रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती पोलिस स्टेशन मध्ये असा एकदम मॉड अवता र करून का जाते. आ. ला डिवचायला बहुतेक. >>>>>> हो. ती कुरुप झालेली असते गर्भपाताच्या औषधामुळे. नन्तर कुठल्याशा औषधामुळे ती मूळ रुपात परत आली. सो, मेकओवर करुन ती आ. ला भेटायला जाते.

>>मागे भिवरी लहान दत्ताला घेऊन वाड्यात घुसते त्यावेळेस माईने रडुन रडुन गोंधळ घातला होता. कोणत्याही परिस्थितीत भिवरीला सवत म्हणुन वाड्यात घ्यायला तिचा ठाम विरोध होता. पण आण्णा पुढे कोणाचे काही चालत नाही. छाया-माधव पण छोटेच असतात. त्यामुळे आण्णा भिवरीला घरात घेतात.. आणि माईचे तिकिट कन्फर्म करायचे असे ठरवतात. पण माई दिसते तेवढी पण खुळी नव्हती.. रात्री झोपायच्या वेळेस ती स्वतःच्या खोलीत स्वतःच्या अंथरुणात भिवरीस झोपवते आणि स्वतः बाहेरच्या खोलीत छया+माधवास घेऊन झोपते. मध्यरात्री आण्णा ताक पिऊन येतो.. आता माईचे कलम लावायचे असा विचार करुन तो माईच्या खोलीत शिरतो आणि पाठमोर्‍या झोपलेल्या भिवरीच्या नरडीवरुन खस्सकन चाकु फिरवतो

हा एपिसोड असा होता? Uhoh मी पाहिला होता. मला वाटतं की अण्णा भिवरीला नुसती थाप मारतो की बायकोला मारेन. नंतर रात्री तिच्या खोलीत शिरून तिच्या गळ्यात हार घालायच्या बहाण्याने सुरी फिरवतो. तेव्हा भिवरी झोपलेली नसते. टक्क जागी असते. तो तिच्याशेजारी झोपलेल्या दत्तालासुध्दा मारणारच असतो पण माई मध्ये पडते आणि त्याला वाचवते.

अण्णा पक्का जाणून आहे की माईच बायको म्हणून ठीक आहे. काही प्रश्न विचारत नाही. बोलतो ते ऐकून घेते. तरी सगळी कामं करते. तो कशाला भिवरी किंवा शेवंताची धोंड गळ्यात बांधून घेईल??

अण्णा पक्का जाणून आहे की माईच बायको म्हणून ठीक आहे. काही प्रश्न विचारत नाही. बोलतो ते ऐकून घेते. तरी सगळी कामं करते. तो कशाला भिवरी किंवा शेवंताची धोंड गळ्यात बांधून घेईल??>>>>>>>>+१११११

आणि इतक्या बर्षात एकच पोरगी?>>>>>> शेवंताला तिच्या भौतिक सुखाची पडलेली असते, तिला तशी त्या वेळेस कुठलीच जबाबदारी नको असते. पण जेव्हा ती कुरुप होते तेव्हा तिला नवरा म्हणजे काय हे कळते, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो.

काय झालं म्हणजे कुरूप कशी झाली.>> ती दुसऱ्यांदा गरोदर राहते तेव्हा घाबरते त्यावेळी अण्णा तिला रघु काकाने दिलेली कसलीशी औषधी देतो गर्भपातासाठी, त्याचा side effect...

मला वाटतं की अण्णा भिवरीला नुसती थाप मारतो की बायकोला मारेन. नंतर रात्री तिच्या खोलीत शिरून तिच्या गळ्यात हार घालायच्या बहाण्याने सुरी फिरवतो. तेव्हा भिवरी झोपलेली नसते. टक्क जागी असते. तो तिच्याशेजारी झोपलेल्या दत्तालासुध्दा मारणारच असतो पण माई मध्ये पडते आणि त्याला वाचवते.>> स्वप्ना_राज : तुम्ही म्हणता ते खरे आहे.. असेच झाले होते.. पण काहिका असेना माईचं तिकिट कॅन्सल झाले यातच आनंद आहे. Proud

हा एपिसोड असा होता? Uhoh मी पाहिला होता. मला वाटतं की अण्णा भिवरीला नुसती थाप मारतो की बायकोला मारेन. नंतर रात्री तिच्या खोलीत शिरून तिच्या गळ्यात हार घालायच्या बहाण्याने सुरी फिरवतो. तेव्हा भिवरी झोपलेली नसते. टक्क जागी असते. तो तिच्याशेजारी झोपलेल्या दत्तालासुध्दा मारणारच असतो पण माई मध्ये पडते आणि त्याला वाचवते.>>>>>>

नवीन Submitted by स्वप्ना_राज on 24 September, 2019 - 10:11

हो हे असेच होते ना पण वर लिहिलेली थिअरी नाही घश्याखाली उतरत. माई राखेचा एक मध्ये कनिंग वाटायची पण या भागात ती मलातर निरुपा रॉय च्या पण वरताण वाटते. Happy

राखेचा-२ ला झी गौरव सर्वोत्कृष्ट कार्यक्रम साठी नामांकन मिळालेलं आहे. हा पुरस्कार मिळवुन देण्यासाठी आपल्या (किंवा दुसर्‍यांच्या Wink ) मोबाईलवरुन या क्रमांकावर मिसड्कॉल द्या - ८०८००७३०७३

>>शेवंताला तिच्या भौतिक सुखाची पडलेली असते, तिला तशी त्या वेळेस कुठलीच जबाबदारी नको असते. पण जेव्हा ती कुरुप होते तेव्हा तिला नवरा म्हणजे काय हे कळते, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो.

सॉरी, स्पष्ट लिहितेय. शेवंताला जबाबदारी नको म्हणजे गर्भनिरोधाची साधनं वापरलेली असतील, बरोबर? पण मग नंतर पाटणकरचा उपवास आहे हे माहित असताना अण्णाबरोबर असताना ही काळ्जी का घेत नाही? म्हणजे पुढलं रामायण घडलं नसतं ना? बालकी खाल काढतेय कळतंय. पण नाईलाज आहे. माधव, छाया, दत्ता (गर्भात गेलेलं बाळ), अभिराम वगैरे माईंसोबतची पुत्रसंपदा बघता शेवंताकडे इतकं येणं-जाणं असून इतक्या वर्षात फक्त सुषमाच ये बात कुछ हजम नही हुई Proud

सगळ्यांना जीव द्यायला नाईकांची विहीरच बरी मिळते. गावात दुसर्‍या विहिरी नाहीत काय? का सरिता विहीरीतून पाणी काढताना आत पाटणकर सोडून दुसरंच काहीतरी आहे? पांडूला लेखनात असले खेळ करायची सवय आहे म्हणून विचारलं. Happy

नाईकांच्या विहिरीत फक्त शर्ट सापडला पाटणकरांचा ... बॉडी दुसर्‍याच विहिरीत आहे .
सरिताने दागिने ढापले . आणि त्यामुळे चोंगट्याची चान्दी झाली , अण्णाला कळल्यावर चोंगट्याचं कलम लागणार ताबडतोब...

एक गोष्ट नोटिस केली का कुणी? पहिल्या सीझनच्या तुलनेत या सीझनला पांडूला फुटेज खूप कमी आहे ... त्यामानाने चोंगट्या सगळे फुटेज खातोय !

नाथा बर्‍याच दिवसानी दिसला आज.

चोंगट्या कोण आहे, मिन्स कलाकार. वरती फोटो दिसत नाहीये, म्हणून विचारलं.>> हो ना.. आता लेख संपादन करुन नवीन भरती अ‍ॅड करता येत नाहिय. मला तरी चोंगट्या हा कलाकार दशावतारातील असा वाटतं.. अ‍ॅक्टिंग खरेच भारी करतो - "अण्णानु, मारु नका.. माती खातंय.. माती खातंय" असं म्हणतो तेव्हा हसायलाच येतं..! Proud

काल चोंगट्यो पाटणकरणीला दळण ( पीठ ) नेऊन देतो, तेव्हा पाटणकरीण त्याच्या जवळ तिला अण्णांनी दिलेले दागिने व पैसे देते आणी ते अण्णुकल्याला परत कर असे सांगते. त्याच्या आधी सरीता सकाळी उठुन चहा वगैरे करुन माईंना सांगते की ती पाणी आणेल पांडुच्या किंवा दत्ताच्या मदतीने. ती विहीरीवर जाते तेव्हा तिला कळशी ओढता येत नाही, मग कशीतरी काढल्यावर तिला त्या कळशीवर अण्णुचा शर्ट सापडतो, तेव्हा पांडुला वाटत की अण्णा ढगात गेले. इकडे मग चोंगट्यो ते दागिने परत करायला येतो तेव्हा नाथाची व त्याची बाचाबाची होते. मग अण्णा बाहेर येऊन त्याला वर बोलावतात. चोंगट्या ते दागिने, पैसे अण्णाला देतो, पण ते परत घेत नाहीत. मग ते गाठोडे घेऊन जात असतांना सरीता त्याला पकडते. मग दोघेही हो नाही असे करत वाद घालतात. सरीताला ते दागिने व पैसे पाहुन धक्का बसतो. ती ते ठेऊन घेते व चोंगट्याला थोडे पैसे देऊन त्वांड बंद ठेव असे सांगते. इकडे पाटणकराची बहीण सुषमाला घेऊन येते. शेवंता खुश होते पण तिला कळते की पाटणकर बहिणीकडे गेलाच नाही.

चोंगट्या कुठेतरी घरंगळत जात असतांना त्याच्या चपलेला घाण लागते, ते धुवायला म्हणून तो जवळच्या विहीरीवर येतो. तिथे एक मुलगी आधीच पाणी भरायला येते व विहीरीत बघुन कळशी तिथेच टाकुन पळते. काय झाले म्हणून तो पण विहीरीत डोकावतो आणी मग घाबरुन शिमगा करत पळत सुटतो. इथेच भाग संपलाय.

ते तोडे मस्तच आहेत बाकी. सरिताने घालून पाहिलेले. दत्त्या हे परत आईकडे देइल पागल. काही काही चोरून स्वतःकडॅ ठेवायचे ना.

रश्मी.. वयनी, धन्स..! Bw
कळशीवर अण्णुचा शर्ट सापडतो,तेव्हा पांडुला वाटत की अण्णा ढगात गेले.>> Biggrin
झालं... आजपासुन पाटणकर डोळे पांढरे करुन वावरणार..! Uhoh

पाटणकरणीला विधवा स्वरुपात बघायचं म्हणजे जीवावर येईल. Uhoh गेल्या टायमाला तिच्या चेहर्‍यावर डाग पडलेले बघुन सिरिअल बघणं सोडावं की काय असं होऊन गेलं होतं मला.. पण पांडु कृपेनं सगळं व्यवस्थीत झालं..!

पाटणकरणीला विधवा स्वरुपात बघायचं म्हणजे जीवावर येईल. Uhoh गेल्या टायमाला तिच्या चेहर्‍यावर डाग पडलेले बघुन सिरिअल बघणं सोडावं की काय असं होऊन गेलं होतं मला.. पण पांडु कृपेनं सगळं व्यवस्थीत झालं..!>> अगदी अगदी पांडबा पन कृपा करुन र्हायले?! दचकलेली भावली.

शेवंता किती जाड आहे खरेतर.

शेवंता किती जाड आहे खरेतर.>> म्हणुन तर तिने केलेल्या गुन्ह्याबद्दल माईकडुन सुया टोचवुन घ्यायची शिक्षा फर्मावली होती मी.. म्हणजे जरा बारीक झाली असती.. Proud

>>नाईकांच्या विहिरीत फक्त शर्ट सापडला पाटणकरांचा ... बॉडी दुसर्‍याच विहिरीत आहे .

हे गूढ एक काय उकललं नाही.

>>नाथा बर्‍याच दिवसानी दिसला आज.

हो, त्याचे दोनाचे चार हात झालेले नाहीत अजून. बहुतेक सुशल्याला सांभाळायला देतील तेव्हा त्याचं लग्न करून देतील.

>>शेवंता किती जाड आहे खरेतर.

असं म्हणणं आजकाल politically correct नाही म्हणून गप्प बसले होते Proud तिच्या एका मुलाखतीत वाचलं म्हणे भूमिकेची गरज म्हणून वजन वाढवलं. कैच्या कै. तो अण्णा काय साऊथ इंडियन आहे काय वजनदार बायका आवडायला? माईच तिच्यापेक्षा शिडशिडीत आहे. खरं तर माधव आणि माईच वजन सांभाळून आहेत. दत्ता,छाया, पांडू सगळयांची वजनं वाढलेत सि़झन १ पेक्षा. आताशा पाटणकरसुध्दा जाड वाटतोय आधीपेक्षा.

माई खरेतर सुरेख दिसते. अगदी पहिल्या काही भागांमध्ये वेणी पण लांब सोडलेली आहे छान दिसते. ती खाली चुलीपाशी बसलेली असते तेव्हा किती क्युट दिसते. पाटण कर जरा फोपशा म्हणतात तश्या साइजचा आहे. पांडू सरिता फिट आहेत. शोभा फारच वाळलेली आहे बिचारी.
छाया पण जाडसरच आहे आत्ताच. नुसते बसून खाल्ले तर काय होईल तेच आहे.

माईची फॅशन म्हणजे डार्क ग्रीन ब्लाउज व वर फिकट ग्रीन किंवा निळसर साडी, नाहीतर ऑरेंज साडी, पहिल्या काही भागात खणाचा ब्लाउज. व्हेरी प्रिट्टी.

भिवरी सर्वात फिट व सुरेख खरेतर. पण तिला बिचारीला चांगले कपडे दागिने आलेच नाहीत घालायला. मेक अप पण सुरेख आहे. कायम पांढरे डोळे आणि ए शेट.

अरे हो चोंग ट्या हेअर स्टाइल एवन. पूर्वी गावात स्त्री पात्राची कामे करायचे ते लोक असे केस वाढवायचे. शेवंता स्लीव्हलेस व सिंथेटिक साडी नेसून जेल मध्ये जाते भेटायला तेच आउट ऑफ प्लेस वाट्ते. तेव्हा तश्या ब्लाउज ची फॅशन नव्हती. आता पण फार फॅशने बल स्त्रिया किंवा शोबिझ
मधल्या स्त्रिया घालतात असले ब्लाउज. गावात ल्या घरंदाज स्त्रिया असे नेसत नाहीत. पण तिच्या व्यक्तिमत्वात जो दुसरा स्व भाव लपलेला आहे त्याचे द्योतक असावे. फुल नाइट स्टँडच्या रात्री नौवारी नेसलेली काय सुरेख दिसते. ऑसम.

तो अण्णा काय साऊथ इंडियन आहे काय वजनदार बायका आवडायला?>>>>>>Rolling laughter

स्वप्ना, जबरी कॉमेंट ! हो जाड झालेतच आहेत बाकी लोक पण, माई सोडली तर. बहुतेक या लोकांना स्वप्नातही वाटले नसेल की राखेचाचा प्रिक्वेल निघेल म्हणून. त्यामुळे सुटलेत सारे. बाय द वे, मला भाऊ कदमने केलेले अण्णाचे पात्र जास्त आवडते. Proud

https://www.youtube.com/watch?v=FU3hN3BWKMU

रश्मी.. वयनी, हो पाहिलाय मी हा भाग.. मस्त होता.. Proud

पण थुकरटवाडीत राखेचा-२ मधील फक्त आण्णा, शेवंता, वच्छी अन ती लहान पोरंच आली होती.. बाकी कुणी का आले नाहीत काय माहीत Uhoh

नाईकांच्या विहिरीत फक्त शर्ट सापडला पाटणकरांचा ... बॉडी दुसर्‍याच विहिरीत आहे .हे गूढ एक काय उकललं नाही.>>>>>>> कदाचित पाटणकराची बॉडी एका विहिरीतून वाहत वाहत दुसर्या विहिरीत गेली असेल. Biggrin

Pages