मध्ये मी मित्राबरोबर त्याच्या लवकर रिटायरमेंट बद्दल चर्चा केली आणि त्यावेळी त्याने सध्या जीवनशैलीसाठी साधारण दोघांसाठी २०-२५ हजार रुपये खर्च येतो असे सांगितले होते. थोडेसे खोदून विचारल्यावर कळले के साधारण १० हजार अतिमूलभूत गोष्टींसाठी, ५ हजार मूलभूत गोष्टींसाठी आणि आणि वरचे ५-१० हजार चैनीसाठी आणि इतर खर्चांसाठी असे कळले. आत्यंतिक मूलभूत गोष्टींमध्ये रोटी, कपडा, वीजबिल, सोसायटी मेंटेनेनन्स, गॅस, मोबाईल यांचा समावेश होता. (घर लोन फ्री होते त्यामुळे त्याच्यासाठी समावेश नाही) तसेच मूलभूत गोष्टींमध्ये घरकामासाठी बाई, शहरात प्रवास (बस, टॅक्सी, रिक्षा, उबर)
इस्त्री (बाहेर देत असल्यास), वर्तमानपत्र, इंटरनेट, (आणि मुलांची शाळा, ट्युशन, इतर खर्च जे माझ्या मित्रासाठी नाही) यांचा समावेश होता.
आणि चैनीच्या गोष्टींमध्ये बाहेरचे खाणे, चित्रपट, नाटक, गाण्याचा प्रोग्रॅम, वीकएंड चा किंवा लांबचा प्रवास, छंद जोपासण्यासाठी केलेला खर्च, तर इतर मध्ये इन्शुरन्सचा हफ्ता, वन टाइम खर्च जसे की घराचे फर्निचर, रंग, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दिवाळी किंवा इतर काही कारणांमुळे गिफ्ट्स, जोडीदाराचा वाढदिवस, इतर मोठी खरेदी, घरकार्ये जसे की पूजा, पाहुणचार, देऊळ दक्षिणा किंवा होम-हवन, दवाखाना-आजारपण, घरपट्टी, पाणीपट्टी इत्यादींचा समावेश होता. मी फार खोलात जाऊन विचारले नाही परंतु विचार आला की मायबोलीकरांना विचारावे महिन्याला किती खर्च येतो. आता प्रत्येकाची लाइफस्टाइल वेगळी असल्यामुळे चर्चा फक्त अतिमूलभूत आणि मूलभूत गोष्टींवर राहिल्यास उत्तम.
प्रतिसादामध्ये खालील गोष्टी जरूर लिहाव्यात. बाकी सर्व तपशीलवार न सांगता ढोबळमानाने प्रकारानुसार सांगितले तरी चालेल.
शहर:
परिवार सदस्य संख्या:
अतिमूलभूत गोष्टींवर खर्च:
किराणा
भाज्या, फळे
कपडे
वीजबिल
गॅसबिल
मोबाईल बिल
सोसायटी मेंटेनन्स
घराचा हफ्ता (असल्यास)
मुलांच्या शाळा, कॉलेजचा खर्च (असल्यास)
मूलभूत गोष्टींसाठीचा खर्च:
घरकामासाठी बाई
शहरात प्रवास (बस, टॅक्सी, रिक्षा, उबर)
इस्त्री (बाहेर देत असल्यास)
वर्तमानपत्र
इंटरनेट
चैनीच्या गोष्टींसाठी खर्च:
इतर खर्च:
बघुयात कोणत्या शहरामध्ये साधारण किती खर्च येतो ते.
ऋन्मेऽऽष, ॲमी, एवढ्या
ऋन्मेऽऽष, ॲमी, एवढ्या प्रतिसादामध्ये केवळ तुमचा प्रतिसाद विषयाला धरून होता. बाकी सगळे प्रतिसाद निरुपयोगी. मूलभूत गोष्टींवरचा खर्च, मग तो अंबानी असो वर अतिशय गरीब माणूस, सर्वांना असतोच. विषयाला धरून प्रतिसाद न येण्याचे कारण समजले नाही. मला वाटते ही माहिती इतकीही प्रायव्हेट नाही की कोणीच लिहू नये. मुद्दामच संपूर्ण महिन्याचा खर्च नाही विचारला आणि फक्त सामान्य जगण्यासाठी किती लागतात ते विचारले होते अगदी लिस्ट पण दिली होती परंतु तुम्ही सोडून बाकीच्यांनी आकडे देण्याचे टाळले. असो.
ॲमी यांनी दिलेल्या लिंक मध्ये चांगली चर्चा झाली आहे. पण ती ५ वर्षे जुनी असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात कालबाह्य आहे. वाटले होते इथे छान होईल चर्चा. अजूनही आशा आहे. पाहूया कोणी सुरुवात करतय का.
विषयाला धरून प्रतिसाद न
विषयाला धरून प्रतिसाद न येण्याचे कारण समजले नाही. >> जे प्रतिसाद तुम्ही निरूपयोगी म्हणून टाकून दिले त्यात होती कारणे.. एक ना अनेक
वर तुम्ही अजूनही ह्या माहितीचा ऊपयोग तुमच्या मित्राला कसा होणार ते सांगत नाहीत.
सध्या जीवनशैलीसाठी साधारण दोघांसाठी २०-२५ हजार रुपये खर्च येतो असे सांगितले होते. थोडेसे खोदून विचारल्यावर कळले के साधारण १० हजार अतिमूलभूत गोष्टींसाठी, ५ हजार मूलभूत गोष्टींसाठी आणि आणि वरचे ५-१० हजार चैनीसाठी आणि इतर खर्चांसाठी असे कळले. >> २५ हजार पगार आणि त्यात १० हजाराची चैन? तुम्ही हे पहिलेच वाक्य एवढे लोडेड लिहिले आहे की ज्याचे नाव ते. ह्याचा सरळ सरळ अर्थ एक तर तुमचा मित्र (जो पंचेचाळीशीच्या आसपास आहे असे तुम्ही म्हणाला होतात) सर्वसंगपरित्याग मोड मध्ये आहे किंवा तो तुमच्याशी खोटे बोलतो आहे आणि ह्यावर विश्वास ठेवायला तुम्ही मागच्या १५ वर्षात भारतभू मध्ये पायधूळ झाडलेली नाही.
मूलभूत गोष्टींमध्ये रोटी, कपडा, वीजबिल, सोसायटी मेंटेनेनन्स, गॅस, मोबाईल यांचा समावेश होता. (घर लोन फ्री होते त्यामुळे त्याच्यासाठी समावेश नाही) तसेच मूलभूत गोष्टींमध्ये घरकामासाठी बाई, शहरात प्रवास (बस, टॅक्सी, रिक्षा, उबर)
इस्त्री (बाहेर देत असल्यास), वर्तमानपत्र, इंटरनेट, (आणि मुलांची शाळा, ट्युशन, इतर खर्च जे माझ्या मित्रासाठी नाही) यांचा समावेश होता.
आणि चैनीच्या गोष्टींमध्ये बाहेरचे खाणे, चित्रपट, नाटक, गाण्याचा प्रोग्रॅम, वीकएंड चा किंवा लांबचा प्रवास, छंद जोपासण्यासाठी केलेला खर्च, तर इतर मध्ये इन्शुरन्सचा हफ्ता, वन टाइम खर्च जसे की घराचे फर्निचर, रंग, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दिवाळी किंवा इतर काही कारणांमुळे गिफ्ट्स, जोडीदाराचा वाढदिवस, इतर मोठी खरेदी, घरकार्ये जसे की पूजा, पाहुणचार, देऊळ दक्षिणा किंवा होम-हवन, दवाखाना-आजारपण, घरपट्टी, पाणीपट्टी इत्यादींचा समावेश होता.>>>> ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च २० ते २५ हजार.. माझे तर वाचूनच डोळे भरून आले.
तुम्ही म्हणता आहात घर असेल तर वार्षिक ३ लाख पगारात जोडप्याला चैनीसकट जगता येते. सत्तरीचे धडधाकट जोडपे असेल तर कदाचित काटकसर करून शक्य आहे पण पंचेचाळीशीचे? दादा भारतातले एका व्यक्तीसाठी प्रपोज्ड मिनिमम वेज लिमिट आहे ९७५०/महिना. म्हणजे लोएस्ट ईन्कम ग्रूप.. हातावर पोट असलेल्या एका व्यक्तीला १०००० महिना मिळतो.. जोडप्याचा झाला २००००.
हातावर पोट असलेली जोडी २० हजारात तुम्ही लिहिलेले आयुष्य जगू शकणार आहे? गंमतच करता राव तुम्ही.
ऋन्मेषजी, तुम्हाला घरभाडे का
ऋन्मेषजी, तुम्हाला घरभाडे का भरावे लागते ? तुमची चार चार घरं आहेत मुंबईत असे वाचले होते मी.
>>>>
चार नाही तीन. आईवडिलांची आहेत. आता मी स्वत:चे घेतलेय. ताबा मिळेपर्यंत भाड्याने राहतोय नव्या घराजवळच.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 19 November, 2019 - 22:19
>>>
३ साउथ बाॅम्बे +१ न्यू बाॅम्बे + १ भाड्याचे = ५ घरे.
पगार २५००० नव्हे. पगार बराच
पगार २५००० नव्हे. पगार बराच जास्त. आरक्षण २५०००
ऋन्मेषजी,
ऋन्मेषजी,
धागालेखकाला मुलभूत खर्च हवे आहेत. तुम्ही खरे खरे खर्च सांगा. तुमचे आईवडील तीन घरात एकाव वेळी कसे काय राहू शकतात ? दोघे मिळून एका घरात किंवा वेगळे राहीले तर दोन घरात राहतील. मग तिसरे घर तुम्ही का वापरत नाही ? एक घर रिकामे ठेवून भाड्याच्या घरात कोण राहील बरे ?
त्यामुळे हा खर्च धागालेखकाने वजा करावा. एव्हढेच सांगायचे होते.
कोहंसोहं, तुमच्या त्या
कोहंसोहं, तुमच्या त्या मित्राचं ठरलेलं आहे. त्याला किती खर्च येतो, हे त्याला माहीत आहे. इतरांचे खर्च जाणून घेण्यात त्याला रस आहे का?
त्या मित्राला त्याच्या मनाप्रमाणे निवृत्ती घेता येणार आहे, त्यांचा मासिक खर्च उत्पन्नाच्या निम्माही नाही, तर त्यांच्याकडूनच मायबोलीकरांना चांगली माहिती मिळेल. त्यांना मायबोलीवर बोलवायचं मनावर घ्याच.
सर माझी मुंबईत तीन घरे आहेत
सर माझी मुंबईत तीन घरे आहेत ईसका मतलब ये तो नही के एका घरात मी, एकात आई आणि एकात बाबा राहणार.
आम्ही राहतो एकाच घरात आणि दोन भाड्याने देतो.
आता ती तिन्ही घरे मुण्बईत आहेत. माझा जॉब नवी मुंबईला. म्हणून मी ईथे घर विकत घेतोय. पण ताबा मिळायला अजून वेळ आहे तोपर्यंत नवी मुंबईतच भाड्याने राहणे सोयीचे पडतेय.
ऋन्मेश तुम्ही संधिक्त बोलत
ऋन्मेश तुम्ही संधिक्त बोलत आहात.
तुमच्या खर्चाचा तपशील बघितला तर एकादी luxary कार तुम्ही नक्कीच बाळगू शकता.
मुंबई आणि नवी मुंबई हा प्रवास car नी आरामात होतो.
त्या साठी भाड्या नी नवी मुंबईत घर घेणे हे पटत नाही बघा
मुंबई आणि नवी मुंबई हा प्रवास
मुंबई आणि नवी मुंबई हा प्रवास car नी आरामात होतो>> मी मधल्याच सबर्ब मध्ये राहते त्यामुळे रिलायन्स चे साहेब हेलिकॉप्टरने न्यु बाँबेला जात असतात ते मी नेह मी बघते. रुणम्याने एक अप्पाचे हेलिकॉप्टर घ्यावे. का पोराला कम्युटिंग चा त्रास. साउथ बाँबेतले पब्लिक न्यु बाँबेला फक्त काही कॉ न्स र्ट असेल तरच येते. परवा दुआलिपा व केटीपरी आल्या होत्या कि नाही. पण ही सर्व सामान्य केस नाही.
हायझेन बर्ग उत्तम प्रतिसाद. २५००० महिन्याला इतके सुखवस्तु जगणे अवघडही नही नामुम्किन है. खूपच काट् कसर नव्हे मेजर लाइफ स्टाइल चेजं करावे लागतील.
मला फिक्स्ड इनकम वर जगणे ह्यावर एक धागा काढायचाच होता त्यात हा आला. आता सवडीने काढते. म्हातारपणातली गरीबी हा एक शब्द प्रयोग रूढ होतो आहे.
ऋन्मेष सर, अंबानीला दिले आहे
ऋन्मेष सर, अंबानीला दिले आहे का घर भाड्याने (rent) ?
मी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी
मी कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी लिहिलेले आहे कि साधारण मध्यमवर्गीय कुटुंबाला घराचे कर्ज नसेल तर साधारण त्या त्या काळात असलेल्या १० ग्राम सोन्याच्या भावात सहजपणे राहता येते.
यात दुर्धर आजारातील वैद्यकीय खर्च धरलेला नाही. परंतु दोघांचा आरोग्य विमा याचा खर्च गृहीत आहे.
आणि त्यात वर्षात एकदा भारतात सहल किंवा घरची साधी उपकरणे दुरुस्ती किंवा काही कालावधी नंतर नवी घेणे हेही गृहीत आहे.
यात फर्निचर इ चा भांडवली खर्च गृहीत धरलेला नाही.
बाकी १९८० पासून अन्नपदार्थांची महागाई हि सरासरी २ % पेक्षा जास्त वाढलेली नाही.
आपण निवृत्त झालात कि रोजचा प्रवास खर्च कमी होतो त्याबरोबर बाहेर खाण्याचा खर्च हि कमी होतो.
अनेक गरजेच्या गोष्टी ज्या चैनीच्या झालेल्या असतात त्यांची गरज भासेनाशी होते. उदा दर वर्ष दोन वर्षांनी मोबाईल फोन बदलण्याची गरज राहत नाही. ऑफिसातील पार्ट्या इ चा खर्च कमी होतो.
माणुस घरातच असला तर मोलकर्णीवरचा खर्च कमी होतो. उदा घरात वॉशिंग मशीन असले कि धुण्यासाठी( खरं तर कपडे वाळत घालण्यासाठी) बाईची गरज लागत नाही. डिश वोंशर असेल तर भांडी घासण्यासाठी बाईची गरज लागत नाही.
आपल्या इज्जती साठी "नको इतका आहेर" लग्नात करावा लागत नाही.
संचित ठेव संपत आली तरी शेवटी आपल्या घराचे रिव्हर्स मॉर्टगेज हा उपाय तर असतोच.
आजार आणि मृत्यू हे अटळ आहेत.
"वर तुम्ही अजूनही ह्या
"वर तुम्ही अजूनही ह्या माहितीचा ऊपयोग तुमच्या मित्राला कसा होणार ते सांगत नाहीत"---> मी आधीच्या प्रतिसादामध्ये याचा उल्लेख केला आहे. तुम्ही तो वाचला नसल्यास पुन्हा लिहितो - "मित्राला साधारण अंदाज घ्यायचा आहे खर्चाचा (तुलनात्मक अभ्यास). पुण्यात इतरांसाठी किती खर्च येतो आणि इतर शहरांमध्ये राहिले तर किती येतो याचा."
"२५ हजार पगार आणि त्यात १० हजाराची चैन? तुम्ही हे पहिलेच वाक्य एवढे लोडेड लिहिले आहे की ज्याचे नाव ते. ह्याचा सरळ सरळ अर्थ एक तर तुमचा मित्र (जो पंचेचाळीशीच्या आसपास आहे असे तुम्ही म्हणाला होतात) सर्वसंगपरित्याग मोड मध्ये आहे किंवा तो तुमच्याशी खोटे बोलतो आहे ---> तुम्ही हा किंवा आधीचा धागा नीट वाचलेला दिसत नाही. पगार २५ हजार नसून खर्च २५ हजार आहे. १० हजारांमध्ये चैन आणि इतर खर्च असे दोन्ही लिहिलेले आहे.
ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च २० ते २५ हजार.. माझे तर वाचूनच डोळे भरून आले----> ह्यातल्या बराचश्या गोष्टी प्रत्येक महिन्याला गरजेच्या नसून वन-टाइम मात्र जास्त खर्चिक आहे. आणि या सर्व गोष्टींचा खर्च २०-२५ हजार नसून सरासरी ५-१० हजार महिना आहे असे लिहिले आहे. कृपया धागा पुन्हा एकदा नीट वाचावा ही विनंती. तसेही धाग्याचा उद्देश्य २५ हजारात कसे मध्यमवर्गीय आयुष्य जगता येते हे इतरांना पटवून देणे हा नसून जगण्यासाठी आवश्यक मूलभूत गोष्टींसाठी किती खर्च येतो हा आहे. तुम्हाला वाटत असेल की २५ हजारात २ व्यक्ती साधारण जीवनशैली जगू शकत नाहीत तर एक वेगळा धागा काढा. आपण तिकडे यावर अवश्य डिटेल मध्ये चर्चा करू.
"दादा भारतातले एका व्यक्तीसाठी प्रपोज्ड मिनिमम वेज लिमिट आहे ९७५०/महिना". हातावर पोट असलेल्या एका व्यक्तीला १०००० महिना मिळतो.. जोडप्याचा झाला २०००० ----> आता तुम्ही मिनिमम वेज लिमिट चा मुद्दा काढला आहेच तर लिहितो. मिनिमम वेज लिमिट हे सर्वसाधारण जीवनमान जगण्यासाठी ठरवलेली रक्कम असते. थोडक्यात मिनिमम वेज लिमिटप्रमाणे पगार मिळणारी व्यक्ती ही साधारणपणे गरीब आणि सर्वसाधारण मध्यमवर्गीय यांच्या मधले आयुष्य जगत असते. आता हे लिमिट ठरवताना काही गृहीतके धरली जातात त्यामध्ये त्रिकोणी अथवा चौकोनी कुटुंब असणे आणि मिळालेल्या पैशातून भविष्यासाठी/म्हातारपणासाठी थोडीशी बचत करू शकणे हेही येतात. आता ही बचत मासिक २०% पकडली तरी १०००० पगारात ८००० खर्च समाविष्ट आहे. थोडक्यात काय तर ३-४ माणसांसाठी निम्न मध्यमवर्गीय आयुष्य जगायला ८००० रुपये महिना खर्च होतो हा विचार त्यामागे आहे. इथे जोडप्याचा २०००० पकडण्याचे काहीच कारण नाही
ह्यावर विश्वास ठेवायला तुम्ही मागच्या १५ वर्षात भारतभू मध्ये पायधूळ झाडलेली नाही. हातावर पोट असलेली जोडी २० हजारात तुम्ही लिहिलेले आयुष्य जगू शकणार आहे? गंमतच करता राव तुम्ही---->
२५००० मध्ये साधी जीवनशैली अनुसरून २ माणसांना मध्यमवर्गीय आयुष्य जगता येत नाही खास करून लोन फ्री घर असताना असे तुम्हाला वाटत असेल तर एकतर तुमची जीवनशैली उच्चभ्रू आहे आणि तुम्हाला साधारण मध्यमवर्गीय आयुष्य कसे जगतात याची कल्पना नाही अथवा तुम्ही स्वतः भारतात गेल्या अनेक वर्षात पायधूळ झाडलेली नाही असे मी म्हणेन.
बाकी एक नम्र विनंती: धाग्यातील तपशिलाचा कीस पाडण्यापेक्षा प्रश्नाला अनुसरून आपल्याकडे काही माहिती असेल तर ती शेयर करावी. नाहीतर विषयाला फाटे फोडणारे लांबलचक प्रतिसाद तसे निरुपयोगीच
लाडका होतो मी हे भारीच.
लाडका होतो मी हे भारीच.
वीज बील - एक हजारपेक्षा कमी,
वीज बील - एक हजारपेक्षा कमी,
घरभाडे/मेंटेनन्स -१२००( जुन्या '८०तल्या ब्लॉक्सना एवढेच आहे.
इस्त्री वाशिंग सर्व घरीच.
दूध,वाणीसामान आठ हजार.
स्थानिक प्रवास - लोकल ट्रेनने कधीतरी. रिक्षा नाहीत. , वार्षिक एखादी सहल पंधरा हजारात होईल तेवढेच.
शाळा कॉलेजे फिया नाहीत.
अमचे नातेवाईक कुठेही लांब भारतात नाहीत. परदेश प्रवास नाहीत.
करमणूक - नाटक सिनेमा फक्त टिवीवर फुकट दाखवतात तेवढे. महिना तीनशे.
टेलिफोन घरचा, तीन मोबाईल टोटल महिना पाचशे.
कपड्यांची हौस नाही. पर्यटनास गेल्यास काहीही आणायचं नाही ठरवले आहे.
आहेर भेटवस्तू नाही देत. बोलवायचं तर बोलवा.
पटलं तर घ्या.
कोहंसोहं ,
कोहंसोहं ,
तुमच्या मित्राची जी जीवनशैली आहे त्यानुसार त्यांचा खर्च असणार. तशाच आकाराच्या आणि त्याच परीसरात रहाणार्या दुसर्या कुटुंबाचा खर्च हा त्यांच्या जीवनशैलीनुसार कदाचित ५०% ने जास्त असेल , कदाचित ५% ने कमीही असेल. शहर बदलले तर हे आकडे अजून बदलतील. अगदी ग्रोसरीचा खर्च धरला तरी तुम्ही शाकाहारी की मांसाहारी, दूध विकतचे आणि दही-ताक-लोणी घरचेच की सगळेच विकतचे, वाईन-अल्कोहोल-सॉफ्ट ड्रिंक-चहा-कॉफी चा वापर, सणासुदीचे पक्वान्न विकतचे की घरचे , वर्षभराचे मसाले-लोणची घरी बनवली की विकतची, स्वयंपाकात परदेशी घटकांचा वापर अशा वेगवेगळ्या मुद्द्यांनुसार खर्चाचा आकडा बदलेल. एखाद्या कपलसाठी दर विकेंडला बाहेर जेवायला जाणे आवश्यक खर्चात असेल तर दुसर्या कपलसाठी महिन्यातून एकदा. एखादे कुटुंब जिम मेंबरशिप घेइल तर दुसर्या कुटुंबासाठी रोज सकाळी उठून चालायला/धावायला जाणे + विकेंडला टेनिस्/गोल्फ . एकाच कँपसवर दोन भावंडे शिक्षणासाठी रहातात तर त्यांच्या महिन्याच्या खर्चातही जीवनशैलीनुसार तफावत असते . त्यामुळे इतर कुटुंबांच्या खर्चाची माहिती मिळवून काय होणार हे कळले नाही.
२०,०००-२५,००० रुपये महिना या बजेटमधे तुमच्या मित्राचे कुटुंब आनंदात राहू शकते का? याचे प्रामाणिक उत्तर त्यांनीच स्वतःला द्यायचे. जे काही रिटायर्मेंटचे चित्र आहे ते आपले स्वतःचे असावे. तसेच अजून १० वर्षांनी इतरांच्या जीवनशैलीकडे बघून तुलना करणे आणि खंतावणे असे नको व्हायला. त्यामुळे आपल्या गरजा-इच्छा-आकांक्षा भागवण्यासाठी आपल्याकडचे पैसे खरेच पुरेसे आहेत ना याचे कठोर परीक्षण योग्य राहील.
मित्राने आणि त्याच्या पत्नीने त्यांच्या व्यक्तीमत्वाला सुसंगत अशा दुसर्या जॉबचा सेकंड इनिंग म्हणून विचार केला आहे का? काही वेळा वॉलेंटियर वर्क करता करता पार्ट टाईम/ सिझनल वर्क असेही होते आणि आनंद देणारी नवी दिशा मिळते.
स्वाती2, खूप छान प्रतिसाद
स्वाती2, खूप छान प्रतिसाद
त्या मित्राला विचारायचे
त्या मित्राला विचारायचे प्रश्न मायबोलीकरांना का विचारले जाताहेत?
मेंटेन्स 4000
मेंटेन्स 4000
गॅस 300
2 मोबाईल 300
भाजी 1kg रोज 3000( सरासरी 80रुपये kg आणि kothambir,मिरची)
पाणी बिल. 200
केबल 450
वीज बिल. 2000(एसी असेल तर)
आढवड्या मधून 2 वेळा muton 3000
प्रवास रोजचे 150= 3750
दारूकाम घरी 2000
ज्वारी,etc 9kg/ व्यक्ती,= 450
तांदूळ 5kg =500
तूप /तेल =1000
साबण शाम्पू / surf =
400chya आत बाहेर.
हा जास्तीत जास्त खर्च पकडला आहे .
ह्या मधून कोणती गोष्ट
राहिली नसेल.
घर चालवणे हे आम्ही आमच्या अर्धांगणी वर सोपवून तटस्थ भूमिका घेतो त्या मुळे अंदाज आहे हा बरोबर आहे का तुम्हीच ठरवा
<तांदूळ 5kg =500
<तांदूळ 5kg =500
तूप /तेल =1000>
चेक चेक.
पगार २५ हजार नसून खर्च २५
पगार २५ हजार नसून खर्च २५ हजार आहे. १० हजारांमध्ये चैन आणि इतर खर्च असे दोन्ही लिहिलेले आहे. >> मी मित्राच्या पगाराबद्दल काहीही म्हणालो नाही.
पगाराचे ऊदाहरण लो-इन्कम ग्रूपचे होते ज्यांचे सेविंग पोटेंशिअल नसते. रोजंदारीवर महिन्याला २०००० कमावणारे आणि तेवढेच खर्च करावे लागणार्या जोडप्याचे स्टँडर्ड ऑफ लिविंग काय असते ते सांगण्यासाठी. पगार २५००० हजार असो वा १ लाख जर तुम्ही खर्चच २५००० आहे म्हणता तर पगाराची बात करून ऊपयोग काय?
सगळ्या मुद्द्यांना ऊत्तरे देत बसत नाही... असे दिसते आहे की समहाऊ तुम्ही तुमच्या मित्राचा सध्याची (वर लिहिलेली) जीवनशैली कायम ठेऊन जगण्याचा खर्च महिना २५००० (वर्षाला ३ लाख) आहे ह्या मुद्द्याशी स्वतः कन्विन्स झाला आहात आणि तुम्हाला ईतर लोकांनी ते क्न्फर्म करावे अशी ईच्छा आहे. किंवा ह्या ऊलट मित्राचा २५ हजाराचा मुद्दा खोडण्यासाठी तुम्हाला ईतर लोकांकडून ईविडंस हवा आहे. २५ हजाराच्या वरची अमाऊंट सांगितली की तुम्ही म्हणणार 'तुम्ही ऊच्चभ्रू'. काय करावे बरं तुमच्या ह्या प्रचंड मोठ्या बायसचे?
तुम्ही एक काम का करत नाही... मित्राच्या मासिक २५००० हजाराचे किंवा अॅन्युअल ३ लाखाच्या खर्चाचे ब्रेक अप ईठे लिहा. मग बघू यात त्या २५ हजारात काय काय बसते. नुसती यादी देऊन हे २५ हजारात बसते ह्याचा ऊपयोग शून्य. मग आपण सगळ्यांना विचारू हा खर्च आणि ह्या किंमती खर्या आहेत का? चालेल?
पण मी म्हणतो एवढेही कशाला करायचे..
तुमच्या मित्राकडे १ करोड गंगाजळी आणि २५ लाखांची ईन्वेस्टमेंट आहे जे तुम्ही आधी म्हणालात बरोबर??. मूलभूत गरजाच असणार्या सर्वसामान्य सामान्य माणसांना ईन्फ्लेशन अॅफेक्ट करीत नाही हे सुद्धा तुमचेच वाक्य आहे बरोबर? झाले तर मग.
मित्राचे वय ४५, वर्षाचा खर्च ३ लाख .. टोटल कॅपिटल १२५ लाख बरोबर?
मग एकही पैसा न वाढता पुढच्या (१२५/३) अशा ४२वर्षांची निश्चिंती झाली की. अगदीच गरज पडली तर घर विकून बक्कळ पैसा मोकळा करता येईल. नव्वदीच काय शंभरी आली तरी पैसे संपायचे काहीच टेंशन घ्यायचे कारण नाही "तुमच्या मित्राला".
बघा बरं किती साधे सोपे सरळ गणित आहे.
हायझेनबर्ग याच पानावरच्या
हायझेनबर्ग याच पानावरच्या तिसर्या प्रतिसादात - "२५ हजार पगार आणि त्यात १० हजाराची चैन? " असं लिहिलंय.
पण मुद्दा कळला. पटला की नाही ते लिहीत नाही.
आम्हाला मुलभूत खर्च शून्य
आम्हाला मुलभूत खर्च शून्य येतो. कसा ते सांगतो.
आमच्याकडे सोसायटी मेन्टेनन्स २२०० रूपये महिना आहे. आम्ही तो भरण्याऐवजी सोसायटीची पडेल ती कामे ३००० रूपये महिना या दराने करतो. ती पण आपल्या वेळेत. यात क्लबहाऊसच्या चाव्या सांभाळणे, क्लबहाऊस ज्याने बुक केले आहे त्याला उघडून देणे, वस्तू मोजून घेणे इत्यादी बाबींचा समावेश होतो.
आता मोटर चालू करणे आणि टाकी भरणे हे काम सुरू करणार आहे. त्याचे साधारण ५०० रूपये वाढवून मिळतील. त्यात माझे दरमहा वीजेचे बील निघून जाईल.
कामवाल्या बाईचा खर्च अजिबात नाही. उलट कामावरून आल्यावर मीच चार घरची धुणीभांडी करतो. त्याचे ८००० रूपये महिना मिळतात. माझी पत्नी सुद्धा स्वयंपाकाची कामे घेणार आहे. फक्त घरीच पोळ्या करून त्या विकायच्या की घरोघरी जाऊन हे ठरायचे आहे.
गाडी पुसायला महिना ५०० रूपये दराने एक मुलगा येतो. पण आता आपणच लवकर उठून ते ही करावे असा विचार चालू आहे. सोसायटीत चारशे कार्स आहेत. पहाटे साडेचारला सुरूवात केली तर साडेसहा पर्यंत त्याच्या सर्व गाड्या पुसून होतात. मला सुरूवातीला वेळ लागेल. पण नंतर मी एका तासात हे काम करू शकेन. या कामाचे मला दीड लाख रूपये महिना सहजच मिळतील. आमच्या सोसायटीत वॉचमनसाठी केबीन आहे. तीत इलेक्ट्रीक सप्लाय आहे. तिथे बसून संध्याकाळी इस्त्रीचा उद्योग करायचे ठरवले आहे. एकूण ६०४ घरे आहेत. आमच्या घरचेच एका वेळी १५ कपडे निघतात चौघांचे. दिवसाआड एव्हढे लागतातच. साधारण महिन्याला ३००० रूपये सरासरी खर्च असतो. समजा २०४ घरांपैकी मला ५० घराच्या महिना १००० रूपयांप्रमाणे ऑर्डर्स मिळाल्या तर हे ५०००० रू महिना चालू होतील. शिवाय आमच्या इस्त्रीवाला डेडीकेटेड टू अवर सोसायटी नाही. त्याच्याकडे किमान ५० एक सोसायट्यांची कामे आहेत.
त्यामुळे माझ्याकडून लोकांना त्याच दिवशी कपडे मिळू लागतील. सुरूवातीला जरा ताण येईल. पण जसजशी चुणमुणीत मुलं मिळतील तसतसे त्यांना एकेक उद्योग देत महिना १०००० रूपये पगारही देता येईल आणि त्यांच्या शाळेचा, शिक्षणाचा खर्चही उचलता येईल. वरचा फायदा माझा.
याशिवाय लोकांना मार्केट यार्डातून भाजी, धान्य आणून देणे, वीजबिल भरणे, मुलांना शाळेत सोडणे आणणे अशी कामे भविष्यात नियोजित आहेत. एकदा का सध्याचे काम सुटले की त्याकडे मोर्चा वळवणार आहे.
घरोघरी पेपर टाकणे आणि दूधाच्या पिशव्या टाकणे यात कमिशन जरी कमी असले तरी त्यामुळे मला दूध आणि वर्तमानपत्र फुकट मिळेल. तसेच सोसायटीसाठी केबल टीव्ही सुरू करायचा विचार आहे. किंवा डिश टीव्ही ची एजन्सी किंवा जिओ फायची एजन्सी घेऊन सोसायटीत टीव्ही करमणुकीची सोय केली की माझे कनेक्शन फ्री निघेल. शिवाय अर्थप्राप्तीही होईल.
याशिवाय केसरी टूस, राजाराणी यांच्याशी बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. यांच्या सहलीला सोसायटीतून ग्राहक दिले की माझा खर्च मोफत.
ही अशी लाईफस्टाईल चालत असेल तर बघा. घरभाडे सुद्धा येणार नाही असे उपाय आहेत. पण त्यासाठी फीस लागेल. सगळेच कसे फुकटात सांगायचे ?
मी पगाराबद्दल काहीही म्हणालो
मी पगाराबद्दल काहीही म्हणालो नाही -----> हाब, प्रतिसाद देण्यात तुमची काहीतरी घाईगडबड होतीये किंवा नीट न वाचून प्रतिसाद देताय. खालील वाक्य तुमच्याच प्रतिसादातले आहे आणि तरीही तुम्ही म्हणताय पगाराबद्दल बोललो नाही - "२५ हजार पगार आणि त्यात १० हजाराची चैन? तुम्ही हे पहिलेच वाक्य एवढे लोडेड लिहिले आहे की ज्याचे नाव ते"
" असे दिसते आहे की समहाऊ तुम्ही तुमच्या मित्राचा सध्याची (वर लिहिलेली) जीवनशैली कायम ठेऊन जगण्याचा खर्च महिना २५००० (वर्षाला ३ लाख) आहे ह्या मुद्द्याशी स्वतः कन्विन्स झाला आहात आणि तुम्हाला ईतर लोकांनी ते क्न्फर्म करावे अशी ईच्छा आहे. किंवा ह्या ऊलट मित्राचा २५ हजाराचा मुद्दा खोडण्यासाठी तुम्हाला ईतर लोकांकडून ईविडंस हवा आहे" --------------दोन्हीही चूक. माझा प्रश्न एकदम सरळ आणि साधा आहे जो धाग्यामध्ये मांडलेला आहे. सध्या तुम्ही ओव्हर-अनालिसिस मोड मध्ये गेलेले दिसताय. आधी म्हणल्याप्रमाणे धाग्याच्या कारणाच्या खोलात जाण्यापेक्षा मूळ प्रश्नाला अनुसरून काही शेयर केलेत तर उपयोगी येईल.
असो. बाकी तुमचा पुन्हा लांबलचक प्रतिसाद विषयाला फाटे फोडणारा असल्याने माझ्याकडून पास.
हायझेनबर्ग याच पानावरच्या
हायझेनबर्ग याच पानावरच्या तिसर्या प्रतिसादात - "२५ हजार पगार आणि त्यात १० हजाराची चैन? " असं लिहिलंय. >> माफ करा. तो टायपो झाला.
तिथे "२५००० हजार खर्च आणि आणि त्यात १० हजाराची चैन " असे वाचावे. (जे कोसो ह्यांनी सुद्धा लेखात लिहिले आहे)
असे म्हणायचे होते की --- २५००० खर्च आणि त्यात टाळता येण्याजोगी १० हजाराची चैन... म्हणजे १५००० हजारात महिन्याचा घरखर्च आणि तो ही वर दिलेल्या यादीनुसार, कसे शक्य आहे?
हायझेनबर्ग यांनी लेखाच्या
हायझेनबर्ग यांनी लेखाच्या उद्देशाबद्दल उपस्थित केलेल्या मुद्द्यांशी मात्र १००% सहमत.
मी केव्हापासून लिहितोय, त्या मित्राला मायबोलीवर अकाउंट उघडायला सांगा. हे उगा लंकेत सोन्याच्या विटा टाइप चाललं आहे.
त्या दुस र्या धाग्यावर अनेकांनी इ तकं काही मेहनत घेऊन लिहिलंय त्याचा काय उपयोग झाला तेही कळलेलं नाही.
कोसो, माझे ते वाक्य <<"२५
कोसो, माझे ते वाक्य <<"२५ हजार पगार आणि त्यात १० हजाराची चैन? " >>
ह्या खालच्या कंटेक्स्ट मध्ये वाचा बरं.
२०-२५ हजार रुपये खर्च येतो असे सांगितले होते. थोडेसे खोदून विचारल्यावर कळले के साधारण १० हजार अतिमूलभूत गोष्टींसाठी, ५ हजार मूलभूत गोष्टींसाठी आणि आणि वरचे ५-१० हजार चैनीसाठी आणि इतर खर्चांसाठी असे कळले.
संधिक्त संदिग्ध.
संधिक्तसंदिग्ध."ह्या खालच्या कंटेक्स्ट मध्ये
"ह्या खालच्या कंटेक्स्ट मध्ये वाचा बरं."....आणि वरचे ५-१० हजार चैनीसाठी आणि इतर खर्चांसाठी असे कळले ------- हाब, मी वरच्या एका प्रतिसादामध्ये लिहिल्याप्रमाणे तुम्ही 'इतर खर्चांसाठी' हा शब्द विसरलात. आता इतर खर्चात अनेक खर्च येतात ज्यातले काही मी लेखात नमूद पण केलेत. तुम्ही फक्त अजूनही १०,००० 'चैनीसाठी' एवढेच घेऊन बसलात की. यावर एवढा काथ्याकूट करायची गरज काय ते कळत नाहीये. जाऊ दे.
तुमच्या मित्राला नेमकी कशी
तुमच्या मित्राला नेमकी कशी लाईफस्टाईल हवी आहे ? म्हणजे तशा प्रकारच्या मित्राची लाईफस्टाईल सांगतो. माझी लाईफस्टाईल एव्हढी मेहनत घेऊन लिहून काढली त्यावर अवाक्षर नाही. आधीच सांगायचे ना , हे असे नको म्हणून. उगीच वेळ वाया गेला.
राजेश१८८, srd, प्रतिसादाबद्दल
राजेश१८८, srd, प्रतिसादाबद्दल धन्यवाद
Pages