तुम्हाला मूलभूत गोष्टींसाठी किती खर्च येतो?

Submitted by कोहंसोहं१० on 18 November, 2019 - 15:04

मध्ये मी मित्राबरोबर त्याच्या लवकर रिटायरमेंट बद्दल चर्चा केली आणि त्यावेळी त्याने सध्या जीवनशैलीसाठी साधारण दोघांसाठी २०-२५ हजार रुपये खर्च येतो असे सांगितले होते. थोडेसे खोदून विचारल्यावर कळले के साधारण १० हजार अतिमूलभूत गोष्टींसाठी, ५ हजार मूलभूत गोष्टींसाठी आणि आणि वरचे ५-१० हजार चैनीसाठी आणि इतर खर्चांसाठी असे कळले. आत्यंतिक मूलभूत गोष्टींमध्ये रोटी, कपडा, वीजबिल, सोसायटी मेंटेनेनन्स, गॅस, मोबाईल यांचा समावेश होता. (घर लोन फ्री होते त्यामुळे त्याच्यासाठी समावेश नाही) तसेच मूलभूत गोष्टींमध्ये घरकामासाठी बाई, शहरात प्रवास (बस, टॅक्सी, रिक्षा, उबर)
इस्त्री (बाहेर देत असल्यास), वर्तमानपत्र, इंटरनेट, (आणि मुलांची शाळा, ट्युशन, इतर खर्च जे माझ्या मित्रासाठी नाही) यांचा समावेश होता.
आणि चैनीच्या गोष्टींमध्ये बाहेरचे खाणे, चित्रपट, नाटक, गाण्याचा प्रोग्रॅम, वीकएंड चा किंवा लांबचा प्रवास, छंद जोपासण्यासाठी केलेला खर्च, तर इतर मध्ये इन्शुरन्सचा हफ्ता, वन टाइम खर्च जसे की घराचे फर्निचर, रंग, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दिवाळी किंवा इतर काही कारणांमुळे गिफ्ट्स, जोडीदाराचा वाढदिवस, इतर मोठी खरेदी, घरकार्ये जसे की पूजा, पाहुणचार, देऊळ दक्षिणा किंवा होम-हवन, दवाखाना-आजारपण, घरपट्टी, पाणीपट्टी इत्यादींचा समावेश होता. मी फार खोलात जाऊन विचारले नाही परंतु विचार आला की मायबोलीकरांना विचारावे महिन्याला किती खर्च येतो. आता प्रत्येकाची लाइफस्टाइल वेगळी असल्यामुळे चर्चा फक्त अतिमूलभूत आणि मूलभूत गोष्टींवर राहिल्यास उत्तम.
प्रतिसादामध्ये खालील गोष्टी जरूर लिहाव्यात. बाकी सर्व तपशीलवार न सांगता ढोबळमानाने प्रकारानुसार सांगितले तरी चालेल.

शहर:
परिवार सदस्य संख्या:

अतिमूलभूत गोष्टींवर खर्च:
किराणा
भाज्या, फळे
कपडे
वीजबिल
गॅसबिल
मोबाईल बिल
सोसायटी मेंटेनन्स
घराचा हफ्ता (असल्यास)
मुलांच्या शाळा, कॉलेजचा खर्च (असल्यास)

मूलभूत गोष्टींसाठीचा खर्च:
घरकामासाठी बाई
शहरात प्रवास (बस, टॅक्सी, रिक्षा, उबर)
इस्त्री (बाहेर देत असल्यास)
वर्तमानपत्र
इंटरनेट

चैनीच्या गोष्टींसाठी खर्च:

इतर खर्च:

बघुयात कोणत्या शहरामध्ये साधारण किती खर्च येतो ते.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Lets drop this "you know, a friend of mine..." thing.
ह्या माहितीचा काय आणि कसा ऊपयोग आहे ते सांगू शकाल का? कारण 'मूलभूत' गरजांच्या माहितीमध्ये जरा वेरिएअशन दिसले की तुम्ही किंवा अजून कोणी, हे पहा वेगवेगळ्या शहरातले standard of living calculators अशा लिंका देणार हे मला आताच दिसते आहे.
तरीही अगदीच गरज असल्यास सुरूवात तुमच्या माहितीपासून करूयात का?

"Lets drop this "you know, a friend of mine..." thing."----> जे आहे ते सांगितले. हवे असल्यास तुम्ही ती ओळ इग्नोर मारा Happy

"ह्या माहितीचा काय आणि कसा ऊपयोग आहे ते सांगू शकाल का?"----> खरे तर सांगणार नव्हतो कारण इथे निघणारा प्रत्येक धागा काढताना त्याचा "उपयोग" कोणी लिहीत नाही आणि निघणारा धागा का "उपयोगाचा" असेलच असेही नाही. परंतु मिळणारी माहिती ही कधी ना कधी कोणाला तरी कशी ना कशी उपयोगीसुद्धा पडू शकते. तरीही तुम्ही विचारले आहेच म्हणून सांगतो. मित्राला साधारण अंदाज घ्यायचा आहे खर्चाचा (तुलनात्मक अभ्यास). पुण्यात इतरांसाठी किती खर्च येतो आणि इतर शहरांमध्ये राहिले तर किती येतो याचा. अर्थात वर लिहिल्याप्रमाणे कोणाला तरी कधी ना कधी उपयोगी येईलच ही माहिती.

"कारण 'मूलभूत' गरजांच्या माहितीमध्ये जरा वेरिएअशन दिसले की तुम्ही किंवा अजून कोणी, हे पहा वेगवेगळ्या शहरातले standard of living calculators अशा लिंका देणार हे मला आताच दिसते आहे" ---> तश्या देऊ नये म्हणूनच वैयक्तिक दृष्ट्या प्रश्न विचारला आहे. बाकी चर्चा म्हणाल तर ती कुठेही वळण घेऊ शकते आणि हे जवळपास सर्वच धाग्यांवर होते त्यामुळे पुढे काय येईल ह्याचा विचार करून काहीच उपयोग नाही. आले तरी ते काही थांबवता येणार नाही म्हणून शक्य तितका स्पष्ट प्रश्न विचारला आहे.

"तरीही अगदीच गरज असल्यास सुरूवात तुमच्या माहितीपासून करूयात का?"----> मी अमेरिकेत असतो त्यामुळे त्याचा फारसा उपयोग या चर्चेसाठी होणार नाही. भारतामधील खर्चाची माहिती दिल्यास उत्तम (धागा त्यासाठीच आहे)....अर्थात इतर कोणी त्या त्या देशातील वैयक्तिक खर्च देण्यास उत्सुक असतील तर स्वागतच आहे Happy

वर्तमानपत्र पेपर --- मूलभूत गोष्ट आहे पण या माध्यमाला पर्याय आला आहे.
मोबाईलवर इ-पेपरही दिसतो. टिवीवर सर्व बातम्या दिसतात. रोजचा पेपर बंद करून टाकला आहे दहा वर्षं. दीडदोनशे वाचवणे हा उद्देश नसतो. पेपराची रद्दी काढणे हे एक मोठं काम होतं . कधीतरी शनिवारी /रविवारी विकत घेतो.

धाग्याचा उद्देश काय कळला नाही. मूलभूत गोष्टींत पैसे वाचवता का/कसे असा काहिसा वाटला.

मी अमेरिकेत असतो त्यामुळे त्याचा फारसा उपयोग या चर्चेसाठी होणार नाही. भारतामधील खर्चाची माहिती दिल्यास उत्तम (धागा त्यासाठीच आहे).>> OK, that's fair.

इथे प्रत्येकाची भौगोलिक, आर्थिक, सांपत्तिक, सामाजिक, कौटुंबिक, प्रासंगिक, वैयक्तिक आणि स्वाभाविक परिस्थिती वेगळी असणार ना.? ह्या नुसत्या आठ ढोबळ वैशिष्ट्यांची एकूण पॉसिबल कॉम्बिनेशन्स बघितली तरी 8! म्हणजे 40320 होतील. अशा किमान 40320 वेगवेगळया प्रोफाइल्सच्या (assuming लोक वय, मुले, जबाबदार्‍या, खर्च अशी वैयक्तिक माहिती देतील) मूलभूत गरजा गोळा करून तुम्ही तुमच्या so called भारतातल्या मित्राला काय माहिती पुरवणार आहात. त्याच्या खर्चाचा अंदाज येण्यासाठी इथल्या मूलभूत गरजाच्या खर्चाची सरासरी काढणार आहात?
नुसता डाळ तांदुळाचा भाव, दोन जोडी कपडे आणि भाड्याचे वन रूम किचन एवढीच मूलभूत गरज असेल तर त्याला कशाला survey करावा लागतो. किंवा वर दिलेल्या यादीतील सगळेच मुलभूत अणि अतिमूलभूत गोष्टींचे स्टँडर्ड दरपत्रक एका सर्च वर मिळते.
असे नाही तर मग मूलभूत गरजा मोबाइल फोन पासून 10 लाखाच्या गाडी पर्यंत आणि वर्षातून एकदा गणपतीला गावाकडे जाण्यापासून तर पिरॅमिड्स बघायला जायचेच इथपर्यंत, फ्ल्यू, डायबेटिस पासून महागड्या मेडिकल इंश्युरन्स पर्यन्त काहीही असू शकते. तुम्ही त्याला चैन म्हणाल कोणी त्याला मूलभूत म्हणेल.

मला तर काही ह्या द्राविडी प्राणायामात बाबा रामदेव दिसत नाही. तुम्हाला माहिती मिळण्यासाठी शुभेच्छा. काही इंटरेस्टिंग वाटले तर लिहीन.

अगदी ठाण्यात स्वस्त फीयांच्या शाळांसह महागडी सिंघानियासारखी स्कूलसुद्धा आहेत. पण या माहितीचा उपयोग काय? त्यांच्या पालकांना परवडते तिकडे मुले जातात.

मूलभूत गोष्टींसाठीचा खर्च:
घरकामासाठी बाई
>>>

हा मूलभूत खर्च आहे? कामाला बाई हवीच?
साधरण किती टक्के भारतीय कुटुंबात घरकामाची बाई असे काही आयड्या आहे का कोणाला? मूलभूत बाब घोषित करायला काय टक्केवारी अपेक्षित आहे...

एमी, ती वरची जुनी चर्चा वाचली पटकन. गरीब, निम्ह्नमध्यमवर्गीय,मध्यमवर्गीय,उचचमध्यमवर्गीय ह्या व्यक्तिसापेक्ष कल्पना आहेत. बरेच लोक महिन्याला दीड -दोन लाख उत्पन्न असेल तर स्वतःला अप्पर मिडलक्लास समजतात पण काही वर्षाला ६०-७० लाख कमवले तरी मध्यमवर्गातच गृहीत धरतात स्वतःला जर मुंबई-दिल्लीत महागड्या भागात राहत असतील तर

लोक काय, स्वतःला काय वाटेल ते समजतात. समजू देत. हरकत नाही.
पण 'आर्थिक वर्ग ही व्यक्तिसापेक्ष कल्पना आहे' हे मला मान्य नाही.

माझ्यामते लोकं अंतर्वस्त्रे किती महागडी वा चांगल्या ब्रांडची घालतात यावरून त्यांचा आर्थिक क्लास ठरतो.
पण लो वेस्ट घालून अंतर्वस्त्राचा ब्राण्ड मिरवणारयांचा क्लास मात्र तितकाच लो असतो.

पण लो वेस्ट घालून अंतर्वस्त्राचा ब्राण्ड मिरवणारयांचा क्लास मात्र तितकाच लो असतो >>> कॉलेजचे नमुने आठवले Lol
या सापेक्षतेच्या बाबतीत पारशी समाज तर बाकीच्यांना काय समजत असेल त्याची एक झलक -
जुनी बातमी होती लोकसत्ताला. आता नाय भेटत ती लिंक
'हर महीने 90 हजार कमाने वाला पारसी गरीब' हि २०१२ ची बातमी आहे. सध्याची परिस्थिती माहित नाही.
https://navbharattimes.indiatimes.com/metro/mumbai/other-news/poor-parsi...

हा मुलभूत खर्च आहे ? कामाला बाई हवीच ? >>> मा़झ्या घरी कामाला बाई नाही. गरज वाटली नाही कधी. आपणच स्वतः काम करण्यात आनंद असतो. मनःस्ताप सुद्धा होत नाही.

मित्राला साधारण अंदाज घ्यायचा आहे खर्चाचा (तुलनात्मक अभ्यास). पुण्यात इतरांसाठी किती खर्च येतो>>>>>> मित्राचे बजेट २०-२५ हजाराचे सांगितले असताना तुलनात्मक खर्च हवा कशाला? त्यांच्या शेजारच्या माणसाचे बजेट यापेक्षा जास्त/ कमी असू शकेल की! शिवाय दुसर्‍याचे बजेट कशाला हवंय?
अर्थात वर लिहिल्याप्रमाणे कोणाला तरी कधी ना कधी उपयोगी येईलच ही माहिती. >>>> तोपर्यंत बजेटमधे बरेच फेरफार होतील.

मित्राला आणि त्याच्या पत्नीला मायबोलीवर अकाउंट उघडायला सांगा. त्याच्याकडून मायबोलीकरांना बरीच माहिती मिळेल. >>>+१

मला तर बाबा आमच्या क्रेडिट कार्डाचे बील घरच्या इतर मंडळींच्या बीलाबरोबर तुलना केली तर जाम टेन्शन येतं! बाकीचे सगळे आमच्यासारखेच राहत असताना आमचं बील एवढे कसे! दर चार महिन्याने एकदा बील नीट बघायचा exercise होतो, चार-दोन ठिकाणी हे कसले एवढे पैसे आपण भरले असे, परत येरे माझ्या मागल्या!

एक चंमतग.
आमचे एक शेजारी आहेत. घरात दोघेच ज्ये ना. आमच्याकडे आम्ही तिघे. त्यांचं विजेचं आणि गॅस (पाइप्ड) चं बिल आमच्या तिप्पट चौपट असतं.
त्यांच्याकडे असलेली उपकरणे आमच्याकडेही आ हेत. एसी दोघांकडेही नाही. उलट आमच्याकडे डेस्कटॉप कॉ म्प, मायक्रो वेव्ह , ओटीजी आणि फुडप्रोसेसर आहे. हे त्यांच्याकडे नाही.

काय लोकहो सांगा की खर्च, लगेच ईंकम टॅक्स रेड पडणार आहे का...

हल्लीच मी चारेक महिने घरखर्च लिहून कॅल्युलेट करायचो.
घरभाड्याचे २५ हजार पकडून साधारण सरासरी ९५ हजार महिन्याचा खर्च होतो आमचा.
स्थळ - नवी मुंबई

यात घरभाडे, लाईट, वायफाय, मोबाईल, गॅस, टाटास्काय, खाणेपिणे मौजमजा, प्रवासखर्च, माझी रोजची औषधे ईत्यादी महिन्याच्या महिन्याला लागणारया ईतर वस्तू पकडल्या होत्या.

वस्त्र, अलंकार, ईलेक्ट्रॉनिक्स वगैरे कधीतरीच घेतल्या जाणारया वस्तू वगळल्या आहेत. त्यांचे वार्षिक बजेट वेगळे काढावे लागेल.

आपली आवक किती आहे त्या वर तुमचा खर्च अवलंबून असतो .
अन्न,वस्त्र,निवारा ह्या मूलभूत गरजा असल्या तरी त्यांचा दर्जा असतो.
आपली आवक चांगली असेल तर चांगले घर,ब्रँडेड कपडे,आणि पाश्चिमात्य पदार्थ(मग डाळ roti हे जेवण हे आपल्या साठी नसून ते समाजातील तुच्छ गरीब लोकांचे आहे अशी भावना )हे सर्व येते
त्या मुळे मूलभूत गरज भागवण्यासाठी होणारा खर्च हा व्यक्ती नुसार बदलतो.
सर्वात चांगले आपला इन्कम किती ह्याचा विचार करून बजेट तयार करावे
आणि तुमचा इन्कम हा स्थिर नाही अगदी सरकारी नोकरी असली तरी किंवा धंधा असला तरी ह्याची जाणीव पदोपदी ठेवावी .
जगात सर्व गोष्टी अस्थिर आहेत.
त्या मुळे भविष्याची तरदुत तुम्हाला रोजच करावी लागेल

ऋन्मेषजी, तुम्हाला घरभाडे का भरावे लागते ? तुमची चार चार घरं आहेत मुंबईत असे वाचले होते मी.
https://www.maayboli.com/node/63028?page=1
आणि इथेही
https://www.maayboli.com/node/62997?page=7#comment-4078771 राहुल यांच्याच दोन्ही कमेण्ट्स आहेत.

Rajesh188, पोस्ट आवडली आणि पटली ( गरिबांना तुच्छ लेखणे, हे स्टेटमेंट सोडून)

जर खूप वर्ष परदेशात राहून भारतात परत आला असाल तर त्या खाण्याची सवय होते आणि ते खाणं मूलभूत गरजेमध्ये येऊ शकतं. त्याचा अर्थ डाळ रोटीला तुच्छ समजणं नाही.

मुलभुत काय अगदी सगळ्याच भूतांचा खर्च स्वस्तात ठेवायचा तर नेपाळ भूतान सारख्या ठिकाणी प्रॉपर्टी घेवून निवास करायला सांगा की त्या मित्र दांपत्याला. पुण्यातल्या फ्लॅटच्या भाड्यावर ऐशरामात जगतील तिकडे.
जमल्यास एकाच कॉलनीमध्ये घरे घ्या म्हणजे तुमचीही पुढची सोय होईल.

खूप लोक पट्टाय्या ला जातात retire व्हायला, तिथे वेगेटरीण झालेले खूप जर्मन भारतीय रेस्टॉरंट उघडून बसलेत. जर्मनांनी दिलेलं भारतीय शाकाहारी ऐवजी आपला कोणीतरी जाऊन रेस्टॉरंट उघडले तर बरं.

ऋन्मेषजी, तुम्हाला घरभाडे का भरावे लागते ? तुमची चार चार घरं आहेत मुंबईत असे वाचले होते मी.
>>>>
चार नाही तीन. आईवडिलांची आहेत. आता मी स्वत:चे घेतलेय. ताबा मिळेपर्यंत भाड्याने राहतोय नव्या घराजवळच.

घरे तीन आहेत
आईवडील खूप आहेत.
जसे कृष्णाला गोकुळात होते. लाडका होतो मी लहानपणी बिल्डींगमध्ये सर्वांचा. चुकून रांगत रांगत आईचा डोळा चुकवून घराबाहेर पडलो की जी/जो येईल ती/तो मला उचलून घेऊन जायचा आणि आपली वात्सल्याची भूक भागवायचा Happy

Pages