माह्या भैताड नवर्‍याची दुसरी (कि तिसरी ) बायको- ३

Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13

दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च

तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झी मराठी ला काय सिद्ध करायचे आहे की जी उत्तम स्वयंपाक करते(आठवा:आसावरी)आणि सहनशील, सोशिक, सासू सासर्यांचे निगुतीने करणारी तीच नायिका. >>>>> काय आहे, की निर्मात्याला बहुतेक चवीचे खाण्याचा खूप शौक असेल, पण त्याची बायको बहुतेक सुगरण नसेल. तसेच त्याची आई व बायको या दोघीत पटत नसेल त्यामुळे लेकी बोले सुने लागे या न्यायाने तो राधिकाला ( त्याच्या मनातली / स्वप्नातली ) आदर्श सून दाखवत असेल. Biggrin Light 1

@रश्मी सहमत.आणि मराठी मालिकांबद्दल अजून एक निरीक्षण(नेहमी नाही पण बरेचदा) नायक अतिश्रीमंत,मोठा बिझनेस, पैशांचे झाड असलेला (आठवा:अभिजीत राजे,सौमित्र बनहट्टी,श्रीरंग गोखले, सिद्धार्थ तत्त्ववादी,इंद्रनील जहागीरदार, कुलवधू मध्ये सुबोध भावे)आणि त्याच्यापेक्षा टोकाची उलट आर्थिक परिस्थिती वाली नायिका (आठवा:आसावरी कुलकर्णी,जाह्नवी सहस्रबुद्धे, अनुश्री दीक्षित,ईशा निमकर,देवयानी-कुलवधू-पूर्वा गोखले,स्वानंदी)
एक याच्या उलट जोडी जय खानोलकर आणि अदिती दाभोलकर बड्या बिझनेसमनची मुलगी

ते गृहिणीला मेड बनवण परवा ' अग्गोबाई सासूबाई' मध्येही दाखवल.

एका कॉन्फरन्समध्ये एक फॉरिनर लेडी क्लायण्ट राधिकाला तिच्या हातावरची मेहन्दी बघून ' हे काय आहे' हे इन्गलिश मध्ये विचारते. जेनी तिला ' दिस इज इन्डियन टॅटू' अस काहीतरी सान्गते. त्या फॉरिनरकडे इन्टरनेट नाही का? बर त्या क्लायन्टची लेडी अस्टिटण्ट भारतीयच होती, निदान तिने तरी सान्गाव ना.

राधिकाला इन्गलिश येत. बी. ए झालीये. पण तिला फॉरिनरच फास्ट इन्गलिश कळत नसाव. जेनी तिच्यावतीने बोलत होती आणि हि तिच्याशी मराठीत.
ते फास्ट इन्गलिश न समजण साहजिक आहे. मला सुद्दा हॉलिवूडचे चित्रपट बघताना सबटायटल्सचा आधार घ्यावा लागतो. समोरची बया किव्वा बाप्या काय बोलतो तेच कळत नसत काही वेळेला. Lol

ते काम राधिकाला मिळतं कारण ती काहीतरी संस्कृती वगैरे बद्दल बोलते, नक्की आठवत नाही मला. राधिका ऑफिस मध्ये आली की फॉरिनर लोकांबरोबर धडाधड मिटिंग घेऊन एक चमकदार वाक्य त्यांच्या तोंडावर फेकून मोठाली डिल करते. तिला कधीच कोणी नाही म्हणत नाही. काहीच काम कोणी न करता आरामात चालतं सगळं आणि तो गुरु बिचारा एकेकाळी सी ई ओ होता त्याला कुठेच जॉब मिळत नाही.

सध्या झीम वर 'अळीमिळी गुपचिळी' या नवीन सिरीयलचे प्रोमो चालू आहेत. काल तो सौमित्र वाला प्रोमो लागला, तर माझी लेक विचारत होती, ' मम्मी त्यांना मुलगी पण झाली?'
मी आणि साबा खूप हसत होतो. Proud

अळीमिळी गुपचिळी' या नवीन सिरीयलचे प्रोमो चालू आहेत. काल तो सौमित्र वाला प्रोमो लागला, >>>> मी तो promo , कुठेतरी mute मध्ये पाहिला. मला पहिल्यांंदा वाटलं की सौमित्रची मुलगी आहे आणि राधिका दारावर आली म्हणून लपवाछपवी चालू आहे.

असं असलं तरी राधिका स्वीकारेल त्या मुलीला कारण ती नेहेमी दुसर्यांचा विचार करणारी, करुणेने ओतप्रोत भरलेली जगत जननी आहे.

गुरू जमिनीचे पेपर मागतो तर राधिका का घेउ देत नाही त्याला? त्यात परत सौमित्र टिव टिव ती आता माझी बायको आहे वगैरे. अरे हो ना बाबा. कोण नाही म्हण तंय पन इतरांना जगू तर दे? म्हाता र्‍यांनी गुरू ला सेटल करून नागपोरी जावे आता.

तरीपण गुरूला माफ करून त्याच्याच बरोबर संसार करणारी राधिका दाखवली नाही म्हणून अभिनंदनच झी च!

गुरु आणि राधिकाचे नातं नसलं तरी मुलगा आहे ना त्यांचा, गुरुने फुकुन टाकू नये जमिन म्हणून देत नसतील, अथर्वला देतील पुढे.

गुरु काय फुकुन टाकेल सगळं, सुधारला नसेल तर.

अमा...... म्हातारे का सेटल करतील गुरुला?>> इथे राधिकाला वर चढवायचा एक कलमी कार्यक्रम आहे पण प्रत्यक्षात मुलग्याने लफडे केल्यास सासू सासरे नव्या बाई शी जुळवून घेतात. सुनेला इत्का सपोर्ट कुठेही मिळत नाही. नातू पण असा देउन टाकत नाहीत. आता राधिका चे फिक्स झाल्यावर गुरू ला त्याच्या मनासारखे करू देण्यास काय हरकत आहे.

तो गुरु बिचारा एकेकाळी सी ई ओ होता त्याला कुठेच जॉब मिळत नाही. >>>>>>>>> बिचारा? हि डिझर्वज इट. सी ई ओ असताना तरी धड कुठे काम करायचा. त्याच्या केबिनमध्ये शनायाबरोबर गुटर्‍र्गु चालू असायच त्याच.

करुणेने ओतप्रोत भरलेली जगत जननी आहे.>>>>> सही पकडे है.... ज ज म्हणू तिला आता..... आणि हनिमून ला जायचं तर एवढं काय गंभीर व्हायचं....स्वतःच्याच नवऱ्यासोबत चालली ना व तू भैताड Rofl

जग्गु म्हणा.
पिके सिनेमात ज ज टिव्हीवर वाभाडे काढायची, ही जुन्या नवर्याचे काढते. हाच काय तो फरक

राधिकाच्या नव्या सासूने मुला-सुनेच्या आयुष्यात एवढं नाक का खुपसावं. बरं खुपसलं तरी पहिले त्यांच्याशी स्पष्ट बोल ना, बाहेरच्या लोकांना सगळं सांगून मोकळी. महाजनी काका म्हणतात तुम्ही काय बोलत होतात ते मला सांगितलंच पाहिजे, अरे काय जबरदस्तीये, कोणी कुणाशी काय बोलतंय यात तुम्हाला का इंटरेस्ट, प्रायव्हसी नावाची काही गोष्ट आहे की नाही. राधिका आणि सौमित्र यांच्यात शारीरिक आकर्षण निर्माण व्हावे म्हणून आता खास खेळ तयार केले आहेत, सगळे म्हातारे वर्तुळ करून तो पांचटपणा बघत आहेत, मलाच माझ्या डोळ्यांवर आज विश्वास बसत नव्हता की हे सगळं अचाट प्रकरण या मालिकेत दाखवत आहेत. ही त्या नवरा बायकोची खाजगी बाब आहे हे कोणालाच कळत नाही का. नवीन लग्न असलं तरी लग्न करणारे विशीतले असल्यासारखे का सगळे लगेच अस्वस्थ होताहेत.अजून काय काय दाखवणार या मालिकेत Uhoh

हो काहीतरी अचाट प्रकार सुरू होते. 'पहला नशा' गाणे ऐकू आले म्हणून एकदम टीव्हीकडे लक्ष गेले. तर काहीतरी औट्डोर सीन होता व हे दोघे डान्स करायचा प्रयत्न करत होते.

सगळे कॅमेरा फेसिंग बसलेले असे एक पिकनिकही होते आधी. मधेच ती शनाया काहीतरी बॉण्डपेपर वर सही घेउन मग लुबाडायचे वगैरे बोलत होती, आणि गुरू बहुधा दारोदार नोकरी शोधतोय.

बाजीगर मधल्या अनंत महादेवन आणि दिलिप ताहील सारखे हे लोक एक सही करून थेट रस्त्यावर येतात असे दिसते. कंपनीचे अधिकारपद किंवा मालकी गेली की वैयक्तिक आयुष्यात सुद्धा यांचे खायचे वांदे होतात. काही पर्सनल बॅलन्स, अ‍ॅसेट्स वगैरे प्रकार नाही. कोण यांना कंपन्या चालवू देते काय माहीत. लिमिटेड लाएबिलिटी कंपनी नावाचा प्रकार झी मधे आस्तित्त्वात नसावा.

हि भंगार सिरिअल संपायची असती तर कधी संपली असती. राधिका एक सक्सेसफुल इंडिपेंडन्ट बिजनेस वुमन दाखवुन. पण आता मात्र काहिही दाखवु शकतात. कदाचित गुरु आणि राधक्का परत एकत्र येतील.. हे महान कार्य सौमित्र स्वतःच करेल.. आणि शेण्याबेबीला जन्माची अद्दल घडेल आणि ती तिचं तोंड काळ करेल!

मन्या ऽ +१
महाराष्ट्राच्या राजकारणापासून प्रेरणा घेतली आहे.

नवीन लग्न असलं तरी लग्न करणारे विशीतले असल्यासारखे का सगळे लगेच अस्वस्थ होताहेत.अजून काय काय दाखवणार या मालिकेत Uhoh-अगदी बरोबर चंपा. भयंकर आहे हे.

का ल थोडा भाग नजरेला पडला... हॉरिबल प्रकार चालू आहे. शनाया ची ममा व तो कोण टकला माणूस यांचे लग्न लागताना दाखविले आहे. शनाया ची ममा आंतरपाटाच्या आडून डोके काढून चित्र विचित्र हावभाव करीत त्याच्याकडे पहात होती...आणि तोही कोण बवाळट माणूस उभा केलाय....तर तो भटजी ला म्हणे की लवकर लवकर डिलिव्हरी करा ने....
शनाया व तिची आई विनोद निर्मीतीचा केविलवाणा प्रयत्न करीत होती. मग एकमेकाना हार घालताना ते तुटले ...!! काहीही भीषण प्रकार ....!!
आणि शनाया म्हणे की मी तुझी करंजी आहे , मीही तुझ्याबरोबर येणार...सेम लाईक मॅडी सेड इन अगबाई..... फॉर करवली !

केड्या तेच ते डायलॉग्ज व प्रसंग दोन्ही मालिकात खपवतो आहे...... अतिशय विनोदी प्रकार आहे हा!

तेच ते प्रौढ विवाह ( इथे तर दोन दोन-- राधिका- सौमित्र आणि शनायाची ममा व तो टकला!) व राजे आणि आसा.....
तेच ते विनोद व त्याच त्या बावळट, इंग्लिश बोलणार्‍या फॅशनेबल पण मूर्ख बायका....
केड्या इज ऑबसेस्ड विथ हिज ओन क्रिएटेड फँटसीज!
Angry

आंबट गोड - हो तो भाग मीही पाहिला. टोटली केविलवाणे प्रकार चालले होते विनोदाकरता.

बाय द वे, मधे एक दोन भाग हुकले आणि पुढच्या एका भागात कंपनीच्या हॉलवे मधेच तो सीईओ कोणतीतरी "टाउन ब्रांच" बंद करा म्हणून सांगतो. तेथेच उभे राहून या गुरू ला कामावर घ्यायचे की नाही याची चर्चा असले काहीतरी विनोदी प्रकार सुरू होते. आधीच्या भागात म्हणे गुरूने त्या बॉसचा मोबाइल फोन सरळ घेतला कॉल आल्यावर आणि चुटकीसरशी एका "यु एस क्लायण्ट" चा प्रॉब्लेम सोडवला! तो काय प्रकार होता कोणी पाहिला का?

यांनी फक्त कंपनी कामकाज दाखवावे. वरच्यासारखे भीषण विनोद आवर्जून करावे लागणार नाहीत.

Pages