रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा नम्रता..!! मलाही जायचे आहे.. नेक्स्ट मंथ मधे जाणार आहे.. तोपर्यंत मालिकेने राम म्हणु नये म्हणजे झाले..!! Proud

माई आणि माधव ला आम्ही हाका मारत होतो पण त्यांनी ढुंकूनही बघीतले नाही.>> Uhoh गे बाय माझे.. कोकणी आऊस असां म्हणान तिकां भेटुचा आसंय तर तिचो ह्या कथा..! Uhoh
-शोभा भयंकर शिष्ट आहे..धड बोलली नाही वर उपकार केल्याचे भाव चेहर्‍यावर. >> मगे जाउ की नको जाउ..?
-पांडू सगळ्यांशी बोलला, फोटो काढू दिले.>> येड्यावांगडा फोटो काढुन कुणाक दाखव्णार..? मगे न गेलेलाच बरा ना..?? Proud
कॅमेरा अँगल मुळे वाडा मोठा दिसतो, प्रत्यक्षात लहान दिसतो.>> Uhoh माका तां वाडा लय आवडताहा.. मोठा नसां ता माका काय बरा वाटुचा नाय.. Uhoh
आजूबाजूला असलेल्या तार कंपाऊंडमुळे कोणालाही पुढे जाता येत नाही.>> मगे जाऊन फायदा नाही असां म्हणायचो असां काय..?? Uhoh Uhoh
आमच घरदार वेडं आहे ह्या सिरीयल साठी.>> व्हय तर.. हंयसर पन तांच कथा म्हणुन तर प्लॅन केल्यानी..

मालिका संपता की काय..? कालचो भाग लई पळवल्यानी.. एका भागात सगळ्याचाच साक्ष-मोक्ष लागल्यानी.
वच्छी जरी डोस्क्यान कमी हां तरी तिचो सुन काय कमी नसां.. शोभा मॉप हुशार आसंय. शोभान वच्छीक सोन्याचो अंडो देणारी कोंबडी काय कापुक दिलो नाय.. पन तां सरिताक काय कळुचा त्या कळल्यान.. तिने घोवाक सगळां सांगितल्यान.. दत्ताक सगळां पटतां पन काय करु शकणां नाय. Uhoh
सरिता मात्र हे करु शकतां.. तां सकाळी वाड्यात्सुन पाटणकर सदनात जातंलां.. खडा-खडा दार वाजवुक पाटणकरणीक बाहेर बोलवल्यानी..
ईतकां दिवस पोटात साठलेलो राग भडा-भडा पाटणकरणीवर ओकल्यानी.. Angry तिचो आण्णावांगडा जे काय चालु आसंय तां सगळां तिकां कळताहा हे पण सांगितल्यानी.. माई सारख्या साशीक तां आऊस मानतंला आन तिकां हे सगळा कळल्यान तर तां काय हे सहन करुची नाय असां दम देऊक मागे फिरल्यानी.. पाटणकरीण जागच्या जागी दगड बनल्यानी.. वळुन घरात शिरतां तर मागे पाटणकर उभो..! Uhoh
आता आज काय पाटणकरीण जगुची नाय असां वाटताहा.. आज रात्रीच तां नाईकांचो वाड्यासमोरच्या झाडाक लटकलेला दिसुक व्हईत काय..? Uhoh

अरे अजून शेवंता नाव जगा समोर यायचे आहे. बे इज्जती अभी बाकी हय. तिचे पण खरे काय मनात आहे ते कळत नाही. कधी नवृया बरोबर एकद् म जोडी जोडी अ‍ॅक्टिंग करते कधी आ ण्णा समोर अशी वागते की कोणाचे पण मन चळेल. हातर कसलेला कलाकार अदमी आहे.

राखेचा वन चे टोटल २०९ भाग होते . ते तर आत्ताच होउन गेले.

आज शेवंता चोंगट्यावांगडा आण्णाक अत्तराचो नवी कुपी धाडतंला..! आण्णान त्या कुपीचो टोपण उघडुन अत्तराचो वास घेतंलो असां दाखवल्यान.. आता आज काय होतला ते बघुक व्हया..!

त्या अत्तराचा वास घेऊन अण्णा, ग्यानबा तुकाराम का करत होते देव जाणे?

शोभा सॉलिड पोहोचलेली आहे वच्छीपेक्षा. वच्छी, उतावळी नवरीसारखी वागतेय. कधी एकदा अण्णाला धडा शिकवता येईल याची वाट बघतेय, पण शोभा मात्र शर्यती मधली कासव आहे. योग्य वेळेची वाट बघणारी.

अण्णा म्हणे पाटणकरला विहीरीत ढकलत होते आणी पाटणकर रडत रडत अण्णाला , माझ्या कुमुदिनीला तुम्ही माझ्यापासुन हिरावलत असे म्हणत होता. अशी झलक माझ्या मुलीने झी मराठीवर बघितली, मी नव्हते तेव्हा घरात. कदाचीत उद्यापर्यंत दाखवतील.

अण्णा म्हणे पाटणकरला विहीरीत ढकलत होते आणी पाटणकर रडत रडत अण्णाला , माझ्या कुमुदिनीला तुम्ही माझ्यापासुन हिरावलत असे म्हणत होता. >> हे झी मराठी इन्स्टाग्राम वर पण पाहिली क्लिप.

>>अण्णा म्हणे पाटणकरला विहीरीत ढकलत होते आणी पाटणकर रडत रडत अण्णाला , माझ्या कुमुदिनीला तुम्ही माझ्यापासुन हिरावलत असे म्हणत होता.

हे कोणाला स्वप्नात दिसतंय एव्हढंच बघायचं आता Proud

पाटणकरचा आजवरचा भोटपणा बघता त्याने काहीही ऐकलं असण्याची शक्यता कमीच आहे. उलट 'कुमुदिनी, कोण होतं ग बाहेर? सरिता होती काय? एव्हढी का चिडली होती?' असं काहीतरी विचारेल माठ. आणि हा म्हणे ज्योतिशी. धन्य आहे! सरिता एव्हढी बेंबीच्या देठापासनं ओरडत होती तरी एकही शेजारी बाहेर आला नाही. पाटणकर काय रानात कुटी बान्धून रहाताहेत काय? :रागः माईला माधवने पसंत केलेल्या मुलीच्या आईकडे (ती दुसर्‍या गावात रहात असूनही) अण्णांचं येणंजाणं होतं हे माहित होतं. मग शेवंता त्याच गावात राहून रंग उधळतेय हे माहित नाही? गुप्तहेरांच्या संख्येत कपात केलीन का काय?? किंवा तेच तिच्या 'गे बाय माजे' ला वैतागले असतील. एव्हढा अश्रूपात निरुपा रॉयने पण केला नसेल.

>>त्या अत्तराचा वास घेऊन अण्णा, ग्यानबा तुकाराम का करत होते देव जाणे?

मला त्यांची पिऊन झिंगण्याची अ‍ॅक्टींग जाम विनोदी वाटते. काही आठवड्यांपूर्वी एका रस्त्याने जाताना एक खराखुरा दारुडा झिंगत जाताना पाहिला तेव्हा तर ते अधिकच जाणवलं.

>>तिचे पण खरे काय मनात आहे ते कळत नाही. कधी नवृया बरोबर एकद् म जोडी जोडी अ‍ॅक्टिंग करते कधी आ ण्णा समोर अशी वागते की कोणाचे पण मन चळेल

दोन दगडांवर हात ठेवून मध्ये पडणार आहे ती.

>>माई आणि माधव ला आम्ही हाका मारत होतो पण त्यांनी ढुंकूनही बघीतले नाही. शोभा भयंकर शिष्ट आहे..धड बोलली नाही वर उपकार केल्याचे भाव चेहर्‍यावर

सॅड.....आपण फक्त माणसांसारखी माणसं आहोत आणि आपलं so-called celebrity status ह्या मालिकेपुरतं आहे हे ह्या लोकांना जाणवू नये ह्यातच काय ते समजायचं. पांडूचे पाय तरी जमिनीवर आहेत म्हणायचं. मी तर असले लोक समोर आले तरी दुर्लक्ष करेन. ह्यांना असाच धडा शिकवला पाहिजे.

मला ह्यातले घर अफाट आव्डते. आल्या आल्या झोपाळा. बसायला मस्त जागा. मग बसायची खोली त्यातले चित्र, व खाली चक्क गादी. जिना. तिथे पोती दोन ज्यावर काही बसतात. हे ते वस्तु किती आहेत. मी कधी कधी पॉज करून सर्व वस्तू बघते. तसेच किचन मध्ये पण बघते. मस्त आहे किचन.
अगदी बारकाईने सजवले आहे.

रघुकाकांचा घरापुढ चा भाग. नेन्यांचे घर पन छान आहे. पाटण कराचे त्यामानाने साधे व ओके आहे. पूर्ण पणे बंद खोली कुठे आहे कोण जाणे ह्यांना लफडी करायला. सर्व कडून तर उघडे व चोंगट्या डोकावत असतो इथून तिथून. प्रायवसी नाही त्या घराला.
पांडूओ कायम बाहेर झाड त असतो.

चांगले कविमनाचे लोक राहात असते. तर समोर फुलबाग. प्राजक्ताचे झाड, सायली मोगर्‍याच्या वेली किती सुरेख दिसेल फाटक सुद्धा रंगवून घेतले की झाले. तो पार नीट करून घेता येइल. देअर इज अ‍ॅ क्चुअली नो निगेटिवी टी इन दॅट प्लेस. पण अण्णा खुनशी. माई रडकी व सरिता भांडकुदळ दत्ता मारकुटा
वरचा मजला व गॅलरी पण छान आहे बसायला.

अण्णा म्हणे पाटणकरला विहीरीत ढकलत होते आणी पाटणकर रडत रडत अण्णाला , माझ्या कुमुदिनीला तुम्ही माझ्यापासुन हिरावलत असे म्हणत होता. >>>>>> आ, कुमुदिनी? तिच नाव शेवन्ता आहे ना? Uhoh

पाटणकराक सगळा कळल्याहा.. माका वाटताहा आता तो आण्णाच्या घरामागील बावेत उडी मारुन जीव देतंलो.. नाही म्हणजे पाटणकरणीचो सगळो प्रताप कळळां ना त्येकां.. सुषमा त्येचो चेडु नाय हा हे कळ्ळ्यावर त्येकां जीव देण्यावाचुन काय पर्याय उरतां..? Uhoh
त्येनी जीव देल्यावर माईचो डोळो उघडात..

शेवंताचे नाव कुमुदीनी आहे ते आज कळलं.

सुषमा त्येचो चेडु नाय हा हे कळ्ळ्यावर त्येकां जीव देण्यावाचुन काय पर्याय उरतां..? >>> असं थोडीच, त्याने का जीव द्यायचा, त्याने काय केलंय. सोडून द्यायचं बायको मुलीला. अण्णा बघतील काय ते, डीव्होर्स घ्यायचा, बदली करुन दुसरीकडे जायचं.

त्येनी जीव देल्यावर माईचो डोळो उघडान..>>>>> माईचे डोळे कसले उघडात? ते फक्त उघडझाप करतात. अण्णा गचकल्यावर पण माईला ते झोके घेतांना दिसायचे. Proud

माईचे डोळे कसले उघडात? ते फक्त उघडझाप करतात. >> रश्मी वयनी Biggrin Biggrin

सुषमा त्येचो चेडु नाय हा हे कळ्ळ्यावर त्येकां जीव देण्यावाचुन काय पर्याय उरतां..? >>> असं थोडीच, त्याने का जीव द्यायचा, त्याने काय केलंय. सोडून द्यायचं बायको मुलीला. अण्णा बघतील काय ते, डीव्होर्स घ्यायचा, बदली करुन दुसरीकडे जायचं.>> तुम्ही म्हणता ते बरोबर आहे अन्जुताई.. पण पाटणकराचा स्वभाव बघता तो जीव देईल हा माझा कयास बरोबर निघाला.. हे वाचा ---> https://www.esakal.com/manoranjan/ratris-khel-chale-shevantas-husband-pa...

हो ना. Sad पाटणकरच्या जागी जर मी असते तर ( काल्पनीक हं ) आधी अण्णाच्या तोंडावर काळे फडके बांधुन त्याला लय हाणला असता.Slapping मग वच्छीच्या मदतीने त्याला एखाद्या डबक्यात बुडवला असता, मग त्या डबक्यात खेकडे, विंचु सगळे सोडले असते.Cute Little Worm hi and bye मग तो डबक्यातुन बाहेर आल्यावर त्याच्या मागे गावची मोकाट कुत्री सोडली असती. Dog walking the owner

मग शेवंताला सोडुन मी मुंबईला जाऊन दुसरा संसार थाटला असता. Proud

रश्मी Lol लय भारी.

शेवंताला पण शिक्षा हवी द्यायला सोडायच्या आधी.

शनिवारच्या भागात पाटणकर ला एकदाचं समजतं सगळं. त्यावेळची त्याची अवस्था पाहून खरंच खूप वाईट वाटलं त्याचं. साधा चाकरमानी माणूस, आपलं काम आणि घर एवढंच विश्व त्याचं आणि त्यात तो खूष. पण अति महत्वाकांक्षी आणि लालची बायको मुळे घात झाला त्याचा. बायकोला आता शहाणपण सुचलंय पण वेळ निघून गेली...

मला पण बघवेना पाटणकरची अवस्था. मी वीकेंडला भाग एक पासून सुरू केले. किती लोकं मेलेलेत. शेवंता विथ मळ वट. पोस्ट मन, शोभा, पाटणकर तातू भिवरी, आणि जागेच्या भानगडीतले एक दोन . तरी माईला हा नवरा ग्रेट वाट्तो?!
नुसता गुन्हेगार नाही तर रेपिस्ट विकृत मानसिकतेचे व्यक्तिमत्व आहे.

आता मरेल कधीतरी. पहिला एपिसोड आण्णा मरतो तेव्हा आधी सर्व येतत त्यात तो मागे उभा आहे पाटणकरच्या. बरा होता नाही. माधवा चे पत्र मनी ऑर्डर आणून देत असे.

मला मात्र भारी राग येतो त्या पोष्ट्याचा..! Angry
सतत ते गळेपडु बोलणं ऐकवुन माईच्या हातचा चहा खाऊन जातो मेला पोष्ट्या.. Angry Angry

Pages