Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
होय बघितलाय, पण अत्ता
होय बघितलाय, पण अत्ता पावसामुळे आमचं टाटा स्काय नॉट रिसीव्हींग सिग्नल मोड मध्ये गेले त्यामुळे पुढचं सगळं बुडलं
मी आधीच लिहिलेलं त्याप्रमाणे
मी आधीच लिहिलेलं त्याप्रमाणे शिवानी आणि बाप्पाला झीने बोलावलं नव्हतं, हे मला माहिती होतं त्यामुळे लिहिलं होतं मी.
माझ्या भाचीशी पण शिवानी चांगली वागते.
तमाम जनता bb मधलं बघणार ना, वैयक्तिक कोणाशी कशी वागते, ह्याच्याशी जनतेचे काय देणं घेणं, तिथे तर सांगायची मी अशीच आहे आणि अशीच रहाणार.
अंकुश तरी वाईट का बोलेल.
अंकुश तरी वाईट का बोलेल. शूटिंग संपलं की तू कोण आणि मी कोण, आणि न जाणो परत एकत्र काम करावं लागलं तर. मराठी इंडस्ट्री छोटी असल्यामुळे मी हिच्याबरोबर कामच करणार नाही वगैरे चोचले परवडत नाहीत. सगळे डिप्लोमॅटिक बोलतात आणि तेच प्रॅक्टिकल आहे.
मला तरी शिवनी सुर्वे नाटकी
मला तरी शिवनी सुर्वे नाटकी आणि पक्कीच वाटते जशी बिबॉ मधे दिसली, स्वतः ला जाम ग्रेट समजते ती.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=VZHd2J0GQys
कलर्स मराठी awards, यात जास्त bb स्पर्धक आहेत, दोन्ही वर्षाचे म्हणून इथे पोस्ट केलं.
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/B4AImN3ngHw/?igshid=zlsn8buv2vcu
वीणा आणि शिव दोन स्पेशल कलर्सच्या शो मध्ये.शूटिंगदरम्ययानचा फोटो..
कधी असतो तो prgm. मला बघायचा
कधी असतो तो prgm. मला बघायचा आहे. शिव वीणा कदाचित नेक्स्ट विक मध्ये असतील ना.
31 ऑक्टोबरपासून चालू होत आहे
31 ऑक्टोबरपासून चालू होत आहे.9.30 वाजता,गुरुवार आणि शुक्रवार.
पहिल्या भागात सुभा आणि सुमित राघवन आहेत.
अच्छा, thank u.
अच्छा, thank u.
कलर्स अॅवोर्डमध्ये किशोरी
कलर्स अॅवॉर्डस शो मध्ये किशोरी शहाणे आणि सुरेखा पुणेकर पिन्गा गाण्यावर डान्स करणार आहेत. प्रोमो पाहिला आज.
सुयोगच गांधी हत्या आणि मी हे
सुयोगच गांधी हत्या आणि मी हे नाटक येत आहे,त्यात रुपाली भोसले आहे.
चला ,निदान या वेळच्या कंटेस्टंटना बिबॉसनंतर काम मिळत आहेत.
कलर्स अॅवॉर्ड शो मध्ये शिव
कलर्स अॅवॉर्ड शो मध्ये शिव विणा चे काहीच बाईट घेतलेले दाखवले नाहीत, म्हंजे मी तरी नाही बघितले, नेहा शितोळे रेड कार्पेट वर सगळ्यांचे बाईटस घेत होती, किशोरी शहाणेशी सुद्धा बोलताना दाखवली, शिव ठाकरे तर बिबॉ चा विजेता तर त्याचे बाईटस् दाखवायला पाहिजे होते, भले विणा शी बोलताना नका दाखवू. स्टेजवर जलवाने जे स्किट केलं त्यात बिबॉ चा शिव विणा चा उल्लेख होता
ओहह असं झालं काय. असुदे
ओहह असं झालं काय. असुदे असुदे, शिव वीणाला जबरदस्त भाव मिळतोय, नेहाला कधी नव्हे तो मिळाला , चमकुदे जरा. तसंही शिव वीणावर सगळे जळत असणार मनातून, हिंदी मिडियापण जाम भाव देतेय अजूनही. बाहेर मिडियाने खूप बाईट्स घेतले, कलर्स मराठी awards च्या वेळी. त्यामुळे नेहाला किंवा channel ला वाटलं असेल पुरे आता पण शिव जिंकला तरी नाही हे मात्र आश्चर्य वाटलं.
(No subject)
पुढच्या आठवड्यात दोन
पुढच्या आठवड्यात दोन स्पेशलमध्ये बिबॉस 2मधले शिव वीणा,नेहा माधव आणि सुरेखा पुणेकर बिचुकले येणार आहेत.
केळकर वैशाली ,किशोरी शहाणेला बोलावतील अस वाटल होत,पण नाही आहेत.
आताही शिवानी नाहीच.
शिवानीला फार भाव देत नाहीयेत
शिवानीला फार भाव देत नाहीयेत कलर्स मराठी वाले असं एकंदरीत दिसतंय. तो तिने शेवटचा टास्क होऊ नाही दिला तेव्हापासून तिचा भाव उतरला, तिला त्यानंतर खाली खाली आणत गेले एकेक स्टेप.
पण किशोरीताई कशा नाहीत, नाहीतर त्या आणि शिवानी स्पेशल एपिसोड करतील नंतर किंवा शिवानी अजिंक्य आणि केळकर वैशाली करतील. अजिंक्य bb त नव्हता म्हणा.
आज उद्या bb स्पेशल भाग, दोन
आज उद्या bb स्पेशल भाग, दोन स्पेशलमध्ये. रात्री 9.30 कलर्स मराठीवर.
जाम बोअर झालं कालचं.
जाम बोअर झालं कालचं. बिचुकलेने किती पकवलं काल.
वीणाला अजूनही नाचता येत नाही, इतके दिवसांत शिकली नाही, शिव किती involved आणि ही हसत राहते. पण वीणा प्रश्नांची उत्तरं छान देते. ते शिवला नाही जमत.
माधव rocking दिसत होता सर्वात, आणि त्याने मात्र सांगितलं की शिव वीणाने कधीच trp साठी केलं नाही हे मला समजत होतं. नेहा मात्र म्हणाली मला वीणा करतेय आधी असं वाटलं पण नाही. नेहा दिसत चांगली होती पण बोलायला तोंड उघडल्यावर फक्त दातांकडे लक्ष जात होतं, जे आपल्याला जाणवायचे काळे दात bb मध्ये तसंच. सॉरी हे लिहिण्यासाठी पण हेच दिसत होतं.
शिव वीणा छान दिसत होते पण माधवपेक्षा कमी. सुरेखाताई पण छान दिसत होत्या पण पावडर खूप लावली आहे असं वाटत होतं. बिचुकले सर्वात वाईट दिसत होता, तो गॉगल भयानक वाटत होता.
शिवचं काम काही सुरु झाल असावं, तो अंधेरीत शिफ्ट झालाय.
जाम बोअर झालं कालचं.
जाम बोअर झालं कालचं. बिचुकलेने किती पकवलं काल. >>>>>>>>> अगदी अगदी. बिबॉच्या पहिल्या एपिसोडमध्ये बिबॉमध्ये येण्याच वेगळ कारण सान्गितल होत, आणि आता भलतच कारण देतोय.
माधव rocking दिसत होता सर्वात >>>>>>>> ++++++++१११११११११ आधी मी त्याला ओळखलच नव्हत.
शिव आणि विणा, लग्नाला
शिव आणि विणा, लग्नाला घरच्यांची परमिशन आहे का ह्या प्रश्नावर थबकले. हो नाही आणि नाहीही नाही टाईप्स रिअॅक्शन होती. मला तर ते दोघे ओढून ताणून हसत होते असं वाटलं. संपूर्ण बीबी मी विणाचा राग राग केला पण काल दया आली तिची
पन्नास टक्के काम झालं म्हणाले
पन्नास टक्के काम झालं म्हणाले ना. त्या दोघांवर आहे मिया बिवी राजी तर क्या करेगा काझी.
तसंही दोघे एकमेकांच्या घरी दिवाळीत पण गेलेले. मिळेल परवानगी त्यांना करायचं असेल तर. सध्या तरी ते करियरवर लक्ष देणार आहेत. नशिबात असेल तर होईल. पण त्यांची जोडी हिट होती आणि अजूनही आहेच.
शिव वीणाला घेऊन जातो तेव्हा त्यांची आई विणाचे जास्त लाड करते, शिव म्हणाला आई माझ्याकडे दुर्लक्ष करते तेव्हा, पुरणपोळी स्वत:च्या हाताने भरवली तिला असं एका मुलाखतीत सांगितलं त्याने, प्लस सर्व नातेवाईकांनी सांगितलं की वीणा आम्हाला आवडते, ती फार गोड आहे, लवकर लग्न कर तिच्याशी. हे शिवनेच सर्व सांगितलं आहे. इथे सांगेल का नाही माहिती नाही.
त्या दोघांएवढे मिडिया attention मेघालाही कधी मिळालं नाही आणि या सिझनच्या इतर कोणालाही मिळत नाहीये. नेहा दुसरी येऊन उपेक्षितच आहे.
हम तो बहोत खुश है, मला जे आवडायचे त्यांनाच मिडीयाने जास्तीत जास्त भाव दिला. जे आवडत नव्हते त्यांना ok ok च भाव मिळाला.
शिव आणि विणा, लग्नाला
शिव आणि विणा, लग्नाला घरच्यांची परमिशन आहे का ह्या प्रश्नावर थबकले. हो नाही आणि नाहीही नाही टाईप्स रिअॅक्शन होती. .....
अगदी खर.शिवच्या आईची पूर्ण परवानगी नाहीच आहे.
दोघांनी अजिबात घाई करू नये.
दरम्यान रुपालीला सुयोगच गांधीहत्यि आणि मी हे नाटक मिळाल आहे.येईल लवकर.सौरभ गोखले नथुराम गोडसेंची भूमिका करणार आहे.
कोण सौरभ गोखले?
सौरभ गोखले राधा ही बावरी, संत
सौरभ गोखले राधा ही बावरी, संत ज्ञानेश्वर सिरियल्स मध्ये लीड रोल करणारा.
UP पन्नास टक्के काम झालं म्हणाले ते दोघे, तुम्ही लिहिलं तशीच reaction देऊन.
अभिजीत केळकर तनिष्कच्या
अभिजीत केळकर तनिष्कच्या कौटुंबिक जाहिरातीत दिसतोय.
नेहाची कविता touching होती,
नेहाची कविता touching होती, ती छानच करते. आज खालचे दात कमी दिसले ते एक बरं झालं. तिचा आणि तिच्या बाबांचा फोटो बघून रडू आलं.
माधव वीर मराठा टीममध्ये खेळतो बहुतेक, भारी रन्स केलेल्या. ह्या कुठल्या matches कलाकारांमध्ये होतात त्या की महाराष्ट्र राज्याची टीम. कलाकारांमध्ये होतात ते माहीतेय पण मुंबई, सातारा, रत्नागिरी etc अशा असतात.
शिव वीणा मस्त, वीणा फार खुलत नाही आणि शिव अति खुलतो. तो पुरणपोळी किस्सा सांगितला ते बरं झालं. वीणाचा शिवानीबद्दल stand अगदी योग्य वाटला. याचा अर्थ जाम छळलं शिवानीने तिला. ती विसरू शकत नाही इतकं.
ह्या सर्वांचे काय प्रोजेक्ट सुरू आहेत सध्या, ते विचारलं नाही जीतूने. फक्त बिचुकले स्वतः हुन काही म्हणाला फिल्मस ऑफर झाल्याबद्दल.
वीणाने शिवानीच नाव नाही घेतल
वीणाने शिवानीच नाव नाही घेतल,ते तर माहित आहे,पण आज तर नेहा पण शिवानीला डावलतच होती,माधव होता म्हणून नाही,पण एकंदरीत त्या दोघींची मैत्री मला कधीच गरी वाटली नाही.
पण आजही नेहा माधवला अगदी टास्कमध्ये खेळायची तस बोलूनच देत नव्हती,एकदा तर असही म्हणाली,की त्याला काही कळलच नाही.
टास्कच्यावेळी नेहा वाईल्ड होते हेच खर.
बाकी वीणा स्पष्टवक्ती आहे,हे आजही दिसल आणि त्यात अँरोगन्स नव्हता.शिव जरा लहान मुलासारख वागतो.
UP खरंच माधवला नेहा अस करत
UP खरंच माधवला नेहा अस करत होती त्याचा मलाही राग आला.
नेहाचा अतिशहाणपणा, आगाऊपणा डोकावत होताच. पण कविता एक नं. आजही मला नेहा नाहीच आवडत आणि शिव वीणा खूप आवडतात हे confirmed .
माधव, नेहा, शिवानी ह्यांची मैत्री बऱ्याच जणांना इथेही फेक वाटायचीच. डीजे पण लिहायची.
त्यांच्यात माधवच ज्येन्यूईन वाटायचा मला तेव्हाही आणि आजही वाटला.
रुपाली अजूनही जळते विणावर हेही समजलं.
फक्त बिचुकले स्वतः हुन काही
फक्त बिचुकले स्वतः हुन काही म्हणाला फिल्मस ऑफर झाल्याबद्दल. >>>>>>>> थापा मारत असेल नेहमीप्रमाणे.
सेम पिंच
सेम पिंच
जाम बोअर झालं कालचं.
जाम बोअर झालं कालचं. बिचुकलेने किती पकवलं काल.>>>>>++११११ . बिचुकलेला सहन करणं सहनशक्ती च्या पलीकडचं आहे. कसं काय लोक त्याच्याशी बोलू शकतात न कळे. बाकी शिव विणा ऑल टाईम फेवरेट आहेत. नेहा मला कलर्स मराठी च्या अवॉर्ड फंक्शन पासून चक्क आवडायला लागली आहे. तिने त्या वेळेस मुलाखती छान घेतल्या होत्या. आणि नेहाची कविता आवडतेच
Pages