भाग्य

Submitted by Ravi Shenolikar on 22 September, 2019 - 01:03

प्रत्येकाचे भाग्य वेगळे
प्रत्येकाची वेगळी कथा
सर्व चेहर्‍यांवरी हसू
अंतरात दडली व्यथा

माणसाचा जीवनपट
कधी पूर्ण कोणा कळला
यशामागे किती कष्ट
कोण किती कसा शिणला

तरी मन करी तूलना
केवढे हे अज्ञान
आपल्या रस्त्याने जावे
हेच असे शहाणपण

आपल्यास जे लाभले
मनी असावा कृतज्ञभाव
हेवा, मत्सरास कधीही
द्यावा मनी न शिरकाव

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Back to top