माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओके ओके, वरती जी लिंक दिल्ये ना ती ओपन तर होत नाहीये पण कुठेतरी बनवबनवीचा उल्लेख आहे गूगल केलं तर.

सौमित्र वडिलांवर गेलाय वाटतं Wink राधिका एकदाची कायमची अमेरिकेला गेली की मालिका संपेल अशी आशा करूया का. पण तिचं लग्न व्हायला अजून किती वर्ष लागतील.

एवढं कष्ट उपसून राधिकाने कंपनी उभी केली आणि आता तर international business magazine वर कव्हर page वर आली आणि होणाऱ्या सासूबाई म्हणतात कि कधी एकदा अमेरिकेला घेऊन जाते? तेव्हा सगळेच त्यात आनंदून सामील झालेत? राधिका का नाही बोलली लग्न करून मी इथेच राहणार माझा business चा व्याप वाढलं आहे etc. कि आता तिकडे अमेरिकेत जाऊन मसाले विकणार?

वंदना पंडीत - शेठ १९९५ मध्ये "मुक्ता" चित्रपटात होत्या
Mukta (Free Bird) (1995) - (Part 1)
https://www.youtube.com/watch?v=FAdhd0v6MkQ
चित्रपटाच्या पहिल्याच दृश्यात दिसतात सोनालीबरोबर, तिच्या आई चा रोल केला होता.

चित्रपटाच्या पहिल्याच दृश्यात दिसतात सोनालीबरोबर, तिच्या आई चा रोल केला होता. >>> अच्छा, हे नव्हतं माहिती. हा पिक्चर नाही बघितला. टीव्हीवर लागलेला एक दोनदा पण बघितला नाहीये.

ह्या अ‍ॅक्टर पब्लिकचे स्माइल चांगले दिसावे म्हणून डेंटल वर्क करतात. फ्रंट ने बघितले तर बरे दिसते. साइड व्ह्यु दिस्ला तर दातात गॅप दिसते. तिथून ब्रेसेस लाव्लेल्या असतात. सौमित्र पण साइड शॉट मध्ये बघा टेंबी नाका देवी शॉट मध्ये दात पडका प्रेमी क. आणि कायम ह्या घो ड नवरीकडे अनिमीष नेत्रांनी बघत असतो. वॉव. पण एक बारकी बाब घटस्फोट झाला आहे का? का असेच मैने भगवान के सामने मै तुम्हे अपनी पत्नी मानता हुं आता चल अमेरिकेस?!

अग्गबाई साबा मध्ये पण प्रज्ञाचे दात बघा पुढचे चार शाबूत आहेत व लायनी त बाकी साइड ने दोन्ही कडून मोठी गॅप आहे.

घटस्फोट झाल्याशिवायच गुरू आणि शनायाने लग्न केले ना?
मग राधिकाचं का अडावं ? लग्नासाठी म्हणून गुरूने धर्मेंद्रसारखं धर्मांतरही केलेलं नाही, कारण लग्न देवळातच लावलं होतं.

मालिका पाहत नाही , सुरुवातीचे 3 - 4 एपिसोड पाहिले असतील पण स्टोरीची कल्पना आहे , मध्ये मध्ये एखादा ट्रेलर व्हिडीओ वगैरे पाहून ...

एन्ड काय करणार आहेत असं वाटतं ? गुरूनाथला पश्चाताप होऊन तो राधिकाची माफी मागणार आणि त्यांचा संसार परत सुरू होणार की राधिका या सौमित्रशी लग्न करणार आहे खरोखर ... तिचा नवरा बदलला तर " माझ्या नवऱ्याची बायको " या टायटलला काही अर्थ राहणार नाही ना ... ह्याच्यापेक्षा " तू तिथे मी " कितीतरी सेन्सिबल होती ... अर्थशून्य घटना तरी घडायच्या नाहीत , पात्रंही इंटरेस्टिंग आणि विश्वसनीय होती ...

पण एक बारकी बाब घटस्फोट झाला आहे का? का असेच मैने भगवान के सामने मै तुम्हे अपनी पत्नी मानता हुं आता चल अमेरिकेस?! > Lol

धर्मेंद्र ने धर्मांतर केलं होतं?
Uhoh
मुस्लीम झालाय की काय?
राधिकाने अतिशय इल्लॉजिकली काल गुरवाला डायव्होर्स चे 'पेपर्स' नेऊन दिले!
याने काय घटस्फोट होतो का?
मागे ते वकील अँड केस वगैरे चं काय झा लं ? फंड्स नाहीत वाटतं.....? तो ट्रॅक पुढे न्यायला?

धर्मेंद्र ने धर्मांतर केलं होतं?>> होयतर. सध्याच्या एम पी बायको त्याच्या त्यांनी पण मुस्लीम धर्म स्वीकारून मगच लग्न केले होते. मुली पुढे त्याने रीतसर दत्तक घेतलेल्या. हिंदू धर्मात बायगॅमी हा गुन्हा आहे कायदेशीर.

जर दोघांनी धर्म बदलून लग्न केले तर मुली दत्तक का घ्यायच्या, त्या नवरा-बायकोच्या मुली ना त्या. मिथुनने धर्म बदलला नव्हता आणि श्रीदेवीसोबत मंदिरात लग्न केले होते, पुढे मिथुनच्या बायकोने कोर्टाची धमकी दिल्यावर त्याने श्रीदेवीला सोडून दिले, असे मी वाचले होते.

तु तिथे मी मध्ये तांबडे बाबा होते, नेहा शितोळे सारखी काड्या करत असते, प्रिया मराठे चिमावर लट्टू असते, चिमा तिला फसवून दुसानिसशी लग्न करतो, पण त्याचं लग्न झालेलं असलं तरी प्रिया त्याच्याच घरी राहून त्याला मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न करत असते, इकडे मृणालचे भाटकर बाबा तिच्याशी बोलत नसतात, ह्या सगळ्या गोष्टी लॉजिकल होत्या असं मलातरी कधीच वाटलं नाही. असो.

तु तिथे मी मध्ये तांबडे बाबा होते, नेहा शितोळे सारखी काड्या करत असते, प्रिया मराठे चिमावर लट्टू असते, चिमा तिला फसवून दुसानिसशी लग्न करतो, पण त्याचं लग्न झालेलं असलं तरी प्रिया त्याच्याच घरी राहून त्याला मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न करत असते, इकडे मृणालचे भाटकर बाबा तिच्याशी बोलत नसतात, ह्या सगळ्या गोष्टी लॉजिकल होत्या असं मलातरी कधीच वाटलं नाही. असो. >>>>>>>> अगदी अगदी भरीस भर चिमा दुसानिसवर सतत संशय घेत असतो आणि स्वतः मात्र प्रियाशी विबान्स ठेवतो. त्यान्ना मुलगी होते. दुसानिस त्यान्ना सोडून जाते. तिलाही त्याच्यापासून मुलगी असते. शेवटी चिमा आणि दुसानिस एकत्र येतात आणि दुसानिस प्रियाच्या मुलीला स्वीकारते हे लॉजिकल होत का?

घो ड नवरीकडे अनिमीष नेत्रांनी बघत असतो >>>>>>> ती घोडनवरी तर मग सौमित्रला घोडनवरा का म्हणू नये?

माझ्यामते शेवटी राधिका- सौमित्रने लग्न कराव आणि गुरु- शनायाला अमेरिकेला पाठवाव कायमच.

सौमित्र आहेच घोड नवरा. सीरेअल संपेल कधी असा काहीं ना विश्वास आहे हे ग्रे ट. पण खूप खूप खेच णार अजून. म्हातारे सहा जण ह्यांचे लग्न लावणार. ती फार्फार लाजणार्. पण माळ घालाय च्या क्षणी गुरुच्या पायाशी पडणार. राधिका बनहट्टी काय ग्रेट वाटत नाहे.

तु तिथे मी मध्ये तांबडे बाबा होते, नेहा शितोळे सारखी काड्या करत असते, प्रिया मराठे चिमावर लट्टू असते, चिमा तिला फसवून दुसानिसशी लग्न करतो, पण त्याचं लग्न झालेलं असलं तरी प्रिया त्याच्याच घरी राहून त्याला मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न करत असते, इकडे मृणालचे भाटकर बाबा तिच्याशी बोलत नसतात, ह्या सगळ्या गोष्टी लॉजिकल होत्या असं मलातरी कधीच वाटलं नाही. असो. >>>>>>>> अगदी अगदी भरीस भर चिमा दुसानिसवर सतत संशय घेत असतो आणि स्वतः मात्र प्रियाशी विबान्स ठेवतो. त्यान्ना मुलगी होते. दुसानिस त्यान्ना सोडून जाते. तिलाही त्याच्यापासून मुलगी असते. शेवटी चिमा आणि दुसानिस एकत्र येतात आणि दुसानिस प्रियाच्या मुलीला स्वीकारते हे लॉजिकल होत का?
>>> करेक्ट. यात काहीही लॉजिकल नव्हतं. फक्त काही गोष्टी चुकल्या आहेत वरच्या डिटेल्स मधे. Proud एक तर चिमा प्रियाला फसवून काही करत नाही. त्याला मुळातच तिच्याशी कधीच लग्न करायचं नसतं. त्याचं तिच्यावर प्रेमही नसतं. ती त्याला फशी पाडते असं दाखवलंय. दुसरं म्हणजे प्रियाला मुलगी तिच्या स्वतःच्या नवर्‍यापासून होते. तिचं दुसर्‍याच कोणाशी तरी काही काळासाठी लग्न झालेलं असतं आणि प्रियाचा हा औटघटकेचा नवरा दुसानिसचाच चुलत का कसलातरी भाऊ असतो. त्या मुलीला अनाथ करण्याऐवजी दुसानिस स्वीकारते.

चिमा तिला फसवून दुसानिसशी लग्न करतो >> फसवलं नव्हतं , त्याने आपल्या लग्नापूर्वी तिच्या प्रेमाला प्रोत्साहन - प्रतिसाद - वचन काहीच दिलं नव्हतं .

चिमा दुसानिसवर सतत संशय घेत असतो आणि स्वतः मात्र प्रियाशी विबान्स ठेवतो. >> संशयी नवरा हाच मालिकेचा सुरुवातीचा मुख्य बेस होता . प्रिया दुसानिसच्या जुन्या मित्राच्या मदतीने त्यांचं अफेअर होतं आणि चालू आहे असे खोटे पुरावे बनवून चिमापुढे ठेवते . त्यानंतर तो प्रियाशी विबा संबंध ठेवतो तेपण एकदाच , त्या रागाच्या - फसवणूक झालेल्या भावनेच्या मनस्थितीत . सत्य कळल्यावर तो प्रियाशी संबंध पूर्ण तोडतो .. तिचं लवकरात लवकर लग्न करून देऊन आपल्या घरातून / आयुष्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो .

त्यान्ना मुलगी होते >> ती प्रियाला लग्नाच्या नवऱ्यापासून झालेली मुलगी असते , तिला संसार करायचा नसतो त्यामुळे सत्यजितचं मूल आहे असं ती खोटं सांगते नवऱ्याला आणि घटस्फोट मिळवते ... इकडे सत्यजित तिला परत आपल्या घरात घ्यायला नकार देतो .. तिचा नवरा मूलगी आपली नाही म्हणून सत्यजितच्या हवाली करून रिलेशन तोडतो .

मृणालचे भाटकर बाबा तिच्याशी बोलत नसतात, >> त्यांची बायको सत्यजितने संशयाचा धिंगाणा यांच्या घरी येऊन केल्यावर , मृणालवर चारित्र्यहीनतेचे आरोप केल्यावर हार्ट अटॅकने गेलेली असते .. तरीही ती घटस्फोट घेऊन माहेरी परतायला नकार देते उलट त्याचाच विश्वास परत जिंकणे वगैरे ध्येय समोर ठेवते त्यामुळे ते बोलत नाहीत - रागाने संबंध तोडतात हे मानवी स्वभावाला धरूनच वाटलं .

शेवटी चिमा आणि दुसानिस एकत्र येतात आणि दुसानिस प्रियाच्या मुलीला स्वीकारते >> दुसानिस मालिकेच्या सुरुवातीपासून प्रेमळ , त्यागी , समजूतदारपणाची पराकाष्ठा , सहनशील , पुढे योग्य तेवढी स्वाभिमानी , कर्तबगार , आदर्श पत्नी , आदर्श आई वगैरे वगैरे अति आदर्श नायिका रंगवली आहे , तेव्हा जरी ती चिमा आणि प्रियाची मुलगी असती तरी तिने स्वीकारली असती ... हे तिचं जे कॅरॅक्टर रंगवलं आहे त्याला धरूनच होतं . बरं ती सात वर्षं वेगळी राहते , झालेल्या अपमान - विश्वासघातासाठी वगैरे . एवढ्या वेळात समोर अनुकूल वर असूनही तिला पुनर्विवाहाची इच्छा नसते .. म्हणजे एकतर तिचं संसारावरून मन उडालं आहे किंवा अजूनही आधीच्या नवऱ्याबद्दल प्रेम आहे .... सत्यजितने मधल्या काळात लग्न केलेलं नाही , त्याला पश्चाताप झालेला आहे आणि तो अजूनही आपला मोडलेला संसार पुन्हा उभा करू इच्छितो समजल्यावर थोड्या काळाने विरघळते - लगेच नाही ... सो तेपण लॉजिकला धरूनच वाटलं .

नेहा शितोळे सारखी काड्या करत असते, >> ती पुढे सुधारते , चांगली बायको - सून - आई होते ... काड्या करण्याचा स्वभाव असलेली माणसं नसतात का रियल लाईफ मध्ये कोणीच ? त्यात फारसं लॉजीकला सोडून काही नव्हतं .. जे होतं ते मालिका म्हटली की थोडं मसालेदार दाखवणं आलंच , पण ते लिमिट मध्ये होतं .

तांबडेबाबा म्हणायचं होतं की दादा होळकर ? दादा होळकर हे एक गुंड - श्रीमंत - माजलेला राजकारणी / बिजनेसमन , अर्धवट विकृत , क्रूर , डॉमिनेटिंग हिंसक नवरा , किंचित अस्थिर मानसिक स्थिती असं पात्र दाखवलं होतं आणि ते शेवटपर्यंत कन्सिस्टंट होतं ... he was believable ..

असो प्रत्येकाचे लॉजिकचे स्टॅंडर्ड वेगळे असू शकतात .. पण गेल्या 3 - 4 वर्षात झी मराठी वरच्या मालिका 1 - 2 एपिसोड पेक्षा जास्त पाहू शकलेले नाही ( अपवाद दिल दोस्ती दुनियादारी ) ... त्यामानाने ही जवळपास शेवटपर्यंत पाहिली होती .. खूप आवडीने एकही एपिसोड चुकवता वगैरे नाही .. पण बहुतेक एपिसोड न कंटाळता पाहिले होते .. ढबु शनाया पीएचडीला अमेरिकेत जाणे किंवा मसाल्याची कितिशे तरी कोटींची कंपनी असले झिरो लॉजिक प्रकार तरी दाखवत नसत .

त्यावेळी इंग्रजी मालिका पाहायला उपलब्ध झालेल्या नव्हत्या .. आता ती युट्युब वर आहे पण पाहावीशी वाटत नाही .. तेव्हा त्यातल्या त्यात गुड मनोरंजन म्हणून बरी होती .

वगैरे वगैरे अति आदर्श नायिका रंगवली आहे >>> खरं सांगू का? तीच सगळ्यात जास्त इल्लॉजिकल वाटते. सत्यजितने तिचा केलेला छळ इल्लॉजिकल वाटतो. आणि ज्या विश्वासाचे तो गोडवे गात असतो तो विश्वास स्वतः राखण्याचा काहीही प्रयत्न करताना दिसत नाही. प्रिया भुलवते आणि तो भुलतो? सिरीअसली? आणि तिच्याबरोबर उद्योग करूनच्या करून वर तोंड करून पुन्हा दुसानिसला शिव्या, मारझोड, संशय..! हे इल्लॉजिकल नाहीतर काय?
पण तुमची पोस्ट आवडली. काहीकाही मुद्दे पटले.

मारझोड आठवत नाही .. कानाखाली मारली असेल पण मालिकांमध्ये ती कोणी ना कोणी मारतच असतात , तिच्या वडिलांनाही मारली असेल / तिनेही क्वचित त्याच्या मारली असेल ... किंवा नसेलही ... प्रियाच्याही त्याने मारली होती ... सगळ्या भावना उत्कट - राग इंटेन्स त्याचं प्रेमही तितकंच उत्कट आहे सो राग इज वर्थ टॉलरेटिंग असं तिला वाटलेलं असू शकतं ....

संशयाचं वागणं वगळता तो तिला चांगला नवरा / माणूस वाटलेला असू शकतो ( मध्ये मध्ये त्याचा स्वभाव चांगला आहे हे दाखवलं आहे - गरिबीतून स्वतःच्या कर्तृत्वावर वर येणे , आईचा आदर , देणगी बिणगी देणे , दुसऱ्याच्या मुलीला स्वतःच्या मुलीसारखी वाढवणे वगैरे ) .. लव्ह ऍट फर्स्ट साईट / लव्ह आफ्टर मॅरेज असू शकतं ...

कदाचित तिला वाटलं असेल आपण आपल्या प्रेमाने याला जिंकून घेऊ शकू / संशयाचं भूत गेलं की स्वप्नातल्या सारखा सुखी संसार होईल ... शिवाय प्रियबरोबर रिलेशन ठेवले कळता क्षणीच ती त्याची माफी बिफी सगळ्याला ठोकर मारून घराबाहेर पडतेच की , क्षणात पूर्ण संबंध तोडते , 7 वर्षं त्याचं तोंड बघत नाही .

तुम्हाला सुशिक्षित आणि माहेरी समृद्ध परिस्थिती असलेल्या - माहेरी परतायची सोय असलेल्या मुलीने छळ सहन करत राहणं इल्लॉजिकल वाटतं पण चांगल्या घरातल्या सुशिक्षित , उच्चशिक्षित , कमावत्या मुलीही प्रेमात माती खाऊन छपरी कर्तृत्वशून्य मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केलेल्या अनेक मुलीसुद्धा लग्नानंतर वाईट अनुभव आला तरी चटकन बाहेर पडत नाहीत ... नवऱ्याला संसाराला मार्गावर आणण्यासाठी धडपडतात ... काहीजणी आणतातही .. काहीजणींची परिस्थिती बदलण्यासारखी नसते त्या वेळीच शहाणपणा आला तर त्यातून सुटका करून घेतात ; काहीजणी अडकतात ....

एकूणच चटकन घटस्फोट न घेता आधी संसार टिकवण्यासाठी धडपड करणे हे भारतीय बायकांची फर्स्ट इन्स्टिंक्ट असते ... विशेषतः जर नवऱ्याच्या प्रेमात पडल्या असतील तर .

त्या मानाने हिचा नवरा कर्तबगार तरी दाखवला आहे .. हिने संसार मार्गावर आणण्यासाठी धडपड केली तर खूप इल्लॉजिकल नाहीये आपल्या देशाच्या परिस्थितीत ...

राधिका गेली अमेरिकेला तर सगळ्यांना आपापल्या आयुष्यात लक्ष देता येईल, मोकळा वेळ मिळेल म्हणून ते सगळे तिच्या जाण्याच्या कल्पनेने खूष असतील Wink या मालिकेत कपड्यांच्या दुकानात खूप वेळा शूटिंग केलेलं आहे. राधिकेला घोडनवरी का म्हटलंय ते कळलं नाही, इतक्या काळानंतर तिचं आयुष्य मार्गी लागतंय हिच किती मोठी गोष्ट आहे, आणि आता लोक पन्नाशी, साठी आणि सत्तरीतही लग्न करताहेत जी चांगली गोष्ट आहे.

ती प्रियाला लग्नाच्या नवऱ्यापासून झालेली मुलगी असते , तिला संसार करायचा नसतो त्यामुळे सत्यजितचं मूल आहे असं ती खोटं सांगते नवऱ्याला आणि घटस्फोट मिळवते ... इकडे सत्यजित तिला परत आपल्या घरात घ्यायला नकार देतो .. तिचा नवरा मूलगी आपली नाही म्हणून सत्यजितच्या हवाली करून रिलेशन तोडतो . >>>>>>> ओ, अस होत का? हे माहित नव्हत.

तीच सगळ्यात जास्त इल्लॉजिकल वाटते. सत्यजितने तिचा केलेला छळ इल्लॉजिकल वाटतो. आणि ज्या विश्वासाचे तो गोडवे गात असतो तो विश्वास स्वतः राखण्याचा काहीही प्रयत्न करताना दिसत नाही. प्रिया भुलवते आणि तो भुलतो? सिरीअसली? >>>>>>> +++++++++११११११११

राधिकेला घोडनवरी का म्हटलंय ते कळलं नाही, इतक्या काळानंतर तिचं आयुष्य मार्गी लागतंय हिच किती मोठी गोष्ट आहे, आणि आता लोक पन्नाशी, साठी आणि सत्तरीतही लग्न करताहेत जी चांगली गोष्ट आहे. >>>>>>>>> अगदी अगदी

ढबु शनाया पीएचडीला अमेरिकेत जाणे >>>>>>>>> आ? हि शनाया कधी पीएचडी करायला अमेरिकेत गेली? Uhoh रसिका सुनील ( जुनी शनाया) अमेरिकेत कुठल्याशा कोर्ससाठी अमेरिकेत गेली होती. ती पीएचडीसाठी गेली होती का ते माहीत नाही.

तू तिथे मी बद्दल डीटेलवार मालिका आवडल्याच्या पोस्टी बघुन भरुन आलं.
ती सिरीयलही राधाक्काच्या सिरीयलएवढीच भंगार होती.

इतक्या काळानंतर तिचं आयुष्य मार्गी लागतंय >>>> लागलंच तर नशीब.
नैतर भयताड गुरोबाला ही भयताड राधाक्का आवडायला लावलीच आहे आता.
काय ते राधिका कित्ती सुंदर दिसत होती. कित्ती वेगळी दिसत होती. तिचे ते उडणारे केस ह्यांव नी ट्ञांव.
बिचार्‍या अभिजीत खांडकेकरला कुणी नेफ्लि प्राईम इत्यादी वेब सिरीजचा मार्ग दाखवा रे. झीच्या कचाट्यातुन एकंदर मराठी चॅनेल्सच्या कौटुंबिक सिरीयलींच्या कचाट्यातनं सुटावा बिचारा.

त्याला कुणी अडवलंय, काही कुणी बिचारं नसतं. पैसे आणि प्रसिद्धी मिळते. त्याने मालिका सोडली तर हजार लोक तयार असतील करायला. कितीही प्रायोगिक किंवा समांतर केलं तरी खरी प्रसिद्धी मालिका करून आणि त्यातही झीच्या मालिका करूनच मिळते. अमृता सुभाष सारखी एन एस डी मध्ये शिकून आलेली अभिनेत्री सुद्धा झीची मालिका करून त्यात प्रसाद ओकच्या पट्ट्याचा मार खाते ते काय उगीच.
तुम्ही लिहिलंय त्याबद्दल काही नाही पण हे जनरल निरीक्षण आहे.
एकदा पैसा गाठीशी आला की मग भूमिका निवडीचं स्वातंत्र्य घेता येतं.

ही मालिका लोक बघतात? काल कुठल्याश्या अवार्ड सेरेमनीमधे नीलेश साबळेने सही खेचली. लिखाण कधीच संपले आहे ,आत फक्त डिरेक्टर येतो आणि अ‍ॅक्शन असे ओरडतो. लोक सुचेल ते करतात.

Pages