनिक जागी आपल्या हक्काच्या गर्लफ्रेंडचे तिच्या संमतीने चुंबन घेणे हे एकूणच दोन भिन्न विषय आहेत. मिसळू नका. दोघांना एकाच पिंजरयात उभे करू नका.>>>>>> ऋन्मेष असे किसिंग हे ते प्रकार उत्तम. अनावश्यक लैंगिक दमन अनिष्ट असेच म्हणते आहे मी.
हाब - मी दोन प्रकार मिक्स करत
हाब - मी दोन प्रकार मिक्स करत नाहीये. किसिंग वगैरे दृश्ये लोकांच्या अंगवळणीच पडायला हवी. नको तिथे मज्जाव नकोच असेच म्हणतेय मी. हातात हात घेणे, चुंबन घेणे, या तारुण्यसुलभ भावना आहेत. जोवर अति होत नाही तोवर लोकांना यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही.
100 वर्षा नंतर च कोणाला
100 वर्षा नंतर च कोणाला माहित.
मुस्लिम कट्टर वादी जगावर स्वतःची सत्ता स्थापन करतील आणि बुरखा सिस्टम पण येईल.
पुढचं कोणाला माहीत काय घडेल ते.
पण मनासारखे वागणे म्हणजे आपण ज्या समाजात राहतो ज्या नियमांनी राहतो .
त्याच्या विरुध्द वागणे म्हणजे मनासारखे वागणे नक्कीच असू शक्रत नाही.
मध्ये असाच वाद दारू पिण्यासाठी बार मध्ये प्रवेश करण्याचे वय सरकारने ठरवले तेव्हा झाला होता.
काही अती सुधार वादी विचारवंत असे विचार व्यक्त करत होते
की कोणतीच बंधने सरकारने घालणे योग्य नाही स्वतः त्या व्यक्तीला दारू पुणे हे वाईट हे समजेल तेव्हा तो दारू सोडेल.
तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाण्यास हेच अतिरेकी सुधारणा वादी विचार कारणीभूत आहेत.16 वर्षात च मुलांना दारू,सिगारेट,गुटखा ह्यांची व्यसन लागत आहेत.
कारण सैल झालेली समाज बंधने.
पाहिले तंबाखू सुधा लांब कोपऱ्यात जावून खावी लागत असे आत्ता पोरगं बापा समोर दारू पितो.
मुलींना त्यांच्या मनासारखे वागायला मिळाले पाहिजे ,मिळालेच पाहिजे जावू ध्या ना ग्राउंड वर मिळवू ध्या खेळत प्रावीण्य,खूप क्षेत्र आहेत त्या मध्ये उत्तुंग भरारी मारू ध्या..की.
सर्वच जुने टाकावू नसते.
जसे अतिरेकी जुने विचार विघातक असतात तसेच अतिरेकी सुधारणावादी विचार सुद्धा घातक असतात..
मोठ्या शहरात लोकसंख्या हा एक
मोठ्या शहरात लोकसंख्या हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. एकांत मिळायचे वांधे. मिळाला तर तोही कितपत सुरक्षित हा प्रश्न. लॉजवर जाणे डेंजर वाटते. नुसत्या किसिंगसाठी सारखे परवडणारेही नसते. हल्ली कोणी मोबाईलवर क्लिप बनवतेय का हे वेगळेच टेंशन. मला पर्सनली रिक्षा सेफ वाटायची. मध्यंतरी व्हॉटसपवर एक रिक्षातलाही विडिओ पाहिला. शेजारून बाईकवरून जाणारयांनी काढलेला.
एखाद्याचा किसिंग सीन सुद्धा पॉर्न बघितल्यासारखे मिटक्या मारत लोकं बघतात तिथे परदेशाशी तुलनाच नको. प्रेमी युगुलांनी सार्वजनिक जागी काळजी घेणेच उत्तम.
+१००० ऋन्मेष.
+१००० ऋन्मेष.
प्रकार.
) तीही गेलीये
काय मूर्खपणा आहे हा मोबाईल
थोडीही प्रायव्हसी जी गच्चीवर वगैरे शक्य होती (आमच्या काळी
उत्तर प्रदेश सरकारने
उत्तर प्रदेश सरकारने पोलिसांना anti Romeo squads बनवायला सांगितले.
हे स्क्वाड्स प्रेमी युगुलांच्याच मागे लागले.
दुसरीकडे छेडाछेडी, विनयभंग इतकंच काय बलात्कार यांचा भोगाव्या लागलेल्या मुलींना साधल्या तक्रारी नोंदवायला ही आंदोलन, जीवनमरणाची लढाई लढावी लागली.
Our priorities are absolutely right.
पब्लिक प्लेसमध्ये किस करणं विकृत आहे की नाही माहीत नाही. पण त्याचे व्हिडियो काढून शेअर करणं ही नक्की विकृती आहे.
भरत +१
भरत +१
सामो मी म्हणतो आहे, किसिंगच्या ह्या तारूण्यसुलभ विषयावरून लैंगिक दमन वगैरे विचार डोक्यात का येतात ?
ऊत्तर राहू द्या... हेमाशेपो होते ह्या धाग्यावर.
1 ते 21 हे मुलांचं वय(ह्यात
1 ते 21 हे मुलांचं वय(ह्यात मुलगा आणि मुलगी दोन्ही येतात)
त्यांच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचे वय आहे.
ह्या वयात मुलांची शारीरिक वाढ होत असते मानसिक वाढ होत असते .
शारीरिक वाढ चांगली होण्यासाठी नियमित व्यायाम ,चांगला आहार आणि चांगले विचार खूप गरजेचे असतात.
ह्याच वयात शिक्षण सुद्धा चालू असते भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी योग्य शिक्षण होणे ,सर्व गोष्टीत प्रावीण्य मिळवणे हे ह्याच वयात करायच्या गोष्टी आहेत.
मोबाईल नी मुलांचे मैदानी खेळ हिरावून घेतले त्याचे परिणाम आता दिसायला survat झाली आहे.
आई वडिलांचे न पटल्या मुळे ,किंवा ते वेळ देत नाहीत म्हणून मुल आक्रमक होत आहेत ,व्यासणी होत आहेत.
ह्या समस्या पश्चिमात्य देशात दिसू लागल्या आहेत
योग्य वयात कौशल्य शिकावी,शारीरिक क्षमता वाढवावी ,सामजिक जाणीव निर्माण व्हावी हे विचार कधीच जुनाट होवू शकत नाहीत तर हे विचार अनंत काळासाठी योग्य आहेत.
सेक्स मधली विकृती म्हणजे तरी नक्की काय.
सेक्स ही एकाग्र चित्ताने,एकांतात करायची गोष्ट आहे.
आपण माणूस आहोत जनावरे नाही.
संस्कृत श्लोकात देखील असे
संस्कृत श्लोकात देखील असे काहीतरी लिहिले आहे ना.. कामातुरांना ना भयंम ना लज्जा.. फक्त मज्जा !
आपण उगाच संस्कृतीचा बाऊ करतो. प्राचीन संस्कृती फार प्रगत होती आपली या बाबतीत.
दर वेळीस पाश्चिमात्यांचे
दर वेळीस पाश्चिमात्यांचे अंधानुकरण केलेच पाहिजे का? आणि जर उत्तर हो असेल तर मग सार्वजनिक ठिकाणी ,पब्लिक transport मध्ये त्यांने वर्तन कसे असते, स्वच्छता ती लोकं किती कसोशीने पाळतात, गर्दी मध्ये धक्काबुक्की होवू नये म्हणून रांगेचा वापर कसा करतात , वाहतुकीचे नियम ते कसे पाळतात ह्या सगळ्याचे अनुकरण करावे आधी मगच गमजा कराव्यात.
एक साधा प्रश्न आहे जर त्या डब्यात कोणी आपल्या लहान मुलाना घेऊन बसले असते आणि तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देता देता त्यांच्या नाकी नऊ आले असते.
हे वर्तन नक्कीच अयोग्य होते !!!
भुत्याभाउ >> ++ १
भुत्याभाउ >> ++ १
एक साधा प्रश्न आहे जर त्या
एक साधा प्रश्न आहे जर त्या डब्यात कोणी आपल्या लहान मुलाना घेऊन बसले असते आणि तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देता देता त्यांच्या नाकी नऊ आले असते.
>>>
खरंय
पण दुर्दैवाने म्हणा की आणखी कश्याने, लहान मुलांनाही हल्ली हे कळू लागते लवकर. प्लेग्रूपला जायच्या आधीच मुले मोबाईल सहज हाताळून युट्यूब बघायला शिकतात. हा एक वेगळाच प्रश्न आहे खरे तर. यावर स्वतंत्र धागा हवा.
काही लोकांच्या लिखाणात एक
काही लोकांच्या लिखाणात एक इंग्लिश मध्ये असलेलं शब्द सारखा येतो .
इंग्लिश मध्ये तो शब्द लिहतात म्हणजे त्या शब्दातून व्यक्त होणारे भाव हे अतूच्य दर्जाचे असतात.
लग्नानंतर येणाऱ्या शारीरिक संबंध ना कायद्याच्या कचाट्यात आणा.
म्हणजे एकाधी विचारी स्त्री बोलली की माझ्या मना विरुद्ध नवऱ्यानी सेक्स केला तर त्या नवऱ्याला बलात्कारी ठरवा .
पण बंद दरवाजा मागे घडणाऱ्या ह्या घटनेला पुरावा कोठून आणणार ,ते सिद्ध कस करणार की मनाविरुद्ध झाले म्हणून.
Cc टीव्ही बेडरूम मध्ये सुद्धा बसवायचे का?
म्हणजे फुटेज कोर्टात सादर करता येईल.
कुटुंब खिळखिळी केली,आता नवरा बायको मधील संबंध सुधा स्फोटक करा.
मुळात काही विचार मला स्त्री मुक्ती वाल्यांचे बिलकुल पटत नाहीत.
त्यांचे विचार स्त्री चे भले करणारे नसतात तर ती अजुन असुरक्षित कशी होईल ह्याला प्राध्यान्य देणारे असतात
Pages