राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने

Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34

खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्‍याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहा, नाही. मी वर लिहिल्यापैकी काहीही नाही. सिंह रास, मघा नक्षत्र. Happy

@मामी - सौररास मेष का मग तडफदार असणार तू. त्यात धनु चंद्र म्हणजे फायरच फायर कारण दोन्ही अग्नीतत्वाच्या राशी. उत्साह, तडफ, सकारात्मकता यात तू अग्रेसर असणार.
_________________________________
मेष (चंद्र) हे रागीट असतात हा गैरसमज आहे. हे लोक लढवय्ये असतात वॉरियर्स. त्यांना अन्याय सहन होत नाही.

>>> सामो, उत्साही नाही पण सकारात्मक आहे.

हे लोक लढवय्ये असतात वॉरियर्स. >> ह्ये बी बरूबर.

>>> हे लोक लढवय्ये असतात वॉरियर्स. >> ह्ये बी बरूबर.
हो, मी साक्ष आहे. (पण आमच्यात त्याला भांडकुदळ म्हणतात.) Proud
मामे Light 1

@स्वाती काय सांगतेस???? मघा Happy मस्त गं. बघ!!!! हे ऐक - https://www.youtube.com/watch?v=7O0jL41qWWA
मघाचा पूर्वजांशी फार घनिष्ठ संबंध सांगीतलाय. अर्यमा असावी देवता. बघून सांगते. अर्यमा ही पितरांची देवता आहे.
________
नाही अर्यमा नाही पण .... पूर्वजांशी सम्बंधित काहीतरी महत्व आहे. सॅम जेप्पी च्या व्हिडिओत ऐकल्याचे स्मरते.
______________
@मामी धन्स . Happy

कर्क लग्न, रोहिणी नक्षत्र, पहिल्या घरात शुक्र आणि तिसर घर मंगळ, बुध, गुरू..

सांगा बघू आमच्याबद्दल काहीतरी विशेष!

@अजिंक्यराव - कर्केचा शुक्र का? माझा एक मित्र आहे त्याचा आहे कर्केचा शुक्र. सासूबाईंचाही होता. दोघेही उत्तम खाद्यपदार्थ बनवतात म्हणजे साबा तर सुग्रणच होत्या.
शुक्र तुम्ही प्रेम कसे करता ती पद्धत दाखवतो. अगत्याने, प्रेमाने खाऊ घालत असणार तुम्ही आवडत्या व्यक्तीला.
________________________________
माझ्या डेटाबेसमध्ये अ‍ॅडवलं बर्का - 'सावळी' (https://www.maayboli.com/node/71692) सारखी सुंदर कविता, कविमनाचा कर्क-शुक्र लिहून जातो. आणि रैना (https://www.maayboli.com/node/71099) सारखं ललीतही. नो वंडर, पाऊस रिमझिमत असताना तुमचा जल राशीचा शुक्र रैना लिहायला घेतो

काहीतरी गफलत होतेय माझी बहुतेक.. मी आजवर समजत होतो की माझा मंगळ, बुध, गुरू कन्या राशीत आहेत..

(पूर्वी एकदा सहज अभ्यास केलेला स्वतःच्या कुंडलीचा, पण ऑनलाइन वाचताना बऱ्याचवेळा 2 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्याचं गोष्टी दिसायच्या, म्हणून शेवटी नादच सोडलेला.. जसे की हे आता तुम्ही वृषभ म्हणत आहात, आणि मी आजवर कन्या समजत होतो)

@ अजिंक्यराव - तुम्ही ११ व्या घरात मंगळ म्हणालात म्हणुन मी म्हटले - वृषभेचा मंगळ.
पण आता तुम्ही म्हणताय तीसर्‍या घरात, म्हणजे मंगळ कन्येचाच की.

हो कन्येचाच, मी राशी उलट (क्लॉक वाईज) मोजल्या बोटांवर चुकून.. या तिघांचं तिसऱ्या घरात एकत्र नांदणं फार क्वचित असतं, म्हणून त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे.

>>>> हो कन्येचाच, मी राशी उलट (क्लॉक वाईज) मोजल्या बोटांवर चुकून.. या तिघांचं तिसऱ्या घरात एकत्र नांदणं फार क्वचित असतं, म्हणून त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे.>>>> नाही माहीत Happy

अरेच्या! चालतंय.. आम्ही वाचू पुन्हा.. सांगू इथं. तसं मी सुरुवात केली तेव्हा मायबोलीवर फार कुणी चर्चा करत नव्हतं या विषयावर.. आता होते आहे तर चांगलं आहे, शिकू काहीतरी!

चंद्र रास मीन, सूर्य रास ही मीन, लग्न रास सिंह, नक्षत्र रेवती... सांगा बघू ही किल्ली कुठली कुलूपे उघडू शकते ते Happy Happy

ह्म्म्म्म लग्न सिंह व चं आणि सू मीनेत म्हणजे तुझ्या आठव्या घरात आहेत की गं चं+ सू.
हे घर डेडली , पोटंट, सिक्रेटसचं घर असतं. ऑकल्ट, मिस्टरी, ट्रान्स्फॉर्मेशनचं घर असतं एवढं ऐकून आहे. आणि किल्ली माझ्यापेक्षा किंवा कोणत्याही ज्योतिष्याच्या सांगण्यापेक्षा कैक पटींनी तू स्वतःला ओळखतेयस असे मला हे ग्रहमान सांगते.
खरे आहे का?

घर डेडली , पोटंट, सिक्रेटसचं घर असतं. ऑकल्ट, मिस्टरी, ट्रान्स्फॉर्मेशनचं घर असतं एवढं ऐकून आहे.-- हे समजलं नाही

स्वतःला ओळखते हे खरंय Happy
धन्स Happy

@किल्ली प्रत्येक घराला काही कारकत्वे आहेत, आठव्या घराला एक गूढत्वाची छटा आहे. या घराच्या कारकत्वाखाली साधारण ऑकल्ट सायन्स, आमूलाग्र बदल, रहस्ये , मृत्यु ( म्हणजे शेवट मग तो भल्याबुर्‍या कशाहीकरता. उदाहरणार्थ वाईट सवयीचा अंत हा ही एक प्रकारचा मृत्यू आणि त्यातून आपला होणारा पुनर्जन्म असू शकतो ना.) वगैरे येतात. म्हणुन तसे म्हटले.

>>> चंद्र रास मीन, सूर्य रास ही मीन, लग्न रास सिंह, नक्षत्र रेवती... सांगा बघू ही किल्ली कुठली कुलूपे उघडू शकते ते >>>

मीन आणि सिंह म्हणजे परस्परविरोधी राशींचा प्रभाव आहे. त्यामुळे स्वभाव काहीसा परस्परविरोधी असतो. भूमिकेत सातत्य कमी असते. काहीसा चिडखोरपणा व अहंकार असतो, परंतु स्वभावात धार्मिकता बरीच असतेे. मीन व सिंह या दोन्ही राशींचे वैशिष्ट्य म्हणजे या राशी बोलण्यात सरळसोट असतात, लबाडी नसते.

+१ पुरोगामी
>>> मीन आणि सिंह म्हणजे परस्परविरोधी राशींचा प्रभाव आहे. त्यामुळे स्वभाव काहीसा परस्परविरोधी असतो. >>>> खडाष्टक?

माझी चन्द्र रास कुम्भ आणि सुर्य रास सिन्ह आहे. आय थिन्क पूर्वा नक्शत्र. कोणाला वेळ मिळाला तर प्लिज सान्गा.

माझ्या अनुभवात, कुंभ चंद्र व कर्क चंद्र यांचे अजिबातच जुळत नाही. स्वभावात, फार फार विरोधाभास असतो, प्रचंड तफावत असते. अर्थात इतर ग्रहंदेखील पहायला हवेतच. पण खडाष्टक असते हे खरे आहे.
______________
@अथेना - कुंभ चंद्र लोक बरेच निरपेक्ष, नि:स्पृह व विचारी पाहीलेले आहेत.

वृश्चिकेच्या लोकांसोबत विंचू खेळतात असं ऐकून आहे. माझी स्वतः ची रास वृश्चिक आहे. मी एकदा शेतात गेलो होतो तेव्हा तिथे एक विंचू होता. माझ्याकडे पाहून हसला आणि म्हणाला घरी येतोस का चहा पाण्याला, मी बोललो नन्तर येईन कधीतरी. ते सगळं जाऊ द्या वृश्चिकेची साडेसाती कधी संपणार ते सांगा.

हाहाहा Happy माहीत नाही साडेसातीचं.
मागच्या एका प्रतिसादात कर्क-शुक्र मित्राबद्दल सांगीतलं ना तो वृश्चिक-चंद्रही आहे. आमचं म्हणजे तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना
करमेना म्हणजे, वाढदिवसाला विश करणे, वर्षाकाठी २ ई-मेल (एक माझ्या वाढदिवसाला , एक त्याच्या) पाठविणे.
बाप रे!!! कसले सिक्रेटिव्ह असतात हे वृश्चिक-चंद्र.

>>> . ते सगळं जाऊ द्या वृश्चिकेची साडेसाती कधी संपणार ते सांगा. >>>

वृश्चिकची साडेसाती २४ जानेवारी २०२० पासून संपणार आहे.

धन्यवाद मधुरा. मला सिंहेमधीलही विशेषतः 'मघा' नक्षत्राचे लोक चक्क बरेच, खूप आवडतात असे लक्षात आलेले आहे Happy का विचार्शील तर माझे २ मॅनेजर्स (रादर लीडर्स ऑफ अवर ऑर्ग) आहेत कसले डिग्निफाईड (दिसायला नव्हे , वागायला म्हणतेय.) असतात.>>>>>>>>>>>>>>>>>> अरे वाह!

मी आत्ता कुंडली पाहिली.

कुंडली सिंह रास व‌ वृश्चिक लग्नाची आहे. पण मग मी कोणत्या नक्षत्रात येते????

माझ्या बद्दल काही सांगता येईल का?

येईल ना.
तुम्ही नकारात्मक प्रतिक्रिया सहन करून घेत नाही. एकतर सफशेल दुर्लक्ष करून अपमान करता, किंवा उद्धट उत्तरे देता. Proud

काही २-३ नक्षत्र मिळून सिंह रास बनलेली असेल गं. तुझं नक्षत्र तुला चंद्राच्या समोर कोष्टकात सापडेल, जर तसे कोष्टक तुझ्याकडे असेल तर अन्यथा, http://astrosage.com वर जाउन, वेळ व स्थान देउन तु ते कोष्टक पाहू शकशील.
वृश्चिक लग्न मला २ जणांचे माहीत आहे. एक आहे ती व्यक्ती म्हणजे रिचर्ड जेरे हाहाहा (कसला चिकना आहे तो!!! प्रेटी वुमन मध्ये पहा)
दुसरी व्यक्ती इथे माबोवरती आहे. फीयरलेस व कटु बोलण्यास न घाबरणारी अशी व्यक्ती म्हणता येइल तिला . कन्व्हेन्शनली सुंदर नाही ती व्यक्ती पण नाकेली व एक प्रेझेन्स आहे तिला. हे माझे नीरीक्षण एवढेच सिमीत आहे.
माझ्या २ विदा बिंदूंवरुन माझे असे मत आहे की या व्यक्ती एकंदर खूप मॅग्नेटिक असतात.
.
बाकी तुझा चंद्र १० व्या घरात असू शकेल पण ते कस्प वगैरेही मला मोजता येत नाही. १० वे घर असते तुमचे रेप्युटेशनचे, तुम्ही इतर लोकांना कसे दिसता त्याचे, समाजातील तुमचा प्रभाव, वावर. १२ वाजता दुपारी तळपणारा म्हणजे मध्यान्हीचा सूर्य हे घर दर्शविते. आणि व्यवसायाचे, करीयरचेही हे स्थान आहे. अर्थात जर इथे जर चंद्र पडला असेल तर व्यवसायाशी तो कसा निगडित होतो हे मला माहीत नाही.
____________
लग्न म्हणजे दिसणं येतं गं, तसेच तुम्ही स्वतःला कसे प्रेझेंट करता. म्हणजे बघ आतली खरीखुरी वस्तू म्हणजे चंद्र राशी तर बाहेर केलेले पॅकिंग म्हणजे - लग्न रास.
म्हणुन मी वृश्चिकेचं दिसण्याबद्दल एवढं वर्णन केलं. लग्न वृश्चिक म्हणजे दिसण्यात, वागण्यात (fasade the person presents to the world) तो वृश्चिक पणा कळत नकळत येतोच.
आता मी मिथुन लग्न आहे. मला हातात पुस्तक आणि डोळ्याला चष्मा लावण्याची अक्षरक्षः हौस होती/ आहे. इन्टुक दिसावं असं खूप वाटतं. जगाने आपल्याकडे बुद्धीप्रधान म्हणुन पहावं असं. आता हा झाला फसाड!!! पण मूळात काय आहे, जरा पिन मारली की रडले, कुढले, मूडी असणे हे झाले व्यक्तीमत्व (उस्फूर्त क्रिया) म्हणजे चंद्ररास.
_____________
सिंह व वृश्चिक दोन्ही fixed (स्थिर मला वाटतं म्हणतात ज्योतिषात) राशी आहेत. म्हणजे एकदा मनावर घेतलं की हट्टाने पूर्णच करतात. stubborn असू शकतेस.
तुझा चंद्र केंद्रात आहे (१० वे घर) तेव्हा केंद्रातील ग्रहांनाही काहीतरी महत्व आहे. पण काय ते मला माहीत नाही सॉरी अबाऊट दॅट! Happy

>>>> किंवा एखाद्याची चंद्ररास वृश्चिक आणि सूर्यरास तूळ असेल तर ते बॅलन्स्ड नांग्या मारतात का? Proud >>>> हाहाहा काय एकेक कमेंटसेत Happy

वृश्चिकची साडेसाती २४ जानेवारी २०२० पासून संपणार आहे.>>>> ओके, पण नंतर चांगले दिवस येणार आहेत काय वृश्चिकेच्या लोकांना.

Pages