पहारेकरी

Submitted by Ravi Shenolikar on 28 September, 2019 - 07:09

मध्यरात्रीच्या प्रगाढ शांततेत
मनातले वादळ शमवत
विचारांचा कोलाहल निववत
खडा पहारा देत
उभा आहे जोवर हा
माझ्या अस्थिर अस्तित्वात
अचल आणि अभेद्य
तोवर कसली तमा
अडथळ्यांची, संकटांची
काळीज पोखरणार्‍या
विदारक चिंतांची
चक्रावून सोडणार्‍या
अविरत शंकांची
थोपवेल तो ह्या सर्वांस
अन् झोपेन मी शांतपणे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users