एक वीडियो सध्या प्रचंड वायरल होतोय, एक मध्यमवयीन बाई एका पोरीला चांगलीच ओरडतांना दिसत होती. हा वीडियो दूसरा कुठला नसून कपल, आणि त्यांच्या प्रेमाच्या उघड प्रदर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या दिल्ली मेट्रोमधला होता. आता दिल्ली मेट्रोतून निच्छितच चांगले कार्य घडते म्हणजे त्यातून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करत असतील; पण मी दिल्लीला राहत नाही त्यामुळे दिल्ली मेट्रोशी संबंध दूरदूरचा नाही, आणि दिल्ली मेट्रोबद्दल काही वायरल झालेले विडीयो पाहूनच कदाचित हे माझे मत असावे.
तर हा, त्या वीडियोवर येऊया, ती बाई त्या कपलला चांगलीच ओरडतांना दिसत होती, की कसे त्यांच्या घरच्यांनी संस्कार दिलेले नाहीत ई. आणि काही गोष्टी कशा चार भिंतीच्या आड केल्यातरच बऱ्या असतात. वगैरे. तर पोरीने ही प्रत्युत्तर म्हणून, "18+ हो गयी हूँ।" असे म्हणत तिची कृतीला बळ द्यायचा प्रयत्न केला. त्या गावात राहणाऱ्या हरयाणवी बाईला काय कळणार त्यातलं, तिचं ते चालूच होतं. प्रचंड वीडियो वायरल झाला, आणि त्या बाईचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक होतांना दिसत आहे. काही उत्साही यूट्युबरनी त्या बाईचा पत्ता काढून नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला, आणि तीच्या मुलाखतीत तीच्या म्हणण्यानुसार, ती मुलगी आणि तो मुलगा "एकमेकांची तोंड खात होती" असं तिचं म्हणणं, म्हणजेच आपल्या चांगल्या भाषेत "किस" करत होती. हा वीडियो एवढ्यावरच झाला.
पण यानंतर वीडियो आला तो त्या पोरीचा, ती त्यात सांगत होती की ती फक्त फ्रेंड्स सोबत मस्ती करत होती, आणि त्या काकूने तिला कसा ओरडा केला आणि तिला खरंच आता त्याचं वाईट वाटत आहे, आणि ती विणवण्या करतांनाही दिसली की तिचा वीडियो कृपया कोणी वायरल करू नये कारण ती एक मुलगी आहे वगैरे वगैरे.. आता तिच्यात "18+ हो गयी हूँ।" हा एटिट्यूड नव्हता उलट आता ती सोज्वळ आणि काहीच न केल्याचा आविर्भावात होती, 18+ असण्याचा तिने मेट्रोत दाखवलेला बोल्डपणा पार निघून गेला होता. असो!
आपला समाज कितीही प्रगल्भ झाला तरी, काही गोष्टी या चार भिंतीच्या आतच व्हाव्यात ही मानसिकता वाईट आहे का?? पुरोगामी म्हणून लहान मुलांसमोर सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करणे किती योग्य, रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक वयोगटातील लोकं वावरतात त्यांचं भान ठेवून वागनं बरं नाही का?? यावर आपलं मत काय, हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
ही त्या वीडियोची लिंक, फक्त यात त्या मुलीचा चेहरा ब्लर केलेला आहे. बाकी इतर सोशल मिडीयात अपलोड झालेल्या वीडियोजमध्ये चेहरा स्पष्ट दिसतोय.
https://youtu.be/9Kqsn3fPDbg
>>>>> Cc टीव्ही बेडरूम मध्ये
>>>>> Cc टीव्ही बेडरूम मध्ये सुद्धा बसवायचे का?>>>> विवाहबाह्य केसेसमध्ये जेव्हा बलात्कार सिद्ध होतो/न होतो तेव्हा कुठे सी सी टि व्ही असतात? तरीही केस दाखल होतातच ना.
"मनाविरुद्ध झाले" एवढं सांगून
"मनाविरुद्ध झाले" एवढं सांगून स्त्रीला कायदेशीर घटस्फोट मिळवता येतो , पोटगी वगैरे सकट .. त्याला कायद्याने गुन्हा म्हणून शिक्षा अजूनतरी नाही , भविष्यात कदाचित होईलही . हे कारण सांगून घटस्फोट मागणाऱ्या स्त्रीला फुटेज सादर करा म्हणून कायदा सांगू शकत नाही .
विवाहबाह्य बलात्काराच्या केसेसमध्ये जेव्हा बलात्कार सिद्ध होतो त्यावेळी स्त्रीच्या साक्षीला सगळ्यात अधिक महत्व असतं , तिने बोट दाखवून हाच तो - सांगणं हा महत्वाचा पुरावा मानला जातो . विवाहांतर्गत मनाविरुद्ध संबंध हेही अनेक देशांत बलात्कार मानले जातात व गुन्हा समजून शिक्षा होते (Today, marital rape is illegal in all 50 US states, though the details of the offence vary by state. एकूण 195देशांपैकी 150 देशांमध्ये विवाहांतर्गत मनाविरुद्ध संबंध हे बलात्कार म्हणुन कायद्याने शिक्षेस पात्र गुन्हा आहेत . Only 36 countries in the world have still not criminalised marital rape. ) . भारतातही हा कायदा यायला फार वर्षं लागतील असं वाटत नाही .
या विषयावर अक्षय खन्ना आणि
या विषयावर अक्षय खन्ना आणि रिचा चड्डा चा एक फार सुंदर चित्रपट आहे - section 375.
विवाह बाह्य बलात्काराच्या
विवाह बाह्य बलात्काराच्या केसेस सुधा किती तरी वर्ष कोर्टात चालू असतात .
ते पुरावे तपासण्यासाठी च लांबत असतील ना की स्त्री ला हाच तो म्हणायला तेवढा वेळ लागतो .
कमजोर वर्गाच्या संरक्षणासाठी कायदा कमजोर वर्गाकडे झुकतो जशी स्त्री झाली किंवा
सामाजिक मागास समाजातील वर्ग झाला.
पण जोपर्यंत तो कमजोर आहे तोपर्यंतच सर्व समाज अशा कायद्यानं स्वीकारतो .
खोटे गुन्हे दाखल करणे ,स्वतःच्या फायद्यासाठी अशा कायद्या चा वापर करणे ह्या वर सुद्धा न्यायालयाने आणि मीडिया नी सुद्धा खूप वेळा चिंता व्यक्त केली आहे.
काही बाबतीत
फॉर example
mee to ला पश्चिमात्य देशात स्त्रियांनी सुद्धा विरोध केला आहे.
अशा एकतरभी कायद्याने शिकार झालेल्या पुरुषाचं हक्काचं समर्थन स्त्रिया सुद्धा करू लागल्या आहेत.
कारण तो पुरुष सुद्धा कोणत्या तरी स्त्री चा पती असतो,मुलगा असतो,bhavu असतो,मित्र असतो त्या
मुळे नकळत स्त्री वर सुद्धा अन्याय होतो.
गुन्हा होत असेल तर शिक्षा झाली पाहिजे ह्यात संशय नाही .
पण कायद्या cha गैर वापर हा मोठा चिंतेचा विषय आहे.
त्या वर अनेक क्षेत्रातील lokanai वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे.
Mhanun' हाच तो' ह्या एका वाक्यावरून गुन्हा सिद्ध झाला किंवा गुन्हा घडला असे समजणे चुकीचं च आहे .
अशा कायद्या चा गैर वापर होत आहे ह्याच्ये प्रमाण वाढल्या मुळेच अश्या गुन्ह्यातील आरोप कडे संशयाच्या नजरेने बघण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.
घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा,atrocity कायदा,असे कायदे सुधा
संशयाच्या भोवऱ्यात आहेत
सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन
सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणे हा कायद्याने गुन्हा आहे. सार्वजनिक ठिकाणी विवाहीत/ अविवाहीत स्त्री पुरूषांनी एकमेकांचे घेतलेले चुंबन हे अश्लील वर्तनात येते. खूपच वर्षांपूर्वी एका परदेशी जोडप्याला उत्तर भारतात या गुन्ह्याखाली अटक झाली होती. त्या वेळी यावर पुरेसे मंथन झालेले आहे. कायद्यात बदल काही झाला नाही.
त्या काळात आणि नंतरही पुरोगामी सरकारे येऊन गेली. आता सनातनी सरकार आहे. हा कायदा बदला. नाहीतर कायद्याने वागू नका असा संदेश जातो.
अथवा चुंबन हे अश्लील वर्तनात मोडत नाही असा फतवा निघायला हवा. कारण अश्लील वर्तन कशाला म्हणायचे हे पोलीस ठरवतात.
बरोबर आहे. कुणीही एखादी गोष्ट
बरोबर आहे. कुणीही एखादी गोष्ट कायद्यात बसते की नाही हे तपासून घेतल्या शिवाय कुणावर आक्षेप घेत नाही.
कायद्याने सार्वजनिक जागी प्रौढ व्यक्तींना एकमेकांचे चुंबन घेण्यास मनाई नसती तर त्या बाईने आक्षेप घेतलाच नसता.
तो मुलगा त्या मुलीचं जबरदस्ती
तो मुलगा त्या मुलीचं जबरदस्ती ने चुंबन घेत असता, तर बहुतेक कोणाला काही त्रास झाला नसता. मुलगीही चुंबनात आनंदाने सहभागी झाली, हा प्रॉब्लेम आहे.
पापभिरू लोक सरकारी कायद्या नी
पापभिरू लोक सरकारी कायद्या नी चालतात.
गुन्हेगार लोकांचे स्वतःचेच कायदे असतात.
किंवा गुन्हा पण ते सरकारी कायद्यात बसवूनच करतात.
इथे किसींग करणे गुन्हा आहे
इथे किसींग करणे गुन्हा आहे असे कोणीच म्हणत नाही.
सार्वजनिक ठिकाणी अश्यील हरकत करणे हा गुन्हा आहे.
लहान मुलांच्या कोवळ्या मनावर ह्याचा विपरीत परिणाम होतो हे तरी मान्य आहे का.
अहं ब्राम्हसमी
अहं ब्रम्हासमी
दोन प्रौढ व्यक्तींनी परस्पर
दोन प्रौढ व्यक्तींनी परस्पर सहमतीने चुंबन घेण्यात काही गैर नाही हे लहान मुलांना शिकवायला हवं.
भारत हा खजुराहो आणि कामसूत्राचा देश आहे. इथे लिंगाची पूजा केली जाते.
भरत.
भरत.
विकृत सेक्स करण्याची वृत्ती अशा शिक्षण मुळे तर वाढत आहे..
मुलांसाठी वेगळी बेड रूम का बनवली जाते.
मुलांना शिक्षण देण्यासाठी कळत्या मुलांसमोर आई वडील सेक्स करतात का
आमच्या इथे तरी करत नाहीत .
तुमच्या विषयी माहीत नाही.
कामसूत्र चा देशा च अर्थ ज्या प्रमाणे तुम्ही लावला आहे त्या नुसार मुलां समोर सेक्स करून त्यांना शिक्षित करण्याचे महान काम तुम्ही करत asal
सेक्स ही निकोप भावना आहे ..
तुम्हाला नाही समजावू शकत..झोपलेल्या व्यक्तीला जाग करता येत पण झोपेचे ढोंग घेतलेल्या व्यक्तीला जाग करता येत नाही
(No subject)
चुंबन ही एक सुंदर गोष्ट आहे,
चुंबन ही एक सुंदर गोष्ट आहे, त्यात अश्लील काही नाही. अश्लीलता पाहणा र्याच्या नजरेत आहे.
मानव पृथ्वीकर
मानव पृथ्वीकर
विपर्यास अलंकाराचे उदाहरण अतिशय सुंदर दिले आहे. मूळ विषयापासून अनेक जण लांब भरकटले आहेत. कायद्याने तपासून आक्षेप घेतला की कायदा नसतानाही आक्षेप घेतला यावर आपण रवंथ करू शकता. कायदा आहे त्याप्रमाणे वागले पाहीजे इतकेच. कायद्यात चुंबन घेणे बसत असेल तर चुंबन घ्या. कोण बाई आक्षेप घेतेय याबाबत माझ्या प्रतिसादात चकार शब्द नाही. तिने का घेतला हे तिलाच जाऊन विचारलेत तर बरे होईल.
कायद्याने सिग्नल सुद्धा पाळला पाहीजे. पण नाहीत पाळत अनेक जण. काही जण आक्षेप घेतात. त्यांना आक्षेप घेण्याचा अधिकार आहे किंवा नाही हा विषय असेल की भारतात आहेत ते कायदे तरी पाळा किंवा बदला तरी हा चर्चेचा विषय असेल ?
तुमच्या मते इथे जर त्या बाईने घेतलेले आक्षेप कायदेशीर / नैतिक आहेत किंवा नाही हा विषय चालू असेल तर माझा प्रतिसाद अवांतर समजावा.
सेक्स ही निकोप भावना आहे हे
सेक्स ही निकोप भावना आहे हे मुलांना शिकवायचं की ते ई शी घाण आहे असं?
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/mumbai-news/massive-sales-of-deceptive-pills-th...
195देशांपैकी 150 देशांमध्ये
195देशांपैकी 150 देशांमध्ये विवाहांतर्गत मनाविरुद्ध संबंध हे बलात्कार म्हणुन कायद्याने शिक्षेस पात्र गुन्हा आहेत .
पण ते खूप दिवस वेगळे राहत असतील तर अशी तरतूद खूप देशात आहे.
एकत्र राहत असतील तर बलात्कार हा गुन्हा आहे असे ठरवणारे मोजकेच देश आहेत
चुंबन ही एक सुंदर गोष्ट आहे,
चुंबन ही एक सुंदर गोष्ट आहे, त्यात अश्लील काही नाही.
>>>
सहनत आहे
फक्त ते योग्य पद्धतीने घ्यायला हवे. काही लोकं फार ओंगळवाणे पद्धतीने तुटून पडतात. एक च्युईंगम दोघात खाल्यासारखे करतात. वाटीभर लाळेची देवाणघेवाण करतात. अर्थात यातही आपली एक मजा आहे हे मान्य पण निदान असे चुंबन सर्वांसमोर नसावे. आपल्याकडील लोकांना चुंबनमॅनर्स शिकवायची गरज आहे.
माणसाची सेक्शुअलिटी विषयी
माणसाची सेक्शुअलिटी विषयी सर्वांना प्रॅक्टिकल सहित चांगली माहिती आहे.
कारण myboli वरचे सर्व सभासद हे लग्न झालेलं आहेत.
खूप कमी न झालेले असतील.
सार्वजनिक ठिकाणी,गर्दीच्या ठिकाणी किती लोक स्वतःच्या बायकोचा किस घेतात,किती लोक बायको क्या कमरेत किंवा खांध्या वर हात ठेवून चालतात.
तर हे दृश्य तस दुर्मिळच .
काय कारण असेल.
तर त्यांचं वारंवार येणारे सेक्शुअल संबंध.
आपल्या सेक्शुअल भावना सार्वजनिक ठिकाणी सुद्धा जे दाबून ठेवू शकत नाहीत त्या कारण विषयी तर्क केला तर.
1) सेक्स विषयी चुकीचं बटबटीत माहिती टीव्ही आणि movies मधून न कळत्या वयात मिळणे.
2) सेक्शुअल अॅक्टिविटी करण्यासाठी एकाकांत जागा न मिळणे.
( पण भारतात कसलेच कायदे कोण्ही गंभीर पने घेत नसल्या मुळे लॉज सर्व ठिकाणी कमी पैस्यात उपलब्ध आहेत.)
3) प्रतक्ष सेक्स करण्यात अपयशी होवू ही भीती.हे महत्त्वाचे कारण आहे.
4) कुटुंबात कलह असणे
5) जीवना विषयी कोणतेच ध्येय नसणे,कोणती च महत्वकांक्षी पना नसणे.
6) शिक्षण पासून other अॅटिविटी मध्ये स्पर्धेत उतरण्याची क्षमता नसणे.
अजुन कारण आहेत.
ही कारण ज्या व्यक्तींना लागू होतात त्यांच्या जवळच अशा गोष्टी साठी खूप वेळ आणि इंटरेस्ट असतो
Submitted by पुरोगामी गाढव on
Submitted by पुरोगामी गाढव on 20 November, 2019 - 08:48
ओके तुमचा मुद्दा लक्षात आला.
सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणे
सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणे अगदी योग्य! असा मुद्दा काही सदस्यांनी मांडला त्यातले सर्व मुद्दे पटले. ठीक आहे मान्य करूया, पण सार्वजनिक ठिकाणी म्हणजे, उघड्या/खुल्या ठिकाणी चुंबन कोणी घेत असेल तर आपण त्या वातावरणातून झटपट बाहेर जाऊ शकतो आपण ताटकळत तिथे उभे राहत नाही, आपण रस्त्याने चालतांना वगैरे एखाद्या कोपऱ्यात कोणी कपल चुंबन घेत असेल तर आपण त्यांना दुर्लक्ष करून जाऊ शकतो.
पण मेट्रोचा ठिकाणी बसमध्ये हे शक्य नाही, तिथे अशा कपल ने आपण आपल्या कृत्यामुळे दुसऱ्यास embarrass तर करत नाही आहो ना याची काळजी घ्यावी असे मलातरी वाटते.
दोघांच्या संमतीने केलेलं
दोघांच्या संमतीने केलेलं पब्लिक किसिंग ओके आहे असा विचार जर आत्ताची वय वर्ष 25 - 30 च्या आतल्या पिढीतील बहुसंख्य सुशिक्षित तरुण करत असतील तर आणखी 25 - 30 वर्षात हीच पिढी भारताची कर्ती पिढी असणार आहे .
कायदेतज्ञ , सरकारी अधिकारी , वकील , उच्च अधिकारी अगदी पोलीस सुद्धा सगळे याच वयोगटातील लोक असणार आहेत ... कायदा बदलायला आणि त्याची अंमलबजावणी व्हायला कितीसा वेळ लागेल ? निदान शहरी भागात तरी ?
30 वर्षांनंतर जाऊ द्या . याच घटनेत त्या ट्रेन मध्ये हरयाणातील त्या बाईऐवजी वय वर्षे 30 च्या आतील सुशिक्षित पुरुष किंवा स्त्री असती तर ते त्या दोघांच्या मध्ये पडले असते का ? दुसऱ्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करणारी आणि दुसऱ्यांच्या फाटक्यात नाक न खुपसणारी नवीन पिढी खूप लिबरल आहे आणि हीच पिढी देशाचं भविष्य आहे ..
आज जे आजीआजोबा नातवंडांच्या कपडे - भाषा - मित्रमैत्रिणी - जीवनशैली यांना नाक मुरडतात पण त्यापलीकडे याबाबतीत त्यांच्या मताला खुद्द त्यांच्या घरात किंमत नसते कारण घराची कर्ती झालेली त्यांची मुलं - नातवंडांचे आईवडील यांच्याच मताला किंमत असते तशीच अवस्था या जुनाट विचाराच्या लोकांची 3 - 4 दशकात त्यांच्याच देशात होणार आहे . आधीच्या पिढीच्या लोकांची आज झालेली आहे . आपली मतं काही वयोमर्यादेनंतर पुढच्या पिढीवर लादता येत नाहीत ... ती सोडून देऊन जे जे दिसेल ते मुकाट पाहण्यावाचून पर्याय नसतो . एकेकाळी मुलाला नजरेच्या धाकात ठेवणाऱ्यांची नातवावर सत्ता चालत नाही आणि मुलावरही नाही ... ( नातसून नातवाला अरेतुरे करते , तुळशीची पूजा करत नाही , याचं एखाद्या आज्जींना वाईट वाटू शकतं पण त्यांचं ऐकून ती ते करायला लागणार नसते , तुमचं आयुष्य तुम्ही तुम्हाला हवं तसं जगला आहात आमचं कसं जगायचं हे आम्ही ठरवू हा पवित्रा असतो ... नातसून कशाला आताच संसारात स्वातंत्र्य हवं - कोणाच्या मर्जीने ताबेदार व्हायला नको म्हणून वेगळ्या चुली मांडतच आहेत . एकूण नवीन पिढी ही व्यक्तीस्वातंत्र्याला दिवसेंदिवस अधिकाधिक महत्व देत आहे . )
व्यक्तीस्वातंत्र्याला सर्वाधिक महत्व देणारी ही पिढी जेव्हा पुढच्या 25 वर्षात देशाची कर्ती पिढी होईल तेव्हा जुन्या पिढीच्या लोकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करताना पाहून मनोरंजन होणार आहे .
या व्हिडिओतील मुलगी घरच्यांना घाबरते आहे . 25 वर्षांनी कदाचित हीच मुलगी अशाच परिस्थितीत स्वतःच्या मुलीला पूर्ण सपोर्ट देईल - तू घाबरू नकोस , तुला कोण नातेवाईक काय बोलतात ते मी बघते ... तुला कोणी अक्षरही बोलणार नाही .
25 वर्षांनी कदाचित हीच मुलगी
25 वर्षांनी कदाचित हीच मुलगी अशाच परिस्थितीत स्वतःच्या मुलीला पूर्ण सपोर्ट देईल - तू घाबरू नकोस , तुला कोण नातेवाईक काय बोलतात ते मी बघते ... तुला कोणी अक्षरही बोलणार नाही .>>>>>>तू बिन्धास्त पाहिजे तिथे, उघड्यावर, सार्वजनिक ठिकाणी, मेट्रो बस ट्रेनमधे किसिंग कर ......
दोन्ही बाजुची चर्चा वाचतेय.
दोन्ही बाजुची चर्चा वाचतेय. मी कुंपणावर आहे.
पंचवीस वर्षांनंतर कशाला आताच
पंचवीस वर्षांनंतर कशाला आताच मुली दिसताहेत की सार्वजनिक ठिकाणी किस करताना.
मुलगी आई आणि नातलगांची परवानगी घेणार आहे का?
तेही २५ वर्षांनंतरही?
मुलगी आई आणि नातलगांची
मुलगी आई आणि नातलगांची परवानगी घेणार आहे का?> >>>>>>>>> प्रश्न परवानगी चा नाहीये. .
फक्त आई आणि नातलग<<<<< अशाच परिस्थितीत स्वतःच्या मुलीला पूर्ण सपोर्ट देतील, तू घाबरू नकोस , तुला कोण नातेवाईक काय बोलतात ते मी बघते ... तुला कोणी अक्षरही बोलणार नाही>>> >>>हे जरा मला जड गेलं.
या मुलीचा जो इनसल्ट होत आहे
या मुलीचा जो इनसल्ट होत आहे तो आपल्या मुलीचा सहन करून न घेणारी सुशिक्षित- उच्चशिक्षित कुटुंबं आजही सापडतील ...
हो अर्थातच. हा धागा नसता तर
हो अर्थातच
मुलीची विडीओ वायरल न करण्याची विनंती योग्य आहे.
ह्या विश्वातील कोणतंच घटक
ह्या विश्वातील कोणतंच घटक स्वतःच्या इच्येनी मनमानी करू शकत नाही .
आणि तेवढे स्वतंत्र पण त्याला नाही तिथे माणूस काय चीज आहे.
ग्रह , तारे सुधा नियमात बंद आहेत .
त्यातील एकानी जरी आगाऊ पना केला आणि नियम विरूद्ध वागला तर त्याचे अस्तित्व नष्ट होईल.
ऐकच उदाहरण ठीक आहे .
जास्त डिटेल लिहण्याची गरज नाही.
स्वतंत्र एकटा व्यक्ती त्याचे नॉर्मल लाईफ सुद्धा जगू शकणार नाही.
व्यवस्थेच्या बाहेर फेकला जाईल.
व्यक्ती स्वतंत्र किती असावे ह्याला मर्यादा आहेत.
Pages