मध्ये मी मित्राबरोबर त्याच्या लवकर रिटायरमेंट बद्दल चर्चा केली आणि त्यावेळी त्याने सध्या जीवनशैलीसाठी साधारण दोघांसाठी २०-२५ हजार रुपये खर्च येतो असे सांगितले होते. थोडेसे खोदून विचारल्यावर कळले के साधारण १० हजार अतिमूलभूत गोष्टींसाठी, ५ हजार मूलभूत गोष्टींसाठी आणि आणि वरचे ५-१० हजार चैनीसाठी आणि इतर खर्चांसाठी असे कळले. आत्यंतिक मूलभूत गोष्टींमध्ये रोटी, कपडा, वीजबिल, सोसायटी मेंटेनेनन्स, गॅस, मोबाईल यांचा समावेश होता. (घर लोन फ्री होते त्यामुळे त्याच्यासाठी समावेश नाही) तसेच मूलभूत गोष्टींमध्ये घरकामासाठी बाई, शहरात प्रवास (बस, टॅक्सी, रिक्षा, उबर)
इस्त्री (बाहेर देत असल्यास), वर्तमानपत्र, इंटरनेट, (आणि मुलांची शाळा, ट्युशन, इतर खर्च जे माझ्या मित्रासाठी नाही) यांचा समावेश होता.
आणि चैनीच्या गोष्टींमध्ये बाहेरचे खाणे, चित्रपट, नाटक, गाण्याचा प्रोग्रॅम, वीकएंड चा किंवा लांबचा प्रवास, छंद जोपासण्यासाठी केलेला खर्च, तर इतर मध्ये इन्शुरन्सचा हफ्ता, वन टाइम खर्च जसे की घराचे फर्निचर, रंग, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दिवाळी किंवा इतर काही कारणांमुळे गिफ्ट्स, जोडीदाराचा वाढदिवस, इतर मोठी खरेदी, घरकार्ये जसे की पूजा, पाहुणचार, देऊळ दक्षिणा किंवा होम-हवन, दवाखाना-आजारपण, घरपट्टी, पाणीपट्टी इत्यादींचा समावेश होता. मी फार खोलात जाऊन विचारले नाही परंतु विचार आला की मायबोलीकरांना विचारावे महिन्याला किती खर्च येतो. आता प्रत्येकाची लाइफस्टाइल वेगळी असल्यामुळे चर्चा फक्त अतिमूलभूत आणि मूलभूत गोष्टींवर राहिल्यास उत्तम.
प्रतिसादामध्ये खालील गोष्टी जरूर लिहाव्यात. बाकी सर्व तपशीलवार न सांगता ढोबळमानाने प्रकारानुसार सांगितले तरी चालेल.
शहर:
परिवार सदस्य संख्या:
अतिमूलभूत गोष्टींवर खर्च:
किराणा
भाज्या, फळे
कपडे
वीजबिल
गॅसबिल
मोबाईल बिल
सोसायटी मेंटेनन्स
घराचा हफ्ता (असल्यास)
मुलांच्या शाळा, कॉलेजचा खर्च (असल्यास)
मूलभूत गोष्टींसाठीचा खर्च:
घरकामासाठी बाई
शहरात प्रवास (बस, टॅक्सी, रिक्षा, उबर)
इस्त्री (बाहेर देत असल्यास)
वर्तमानपत्र
इंटरनेट
चैनीच्या गोष्टींसाठी खर्च:
इतर खर्च:
बघुयात कोणत्या शहरामध्ये साधारण किती खर्च येतो ते.
नानबा, नुसते empty template
नानबा, नुसते empty template टाकून काय उपयोग होणार आहे. जसे की ह्या सगळ्या गोष्टीं साठी पैसे लागतात हे आम्हाला माहीतच नव्हते. आकडे टाका की त्यात तुमच्या खर्चाचे.
चांगला प्रश्न आहे. असे प्रश्न
चांगला प्रश्न आहे. असे प्रश्न पडायलाच हवेत कारण मग आपल्याला बजेट चे महत्व समजते. मला तिसऱ्या वर्गात गणिताच्या पुस्तकात जमा खर्च नावाचा एक धडा होता. तेव्हा तो शिकवावा म्हणून गुरुजींनी शिकविला पण त्याचे महत्व काही कधी कुणी सांगितले नाही. तुम्ही विचारलेली माहिती बरीच तपशीलवार आहे आणि त्यात ठिकाणानुसार बरेच बदल होतील हे नक्की. मला वाटते जेव्हा कुणाचे वय ३०-३५ वर्षे असते तेव्हापासून रिटायरमेंट साठी योग्य योजना आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे खूप फायदेशीर ठरते. जे आता रिटायरमेंट च्या जवळपास आहेत त्यांनी महिन्याचे बजेट लिहून काढले तरी त्यांना काही आवश्यक नसलेले खर्च ओळखता येतील. impulse buying हि एक सवय सुद्धा अनेकांचे बजेट फार बिघडवत असते. खूप विस्ताराने लिहिता येईल. सारांश हा कि बजेट आखणे पहिली पायरी आहे आणि थोड्याफार फरकाने इकडे तिकडे झाले तरी त्याची अंमलबजावणी दुसरी महत्वाची गोष्ट आहे. काही दिवसात जेव्हा ह्याची सवय होते तेव्हा मग आपसूकच नवीन गोष्टी समजत राहतात.
योजना आगामी आर्थिक वर्षाच्या
https://akshargaane.blogspot.com/2019/08/2019-2020.html
चांगल्या आर्थिक सवयी कशा लावून घ्याव्यात ?
https://akshargaane.blogspot.com/2019/11/blog-post.html
Pages