Submitted by सुप्रिया जाधव. on 22 October, 2019 - 01:03
किती अस्वस्थशी होते स्वतःचे ऐकते तेव्हा
किती निर्धास्त असते मी मनाला मारते तेव्हा
हवीतर साक्ष काढूया रुढींच्या दिव्य भिंतींची
मनाच्या उंब-याआडून ती किंचाळते तेव्हा
तुला कळणार नाही हात सुटल्यावर कसे होते
पतंगीला जरा निरखून बघ ती फाटते तेव्हा
जगामध्ये तुझ्या आश्रीत मी हे जाणते पक्के
घरामध्ये कुणी पिल्लू निराश्रित आणते तेव्हा
जरी जाणार अस्ताला उगवता सूर्य हे कळते
तरी व्याकूळते हे मन दिशा सांजावते तेव्हा
नभामध्ये तुझा वावर, पहा उतरून जमिनीवर
कळेने जीव जातो ठेच जेव्हा लागते तेव्हा
सुप्रिया मिलिंद जाधव
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह वा! मस्तच अगदी!
वाह वा! मस्तच अगदी!
लाजवाब
लाजवाब
छान
छान
अतिशय अर्थपूर्ण!!
अतिशय अर्थपूर्ण!!
>>> जगामध्ये तुझ्या आश्रीत मी हे जाणते पक्के
घरामध्ये कुणी पिल्लू निराश्रित आणते तेव्हा>>>> आई ग्ग!!
.
>>>>>>>> किती अस्वस्थशी होते स्वतःचे ऐकते तेव्हा
किती निर्धास्त असते मी मनाला मारते तेव्हा>>> +१००
>>>>>>> तुला कळणार नाही हात सुटल्यावर कसे होते
पतंगीला जरा निरखून बघ ती फाटते तेव्हा>>>>>>>>
मनापासून आभार
मनापासून आभार