मध्ये मी मित्राबरोबर त्याच्या लवकर रिटायरमेंट बद्दल चर्चा केली आणि त्यावेळी त्याने सध्या जीवनशैलीसाठी साधारण दोघांसाठी २०-२५ हजार रुपये खर्च येतो असे सांगितले होते. थोडेसे खोदून विचारल्यावर कळले के साधारण १० हजार अतिमूलभूत गोष्टींसाठी, ५ हजार मूलभूत गोष्टींसाठी आणि आणि वरचे ५-१० हजार चैनीसाठी आणि इतर खर्चांसाठी असे कळले. आत्यंतिक मूलभूत गोष्टींमध्ये रोटी, कपडा, वीजबिल, सोसायटी मेंटेनेनन्स, गॅस, मोबाईल यांचा समावेश होता. (घर लोन फ्री होते त्यामुळे त्याच्यासाठी समावेश नाही) तसेच मूलभूत गोष्टींमध्ये घरकामासाठी बाई, शहरात प्रवास (बस, टॅक्सी, रिक्षा, उबर)
इस्त्री (बाहेर देत असल्यास), वर्तमानपत्र, इंटरनेट, (आणि मुलांची शाळा, ट्युशन, इतर खर्च जे माझ्या मित्रासाठी नाही) यांचा समावेश होता.
आणि चैनीच्या गोष्टींमध्ये बाहेरचे खाणे, चित्रपट, नाटक, गाण्याचा प्रोग्रॅम, वीकएंड चा किंवा लांबचा प्रवास, छंद जोपासण्यासाठी केलेला खर्च, तर इतर मध्ये इन्शुरन्सचा हफ्ता, वन टाइम खर्च जसे की घराचे फर्निचर, रंग, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दिवाळी किंवा इतर काही कारणांमुळे गिफ्ट्स, जोडीदाराचा वाढदिवस, इतर मोठी खरेदी, घरकार्ये जसे की पूजा, पाहुणचार, देऊळ दक्षिणा किंवा होम-हवन, दवाखाना-आजारपण, घरपट्टी, पाणीपट्टी इत्यादींचा समावेश होता. मी फार खोलात जाऊन विचारले नाही परंतु विचार आला की मायबोलीकरांना विचारावे महिन्याला किती खर्च येतो. आता प्रत्येकाची लाइफस्टाइल वेगळी असल्यामुळे चर्चा फक्त अतिमूलभूत आणि मूलभूत गोष्टींवर राहिल्यास उत्तम.
प्रतिसादामध्ये खालील गोष्टी जरूर लिहाव्यात. बाकी सर्व तपशीलवार न सांगता ढोबळमानाने प्रकारानुसार सांगितले तरी चालेल.
शहर:
परिवार सदस्य संख्या:
अतिमूलभूत गोष्टींवर खर्च:
किराणा
भाज्या, फळे
कपडे
वीजबिल
गॅसबिल
मोबाईल बिल
सोसायटी मेंटेनन्स
घराचा हफ्ता (असल्यास)
मुलांच्या शाळा, कॉलेजचा खर्च (असल्यास)
मूलभूत गोष्टींसाठीचा खर्च:
घरकामासाठी बाई
शहरात प्रवास (बस, टॅक्सी, रिक्षा, उबर)
इस्त्री (बाहेर देत असल्यास)
वर्तमानपत्र
इंटरनेट
चैनीच्या गोष्टींसाठी खर्च:
इतर खर्च:
बघुयात कोणत्या शहरामध्ये साधारण किती खर्च येतो ते.
हैद्राबादला मोलकरीण फक्त 2300
हैद्राबादला मोलकरीण फक्त 2300 रुपये!
अगदी कमी खर्चाचे ते जास्ती
अगदी कमी खर्चाचे ते जास्ती असे प्रतिसाद आहेत. त्यांच्या गरजांप्रमाणे ते मूलभूत आहेत.
--------
ज्यांना इंटरनेट घरी आणि मोबाईल दोन्ही फास्ट लागतं त्यांचा मूलभूत खर्च २०००+ होणारच.
----
शहराचा आवाका आणि टॉवर वाढल्याने लोकसंख्या वाढली. तसेच सुखवस्तू वस्ती तयार झाली. पसारा दहा किमीपर्यंत वाढला. १२००+चौफुटांचीही घरे. तर अशा ठिकाणी येणाऱ्या मोलकरणी दोन किमी अंतरावरून येत नाहीत, दहा किमिवरून रिक्षाने येतात. प्रत्येक भांडी, केरवारा लादी, कपडे धुणे याचे सातशे रु दर आहे. त्यांचीही मुले शिकून कमावती झाल्यावर आईला सांगतात आता ही कामे करू नकोस.
भाजीबाजार कमी होत आहेत. डीमार्ट वाढत आहेत. तिथे महागडे कमी केलेले दर असतात.
एकूण मुलभूत गरजांचे खर्च स्तर वाढत आहेत या कोनातून पाहू शकतो.
आम्ही लहानपणी शाळेत चालत जायचो, मग बागेत खेळायला जायचो म्हणून आताच्या आया तसे सोडत नाहीत. रस्ते ओलांडणे, इतर धोके वाढलेत त्यामुळे शाळेला जाण्यासाठी बस, क्लासला स्कुटरवरून सोडणे, इतर क्लासेसना रिक्षा असे खर्च वाढलेत.
नवीन टावरात म्हातारा म्हातारी राहात असतील, पूल - जिम- लाईब्री कोर्ट इकडे फिरकतही नसले तरी तो एक्सट्रा मेंटेनन्स भरावा लागतोच.
मायबोलीवर सभासद आवाका अधिक असल्याने इकडे सर्च केला असेल असं मी धरतो. भरत यांच्या शंका रास्त आहेत पण शेवटी कोणीतरी पुढाकार घेऊन डाइरेक्ट विचारत आहे. आडून तरी माहिती गोळा करत नाही.
हैद्राबादला मोलकरीण फक्त 2300
हैद्राबादला मोलकरीण फक्त 2300 रुपये!>>
एकेका कामाचे (भांडी, झाडूपोचा, कपडेधुणे, डस्टिंग) प्रत्येकी ₹९०० आहेत. दोन कामाचे १८०० + कार पुसणे (तिचा नवरा करतो) ₹५०० .
ऑफिसपासून दहा मिनिटांवर घर
ऑफिसपासून दहा मिनिटांवर घर असून आता प्रवास खर्च रिक्षाओलाट्रेन ६००० रुपये का बरं?
>>>>
ट्रेनची दोन स्टेशन आहेत. ५ मिनिटे. ट्रेनचा मासिक पास ३९० रुपये.
रिक्षा २५+२५ = ५० रुपये रोजचे. २० दिवसाचे हजार पकडा.
दिड हजार ऑफिसचाच खर्च.
बाकी आई वडीलांचे रोजचे रिक्षाने फिरणे असते. मार्केट मंदीर समव्यस्कांचा कट्टा, छंद. दुनियादारी वगैरे चालू असते.नवी मुंबईत रिक्षा खर्च फार आहे.
तसेच मुंबई ते नवी मुंबई ओलाने वारया चालू असतात. महिन्याला सरासरी तीनचार पकडल्या तर येऊन जाऊन ३ ते ४ हजार तिथेच जातात.
मोलकरीण आमचीही राहिली. २.५
मोलकरीण आमचीही राहिली. २.५ हजार आणखी जोडा माझ्या ८० हजारात
हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म
हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म प्लानची लाइफ पॉलिसी हे सेव्हिंग्ज नाहीत.
>>>
हो याची कल्पना आहे. लिहितानाही विचार आलेला हा मनात.
हेल्थ इन्शुरन्स नाही घेतलाय अजून
आणि टर्म प्लान महिन्याचे हजारच जात असल्याने हिशोबात पकडले नाहीत.
एकेका कामाचे (भांडी, झाडूपोचा
एकेका कामाचे (भांडी, झाडूपोचा, कपडेधुणे, डस्टिंग) प्रत्येकी ₹९०० आहेत.
>>>
९०० जास्त आहेत. हैदराबाद अमेरीकेत येते का?
येऊन जाऊन असते.
येऊन जाऊन असते.
Saari duniya ek taraf
Saari duniya ek taraf Hyderabad ek taraf. Runmesh you can come to Thane from New Bombay and take a local to cst. Saves money.
हैदराबाद अमेरीकेत येते का?>>>
हैदराबाद अमेरीकेत येते का?>>>
बरेचसे अमेरिकेतच आहे..
<ट्रेनची दोन स्टेशन आहेत. ५
<ट्रेनची दोन स्टेशन आहेत. ५ मिनिटे. ट्रेनचा मासिक पास ३९० रुपये.
रिक्षा २५+२५ = ५० रुपये रोजचे. २० दिवसाचे हजार पकडा.>
बिल्डरच्या जाहिरातीतली दहा मिनिटं दिसताहेत. विमानतळापासून दहा मिनिटांवर हे विमानाने दहा मिनिटे असू शकेल मग.
हा प्रतिसाद विषयाला धरून आहे.
आमच्याकडे मिनिमम दर हजार
आमच्याकडे मिनिमम दर हजार रुपये आहे प्रत्येक कामाचा. गाडी पुसायचे 300 आहेत पण
भरत, दुसऱ्या धाग्याचा प्रश्न
भरत, दुसऱ्या धाग्याचा प्रश्न इथे उपस्थित करण्याची गरज नव्हती. एकीकडे विषयानुरूप चर्चा व्हावी हा आग्रह समजला हे दाखवायचे आणि त्याचवेळी दुसऱ्या धाग्याचा विषय इथे मांडायचा हा दुटप्पीपणा झाला. वरचे केलेले प्रश्न तुम्ही योग्य धाग्यावर केले असते तर जास्त बरे झाले असते. असो आता आपण विचारत आहात तर इथेच उत्तर देतो.
माझ्या एका अन्य धाग्यावर विचारलेल्या प्रश्नाचे पुढे काय झाले असे विचारलेत.. धाग्यावर जे काही विचारले होते त्यावर माबोकरांनी आपापली मते मांडली आणि चर्चा झाली. धाग्यावर मी प्रतिसादामध्ये वेळोवेळी नमूद केलेले की माबोकरांच्या विचार मित्रांपर्यंत नक्की पोहोचवेन. चर्चा एका वळणावर थांबली. आता पुढे मित्राने काय निर्णय घेतला हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे व त्याच्याशी तुम्हाला काहीही घेणेदेणे नाही. इथे अनेकजण आपले वैयक्तिक किंवा जवळच्या मित्राचे, नातेवाईकांचे प्रश्न विचारतात ज्यामध्ये सासू सुनांची भांडणे, नवऱ्याबरोबरचे बिघडलेले संबंध, लग्न, डायव्होर्स यासंबंधी सल्ले मागतात, चर्चा करतात. त्यात तुम्ही सगळ्यांना हेच विचारता का की पुढे त्यांनी काय निर्णय घेतला ते? नसेल तर मग याच प्रकारात जाणून घेण्याची खुमखुमी कशासाठी? आणि विचारात असलाच तर तो भोचकपणा नाही का? तसेही तुम्ही एक वाचक म्हणून सुज्ञ असाल आणि दोन्ही धागे बारकाईने वाचले असतील तर तुम्हाला तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे त्यात मिळतील. अगदीच जाणून घ्यायचे होतेच तर जिज्ञासूपणे विचारले असते तर कदाचित सांगितलेही असते. परंतु तुमच्या विचारण्यात मात्र एक प्रकारचा संशयीपणा अविश्वासार्हता लगेच दिसून येते.
"मुळात एका जबाबदार माणसाने स्वतःच्या आयुष्याबाबत काही निर्णय घेतल्यावर तो बरोबर की चूक हे विचारणं , त्याला त्याच्या आर्थिक बाबींबर प्रश्न विचारणं हे मित्राच्या नात्यात भोचकपणाचं आहे">>>> त्याने घेतलेला निर्णय चूक की बरोबर हे मी विचारलच नाहीये. कदाचित धागा पुन्हा वाचण्याची तुम्हाला गरज आहे. तसेच माझ्या मित्राने माझ्याशी कोणत्या गोष्टी शेयर कराव्यात किंवा मी त्याच्याकडून कोणती माहिती मिळवावी हे मला तुम्ही सांगायची काहीच गरज नाही. मला एखादा मित्र असेल जो या गोष्टी मनमोकळेपणाने माझ्याशी बोलत असेल तर तुम्ही का जळताय? एवढा विश्वास ठेवणारा तुम्हाला एखादा मित्र नसेल किंवा तुम्ही कोणावर एवढा विश्वास ठेऊ शकत नसाल तर त्याला मी काही काहीच करू शकत नाही.
पुढचा भाग त्याच्या निर्णयाचं व्हॅलिडेशन सातासमुद्रापलीकडून क्राउड सोर्सिंगने करणं याचं योग्य वर्णन करणारा शब्द सुचत नाहीए.>>>>> माझा पूर्वीचा धागा खरंच पुन्हा वाचण्याची आपल्याला गरज आहे ज्यायोगे आपण जे गैरसमज करून घेतलेत ते तरी निदान दूर होतील. बाकी सातासमुद्रापारचे म्हणाल तर स्थानाचा इथे काहीही संबंध नाही. तुम्हाला नक्की जळफळाट कशाचा आहे? मी सातासमुद्रापार आहे याचा की सातासमुद्रापार राहूनही भारतात माझा एक जिवलग मित्र आहे जो माझ्याशी सर्व शेयर करतो याचा?
एकतर उगा च टाइमपाससाठी काढलेला धागा वाटतोय किंवा जे सांगितलंय त्यापेक्षा बरंच काही लपवलंय असा संशय येतो.>>>>>>> बाकी धाग्याच्या सत्यासत्यतेचे म्हणाल तर जे आहे ते मी सरळपणे लिहिले आहे. कुठेही गोल गोल जिलब्या नाहीत किंवा conflicting डिटेल्स नाहीत. आणि नंतर सारवासारव सुद्धा नाही. तसेही मी काही धाग्यावर प्रतिसाद द्या म्हणून तुम्हाला बोलावले नाही. तुम्हाला तो खरा वाटला किंवा नाही याने मला काहीच फरक पडत नाही किंवा तो वाटावा म्हणून मी प्रयत्नही करणार नाही.
एकदा वर आधी लिहिलेच होते (बहुतेक तुम्ही ते वाचले नसणारच आणि वाचले तरीही असे प्रतिसाद देऊन भोचकपणा केलाच) 'धाग्याला भरकटवण्यात आणखी भर घातल्याबद्दल धन्यवाद'
भरत, दुसऱ्या धाग्याचा प्रश्न
भरत, दुसऱ्या धाग्याचा प्रश्न इथे उपस्थित करण्याची गरज नव्हती. एकीकडे विषयानुरूप चर्चा व्हावी हा आग्रह समजला हे दाखवायचे आणि त्याचवेळी दुसऱ्या धाग्याचा विषय इथे मांडायचा हा दुटप्पीपणा झाला. <<<<<<< मध्ये मी मित्राबरोबर त्याच्या लवकर रिटायरमेंट बद्दल चर्चा केली आणि त्यावेळी त्याने सध्या जीवनशैलीसाठी साधारण दोघांसाठी २०-२५ हजार रुपये खर्च येतो असे सांगितले होते.
तसेच माझ्या मित्राने माझ्याशी कोणत्या गोष्टी शेयर कराव्यात किंवा मी त्याच्याकडून कोणती माहिती मिळवावी हे मला तुम्ही सांगायची काहीच गरज नाही. मला एखादा मित्र असेल जो या गोष्टी मनमोकळेपणाने माझ्याशी बोलत असेल तर तुम्ही का जळताय? >>> थोडेसे खोदून विचारल्यावर कळले के
सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद.
सविस्तर उत्तरासाठी धन्यवाद.
तुमचा मित्र फायनान्शल प्रवाशांकडे गेला की नाही किंवा जाणार आहे की नाही, हे काळजीपोटी विचारलं हो.
आणि त्यातून त्या चर्चेचं फलितही कळलं असतं.
तुमच्या रूपाने मायबोलीकरांना चांगला धडा मिळतो आहे, हे बाकी छान झाले.
हाब, माझा तो प्रतिसाद भरतच्या
हाब, माझा तो प्रतिसाद भरतच्या "त्या सव्वा करोडच्या धाग्यावर बहुतेक प्रतिसाद मुद्द्याला धरून होते. त्या धाग्याचं फलित काय निघालं? त्याचा धागालेखकाने काय उपयोग केला? किमान त्याला फायनान्शल प्लानरकडे पाठवलं का" ह्या मुद्द्यावर होता. नेहमीप्रमाणे तुम्ही न समजताच घाईगडबडीत प्रतिसाद दिलात.असो.
मनमोकळेपणाने माझ्याशी बोलत असेल तर तुम्ही का जळताय? >>> थोडेसे खोदून विचारल्यावर >>>>>> खोदून विचारल्यावर जे बोलला ते मनमोकळेपणाने असू शकत नाही का?
बाकी तुमचा प्रॉब्लेम काय आहे कळत नाही. या धाग्यावर सर्वात जास्त प्रतिसाद तुमचेच आहेत आणि त्यातला अक्षरशः एकही प्रतिसाद विषयाला धरून नाही. अगदी पहिल्या प्रतिसादापासून विषयाला फाटे फोडणारे प्रतिसाद दिलेत. सभ्य भाषेत वारंवार विनंती करूनही आपण विषयाला सोडून प्रतिसाद देण्याचा हेकेखोरपणा काही सोडला नाही. लिहिलेले व्यवस्थितपणे वाचले तर नाहीतच आणि प्रतिसादात दाखवून दिल्यावर मी असे म्हणालोच नाही असेही दिमाखात बोललात. शेवटी नाईलाजाने स्पून फीडिंग करतात तशी चूक दाखवून द्यावी लागली तेंव्हा ते जाऊदे म्हणून पुन्हा चर्चा दुसऱ्या मार्गाने भरकटवायला सुरुवात केली. बरे एवढ्या वेळा तोंडावर पडूनदेखील गप्प बसला नाहीत. ज्यांनी विषयाला धरून प्रतिसाद दिले त्यावर sarcastic कमेंट्स करायला सुरुवात केली आणि आता दुसऱ्या आयडी ची वकिली पण करताय.
माझा मानसशास्त्राचा थोडा अभ्यास आहे म्हणून सांगतो- व्यक्ती जेंव्हा खूप तणावाखाली असते किंवा मानसिक असुरक्षितता वाटत असते तेंव्हा अश्या प्रकारे वर्तन करते. तेंव्हा जरा Chill घ्या....अराम करा...गरज लागली तर मेडिटेशन करा.... नाहीतर असेच पुन्हा तोंडावर आपटत राहाल.
अय्या! हा धागा आता
अय्या! हा धागा आता गुंतवणुकीतून मनोविकार, मानसशास्त्र यांत हलवायला लागणार.
अय्या! हा धागा आता
अय्या! हा धागा आता गुंतवणुकीतून मनोविकार, मानसशास्त्र यांत हलवायला लागणार ----> बघा ना नाईलाज आहे शेवटी. अनेकदा सांगुनपण कळत नाही आणि कळत असेल तरी वळत नाही काय करणार
कोसो,
कोसो,
कृपया निरोपयोगी प्रतिसाद लिहू नका. अजूनही विषयाला धरून चांगली चर्चा होऊ शकते, फॅक्ट्स आणि फिगर्स येऊ शकतात.
थोडा पेशन्स ठेवा.
अजून इथेच का अड्कून पडलेत
अजून इथेच का अड्कून पडलेत सगळे ?
अमेरीकेतल्या मित्राला केसाचा कट करायचा आहे त्याला सल्ला द्या हा धागा मागे गेला ना.
मी अण अमेरिकेतल्या मित्राला आज रात्री फोन लावणार आहे. कदाचित धाग्याचा विषय मिळेल.
अमा, आता नवी मुंबईतच घर
अमा, आता नवी मुंबईतच घर घेतलेय. मुंबईतल्या घरात आईवडील येऊन जाऊन असतील. त्यांना ट्रेनची दगदग नको आणि परवडते म्हणून कॅब करतो. मला स्वत:ला ट्रेनच आवडते. बय रोड मळमळते
आणि ठाणे ट्रेनचा मार्ग पकडायची गरज नाही. वाशीहून हार्बर पकडली की त्या लाईनवरचे स्टेशन आम्हाला जास्त जवळ पडते.
Next station Kurla.
Next station Kurla.
भरत. पंधरा मिनिटांवर ऑफिस
भरत. पंधरा मिनिटांवर ऑफिस म्हटले की ती वेळ चालत अंतराचीच का असाय्ला हवी. असल्यास लोकं पंधरा मिनिटे न चालता गाडीने जतील आणि पाच मिनिटांवर ऑफिस आहे बोलतील.
असो
आता नवीन घर स्टेशनजवळ आहे. रिक्षाचा खर्च वाचला. आणि त्या स्टेशनपासूनही ऑफिस दोन स्टेशनच आहे.
रिटायर्ड अर्ली हा FIRE चा भाग
रिटायर्ड अर्ली हा FIRE चा भाग आहे. तर यातलं FI असणं खूप गरजेचं आहे. RE हे वेळ घालवणे, बोअर न होणे या साठी ऐच्छिक असावे. आधी FI होण्यावर भर द्या. आणि हे करायला इतरांचा खर्च पाहणे गरजेचं नाही. आनंदात जगत असलेल्या स्वत:च्या कुटुंबाचा सध्याचा मासिक खर्च एवढाच एक खर्च आपल्याला उपयोगी असतो. त्याला ८% दसादशे महागाई दर लावा. आणि भविष्यात हीच लाईफस्टाईल असेल हे गृहीत धरा. त्यात महत्त्वाच्या जीवनघटनांना लागणारा खर्च वाढवा. उदा. मुलामुलींची लग्नं. मोठं आजारपण. पार्टनरचे आजारपण. मुलांची शिक्षणं. इत्यादी.
हे सगळं पकडून जितका वार्षिक खर्च येतो तेवढं व्याज दरवर्षी मिळेल इतकी तजवीज करा. जेव्हा ही तजवीज होईल तेव्हा तुम्ही FI व्हाल. हे जोवर होत नाही तोवर RE च्या नादालासुद्धा लागू नका.
रॉय,
रॉय,
इथे आम्हाला रिटायरमेंट ग्यान नको आहे.
तुम्ही पुण्याच्या बाहेर ( माढ्या पासून मढ आयलंड पर्यन्त कुठेही ) राहत असलात तर तुमच्या अतिमुलभूत मूलभूत, इतर आणि चैनीच्या खर्चाच्या फॅक्ट्स आणि फिगर्स लिहा.
मनोविकारसुद्धा येणार!!
मनोविकारसुद्धा येणार!!
मला एवढ्यातच भागवायचं यासाठी द्वंद्व असतंच.
काय करायची आहे लाइब्री फी साडेतिनशे रु ? कधी वाचणारेस मोबाईल सोडून? रेल्वेच्या गर्दीत आपलाच हात आपल्या खिशात जात नाही तिथे पुस्तक कसे पकडणारेस?
Fill in d Expense per ur
Fill in d Expense per ur knowledge. Hope this helps.
1. Bai1
2. Bai2
3. Istri
4. Gas
5. Electricity
6. Society maintenance
7. mnc tax
8. Car cleaning
9. Entertainment
10. Phone
11. Internet
12. Transport
13. Petrol
14. Vehicle maintenance
15. Vehicle insurance
16. School fees/12
17. Parlor
18. Clothes
19. Kirana
20. Fruits and veggies
21. Milk
22. Yearly trip/12
23. Maid Diwali bonus/12
24. Family birthdays/12
25. 4 parents + sibling birthday/12
26. Insurance / 12
27. Atal pension yojana per month
28. Medical expenses per month
29. Eatouts
30 gifts to others (marriages etc)/12
31. Kids birthday gifts/12
32. Sundry home expenses (plumber etc)
33 charity
ही खालील लिस्ट किती उच्चभ्रू
ही खालील लिस्ट किती उच्चभ्रू कुटुंबाची आहे. त्यामानाने आपले अंथरून पांघरूण साधे आहे असा एक विचार मनात आला पण मी जेनुइ ण रिटायरमेम्ट मो ड मध्ये आहे. एज गृप ओके बूमर!!!
हे मासिक खर्च आहेत.
1. Bai1 १००० रु फक्त वीकेंडला येते.
2. Bai2 नाही
3. Istri नाही खर्च स्वतःच करते
4. Gas नाही
5. Electricity मॅक्स १५०० पर मंथ.
6. Society maintenance नाही भाड्याचा आहे. घर मालक भरतो. हैद्राबादेच्या घराचा भरते ९०० रु महिना.
7. mnc tax हे काय हो असते.
8. Car cleaning नाही.
9. Entertainment नेट फ्लिक्स व प्राइम मिळून ८५० पर मंथ.
10. Phone अजून कंपनी पे करते पण नाहीतर ७५० रु.
11. Internet १५०० रु.
12. Transport रोजचे ५० रु. रिक्षाचे. १५०० दर महिना
13. Petrol नाही जास्तीचे. कधी टाउन मध्ये गेले तर उबर कर्ते तितक्या पुरते.
14. Vehicle maintenance नाही नो नो
15. Vehicle insurance नाही नो नो
16. School fees/12 शिक्षण पूर्ण.
17. Parlor नाही जात. सर्व ग्रूमिन्ग घरीच
18. Clothes: दर महिना नाही खर्च. तीन महिन्यातुन घेते. १००००
19. Kirana ६०००
20. Fruits and veggies वर दिले तयातच २०००
21. Milk नाही नो नो. एवरिडे मिल्क पावडर वापरते ते किराणा मध्येच.
22. Yearly trip/12 फार फिरत नाही. हे डिटेल द्यायचे नाहीत
23. Maid Diwali bonus/12 पगाराला पगार. १०००
24. Family birthdays/12 नाही खर्च
25. 4 parents + sibling birthday/12 नाही खर्च. सासू सासरे, दत्तक आईवडील, नैसर्गिक वडिल वारले. आई व बहिणीचा वाढदिवस असला तर विश कर्ते
26. Insurance / 12 द्यायचे नाहीत डीटेल्स
27. Atal pension yojana per month हे काय आहे.
28. Medical expenses per month २५००
29. Eatouts १५००
30 gifts to others (marriages etc)/12 नाही नो नो
31. Kids birthday gifts/12 नाही देत काही नो नो
32. Sundry home expenses (plumber etc)भाड्याचे घर आहे जुजबी खर्च करवते. महिना ५०० रु पण खर्च नाही. क्वार्टरली
33 charity नाही नो नो. कावळे कुत्रे पक्षी यांना खायला घालते तो खर्च किराणा मध्येच.
घरभाड्याचा रो नाही. सबब ते देत नाही. पण मग बाकी प्रतिसादकांची स्वतःचीच घरे आहेत का?
डालोhttps://play.google.com
डालो
https://play.google.com/store/apps/details?id=com.dailyexpensesmanager&h...
https://www.hdfcbank.com
https://www.hdfcbank.com/personal/resources/learning-centre/save/how-to-...
Pages