रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हल्ली माई कुणाक च्याय पण देत नशात Uhoh

माका वाटता, माईचा एपिसोड कंटेटाक कैची लावल्यान.. माई आधीसारका प्रत्येक फ्रेमात दिसत नशात.

पाटणकरणीची जाम टरकली आहे. मजा येते बघून. आज तर वच्छी तिच्या घराबाहेर बसून काशीशी बोलत होती रात्री. पोलिस इतके दिवस अज्ञातवासात होते वाटतं. आता प्रकट झालेत. 25 पर्यंत हे सगळं गुंडाळतील तर बरं. म्हणजे मी अग्निहोत्र बघायला मोकळी. नाहीतर एक तास टीव्ही म्हणजे जास्त होईल रोज.

मी हि सिरियल ह्या आठवड्यापासून परत सुरु केली अधून मधून पहायला. बरेच प्रश्ण पडले.

ती शेंवता, अण्णाच्या कलमी/खूनी कारवाया माहित असून , इतकी का घाबरते शोभाचा खून झाल्यावर?
तिला, तिच्या नवर्‍याचा खून अण्णानेच केला असेल असा अजिबातच संशय कसा येत नाही?

कोणीतरी गरीबाला ज्ञानप्रदान करा , नाहितर

माका काय कळणा नाय.... वं

शेंवताचा चेडू खय असा? पांडू ?

शेंवताचा चेडू खय असा? >> बोर्डिंगात आसंय.
ती शेंवता, अण्णाच्या कलमी/खूनी कारवाया माहित असून , इतकी का घाबरते शोभाचा खून झाल्यावर?>> घरी एकटी असां म्हणान घाबरत अशान.
तिला, तिच्या नवर्‍याचा खून अण्णानेच केला असेल असा अजिबातच संशय कसा येत नाही?>> तिका सगळां म्हाईत आसंय.. वेळ ईली की फणा काडुक आण्णाक डसुचा प्रयत्न करी असां वाटतां... पण आण्णा तिचो फणा ठेचुक व्हया का नाय तां बघत रवां तुमी.

शेवंताला सर्व माहीतच आहे. लेकीनेच सांगितले की समक्ष रात्रीत उठून. पण तिला खरेतर अण्ना च्या इस्टेटीवर डोळा आहे. जसे अ. ने तिला दागिने देउन सिड्युस केले तसे तिने पण ड्रामे नखरा व अर्थात अलिट्मेट प्राइज ऑफर करून अ. ला अंकित करून ठेवले आहे. ती तयाला एकदा म्हणतेना सुसल्या तुमचीच आहे तिचा पण इस्टेटिवर हक्क आहे. इट इज ऑल फोर दॅट प्रोपर्टी अँड मनी फ्रॉम द बिगिनिन्ग. आता वच्च्ची आबांना मुंबएला पाठवून द्यावे. केविल वाणे वागणे डोक्यात जाउ लागले आहे.

चोंगट्या साहेब मर्डर केसची पूर्वतया री आता सुरू झालीच आहे.

काय पब्लिक आहे कोक णा तले त्यापेक्षा पुणेरी भामटे परवडले.

आता वच्च्ची आबांना मुंबएला पाठवून द्यावे. केविल वाणे वागणे डोक्यात जाउ लागले आहे.>> अगदी खरे... काल आबा वच्छीला मांडीवर झोपवुन 'निंबोणीच्या झाडामागे..' अंगाई म्हणत होते हे बघुन त्यांचेही दिवस भरले हे जाणवले Uhoh
काल संपुर्ण भागात आण्णाचा वाडा, माई, दत्ता, सरिता दिसले नाहीत हे तर त्याहुनही वाईट. बहुतेक आता सिरिअलचा शेवट जवळ आला की काय असे वाटु लागले..

बहुतेक आता सिरिअलचा शेवट जवळ आला की काय असे वाटु लागले..>>सीरीअलचा शे वट नाय रे सीझन फिनाले म्हणा यचे शे वांति मळ् वट भरून झाडाला लटकली की झाले. नेक्स्ट सीझन फर्स्ट एपिसोड अण्न्या चे बालपण किशोर पण इत्यादि. सुरू होईल. लफडे बाजीची सुरुवात.

त्या झाडाचा मात्र विमा काढुक व्हया. नक्की मोडान पडतले.

माधव तर मला परवा स्तार प्रवाहच्या कोणत्यातरी सिरिअल मधे दिसला होता.. चांगला गोलमटोल झालाय. याचा अर्थ राखेचा२ मधे आता त्याला पुन्हा एंट्री नसेल.. त्याची ठोकळी पण इथे दिसण्याची शक्यता धुसरच आहे.

डीजे,
तुम्हाला धन्यवाद सविस्तर भाग लिहिला म्हणून.

कालच्या भागात आण्णा नाईकाचा वाडा भन्नाट अँगलने दाखवला.. वाड्याचा रुबाब पुर्णतः उठुन दिसत होता.. पुढ्न पाठीमागुन सगळीकडुनच शुटिंग दाखवले होते. फक्त परसदारीचं शुटिंग करताना विहिरिच्या मोटरवर टाकलेली पोतेरी आणि वाड्याच्या अवती भोवती फिरवलेल्या पाण्याच्या प्लंबिंग पाईप्स उठुन दिसत होत्या. (विहिरीला मोटर आहे, वाड्याच्या भिंतिंवर प्लंबिंग पाईप्स दिसत आहेत तरी घरातील सर्वांना विहिरिच्या रहाटावरुन कळशीने पाणी शेंदण्याची किती ती हौस..!)

वच्छी रात्रीची पाटणाकरणीच्या दारात बसुन शोभाची वाट बघत होती. काशीशी बोलत होती. तिची अवस्था बघवत नाही आता.. तरी नागीण ती नागीणच फणा काढल्याशिवाय रहाते का..? एवढ्या दुरवस्थेतही एका बाईला (जी वच्छीला शोभाबद्दल काहीबाही बोलली तिला) वच्छी ष्टाईल दम देऊन ठेवला.. Proud
काल शोभाच्या चौकशीसाठी पोलिस वाड्यावर येऊन गेले. आण्णाला पोलिसी खाक्या दाखवला तरी शेवटी आण्णा कुठवर पोचला आहे हे इन्स्पेक्टर मंगेश जाधवांना कळुन चुकलं असणार. पोलिसांच्या चौकशीत सरिता शोभाबद्दल जरा जास्तच बोलली. माईने पण पोलिस चौकशीची संधी साधुन शोभासठी गळा काढुन मनसोक्त रडुन घेतलं. पांडबाने परसदारी केळीच्या बागेत इन्स्पेक्टरचा फुल-टु फजितवडा केला. Proud

काल एक गंमतच झाली. अपूर्वा नेमळेकर व मंगल राणे शेवंता शोभा ह्यांना मी इन्स्टा वर फॉलो करते. काल अपूर्वा ची स्टोरी होती. वेटिंग फॉर मांडोवी एक्स्प्रेस फॉरेव्हर. ती शोभा व चोंगट्या बोअर होउन वाट बघत बसले होते. मी नंतर ह्र् दय जाधव ह्यांना फॉलो केले. तर त्यांनी पण फॉलो बॅक केले. मी त्याम्ना मेसेज पाठवला तर लगेच उत्तर पण आले. हाउ स्वीट.

मला तर तो चोंगट्या ज्यास्त आवडतो. ...
माती खाल्ली.. माती खाल्ली...

—-
त्याने ते गावातले लुब्रट पात्र बरोबर पकडलेय.. असतात एकदम अशी पात्रं. कामधाम न करता, इथून तिथे लावालावी करत फिरायचे.

अरे वा अमा... आम्ही पण मडगावहुन सिंधुदुर्ग स्टेशन पर्यंत मांडोवी एक्स्प्रेस नेच आलो होतो.. तरी मी सावंतवाडी रोड स्टेशन वर डोळे फाड-फाडुन बघत होतो की राखेचा२ चं कोणी दिसतंय का गाडीत शिरताना Proud

तिर्‍हाईताने (मांत्रीकाने) शोभा मनुष्य राहिलेली नसुन तिचे कार्य घालुन तिला आता मुक्त करा असे सांगितल्याने काल वच्छीची अवस्था अजुनच केवीलवाणी झाली. आबाने थेट वाड्यावर जाऊन किचनच्या खिडाकीत उभा राहुन माईकडे मदत मागितली. माई पण स्वभावधर्माला जागत आबासोबत वच्छीच्या घरी गेली आणि वच्छीला समजावत भाताची पेज पाजु लागली तेवढ्यात तिथं आण्णॉ आले... Uhoh

पण त्यांनी खोटा कळवळा दाखवत या प्रकरणात ते स्वतः लक्ष घालुन शोभाला परत आणण्यासाठी प्रयत्न करतील असं सांगुन माई आणि आबास धक्का दिला... वच्छी मात्र अजुनही तंद्रीत होती. त्यानंतर रात्री निजानीज झाल्यावर वच्छीस दरवाजा वाजल्याचा भास झाला म्हणुन ती सगळे त्राण एकवटुन दरवाजा उघडते तर समोर काशी उभा असतो.. शोभा कुठे आहे असं विचारत असतो आणि त्याच वेळेस शोभा काशीच्या मागुन पुढे येते आणि तिला बघुन वच्छीचा चेहर्‍यावर तेज येते असं दाखवलं.. कसंतरीच वाटलं मला. Uhoh

मला वाटते की पहिल्या भागात ज्याअर्थी आण्णोबा पोलिसांचा ससेमिरा मागे न लागता बायको-मुलाच्या पुढ्यात आरामात मरतो त्याअर्थी त्याने सगळे खुन व्यवस्थीत पचवलेत.

शोभाचा मृत्यू नेमका कसा झाला? अण्णा तिला पिपात लपून दाखव म्हणाले आणि पूढे काय झालं? आमच्या कडे नेमके लाईट गेले तेव्हा

शोभा पिंपात बसल्यावर तिथेच एक गोणता असतो. तो गोणता अण्णा शोभाच्या तोंडावर घालतो आणि अक्षरशः जोर लावून दाबून तिचा विरोध आणि तिची जगण्याची धडपड याला पूर्णविराम देतो.

मस्त घेतलाय तो शॉट म्हणजे एकाच वेळी आपल्याला अण्णांचा राग आणि शोभा बद्दल कणव येते. Zee 5 वर अजून ही बघू शकता .

मला का कोणास ठाऊक पण असं वाटू लागलंय की अण्णोबा शोभाच्या खुनाचा आळ शेवंतावर घालणार. शेवंताने इन्स्पेक्टरला शोभाने माझे दागिने चोरले असं सांगितलेल्ं दाखवलं त्यामुळे माझा संशय आणखी बळावलाय.

मला का कोणास ठाऊक पण असं वाटू लागलंय की अण्णोबा शोभाच्या खुनाचा आळ शेवंतावर घालणार. शेवंताने इन्स्पेक्टरला शोभाने माझे दागिने चोरले असं सांगितलेल्ं दाखवलं त्यामुळे माझा संशय आणखी बळावलाय.>> तो इन्स्पेक्टर मंगेश जाधव आला म्हणुन त्या दिवशी शेवंताचं कलम लागता लागता राहिलं..!!

चोन्गटया जवळपास स्टेशनवर पोचलाय. आता गाडी कधी सुटते ते पहायचं. शेवंताचं कन्फर्म्ड तिकिट पुढल्या गाडीचं. चोन्गटयाला सोबत घेऊन अण्णाला अडकवायला जाणार आणि वरची वाट धरणार. रच्याकने, काशी मेल्यावर शेवंताला इसरला वाटतं. शोभची चौकशी करत होता.

चोन्गटयाचं वाईट वाटतं. त्याला पेटी कुठे गायब झाली ते माहित नाही म्हणून. नाहीतर पोलिसाना anonymous tip देता आली असती त्याला. बिचारा उगाच जिवाला मुकणार.

व्हय तर.. कालचो भाग वच्छी+आबा+चोंगट्यान खाऊक टाकलान....!

चोंगट्याचो रिझर्वेशन आजचो नायतर उद्याचो गाडीचा अशान असा माकापण वाटताहा. Uhoh

Pages