खूप लहान असताना श्री. शरद उपाध्ये यांचा "राशीभविष्य" (की "राशीरंजन") हा कार्यक्रम पाहिला होता. त्यात प्रत्येक राशीच्या लोकांचे स्वभावविशेष विनोदी ढंगात (बर्याचदा अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा आधार घेऊन) सादर केलेले होते. त्यातला विनोदनिर्मिती साठी वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण प्रसंगांचा भाग सोडून द्या! पण राशींचा जो बेसिक स्वभाव असतो तो त्या त्या राशींच्या सर्व लोकांना तितक्याच प्रमाणात अप्लिकेबल असतो का?? मला तरी तसे वाटत नाही. कारण मग जगात फक्त १२ राशींप्रमाणे १२ प्रकारचेच स्वभाव असलेली माणसे असली असती. म्हणजे जगातल्या सर्व लोकांना फक्त १२च कॅटेगरीत विभागता आले असते. म्हणजेच अमुक एक जण अमुक राशीचा म्हणून त्या त्या राशीसाठी प्रसिद्ध असलेले सर्व स्वभाव विशेष त्यात असतीलच असे नाही.
उदा. कर्क - या राशीची माणसे प्रेमळ स्वभावाची असतात. स्वयंपाकघरात रमणारी असतात. (पुरुष असले तरीही).
सिंह - खमकी लोकं असतात.
कन्या - संशयी स्वभाव. आत्मविश्वासाचा अभाव.
तूळ - बॅलन्स्ड व्यक्तिमत्त्व
इ.इ.
राशीप्रमाणे तुमचा स्वतःचा आणि जवळच्या लोकांचा तुमचा काय अनुभव आहे? प्रत्येक वेळी राशीवरून व्यक्तीचा बेसिक स्वभाव (संपूर्ण स्वभाव नाही) जज करता येतो का?
राशींनुसार व्यक्तिमत्त्वाचे नमुने
Submitted by निंबुडा on 15 February, 2012 - 05:34
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१० व्या घरात गुरू असणारे लोक
१० व्या घरात गुरू असणारे लोक चांगले ज्योतिष होऊ शकतात हे खरे आहे का?
धन्यवाद रश्मी !
धन्यवाद रश्मी !
जन्म रास - वृश्चिक , लग्न रास - मकर असेल तर भविष्य मकर चे पाहायचे का ? आणि स्वभाव वृश्चिक चा ?
जन्म रास आणि लग्न रास एकच
जन्म रास आणि लग्न रास एकच असेल तर ? त्याने राशीचे गुण-अवगुण एन्हान्स होतात का ? याबद्दल एक्स्पर्ट ओपिनियन काय आहे ?>>>> फारशी कल्पना नाही. पण फेसबुकवर असाल तर नक्कीच ज्योतिष्य गृप जॉईन करा. फार खोलात जाऊ नये पण गंमत म्हणून वाचायला हरकत नाही. मला कायप्पा मधुन काही नावे आली होती ती तासा दोन तासाने लिहीन.
नाही, भविष्य हे चंद्र
नाही, भविष्य हे चंद्र राशीनुसारच बघायचे, कारण चंद्र मनाचा कारक. माझे आधी लिहीतांना चुकले आहे. लग्न रास ही स्वभाव ( धाडसी किंवा भित्रा किंवा तापट ) हे दाखवते. लग्न स्थानातील ग्रह देखील स्वभाव व व्यक्तीमत्वा वर परीणाम करतात. उदा. लग्नी चंद्र हा हळवा स्वभाव व फिरण्याची आवड दर्शवतो. तोच लग्नी शनी असेल तर मेहेनती पण थोडा आतल्या गाठीचा स्वभाव असतो.
तुमचे मकर लग्न कष्टाळु स्वभाव दर्शवते पण त्याच बरोबर चंद्र रास वृश्चिक असल्याने तापट पण हळवा स्वभाव असतो. मनाला लावुन घेतात.
तसं नसतं. चंद्र लग्नस्थानी
तसं नसतं. चंद्र लग्नस्थानी असला तरी राशी स्वभाव बदलत/वाढत नाही. त्यांच्या बरोबर,समोर असणारे ग्रह प्रभाव टाकतात. काही ग्रह ठराविक स्थानी फार प्रभाव टाकतात आणि आपल्याला वाटतं की राशीचा प्रताप आहे.
Pages