मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

अभिनन्दन, शिव विणा!!!! Happy

पण यानंतर मात्र छान प्रोजेक्ट्स मिळो,ही इच्छा. >>>>>>>> +++++++११११११११११

काल एबीपी माझावर एक न्यूज आली होती. बिचुकले आदित्य ठाकरेविरोधात बोरिवली मतदारसन्घातून लढतायत म्हणे. खखोदेजा.

बिचुकले वरळी आणि सातारा विधानसभा, अलंकृता सातारा लोकसभा लढवणार.

शिव मनसेचा प्रचार करतोय, त्याची माडेताई मनसेची आहेना.

हो UP वीणा सगळीकडेच cute आणि ग्रेसफुल दिसते, मला ती bb त पण दिसायची तशी, मी लिहिलंही होतं. ड्रेसेस पण मस्त असतात. हिना मात्र कधीकधी बरी दिसते, साडीत चांगली दिसते, बाकी काहीही घालून फिरते, sorry for this आणि ती शिवची आक्काच वाटते, शिव हिना जोडी प्रेक्षकांनी कधीच accept केली नसती, शिवला तोटा झाला असता. शिव वीणाच तिथेही बेस्ट होते आणि बाहेरही आहेत. God bless them.

UP तो गश्मीर आहे का. मी डेस्कटॉपवर बघेन. पण इतर फोटो पण फार cute, गोड, ग्रेसफुल असतात तिचे, काही शिवचे ड्रेसेस तिनेच सिलेक्ट केलेत, शिव सांगतो तिचा ड्रेसिंग सेन्स चांगला आहे.

इव्हेंटस छान मिळतायेत त्यांना, मिडीया अजूनही त्या दोघांनाच जास्त भाव देतेय. खरंच आता प्रोजेक्टस मिळोत हीच कामना. प्रेक्षकांचं प्रेम चांगलं मिळवलं त्यांनी. शिवच्या सगळ्या नातेवाईकांनी पण वीणा फार गोड आहे, तिच्याशीच लग्न कर, सांगितलं त्याला. तो सांगत होता हे सर्व आणि आता शिवची आईही वीणावर खुश आहे.

गश्मीरबरोबर वीणा, अरे वा. कसला दिसतोय गश्मीर, मला खूप आवडतो, वीणाही छान दिसतेय. पण वीणा काही फोटोत यापेक्षाही अजून छान दिसतेय.

बिबॉस तामिळ 3च्या विनरला ५0लाख मिळाले,मराठी विनरला १७ लाख,गेल्या वर्षी मेघाला २५ लाख मिळाले होते.
कशी वर येणार आपली मराठी इंडस्ट्री?

Lol

यावेळी ते शिवानीमुळे गेले ना, तिला वाटलं आपण top 3 येऊ आणि पैसे मिळवू, bb ने तिचा पार पचका केला.

हिंदी पहिली एक दोन वर्ष एक करोड होते मग पन्नास लाख केले, आता माहिती नाही किती ते. तमिळ industry श्रीमंत आहे ब्वा आपल्यापेक्षा.

शिवीणा ला प्रचारात पण डिमांड आहे >>> हो. अजूनही मिडिया जाम भाव देतेय त्यांना. मला वाटलेलं हिंदी सुरु झाल्यावर यांचा भाव कमी होईल पण नाही.

मराठी बिग्ग बॉस मध्ये झालेली ही पहली च जोडी आहे शिव वीणा.
पण हिन्दी बिग्ग बॉस मध्ये ज्या घरात असताना जोड्या तयार झाल्या त्या बाहेर आल्यावर एक दोन वर्षे एकत्र राहुन म नंतर ब्रेक अप केला.

मराठी बिग्ग बॉस मध्ये झालेली ही पहली च जोडी आहे शिव वीणा. >>> लोकांनी अ‍ॅक्सेप्ट केलेली पहीली. मागच्यावर्षी राजेश रेशम, पुष्कर सई यांनी प्रयत्न केले पण ते विवाहबाह्य, लोकांनी मान्य केले नाहीत. शिव वीणा आपल्यासमोर घडत गेलेली स्टोरी खरीखुरी वाटली. बऱ्याच जणांचा त्यांनाही विरोध होता, फेक म्हणून नावं ठेवली गेली पण जास्त लोकांचा पाठींबा होता आणि फेक नाहीये असं बऱ्याच जणांना वाटलं ते खरं ठरलं. प्रिन्स युविका सारखं त्यांनी लग्न केलेलं आवडेल अर्थात.

शेवटी पुढे काय होईल कोणीच सांगू शकत नाही. सध्या तरी दोघांची पाची बोटं तुपात आहेत.

माझ्याकडूनही दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

एक प्रँक बघितला आत्ता शिव वीणाबरोबर केलेला, अमेझिंग. मलाही रडू आलं. काय केमिस्ट्री आहे शिव वीणाची. जी आत दिसायची तीच बाहेर. शिवला कोणी बोललं तर वीणाला रडू यायचं, वीणाला बोललं तर शिवला राग यायचा. गॉड ब्लेस देम.

https://www.youtube.com/watch?v=iSfRuf7C5V0

हो,पाहिला.मी तो व्हिडिओ. वीणा मला सुरुवातीपासूनच खरी वाटत होती,शिव बद्दल शंका होती की तो हे गेमसाठीतर करत नाही ना,कारण त्याच्या ताई,दादाला वीणा नको होती,पण नंतर मात्र शंका मिटली कारण त्याच प्रेम खर होत.
पण माझ्या मते निदान सुरुवातीच्या काळात त्यांनी एकत्र प्रोजेक्ट करू नयेत.वेगवेगळी करावीत.तेव्हा एकमेकांना किती समजून घेतात,ते महत्वाच आहे.
बाप रे,केवढा विचार करत आहे मी,एवढा तर ते पण करत नसतील.......हसणारी बाहुली.
पण मला वीणाबद्दल अजूनही काळजी वाटते.शिवच्या आईचा पूर्णपणे होकार नाही ना....म्हणून.

हो,पाहिला.मी तो व्हिडिओ. वीणा मला सुरुवातीपासूनच खरी वाटत होती,शिव बद्दल शंका होती की तो हे गेमसाठीतर करत नाही ना,कारण त्याच्या ताई,दादाला वीणा नको होती,पण नंतर मात्र शंका मिटली कारण त्याच प्रेम खर होत.
पण माझ्या मते निदान सुरुवातीच्या काळात त्यांनी एकत्र प्रोजेक्ट करू नयेत.वेगवेगळी करावीत.तेव्हा एकमेकांना किती समजून घेतात,ते महत्वाच आहे.
बाप रे,केवढा विचार करत आहे मी,एवढा तर ते पण करत नसतील.......हसणारी बाहुली.
पण मला वीणाबद्दल अजूनही काळजी वाटते.शिवच्या आईचा पूर्णपणे होकार नाही ना....म्हणून.

पण मला वीणाबद्दल अजूनही काळजी वाटते.शिवच्या आईचा पूर्णपणे होकार नाही ना....म्हणून. >>> मिळाला ना होकार, तिचेच लाड केले शिवला सोडून आईने, पुरणपोळी तिलाच भरवली. सगळे नातेवाईक आधीपासून वीणा फार गोड आहे तिच्याशीच लग्न कर असं सांगत होते शिव घरी गेल्यापासून. एका इंटरव्यु मधे सांगितलं त्याने.

वीणाला जाम नावं ठेवली गेली मात्र उगाच, बाकीच्यांचं जाऊदे पण रुपालीने पण भडकवलं शिवला, त्याने ऐकलं नाही ही गोष्ट वेगळी. तिला जे बोलले, तिच्यासमोर कॅप्टन झाले ते सगळे आधीच तिच्या बाहेर गेले.

बाप रे,केवढा विचार करत आहे मी,एवढा तर ते पण करत नसतील.......हसणारी बाहुली. >>> मी पण ठरवलेलं, आपल्याला काय करायचं आहे आता पण येतोच विचार. फक्त आता व्हिडीओज सगळे बघत नाही त्यांचे. सध्या कुठे कुठे कशी शेती करतात वेगवेळ्या देशांत, ते बघत असते जास्त. बरेच जण शिव वीणा fans विचार करतायेत त्यांचा म्हणून मिडिया अजून भाव देतेय ना. नाहीतर कशाला दिला असता.

वीणा पेशवाई ब्रँडची मॉडेल झाली वाटत,इन्स्टावर फोटो टाकला आहे,अहमदनगरच्या पेशवाईच्या उद्घाटनाला वीणा जाणार आहे.
बाकी मला वीणाला स्वामिनीमध्ये मोठ्या रमाच्या रोलमध्ये बघायला आवडेल,माधवराव म्हणून गश्मीर किंवा अंगद म्हसकर किंवा विक्रम गायकवाड चालेल.

अंगद कलरच्या मस्तानी मालिकेत बाजीरावाच्या भूमिकेत होता. वीणाला एवढा अभिनय झेपणार नाही. ती मॉडेल म्हणूनच छान आहे.

नको नको Happy हा बॉडी बिल्डर नंतर टिबी होऊन खंगलेला कसा दाखवणार त्याला Lol
सिरियसली दोघेही अ‍ॅक्टिंग मधे अगदी यथा तथाच आहेत. कोणते आयकॉनिक रोल देऊन त्या मूळ कॅरेक्टर्स ची वाट लावली नाही तर बरे.

अंगद म्हसकर >>> आता नाही शोभणार. गश्मीर मस्त दिसेल. वीणा करेल का नीट रमा. अशी ती मला आवडते पण राधा म्हणून कधी कधी कृत्रिम acting वाटायची, जे काही थोडंफार बघितलं त्यावरून सांगते.

वीणा पेशवाई ब्रँडची मॉडेल झाली वाटत,इन्स्टावर फोटो टाकला आहे,अहमदनगरच्या पेशवाईच्या उद्घाटनाला वीणा जाणार आहे. >>> इन्स्टावर मी नाहीये आणि ह्या कोणाचे fan club वगैरे like केले नसल्याने youtube वर अधे मधे बघते त्यांना.

माधवराव म्हणून शिव ला घेतले तर.
वीणा रमा आणी शिव माधवराव. >>> नाही शोभणार शिव. रमा म्हणून वीणा शोभेल पण दिसायला, बाकी शंका आहे मला. त्यापेक्षा ते जसे आहेत तसे त्यांना घेऊन एखादी सिरीयल केली कलर्सने तर बरं होईल.

अंगद कलरच्या मस्तानी मालिकेत बाजीरावाच्या भूमिकेत होता. >>> जबरी केलेली पण आता माधवराव भूमिकेत शोभणार नाही, वय झालंय. तो उत्तम अभिनेता आहे मात्र.

खूप वर्षापूर्वी मनोज जोशीने पण राऊ भूमिका मस्त केलेली. मस्तानी अश्विनी भावे होती.

शिवला त्या राणादादा पैलवानाचाच रोल सुट होईल , पेशवाई रोल बिग नो !
त्याचा विदर्भी अ‍ॅक्सेन्ट, बॉडी बिल्डर इमेज मुळीच नाही सुट होणार !
माधवराव म्हणून टिपिकल शुध्द तूपातला प्युअर पुणेरी अ‍ॅक्सेन्ट आणि रविन्द्र मंकणी, आलोक राजवाडे सारखी पर्सनॅलिटीच लागते !

दीपांजली कुठं ठेऊ मी तुला ? मंकणी किंवा राजवाडेची बरोबरी शिव शी कशी होईल? आणि पेशवाई वाल्यांना तरी विणा कशी काय आवडली? ती काय मोठी सुंदर देखणी लागून गेलीये. तिचे हातवारे आणि उर्मटपणा पाहून माधवराव आणिक खचले असते. गोपिकाबाईंची तर वाट लावली असती तिनं.

सांगता येत नाही,जर गायत्री दातारला सुभा समोर हिरवीन म्हणून घेण्यिच डेअरिंग झीवाले करू शकतात तर कलर्सवाले हे नक्कीच करू शकतील.आणि लगेच उद्याच शिवला माधवराव दाखवायच नाहीच आहे,या लहान रमेवरच तीन चार महिने जातील,तोपर्यंत जर चँनेल ने ठरवल तर ते त्याला प्रॉपर ट्रेनिंग देतीलही अगदी भाषेचही वाटल तर आवाज डब करतील.वीणा रमाचा रोल चांगला करेलही,मला आवडते ती दिसायला,अर्थात म्रुणाल कुलकर्णीची सर कुणालाच येणार नाही.पण तिनेही हाच सिनेमा काढला होता,पण तितका चालला नाही.
कितीतरी चेहरा असून अँक्टिंग नसलेले कलाकार जर हिट सिरियल देतात तर शिव तर नक्कीच चालून जाईल,शेवटी चँनेलला टीआरपी हवा आहे,इथे कोण अँक्टिंग वगैरे बघत आहे.

बाजारात तुरी.
रमामाधव मोठे होईपर्यंत बिग बॉस मराठीचे आणखी दोन सीझन झालेले असतील.

पण हा जर तर चा भाग आहे.मुळात आता जो माधव दाखवला आहे,तो मोठाच आहे की,त्याला कशाला मोठ करायला पाहिजे, कामही चाऔगल करत आहे.
बर,पेशवाईचे मॉडेल शिव आणि आपल्या पाठकबाई पण आहेत ,म्हणजे कदाचित राणा पण असेल.

Pages