तुम्हाला मूलभूत गोष्टींसाठी किती खर्च येतो?

Submitted by कोहंसोहं१० on 18 November, 2019 - 15:04

मध्ये मी मित्राबरोबर त्याच्या लवकर रिटायरमेंट बद्दल चर्चा केली आणि त्यावेळी त्याने सध्या जीवनशैलीसाठी साधारण दोघांसाठी २०-२५ हजार रुपये खर्च येतो असे सांगितले होते. थोडेसे खोदून विचारल्यावर कळले के साधारण १० हजार अतिमूलभूत गोष्टींसाठी, ५ हजार मूलभूत गोष्टींसाठी आणि आणि वरचे ५-१० हजार चैनीसाठी आणि इतर खर्चांसाठी असे कळले. आत्यंतिक मूलभूत गोष्टींमध्ये रोटी, कपडा, वीजबिल, सोसायटी मेंटेनेनन्स, गॅस, मोबाईल यांचा समावेश होता. (घर लोन फ्री होते त्यामुळे त्याच्यासाठी समावेश नाही) तसेच मूलभूत गोष्टींमध्ये घरकामासाठी बाई, शहरात प्रवास (बस, टॅक्सी, रिक्षा, उबर)
इस्त्री (बाहेर देत असल्यास), वर्तमानपत्र, इंटरनेट, (आणि मुलांची शाळा, ट्युशन, इतर खर्च जे माझ्या मित्रासाठी नाही) यांचा समावेश होता.
आणि चैनीच्या गोष्टींमध्ये बाहेरचे खाणे, चित्रपट, नाटक, गाण्याचा प्रोग्रॅम, वीकएंड चा किंवा लांबचा प्रवास, छंद जोपासण्यासाठी केलेला खर्च, तर इतर मध्ये इन्शुरन्सचा हफ्ता, वन टाइम खर्च जसे की घराचे फर्निचर, रंग, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दिवाळी किंवा इतर काही कारणांमुळे गिफ्ट्स, जोडीदाराचा वाढदिवस, इतर मोठी खरेदी, घरकार्ये जसे की पूजा, पाहुणचार, देऊळ दक्षिणा किंवा होम-हवन, दवाखाना-आजारपण, घरपट्टी, पाणीपट्टी इत्यादींचा समावेश होता. मी फार खोलात जाऊन विचारले नाही परंतु विचार आला की मायबोलीकरांना विचारावे महिन्याला किती खर्च येतो. आता प्रत्येकाची लाइफस्टाइल वेगळी असल्यामुळे चर्चा फक्त अतिमूलभूत आणि मूलभूत गोष्टींवर राहिल्यास उत्तम.
प्रतिसादामध्ये खालील गोष्टी जरूर लिहाव्यात. बाकी सर्व तपशीलवार न सांगता ढोबळमानाने प्रकारानुसार सांगितले तरी चालेल.

शहर:
परिवार सदस्य संख्या:

अतिमूलभूत गोष्टींवर खर्च:
किराणा
भाज्या, फळे
कपडे
वीजबिल
गॅसबिल
मोबाईल बिल
सोसायटी मेंटेनन्स
घराचा हफ्ता (असल्यास)
मुलांच्या शाळा, कॉलेजचा खर्च (असल्यास)

मूलभूत गोष्टींसाठीचा खर्च:
घरकामासाठी बाई
शहरात प्रवास (बस, टॅक्सी, रिक्षा, उबर)
इस्त्री (बाहेर देत असल्यास)
वर्तमानपत्र
इंटरनेट

चैनीच्या गोष्टींसाठी खर्च:

इतर खर्च:

बघुयात कोणत्या शहरामध्ये साधारण किती खर्च येतो ते.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

माझी लाईफस्टाईल एव्हढी मेहनत घेऊन लिहून काढली त्यावर अवाक्षर नाही -------------->> हाहाहा तुमची लाइफस्टाइल म्हणजे एकदम भारीच बुवा. एका तासात ४०० गाड्या पुसणार आहात तुम्ही.....सोबत ग्रिनीज बुक आणि लिंक बुक ऑफ रेकॉर्डस् चे प्रतिनिधी नक्की जवळ ठेवा

ओके. या आधी लिहिलेले एकेवेळ बाजूला ठेऊन देऊ.
तुम्हाला ईतरांकडून काही माहिती हवी असेल तर त्यांचा थोडा विश्वास संपाद करण्यासाठी आधी तुम्ही तुमच्या मित्राचे २५००० खर्चाचे ब्रेक अप देणार का? (अशावेळी नाहक आपले ठेवायचे झाकून ... वगैरे म्हणी आठवतात लोकांना)
तुम्हाला ब्रेक अप देण्यासाठी ऊदाहरण किंवा टेंपलेट हवे असेल तर हे घ्या. हे मी तुमच्या आधीच्या धाग्यावर एका वर्किंग बॅचलरच्या महिन्याच्या मूल्भूत खर्चाचे ४५००० चे ब्रेक अप दिले होते.

सरासरी १०% टॅक्स ५०००
घरभाडे ५०००
खाणेपिणे १००००
गाडीचा हप्ता २०००
फोन्/ईंटरनेट्/युटिल ३०००
पेट्रोल/ट्रान्स्पोर्ट ५०००
ग्रुमिंग्/जिम/मेंटे/फॅशन ३०००
ईंश्युरन्स २०००
डिपार्टेमेंटल स्टोर ५०००
वीकेंडचे लहान सहान मनोरंजन ५०००

आता अजून मी किंवा ईतर कोणी फाटे फोडू नये असे वाटत असेल तर मित्राचे २५००० खर्चाचे आयटमाईझ्ड ब्रेक अप येऊद्या पाहून झटकनी

ओके. या आधी लिहिलेले एकेवेळ बाजूला ठेऊ -----> Happy

आता अजून मी किंवा ईतर कोणी फाटे फोडू नये असे वाटत असेल तर मित्राचे २५०० खर्चाचे आयटमाईझ्ड ब्रेक अप येऊद्या पाहून झटकनी ----> लेखामध्ये मी आधीच लिहिले आहे की "मी फार खोलात जाऊन विचारले नाही परंतु विचार आला की मायबोलीकरांना विचारावे महिन्याला किती खर्च येतो. आता प्रत्येकाची लाइफस्टाइल वेगळी असल्यामुळे चर्चा फक्त अतिमूलभूत आणि मूलभूत गोष्टींवर राहिल्यास उत्तम."
तुम्ही धागा नीट न वाचता पुन्हा तेच ते प्रश्न विचारून फाटे फोडतच आहात. आधी लिहिल्याप्रमाणे तुम्हाला अजूनही वाटत असेल की २५००० पुरेसे नाहीत ज्यासाठी तुम्ही आयटमाईझ्ड ब्रेकअप मागताय तर एक नवीन धागा जरूर काढा आणि आपण तिकडे चर्चा करू. तोपर्यंत मी विचारून ठेवेन आणि धागा आला की इथे टंकेन.

ओके मित्र आणि २५ हजारही बाजूला राहू द्या..

तुम्ही तुमच्या मते, भारतात ( ऊदा. पुण्यात) मुलभूत आणि अतिमुलभूत गोष्टींसाठी महिन्याकाठी किती खर्च येऊ शकेल त्याचे ब्रेकअप देऊ शकता का?

तुम्ही तुमच्या मते, भारतात ( ऊदा. पुण्यात) मुलभूत आणि अतिमुलभूत गोष्टींसाठी महिन्याकाठी किती खर्च येऊ शकेल त्याचे ब्रेकअप देऊ शकता का? ----> इथे माझे मत घेऊन काहीच उपयोग नाही. तुम्ही धागा काढा नवीन मी माझे मत देईन तिथे. इथे चर्चा भरकटावी अशी इच्छा नाही. फॅक्ट्स फिगर्स हव्या होत्या (खास करून मिळाले तर पुण्याच्या बाहेर राहतात त्यांच्याकडून) म्हणूनच धागा काढलेला.

इथे माझे मत घेऊन काहीच उपयोग नाही. >> असे तुम्हाला का वाटते? तुम्ही भारतात राहिला आहात तुम्हाला काही तरी बेसलाईन फिगर्स अणि फॅक्ट माहीत असतिल ना? त्यानुसार लिहा. चूक बरोबर असे काही नाही,तुमच्या अंदाज आणि अनुभवाप्रमाणे लिहा.
तुम्ही लिहा म्हणजे बाकीचेही लिहितील.

हा धागा उघडण्याचे खरे कारण म्हणजे मुलभूत म्हणजे बेबी घोस्ट असे वाटले होते. घोस्टहंटर्स असतात तसे काही असावे, त्यासाठी खर्च विचारला असेल अशी कल्पना झाली.

तुम्हाला कळंत नाहीये का कळून घ्यायचं नाहिये?
मूलभुत काय किंवा अतीमूलभूत काय खर्च आपण करू तितका कमी/ जास्त असतो हे वर अनेक लोकांनी लिहिलं आहे.

साधं दूध घ्या. अमेरिकेत ०% १% २% ३.२५% याबेसिक चार व्हरायटी. मग साधं, ऑर्गॅनिक, लॅक्टोज फ्री इ. आणि त्यात हे वरचे चार फॅट कंटेंट. मग हे लोकल किराणा दुकानातून घेताय, कॉस्को मधुन घेताय का होल फूड्स मधुन घेताय त्याप्रमाणे आणखी व्हेरिएशन. हे सगळ पकडलं तर १ गॅलन दूध २.५० डॉलर ते ८ -८.५० $ या रेंज मध्ये मिळंत. आणि हे प्र-त्ये-क गोष्टीला लागू पडतं.
भारतात ही लोकल भैयाचं दूध (:खोखो:), लोकल डेअरी मधलं दूध, पिशवी मधलं दूध, कमी फॅटचं/ जास्त फॅटचं याने असाच फरक पडतो. सो आयटमाईझ करुन सांगितला तरी करायचं काय त्याचं??? मी जर गोकूळचं दूध पितो (पुण्यात असलात तर चितळे म्हणा) तर पितो! ते बंद करुन मी भारत डेअरीचं दूध पिणार नाहिये तर ते दूध पिणार्‍याचा खर्च कमी आहे ते कळून मला काय फायदा? मी लंगोट वापरत असेन आणि दुसरा कोणी भारी डिझायनर लाँज्रे वापरत असेल, आता अंतवस्त्र ही मूलभूत गरज मानली तरी ती गरज भागवायला ५ रुपये ते ५००० रुपये ही रेंज असेल तर ती रेंज समजण्याचा मला काय उपयोग?
हे म्हणजे भाट्याच्या खाडीत बुडणार्‍याला विश्वेश्वराच्या घाटावरुन कुराण वाचुन दाखवण्यासारखे आहे. त्याचा ह्यास उपयोग नाही ह्याचा त्यास उपयोग नाही! Happy

हे म्हणजे भाट्याच्या खाडीत बुडणार्‍याला विश्वेश्वराच्या घाटावरुन कुराण वाचुन दाखवण्यासारखे आहे. त्याचा ह्यास उपयोग नाही ह्याचा त्यास उपयोग नाही! -------->>>> इथे अगदी पैशामध्ये हिशोब नकोच आहे. साधारण खर्च किती होतो ते विचारले आहे आणि बरेचसे प्रतिसाद आले कि त्यातून ढोबळमानाने अंदाज येतो खास करून मूलभूत खर्चाचा कारण त्यामध्ये व्हेरिएशन फार नसते. उपयोग योग्य पद्धतीने केल्यास सगळ्याचाच असतो. कदाचित तुम्ही तो करू शकत नसाल किंवा तुम्हाला त्याचा उपयोग कसा करावा हे समजत नसावे परंतु त्याचा अर्थ असा नाही कोणीच करू शकणार नाही

इथे अगदी पैशामध्ये हिशोब नकोच आहे. साधारण खर्च किती होतो ते विचारले आहे>>>
साधारण असो वा असाधारण, पैशात नाही तर कशात हिशोब द्यायचा?

प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही काय म्हणता आहात, तुम्हाला नक्की काय हवे आहे आणि का हे इथे कोणालाही कळलेले नाही.
आपल्या मूलभूत गरजा सांगा आणि त्यांचा खर्च सांगा असे तुम्हाला अपेक्षित असेल तर इतर लोक म्हणाले तसे अशी माहिती अनोळखी लोकांना कोणी देत नसते.
तुम्ही म्हणाल त्यात काय आहे न देण्यासारखे.. तर साहेब असे म्हणण्यासाठी ती माहिती पाहिल्याने तुम्ही देणे अपेक्षित आहे.

तुमचा मित्र २५,००० करतो खर्च.
आता इथला आकडा ५०,००० आला किंवा १५,००० आला तर मित्र खर्च वाढवणार आहे का कमी करणार आहे? बहुदा काहीच करणार नाहिये.
मग त्याला इतरांपेक्षा कमी खर्चात जगतो याचा सात्विक आनंद मिळायला धागा काढलाय का आणखी कोणी आपल्या खाली आहे याचा आनंद हवाय? का आणखी फ्रुगल जगण्याच्या टिप्स हव्यात?
>> बरेचसे प्रतिसाद आले कि त्यातून ढोबळमानाने अंदाज येतो खास करून मूलभूत खर्चाचा कारण त्यामध्ये व्हेरिएशन फार नसते. >> यातच तर कॅच आहे. 'बरेचसे' हा आकडा स्टॅटिस्टिकली मिनिंगफुल व्हायला इथले प्रतिसाद पुरेसे नाहीत, आणि विचारण्याची पद्धत भोंगळ आहे. काटेकोर नसल्याने त्यातील आकड्यांना काही फारसा अर्थ नाही. अनॉनिमिटी नसल्याने कोणी प्रतिसाद देत नाही तो आणखी एक वेगळा भाग.

आता इथला आकडा ५०,००० आला किंवा १५,००० आला तर मित्र खर्च वाढवणार आहे का कमी करणार आहे? बहुदा काहीच करणार नाहिये. ----> तेच तर. तुम्हाला हे वाटत असले तरी वस्तुस्थिती वेगळी असू शकते. त्यामुळे तुम्ही तुमचा निष्कर्ष टायपून मोकळे होण्यापेक्षा विचारलेली माहिती दिल्यास (द्यायची इच्छा असल्यास) उत्तम.
' 'बरेचसे' हा आकडा स्टॅटिस्टिकली मिनिंगफुल व्हायला इथले प्रतिसाद पुरेसे नाहीत ---------> ही माहिती after the fact झाली जी धागा काढताना आधी थोडीच कळणार.
अनॉनिमिटी नसल्याने कोणी प्रतिसाद देत नाही तो आणखी एक वेगळा भाग ----> इथल्यापेक्षा अनॉनिमिटी अजून कोणती जास्त असणार. आता प्रतिसाद कमी आले कारण अनॉनिमिटी असूनपण माबोकर का लिहीत नसावेत हा वेगळा मुद्दा झाला. कदाचित "आयडी" वरून का होईना लोकांनी काही आराखडे काढू नयेत हा उद्देश असावा. असो.
बऱ्याचदा धाग्याचे प्रतिसाद विषापासून भरकटले की धाग्यानुरूप प्रतिसाद देणाराही हात आखडता घेतो. बाकी धाग्याला भरकटवण्यात आणखी भर घातल्याबद्दल धन्यवाद Happy

"लवकर रिटायरमेंट" घेऊन मग पुढील आयुष्यात अंदाजे "मुलभुत किती खर्च " होईल असे हे एकाच विषयावर दोन धागे आहेत का?
- मला पडलेला मुलभुत प्रश्र

त्यांना म्हणावे आता घरातून कामवाली बाई (भांडी घासणारी), स्वैयंपाक करणारी बाई आणि किराणा माल ( धान्य - तेल - आंटा आणि भाज्या - असे जेवण बनवण्यास लागेल ते फक्त) आणि गॅस सिलंडर व किचनच्या मिक्सर ओवन वगैरेसाठी लागणारी रोजची १ तासाची विज (थोडक्यात विज बिलात बचत) हे सर्व खास करून महाराष्ट्रात नक्कीच शक्य आहे तेव्हा भविष्याची चिंता नसावी.
फक्त १० रूपयांमध्ये जेवण मिळणार म्हणजे एका नवरा बायकोच्या अक्खा महीना / दोन्ही जेवणाचा खर्च अवघ्या १२०० रुपयांची गोष्ट झाली.

सद्यघरखर्च २५००० मधून असे वाचलेले पैसे त्यांना आजन्म चैनीत जगायला पुरतील.

कोहंसोहं ,
एका तासात ४०० गाड्या पुसणे जास्त वाटत असेल तर वेळ वाढवू किंवा गाड्या कमी करू. पण मुलभूत खर्च दिलेत ना. त्याबद्दल बोला की. एव्हढे कष्ट घेतले त्याची टिंगल करणार असाल तर कोण लिहील इथे इथून पुढे ?

कोहंसोहं१०, या धाग्याचा उद्देश महाराष्ट्रातल्या इतर शहरांमध्ये/गावांमध्ये दर महिन्याला किती घरखर्च येतो असा आहे असं मला वाटतं. तुमच्या मित्राला पुणे सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन रहावे असे वाटते आहे का? आणि त्या साठी हा अंदाज हवा आहे का?
तसे असेल तर माझ्या मते घरखर्च हे काही योग्य मापक नाही cost of living साठी. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या शहरात/गावात 1bhk आणि 2bhk साठी घरभाडे किती पडेल असा प्रश्न विचारावा. घरभाडे + इतर घर देखभाल खर्च हे उत्पन्नाच्या ३३% पेक्षा अधिक असू नयेत असा ढोबळ नियम आहे. शहरागणिक घरभाडे, किराणा आणि घरकामाचे पैसे या गोष्टी बदलतात. बाकी खर्च हे तसे सारखेच असतात (मोबाईल, केबल, वीजदर). शिवाय कुटुंब सदस्य संख्या, शैक्षणिक खर्च हे सारे फार कुटुंबसापेक्ष खर्च आहेत. ते विचारून फारसा उपयोग नाही. तेव्हा शहर/गावांमध्ये घरभाडे किती आहे हे विचारणे अधिक योग्य ठरेल.

शहर: हैद्राबाद
परिवार सदस्य संख्या: २ + येत जात रहाणारे पाहुणे.

अतिमूलभूत गोष्टींवर खर्च:
किराणा: ५०००
भाज्या, फळे: ३०००
कपडे: २५००
वीजबिल: १५००
गॅसबिल: ३००
मोबाईल बिल : ४१०
सोसायटी मेंटेनन्स: १२००
घराचा हफ्ता (असल्यास): आहे पण सांगायचा नाहीये.
मुलांच्या शाळा, कॉलेजचा खर्च (असल्यास)

मूलभूत गोष्टींसाठीचा खर्च:
घरकामासाठी बाई: २३०० (कार पुसणे खर्च धरून)
शहरात प्रवास (बस, टॅक्सी, रिक्षा, उबर) : डिझेल आणि पेट्रोल- २०००
इस्त्री (बाहेर देत असल्यास): ३००
वर्तमानपत्र : शून्य
इंटरनेट : ५४०

चैनीच्या गोष्टींसाठी खर्च: हिशेब ठेवत नाही, ठेवायची इच्छा नाही.

इतर खर्च: हिशेब ठेवत नाही, ठेवायची इच्छा नाही.

इथे प्रत्येक शहराचा ढोबळ खर्चाचा ताळेबंद मिळेल. >> अर्रर्र हे काय केलेत योकु Uhoh
अशी रेडीमेड माहिती/टूल नकोचे आम्हाला.. मायबोलीकरांचीच पर्सनल माहिती पाहिजे आहे.

अर्रर्र हे काय केलेत योकु....अशी रेडीमेड माहिती/टूल नकोचे आम्हाला.. मायबोलीकरांचीच पर्सनल माहिती पाहिजे आहे. >>>>>>>>>> हो ना इतकी पर्सनल की दिलेल्या माहितीबरोबर नाव, पत्ता, बँक अकाउंट नंबर, पॅन नंबर हेही द्या असे सांगितले होते जेणेकरून ती व्यक्ती नक्की कोण आहे हे ओळखता येईल.

मला कार लागते. मळमळते उलट्या होताय. बाय रोड मी जास्त प्रवास करत नाही शक्यतो. रोजचा तर अशक्यच. त्यामुळे रोजचा तासभर कॅब कारचा प्रवास करण्याऐवजी ऑफिसजवळ दहा पंधरा मिनिटांवर घर घेऊन राहणे उत्तम असे मला वाटते. वैयक्तिक मत. स्वत:च्या तब्येतीला झेपेल या हिशोबाने घेतलेला निर्णय.

दुसरी गोष्ट म्हणजे प्रदूषण ओकणारया कार विकत घेऊन मला पर्यावरणावर हल्ला चढवायचा नाहीये. रोजचा प्रवास कमी ठेवावा आणि सायकल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावे हे उत्तम.

मुंबई ते नवी मुंबई लोकलनेच प्रवास करायचो.

असो
माझ्या मूलभूत आणि फिक्स खर्चाचा ब्रेक अप देतो.

सदस्य - ३

घरभाडे - २५ हजार
लाईट बिल - ६ हजार
३ मोबाईल + वायफाय + टाटा स्काय + गॅसबिल - ३ हजार
प्रवासखर्च रिक्षा ओला ट्रेन - ६ हजार
विकेंड मूलभूत मौजमजा - १० हजार
वीकडेज मौजमजा अरबट चरबट खाणे - ३ हजार
महिन्याचे रेशन, डीमार्ट, बिगबास्केट शाहरूख खान वगैरे - १५ हजार
ऑफिस लंच नाश्ता - २ हजार
माझी रोजची मूलभूत औषधे - १० हजार

ईथवर ८० हजार होतात.
याऊपर कपडेलत्ते, उपकरणे, भांडीकुंडी हे खर्च वर्षाचे काढून महिन्याचा वाटा लिहीणे त्रासदायक आहे. पॉलिसी हफ्ते सेविंगमध्ये येत असल्याने धरले नाही.

हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म प्लानची लाइफ पॉलिसी हे सेव्हिंग्ज नाहीत. ते फक्त आणि फक्त खर्च आहेत. बाकी कसली हायब्रीड पॉलिसी असेल तर ती तुमच्यापेक्षा इन्शुरन्स कंपनी आणि एजंट यांच्या जास्त फायद्याची आहे.

असो.

मुद्द्याला धरून प्रतिसाद असं वाचलं.
त्या सव्वा करोडच्या धाग्यावर बहुतेक प्रतिसाद मुद्द्याला धरून होते. त्या धाग्याचं फलित काय निघालं? त्याचा धागालेखकाने काय उपयोग केला? किमान त्याला फायनान्शल प्लानरकडे पाठवलं का?

मुळात एका जबाबदार माणसाने स्वतःच्या आयुष्याबाबत काही निर्णय घेतल्यावर तो बरोबर की चूक हे विचारणं , त्याला त्याच्या आर्थिक बाबींबर प्रश्न विचारणं हे मित्राच्या नात्यात भोचकपणाचं आहे. (फायनान्शल प्लानर हेच काम पैसे देऊन क्लप्रोवाअ‍ॅडव्हायसरच्या नात्याने करेल.)
पुढचा भाग त्याच्या निर्णयाचं व्हॅलिडेशन सातासमुद्रापलीकडून क्राउड सोर्सिंगने करणं याचं योग्य वर्णन करणारा शब्द सुचत नाहीए.

मला या दोन्ही गोष्टी अतर्क्य वाटतात. एकतर उगा च टाइमपाससाठी काढलेला धागा वाटतोय किंवा जे सांगितलंय त्यापेक्षा बरंच काही लपवलंय असा संशय येतो.
असो दोन्ही धाग्यांवर वेळ घालवला. त्यातला काही वाया गेला.

ऑफिसपासून दहा मिनिटांवर घर असून आता प्रवास खर्च रिक्षाओलाट्रेन ६००० रुपये का बरं?
गोंधळ घालणारे आणखी दहा प्रतिसाद तयार आहे त आणि हा माइन ट्रॅप आहे हे माहीत असूनही तो प्रतिसाद विषयाला धरून असल्याने त्याला पुरवणी.

Pages