मायबोली गणेशोत्सव २०१९ समारोप.

Submitted by संयोजक on 18 September, 2019 - 01:16

नमस्कार मायबोलीकरहो,
मायबोली गणेशोत्सवाचे हे यंदाचं २० वे वर्ष. जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले मायबोलीकर ज्यांना इच्छा असूनही गणपतीत घरी जाता येत नाही अश्या सर्वांसाठी अगदी आपला घरचा उत्सव. उत्सव ऑनलाइन असला तरी यात आरत्या होत्या, पंचपक्वान्नांचा नैवेद्य होता, आरास सजलेली, विविध उपक्रम होते, पानाफुलांच्या रांगोळ्या सजल्या, स्पर्धा झाल्या. उत्सवात मायबोलीचं वातावरण पण एकदम उत्साहपूर्ण असते आणि म्हणूनच नेहमी उत्सव दणक्यात होतो.

यंदा स्पर्धा आणि उपक्रम काय ठेवावा यासाठी बराच किस पडला. शेवटी भरगच्च उपक्रम असावेत यावर सर्वांचे एकमत झाले. शब्दधन (सोळा आण्याच्या गोष्टी, चंद्र अर्धा राहिला आणि हास्यलहरी), काव्यतरंग (गझल, चित्रकाव्य आणि त्रिवेणी/हायकू), रुचकर मेजवानी (रॉक अँड रोल, आजीचा खाऊ, हॅव अ सूप), सामाजिक उपक्रम (आपत्ती व्यवस्थापन प्रश्न आणि चर्चा, सांस्कृतिक उपक्रम (रांगोळी), बालगोपालांचा मेळावा (करकटवलेली चित्रे, बालमुद्रा, बालवैज्ञानिक), खेळ (ओळखा पाहू- एक गंमत खेळ,झब्बू) असा भरगच्च कार्यक्रम यावेळी ठेवलेला.

सर्व स्पर्धांना कमी जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सोळा आण्याच्या गोष्टी साठी दिलेल्या उदंड प्रतिसादासाठी यंदाचे मंडळ सर्व मायबोलीकरांचे आभारी आहे. बालगोपाळांसाठी यंदा काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले होते पण एकही प्रवेशिका आली नाही याची खंत वाटली. अर्थात यासाठी मंडळ उपक्रम पोहचवण्यात कमी पडले असेल. आपत्ती व्यवस्थापन प्रश्न आणि चर्चा या धाग्याचा भविष्यात मायबोलीकरांना फायदा होईल अशी आशा आहे. ओळखा पाहू खेळामुळे अनेक गावे त्यांच्या एका प्रसिद्ध गोष्टींमुळे लक्षात राहतील तर बरेच लेखकही पुन्हा त्यांच्या खास ओळींमुळे आठवले.

मतदानाऐवजी परिक्षण:
मतदान की परिक्षण याबद्दल मंडळाबाहेर जितक्या चर्चा झाल्या तितकाच किंबहुना थोडा अधिकच काथ्याकूट मंडळात हा निर्णय घेण्यादरम्यान झाला.... बाहेर जसे मतभेद होते तितकीच मतभिन्नता मंडळामध्येही होती पण एक टीम म्हणून काम करताना विविध शक्यतांचा विचार करून एका निर्णयाप्रत यावे लागते आणि एकदा खुप विचारांती एखादा निर्णय घेतला की एकमताने त्या निर्णयावर ठाम राहणे ही मंडळाची जबाबदारी असते!

परिक्षणाचा निर्णय झाल्यावरही, मंडळाबाहेरचा कमीत कमी एकतरी परिक्षक असावा यावर बहुसंख्य सदस्यांचे एकमत होते. परंतु, मंडळाची घोषणा होवून मंडळ स्थापन झाल्यानंतर उत्सवापुर्वी मिळालेल्या अल्पशा वेळेत, बाहेरचे परिक्षक शोधून त्यांचा होकार येईपर्यंत थांबण्याइतका पुरेसा अवकाश नव्हता. त्यामुळे परत एकदा खुप चर्चेअंती मंडळातल्या सभासदांनी परिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आणि या सगळ्या प्रवासात बहुतांश मायबोलीकरांनी मंडळावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मंडळ खरच खुप आभारी आहे!

मायबोली गणेशोत्सवात संयोजक आपापल्या परीने चांगलं काम करत असतात पण हे काम करत असताना, बाप्पांची सजावट आणि इतर जाहिराती व विजेत्यांची प्रमाणपत्रं अशी महत्वाची तसेच विशेष कसब असावी लागणारी कामे केल्याबद्दल मंडळ "अज्ञानी" यांचे आभारी राहील

गणेशोत्सवात काम करण्याची संधी दिल्याबद्दल admin व webmaster यांचे आभार आणि हो ज्यांच्यामुळे हा उपक्रम निर्विघ्न पार पडला अश्या सर्व मायबोलीकर वाचक, लेखकांचे विशेष धन्यवाद.

गणपती बाप्पा मोरया!! पुढल्यावर्षी लवकर या !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे डायसेक्शन मला करायचे नव्हते, ते करतांना मला रिग्रेट वाटत होते. कुठलेही निकष न पाळता झालेल्या ह्या गलथान परिक्षणाबद्दलचा मुद्दा पटवण्यासाठी काहीसे ईरेला पेटल्याने हे करावे लागले म्हणून 'स्टुपिंग बीलो' म्हणालो, अँड आय स्टिल रिग्रेट मी डुईंग ईट.
हा कथांचा विषय अजून पुढे वाढू नये असे वाटते.

तुमची मर्जी. स्टूपिंगही तुम्ही एकटेच करणार आहात आणि इरेलाही तुम्ही एकटेच पेटला आहात. बघा काय कसं जमेल तसं करा. आम्ही फॅन्स आहोतच वाचायला पॉपकॉर्न खात.

ओह! म्हणजे तुम्ही आता चर्चेत भाग घेणार नाहीत का? अरेरे Sad
मी ईथेच असणार आहे त्यामुळे तुम्ही पॉपकॉर्नची चार पाच पोती आणून ठेवा. Proud

अरे हो! विजेत्या कथेबद्दल तुमचे अभिनंदन करायचे राहिले होते ते करून घेतो. अभिनंदन!
पण खरं सांगू का मी तुमच्या जागी असतो तर "माझ्या कथेवर ती ओरिजिनल नसल्याचा आक्षेप घेतला गेल्याने तात्विक मुद्द्यावरून मी हे प्रशस्तीपत्र स्वीकारू शकत नाही" असा स्वाभिमानी स्टँड घेतला असता.
असो! ज्याची त्याची स्टुपिंग लेवल निराळी असते.

ओह! म्हणजे तुम्ही आता चर्चेत भाग घेणार नाहीत का? अरेरे Sad

अ‍ॅक्च्युअली...हो..आय अ‍ॅम सो सॉरी आय विल जस्ट हॅव टू इग्नोअर धिस स्टफ..

अ‍ॅक्च्युअली...हो..आय अ‍ॅम सो सॉरी आय विल जस्ट हॅव टू इग्नोअर धिस स्टफ.. >> डोंट यू थिंक ईट ईज बिट टू कन्विनियंट टू ईग्नोअर "धिस स्ट्फ" नाऊ Happy
ईस्पेशिअली व्हेन यू ओव अ क्लॅरिफिकेशन टू एवरीवन ईन्क्लूडींग अँड ईस्पेशली मी?

मस्त ट्विस्ट्स मारतोय हा धागा||||
बर्गा - ओरिजिनल कथेची लिंक देउ शकाल का?

त्या धर्तीची कथा वाचल्यासारखे वाटत होतेच मला देखिल |

हाब,
प्रेग्नन्सीमधील संकट हा थ्रेड दोन कथांमध्ये कॉमन आहे पण यात तुमची ओरिजिनल कल्पना काय हेच मला कळत नाहीये. ही खूप खूप खूप कॉमन थीम आहे.
बेबी गर्लबद्द्ल म्हणाल तर सर्वच डिलिव्हरीत गर्ल किंवा बॉय हेच आउटकम असतात. यात तुमचा काय युनिक कन्सेप्ट आहे? मी बेबी गर्लच्या ऐवजी बॉय लिहिलं असतं तर तुमच्या मते मग ते वेगळं कथानक झालं असतं?
तुमची कथा बहुधा परदेशात घडते जिथे आधीच मुलगी होणार हे कळतं म्हणून पिंक सामान जमवलं जातं असा गुलाबी रंगाचा रेफरन्स आहे(?). माझी कथा भारतात आहे जिथे आधी जेंडर कळत नाही, अमेरिकेसारखी आधी जय्यत तयारी करायची पध्दत नाही आणि बाळ गोरंगुलाबी दिसतंय असा उल्लेख आहे, इथे बॉय असेल तरी गोरागुलाबीच असेल, फिकट निळ्या रंगाचा नसेल. इथे गर्ल म्हणून गुलाबी कपडे आणून ठेवले असा काहीच रेफरन्स नाहीये. तुम्ही 'गुलाबी रंगाचा रेफरन्स' म्हणताय ते विअर्ड वाटतंय खूप. मी नुसतं गोरीपान असं म्हटलं असतं तर तुम्हाला मग ते ओके वाटलं असतं? तुमची कथा बापाची घालमेल दाखवते. माझ्या कथेत बापाची घालमेल कुठे दिसली तुम्हाला? त्यावर फोकस नव्हताच.
तुमच्या कथेत देवाचा रेफरन्स लाँड्री लिस्टमधील एक आयटेम असा आलाय. माझ्या कथेची थीम तिथे पूर्ण वेगळी आहे.

एकाच थीमवरील अनेक कथा इथे वाचनात आल्या. समलैंगिकता, हाँटेड हाऊस, प्राणीपक्षी यांच्या पाँइंट ऑफ व्ह्यू ने कथा लिहिणं, मर्डर मिस्ट्रि, इत्यादी. अणि याला plagiarism म्हणतात असं मला स्वतःला वाटत नाही. तुम्ही गंभीर आरोप करताय. plagiarism तसंही या साईटवर अलाउड नाही.
अनीवेज. यू हॅव सक्सेसफुली शट मी अप नॉट जस्ट ऑन धिस थ्रेड बट ऑन धिस साईट. अभिनंदन.

तुम्हाला मोजके डिफरंसेस लिस्ट आऊट करण्याची गरज नाही जेव्हा कथेतली भरमसाठ सिमिलॅरिटी ऊघड आहे.
मी आधी म्हणालो तसे ह्या खाली लिहिलेल्या चौकटीबाहेर माझ्या कथेपासून तुमची कथा तुम्हाला वेगळी काढता येईल का?
डिलिवरी मधले कॉम्प्लिकेशन्स, बेबी गर्ल, गुलाबी रंगाचा रेफरंस..नवर्‍याची घालमेल, देवाचा रेफरंस.
जसे मी आधी नाटकांचे ऊदाहरण दिले तसे गाभा/कथाबीज/कल्पना एकच असल्यास संवाद/सादरीकरण वेगळे असले तरी बघणार्‍याला लगेच कळते.

plagiarism बद्दल तुमचा गैरसमज होतो आहे. तुम्ही माझी कथा जशीच्या तशी ऊचलली असती किंवा मायनर बदल करून प्रदर्शित झाली असती तर ते plagiarism झाले असते. मी plagiarism बद्दल काही म्हणालो का? मी " कल्पना ओरिजिनल नाही आणि ती आधी आलेल्या कथेवर बेतलेली आहे" असे म्हणालो. जगातलं कुठलंही स्टॅट मॉडेल वर ऊल्लेखलेल्या टाईट चौकटीमधल्या स्टोरीलाईनचे साधर्म्य योगायोग (जगातल्या अगणित कथा कल्पनांमधून घडलेला रँडम ऑकरन्स) म्हणून अ‍ॅक्सेप्ट करणार नाही.

मी तुम्हाला आधीच म्हणालो होतो, मला कथेच्या डायसेक्शनच्या पाथवर जायचे नाही कारण त्यातून काहीही चांगले निष्पण्ण होणार नाही हे मला माहित होते. पण तुम्ही वर्बल क्लोजर मिळवण्याच्या नादात दोघांनाही तो 'कॅन ऑफ वर्म' ऊघडलायला भाग पाडलेतच.

अनीवेज. यू हॅव सक्सेसफुली शट मी अप नॉट जस्ट ऑन धिस थ्रेड बट ऑन धिस साईट. अभिनंदन. >> सॉरी टू हिअर दॅट. बट यू डोन्ट हॅव टू डू धिस. ( धिस विल बी वन ऑफ माय डलेस्ट मोमेंट ऑफ मायबोली. Sad )

'कथा बेतलेली आहे' हे माझे मत आहे ते तुम्ही मान्य करावे असा माझा आग्रह नाही. आता तुम्ही क्लॅरिफिकेशन लिहिले आहे तर "ह्या दोन्ही कथा वेगळ्या आहेत" म्हणणारे वाचक तुम्हाला मिळतीलही. दॅट विल गिव यू सम पीस ऑफ माईंड. गुड लक.

तुमची कथा आधी आली म्हणून' प्रेग्नन्सीमधील संकट 'ही तुमची ओरिजिनल आयडिया होत नाही. हाच इतकाच मुद्दा आहे. माझ्या कथेतही तुमच्या कथेप्रमाणे नवऱ्याची घालमेल दाखवली आहे ही तर सरळ थाप मारलीत तुम्ही. गुलाबी रंग रेफरन्स काय ते मला अजूनही कळलेलं नाही. असो. तुम्हाला परत परत समजावण्याची ताकद नाही.
पण प्रशासन हे सर्व वाचत असून तुम्ही केलेले साहित्यचोरीचे गंभीर आरोप तुम्हाला करू दिले जात आहेत याचा अर्थ मी इथे यापुढे लिहिणं योग्य नाही.

सनव, तुमचे कथेबाबतचे मुद्दे अगदी योग्य आहेत - त्रयस्थ वाचक या नात्याने तुम्हाला अनुमोदन. होपफुली तुम्ही या कारणावरून मायबोलीवर लिहिणं थांबवणार नाही, पण तुम्हाला तसं वाटणं समजू शकते.

कोणी विचारले नसताना माझे २ पैसे -
हाब यांच्या 'लाँड्रीलिस्ट' कथेतील ताकद त्या कथेतील साटल्यपूर्ण रीतीने वाचकांना दाखवलेली ट्रॅजिडी आहे. विरुद्ध सनव यांच्या 'अनन्य' या कथेची ताकद साटल्यपूर्ण रीतीने वाचकांना दिलेला अनपेक्षित सुखद धक्का आहे.
पार्श्वभूमी डिलीव्हरी/देव/बाळाची चाहूल अशी असली तरी दोन्ही कथांचे बलस्थान वेगळे आहे.
मला असे वाटले की हाब यांच्या कथेत आई व बाळ दोन्ही दगावले आहेत. विरुद्ध सनव यांच्या कथेत सुखद अंत आहे.
मला दोन्ही कथा फार आवडल्या. असो. एक वाचक म्हणुन मी आनंद लुटला.

थाप मारलेली नाही. आधी म्हणालो तसे तुम्ही plagiarism च्या व्याख्येत अडकला आहात आणि मी तुमच्या कथेची कल्पना ओरिजिनल नसून माझ्या कथेवर बेतलेली असल्याबद्दल बोलत आहे.

मी माझे मत सांगितले आणि तुम्ही तुमचे... Plagiarism, साहित्य चोरीचा आरोप तुम्ही स्वतः वर ओढून घेत आहात. मी तो केलेला नाही असे स्पष्ट लिहिलेले असताना तुम्ही तो केलाच आहे असे बोलणे ही थाप मारणेच होईल नाही का.

माझ्या कथेत बापाची घालमेल कुठे दाखवली आहे? ती तुमची थाप नाहिये का???? बोल्ड मध्ये लिहिलंय तुम्ही.

तुम्ही मला सांगताय की मी प्रशस्तीपत्र स्वीकारून low stoop केलंय, मी ते नाकारायला हवं होतं कारण माझी कथा ओरिजिनल नाही आणि तुमची मात्र ओरिजिनल आहे! That's serious enough for me. जी थीम हजारो इंटरनेट बर्थ स्टोरीज, फोरम, न्यूज, टीव्ही शोज, मुव्हीज मध्ये दाखवून झाली आहे ती तुम्हाला तुमची ओरिजिनल वाटते आहे.

धन्यवाद स्वाती. मायबोलीवर पर्सनल हल्ले होतच असतात पण कुठेतरी लाईन ड्रॉ करावी असा हा टॉपिक झाला. Admin allowing this id to go on is hint enough for me.

एक मिनिट पहिल्याने मी नवर्‍याची घालमेल बोल्ड मध्ये लिहिले आहे बापाची नाही. 'देअर ईज अ डिफरंस' जो बोल्ड असूनही तुम्हाला दिसत नाहीये.

ब्लीडींग झाल्यामुळे मध्यरात्री नवर्‍याने तिला अ‍ॅडमिट केलं. सोनोग्राफी झाल्यानंतर कोणीच काही तिला सांगत नव्हतं. >> ईथे नवर्‍याच्या फिलिंग्ज काय असू शकतील तुमच्या मते?

तुम्ही मला सांगताय की मी प्रशस्तीपत्र स्वीकारून low stoop केलंय, मी ते नाकारायला हवं होतं कारण माझी कथा ओरिजिनल नाही आणि तुमची मात्र ओरिजिनल आहे! >>> चूक. मी लिहिलं आहे मी तुमच्या जागी असतो तर..असे केले असते.
मी तुम्हाला काहीही करायला सांगितले नाही, तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे हवे ते करण्यास समर्थ आहात.

तुम्हाला विश्वास आहे ना तुमची कथा माझ्या कथेवर बेतलेली नाही की तुमचा डळमळीत विश्वास तुम्हाला आलटून पालटून डिफेन्सिव/ ऑफेन्सिव बनण्यास ऊद्यूक्त करतो आहे.

मायबोलीवर पर्सनल हल्ले होतच असतात पण कुठेतरी लाईन ड्रॉ करावी असा हा टॉपिक झाला. >> मी तुमच्यावर कुठलाही वैयक्तिक हल्ला केलेला नाही. मी तुमच्या कथेबद्दल माझे मत सांगितले आहे.
तुम्ही बहुधा तुम्हाला सोयीस्कर तेच आणि तेवढेच वाचत आहात आणि त्याचेच सोयीस्कर ईंटर्प्रिटेशन करून लिहित आहात.

तुमची मर्जी. स्टूपिंगही तुम्ही एकटेच करणार आहात आणि इरेलाही तुम्ही एकटेच पेटला आहात. बघा काय कसं जमेल तसं करा. आम्ही फॅन्स आहोतच वाचायला पॉपकॉर्न खात. >> जोपर्यंत "जोक ईज ऑन हिम" असे तुमचे मत होते तोवर तुच्यासाठी मला हे लिहिणे वैयक्तिक नव्हते. आता तुमच्या कथेबद्दल डाऊट्स गडद होत आहेत तर तुम्ही वैयक्तिक हल्ला आणि अ‍ॅडमिन कारवाई म्हणत आहात.
हे फेअर आहे का तुम्हीच बघा.

ते दोघे एकमेकांवर आरडाओरडी करत होते.
.
.
.
मग मी तिथे गेलो, त्यांना समजावले.
.
.
.
तेव्हा कुठे मारामारी सुरू झाली.
-------------------------------------------------
अरे काय हे, अक्षरशः मासळीबाजार झालाय इथे.
अ‍ॅडमिन यांना विनंती की कृपया हा धागाच बंद करावा.

हाब,
आता हे stupid enough to ignore लेव्हलला गेलंय त्यामुळे विल नॉट इव्हन रिस्पॉन्ड.माझा आक्षेप तुमच्यावर नसून प्रशासनावर आहे कारण ते तुम्हाला असले बिलो द बेल्ट आरोप लेखनावर करून देत आहेत. याचा अर्थ प्रशासन तुमच्याशी सहमत आहे आणि म्हणून मी येथे लिहिणं योग्य नाही. सदर कथाही प्रशासनाने उडवावी.

, प्रशासनावर चिडत नाहीये पण एका जेनेरिक कॉमन थीमला स्वतःचा ओरिजिनल कन्स्पेप्ट म्हणून दावा करणं, मी जे लिहिलेलंच नाही ते इमॅजिन करून मी लिहिलं असल्याचं दडपून देणं- हे उपक्रमात लिहिलेल्या कथेबद्दल करणं- यावर प्रशासन आक्षेप घेत नाही यातून काय मेसेज आहे तो मी समजून घेत आहे इतकंच.

सनव,
मी पुन्हा एकदा स्पष्ट सांगतो आहे मी तुमच्यावर वा तुमच्या कथेवर अजूनतरी कुठलेही आरोप केलेले नाहीत. तुम्ही नाहक सोयीस्कर अशा कांगावा मोड मध्ये जात आहात. (हे मात्र आता नक्कीच म्हणत आहे). जिथे लॉजिकली मी तक्रारदार असायला हवे तिथे तुम्हीच सोयीस्कर आकांड तांडव करीत आहात.

माझा मुद्दा पुन्हा सांगतो आहे कृपया नीट वाचा.

दोन्ही कथेतली अनेकानेक दुर्लक्ष्य न करता येण्याजोगी साम्यस्थळं बघून माझे तुमच्या कथेबद्दलचे मत आहे की "तुमची कथा जेनेरिक आणि कॉमन थीमच्या योगायोगाच्या (बाय रँडम चान्स) परे माझ्या कथेवर बेतलेली आहे". तुम्हाला माझ्या मताशी सहमत वा असहमत होण्याची सक्ती नाही. माझे मत बायस्ड असू शकते हा डिस्क्लेमर सुद्धा मी आधीच लिहिलेला आहे. मी ह्याबद्दल कोणाकडेही आरोप नेलेले नाहीत वा तक्रार केलेली नाही फक्त माझे मत/पर्सेप्शन व्यक्त केले आहे.
स्वतःवर काही ओढवून घेऊन मनस्ताप करून घेण्याआधी कृपया लिहिलेले व्यवस्थित वाचून घेणार का?

ऑलराईट. तुमची कथा, तुमचा कन्सेप्ट १०० टक्के ओरिजिनल असुन माझी कथा त्यावरच १०० टक्के बेतलेली आहे. तसं नसतं तर तुमच्या पोस्ट या ट्रोलिंग केटेगरीत असत्या व प्रशासनाने दखल घेतली असती. पण तुमच्या पोस्ट अपहोल्ड केल्या गेल्या आहेत. तो निर्णय मला मान्य आहे. मी इथे तुमची माफी मागते. माझी कथा डुप्लिकेट असल्यामुळे प्रशासक ती काढतीलच. त्यांना वेळ न मिळाल्यास मी काढेन. तुमचं सगळं सगळं बरोबर आहे. माझं सर्व लिखाण डुप्लिकेट आहे व मी यापुढे इथे लिहणार नाही.
ओके? हॅपी? आर वी डन हियर फायनली?

सनव, तुमची कथा उत्तमच होती याची पोचपावती तिथल्या प्रतिसादांवरून मिळाली आहे. शांत व्हा! तुम्ही उत्तम लेखक आहात. Happy

सनव - तुम्ही शांत व्हा !! तुमची कथा वेल डिसर्विंग आहे !!!!

माझे उदाहरण देतो- मला हापुस आवडत नाही ! हापुस न आवडनारी ही माणसे असतात, याचा अर्थ हापुस वाइट असे होत नाही ना !!

If you revert your decision I am happy to say I stand corrected.
Let's put this to rest.

>>>>कुणीतरी येउन आपली माफी मागावी ही अपेक्षाच किती दयनीय आहे Sad
सिरीयसली नो चिल!<<<<

+११११११११
हे माफी मागितल्यावर सगळा गदारोळ शांत होइल वाचल्यावर वाटले, ह्याच साठी केलाय हट्टाहास. वा!
नवीन होती टीम, नाहि कळले कसे, कुठे वा कधी वागायचे म्हणून सोडता आलं असतं की.
शेवटी जो तो शिकायचा तोच शिकेल. इतका इगो गेम का चाललाय? आणि ब्लेमगेंम कशासाठी?
आणि इतके कोणाचे अपमान झालेत राजे/राणीसाहेबा?
म्हणजे मानभावीपणा का हटवादीपणा ह्या व त्या बाजून सुद्धा आहेच असेच म्हणता येइल.

आवरा म्हणायची वेळ आलीय.

हाबची शशक आल्या आल्या लगेच काही तासांत सनवची शशक आली. हाबची शशक मला जास्त आवडली, माझ्यासाठी तिच विनर आहे. सनवची पण आवडली होती, पण मला ती हाबच्या लाँड्री लिस्ट वरुन ऊचलल्या सारखी वाटली, फरक एव्हडाच होता की हाबची कथा निगेटीव होती, सनव ची पॉझिटीव.

@ हाब, जाऊ द्या हो आता. या वेळचे संयोजक नविन होते,

हाबच्या सगळ्या मुद्द्यांना अनुमोदन विशेषत: गझले वरचे. संयोजीकेने पर्सनल आयडी कमेंट करने पण तितकेच चुकीचे होते, पण आता मूव ऑन होऊया ना

इगो गेम, मानभावीपणा, हटवादीपणा वगैरेपेक्षा मला हा क्लोजर न मिळण्याचा प्रॉब्लेम वाटतोय. कितीही नाही म्हणलं तरी चर्चेचे जे प्रतिसाद उडालेत ते हाबचे होते. त्याने याबद्दल एक्सप्लेनेशनची अपेक्षा करणे यात मलातरी चूक वाटत नाही.

"नवीन होतो, कळलं नाही काय करायचं. झाल्या थोड्याबहुत चुका आमच्याकडून. पुढच्या वेळचे संयोजक आमच्या चुकांमधून शिकतील" <- हे किंवा अशा अर्थाचं काहीतरी लिहायला संयोजकांना नक्की काय प्रॉब्लेम होता/आहे कळत नाही.

नवीन होते म्हणून बर्याचजणांनी सोडूनदेखील दिलंय. पण कालपासून तेदेखील मुरलेलेच वाटताहेत. त्यातले सगळेच निरागस म्हणण्यासारखे वाटत नाहीयत.

Pages