परवा कोल्हापूरहून येताना सातारा पुणे हायवेवर भोरजवळ एका हाॅटेलची जाहिरात पाहण्यात आली आणि ती पाहून हसावं का रडावं हे कळतचं नव्हत.. जाहिरात साधारण अशी होती -
हाॅटेल ओमकार
महाराजा मिसळ.
निखारा मिसळ.
दही मिसळ.
सुखी भेळ. ......
आणि बाजूच्या कोपर्यात मोठा वर असलेला दिशादर्शक बाण आणि त्याखाली लिहलेलं..
क्लिन टाॅयलेट
याचा अर्थ काय?? प्रवाशांनी मिसळीचे हे प्रकार तरी पचवावे किंवा स्वच्छ टाॅयलेटचा अनुभव तरी घ्यावा...
थोडसचं पुढे गेल्यानंतर अजुन एक हाॅटेल दिसलं.. काय नाव दिल होतं हाॅटेलला...नाव सुचवणारा काय खात असेल ह्याचाच विचार मी करत होतो..जाऊ दे जास्त सस्पेन्स ठेवत नाही... तर..हाॅटेलच नाव होत..
TAUJI ON THE WAY..
आणि मराठीच्या फलकात चक्क "ताऊजी ऑन दिवे"
दि आणि वे मध्ये स्पेस तर द्या रावं...आणि हे काय नाव ठेवण्यामागचं लाॅजिक.. तुझे ताऊजी ऑन दे वे आहे तर आम्ही काय करायच??
का ते क्लिन टाॅयलेटच्या शोधात ऑन दे वे आहेत?
आता वळूया दुकान फलकाकडे ..ठाण्यात लहान मुलाच्या कपड्याचं दुकान आहे...आणि नाव आहे "हकोबा"
पहिंल्यादा मी वाचलं तेव्हा अनवधानाने मी हगोबा वाचलेलं..
एका साडीच्या दुकानाच नाव साॅरी मॅडम असं आहे... किती humble दुकानदार आहे बघा ..जास्त साड्यांची वेरायटी नाही म्हणून आधीच साॅरी म्हणतोय ..
ठाण्यात ढोकाळी-कोलशेत जवळं..लाॅड्री आणि क्लिनिगंच दुकान आहे..
नाव आहे वाॅशिंग्टन डी.सी..
डी.सी. म्हणजे ड्राय क्लिनिंग ...
माझ्या पाहण्यात आलेले सध्या इतकेच आहेत..आणखी पाहण्यात आले की आठवले की, लिहेन इथे...
तुम्हीसुद्धा असे विनोदी फलक किंवा जाहीराती पाहील्या असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा...
भारी धागा!
भारी धागा!
आता झणकेदार मिसळ खाऊन माणूस आधी काय शोधणार?
त्यामुळेच त्याने ते लिहिलं असावं
हॉटेल 'बेवकूफ' तर प्रसिद्ध आहे. नावाच्या बाबतीत!
कुठे आहे हे बेवकूफ हाॅटेल..?
कुठे आहे हे बेवकूफ हाॅटेल..? मला बेवकूफ नावाची साईट माहीतेय तिथून बर्यापैकी चांगले कपडे आपण खरेदी करू शकतो..
https://www.google.com/amp/s
https://www.google.com/amp/s/hindi.firstpost.com/amp/culture/story-behin...
FYIP
अरेच्चा!!!! फुकट पब्लिकसिटी
अरेच्चा!!!! फुकट पब्लिकसिटी मिळेल म्हणून असं नाव ठेवलं असेल..
कुठल्यातरी हाॅटेलात पदार्थाची नावे अशीच गंमतीशीर ठेवली होती..आता आठवत नाही.. आठवलं की, लिहेन .
एलिजाबेथ टेलर
एलिजाबेथ टेलर
दंडे मारुती चायनीज सेंटर!!!!
दंडे मारुती चायनीज सेंटर!!!!
मारुतीचा आशीर्वाद इंडियन चायनिजला. लगे रहो!!!
नाशिकला एक प्रभूइच्छा नावाचं
नाशिकला एक प्रभूइच्छा नावाचं ड्रायक्लीन कम इस्त्रीचं करून देण्याचं दुकान होतं. त्याच्यात लावलेल्या निरनिराळ्या पाट्या म्हणजे त्याचा USPच. अनेक पाट्यांमध्ये काही पाट्या.
१. कपडा फाटला - प्रभूइच्छा!
२. कपडा जळाला - प्रभूइच्छा!
३. अर्जंट रफू करून मिळेल, असा, की नव्यासारखा. हे कपडे तुम्ही घालावे, ही तर प्रभूइच्छा!
हे हे भारीये! प्रभूइच्छा!
हे हे भारीये!
प्रभूइच्छा!
वॉशिंग्टन डीसी आणि एलिझाबेथ
वॉशिंग्टन डीसी आणि एलिझाबेथ टेलर आवडलं मला
अज्ञातवासी..भारीय प्रभूच्छा..
अज्ञातवासी..भारीय प्रभूच्छा..
मग पैसे काऊंटरवर मुद्दाम आपल्याजवळ पाडायचे आणि आपल्याकडेच ठेऊन बोलायचं...प्रभूच्छा...
मुलुंड -गोरेगाव लिंक रोडवर एक
मुलुंड -गोरेगाव लिंक रोडवर एक 'बिंदास बेगम रॉकिंग राजा' नावाचे रेस्टॉरंट आहे.
बिंदास बेगम राॅकींग राजा..
बिंदास बेगम राॅकींग राजा...अरेरे काय हे! हुक्का पार्लरला सुट झालं असतं हे नाव..
गनबोटे फरसाण गट्टम्मा
प्रभुइच्छा भारीच.
हायवे ला एक अंतर्मना ग्रॅनाईट आहे.
गनबोटे फरसाण गट्टम्मा
लोणावळ्याजवळ एक ढाबा आहे, '
लोणावळ्याजवळ एक ढाबा आहे, ' थंडा मामला'.....
नाव वाचलं की वाटतं आतमध्ये शुकशुकाट असेल.
झटका भेळ - शिवाजीनगर
झटका भेळ - शिवाजीनगर
हॉटेल सासुरवाडी
हॉटेल सासुरवाडी
"हकोबा" हकोबा हा कॉटन
"हकोबा" हकोबा हा कॉटन कपड्याची सुमारे ५० वर्शे जुनि कम्पनी आहे . he Complainant, an Indian company, trades under the name “Hakoba”, specialising in “embroidery sarees”, fabrics, laces and dress materials, and other fashion products.
The Complainant operates websites at “www.hakoba.in” and “www.pelhakoba.com”.
The Complainant owns United States registered trade mark no. 4822272 for the stylised term HAKOBA (the “o” is heart-shaped), filed December 7, 2004, registered September 29, 2015, in international classes 24, 25 and 26. The “first use in commerce” date was given as February 3, 2009. The “first use” date was given as 1961.
Pioneer Embroideries Limited (“Pioneer”) (an Indian company and part of the Complainant’s group) owns three Indian registered trade marks nos. 423501, 631293 and 417365 for the same stylised term HAKOBA, all filed on June 19, 2003, and registered in classes 24, 25 and 26, respectively.
The disputed domain names were registered on the following dates:
: August 5, 1998
: October 11, 2002
: September 27, 2006
त्यामुले ते दुकान हकोबा ब्रान्डचे आउट लेट असनार....
एका साडीच्या दुकानाच नाव साॅरी मॅडम असं आहे..
काहीतरी गफलत होते आहे.या नावाचे दुकान मी नाशिकला पाहिले आहे आणि त्यात फक्त पुरुषाण्चे कपडे मिळत/ मिलतात. महिलान्चे कपडे ते ठेवतच नसल्याने हे फक्त पुरुषाण्साठी दुकान असल्याचे नावातून अभिनवपद्धती ने सूचित केले आहे . महिलान्चे कपडे उपलब्ध नसल्याने कृतक क्षमा मागितली आहे
साॅरी मॅडम ह्या दुकानात
साॅरी मॅडम ह्या दुकानात प्रत्यक्ष मी जाऊन नाही पाहीलं पण बाहेरून फक्त नामफलक पाहीलेलं आठवतयं आणि एकदा मी माझ्या एका मैत्रिणीशी ह्याबद्दल बोललोदेखिल होतो..तेव्हा तिनेच साडीच दुकान असल्याच सांगितलं...बहुतेक तिने मला गुंडाळलं असेल ..असो इथे मी माफी मागतो...अनावधानाने चुकीची माहीती दिल्याबद्दल..