धूसर क्षितिज, रोरावत्या लाटा,
जग सारं विसरून मागं,
स्तब्ध किनारा, गार वाळू,
तू आणि मी, आपण दोघं..
थांब ना थोडा, नको छळूस,
पाणी उडवत तुझं बोलणं,
गालावर लागलेली वाळू माझ्या
हलक्या हाताने टिपून घेणं..
नंतर तुझं खळी पाडून हसणं,
नवं प्रेम करतं जागं,
स्तब्ध किनारा, गार वाळू,
तू आणि मी आपण दोघं..
लालसर मावळतीची झाक,
पाण्यात जाते हळूच उतरत,
उतरणाऱ्या रंगासोबत,
वेळ सुद्धा येते सरत,
घड्याळांकडे पाहत पाहत,
परतू लागतात सारी लोकं,
मागे उरतात दोन सावल्या,
तू आणि मी, आपण दोघं..
"थांबुयात का अजून थोडं?"
हातात हात गुंफलेले,
विचारतात मला ओठांऐवजी,
तुझे डोळे पाणावलेले
खांद्यावर मग डोकं टेकून,
पुन्हा सुटतं आठवणींचं गाठोडं..
भरती तेव्हा सरून जाते,
पाणीही मागे सरकू लागतं,
अंधारलेलं सारं जग,
चंद्राकडे प्रकाश मागतं
चालू लागतो मग आपणही,
पाऊलखुणा उमटवून मागं,
स्तब्ध किनारा, गार वाळू,
एकमेकांचे आपण दोघं...
-अजिंक्य"राव पाटील"
बालिश वाटेल, फार जुनी कविता
बालिश वाटेल, फार जुनी कविता आहे. (६ वर्षं आधी लिहिलेली, मोबाईलमधले जुने फोटो चाळताना सापडली)
फार सुंदर आहे की. मला आवडली.
फार सुंदर आहे की. मला आवडली.
खूप छान...मस्तच:-)
खूप छान...मस्तच:-)
धन्यवाद !
धन्यवाद !
Chan ahe
Chan ahe
सुंदर लिहिलीये!
सुंदर लिहिलीये!