मायबोली गणेशोत्सव २०१९ समारोप.

Submitted by संयोजक on 18 September, 2019 - 01:16

नमस्कार मायबोलीकरहो,
मायबोली गणेशोत्सवाचे हे यंदाचं २० वे वर्ष. जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले मायबोलीकर ज्यांना इच्छा असूनही गणपतीत घरी जाता येत नाही अश्या सर्वांसाठी अगदी आपला घरचा उत्सव. उत्सव ऑनलाइन असला तरी यात आरत्या होत्या, पंचपक्वान्नांचा नैवेद्य होता, आरास सजलेली, विविध उपक्रम होते, पानाफुलांच्या रांगोळ्या सजल्या, स्पर्धा झाल्या. उत्सवात मायबोलीचं वातावरण पण एकदम उत्साहपूर्ण असते आणि म्हणूनच नेहमी उत्सव दणक्यात होतो.

यंदा स्पर्धा आणि उपक्रम काय ठेवावा यासाठी बराच किस पडला. शेवटी भरगच्च उपक्रम असावेत यावर सर्वांचे एकमत झाले. शब्दधन (सोळा आण्याच्या गोष्टी, चंद्र अर्धा राहिला आणि हास्यलहरी), काव्यतरंग (गझल, चित्रकाव्य आणि त्रिवेणी/हायकू), रुचकर मेजवानी (रॉक अँड रोल, आजीचा खाऊ, हॅव अ सूप), सामाजिक उपक्रम (आपत्ती व्यवस्थापन प्रश्न आणि चर्चा, सांस्कृतिक उपक्रम (रांगोळी), बालगोपालांचा मेळावा (करकटवलेली चित्रे, बालमुद्रा, बालवैज्ञानिक), खेळ (ओळखा पाहू- एक गंमत खेळ,झब्बू) असा भरगच्च कार्यक्रम यावेळी ठेवलेला.

सर्व स्पर्धांना कमी जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सोळा आण्याच्या गोष्टी साठी दिलेल्या उदंड प्रतिसादासाठी यंदाचे मंडळ सर्व मायबोलीकरांचे आभारी आहे. बालगोपाळांसाठी यंदा काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले होते पण एकही प्रवेशिका आली नाही याची खंत वाटली. अर्थात यासाठी मंडळ उपक्रम पोहचवण्यात कमी पडले असेल. आपत्ती व्यवस्थापन प्रश्न आणि चर्चा या धाग्याचा भविष्यात मायबोलीकरांना फायदा होईल अशी आशा आहे. ओळखा पाहू खेळामुळे अनेक गावे त्यांच्या एका प्रसिद्ध गोष्टींमुळे लक्षात राहतील तर बरेच लेखकही पुन्हा त्यांच्या खास ओळींमुळे आठवले.

मतदानाऐवजी परिक्षण:
मतदान की परिक्षण याबद्दल मंडळाबाहेर जितक्या चर्चा झाल्या तितकाच किंबहुना थोडा अधिकच काथ्याकूट मंडळात हा निर्णय घेण्यादरम्यान झाला.... बाहेर जसे मतभेद होते तितकीच मतभिन्नता मंडळामध्येही होती पण एक टीम म्हणून काम करताना विविध शक्यतांचा विचार करून एका निर्णयाप्रत यावे लागते आणि एकदा खुप विचारांती एखादा निर्णय घेतला की एकमताने त्या निर्णयावर ठाम राहणे ही मंडळाची जबाबदारी असते!

परिक्षणाचा निर्णय झाल्यावरही, मंडळाबाहेरचा कमीत कमी एकतरी परिक्षक असावा यावर बहुसंख्य सदस्यांचे एकमत होते. परंतु, मंडळाची घोषणा होवून मंडळ स्थापन झाल्यानंतर उत्सवापुर्वी मिळालेल्या अल्पशा वेळेत, बाहेरचे परिक्षक शोधून त्यांचा होकार येईपर्यंत थांबण्याइतका पुरेसा अवकाश नव्हता. त्यामुळे परत एकदा खुप चर्चेअंती मंडळातल्या सभासदांनी परिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आणि या सगळ्या प्रवासात बहुतांश मायबोलीकरांनी मंडळावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मंडळ खरच खुप आभारी आहे!

मायबोली गणेशोत्सवात संयोजक आपापल्या परीने चांगलं काम करत असतात पण हे काम करत असताना, बाप्पांची सजावट आणि इतर जाहिराती व विजेत्यांची प्रमाणपत्रं अशी महत्वाची तसेच विशेष कसब असावी लागणारी कामे केल्याबद्दल मंडळ "अज्ञानी" यांचे आभारी राहील

गणेशोत्सवात काम करण्याची संधी दिल्याबद्दल admin व webmaster यांचे आभार आणि हो ज्यांच्यामुळे हा उपक्रम निर्विघ्न पार पडला अश्या सर्व मायबोलीकर वाचक, लेखकांचे विशेष धन्यवाद.

गणपती बाप्पा मोरया!! पुढल्यावर्षी लवकर या !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्पेन आणि ईतर,
हा सगळा प्रकार सुरूवातीपासून समजण्यास अतिशय सोपा आहे. अ‍ॅडमिन्/वेमांनी ऊत्सवादरम्यान सगळ्या मायबोलीला धरून चालावे , सगळ्या मायबोलीकरांसाठी काम करावे ह्या अपेक्षेने संयोजक मंडळ नेमून दिले. ही अपेक्षा कुठेही लिहून ठेवलेली नाही ते अधोरेखीत आहे जसे घरातल्या/कॉलनीतल्या सगळ्यांना ऊत्स्वात सामावून घेणे अधोरेखीत आणि अपेक्षित असते.
पण ह्या संयोजक मंडळाने अगदी पहिल्या दिवसापासून वैयक्तिक हेव्यादाव्यांना जबाबदारीच्या कितीतरी ऊपर महत्व देऊन जाणूनबुजून आपल्या मनातली तेढ ऊत्सवात रोवली. त्यांच्या ह्या भावनेला 'आमचे ट्रोलिंग होत आहे' असे सेल्फ सॅटिसफॅक्टरी भावनेचे गोंडस रूप दिले.
स्पर्धेसाठी लेखन करणार्‍या आणि मुख्यत्वे मोठ्या वाचक वर्ग लाभलेल्या प्रत्येक मायबोलीकरांची आजवर सहजी दिलेली गेलेली मतदान सुविधा ऊपलब्ध असतांनाही डावलली. धागे प्रतिसाद ऊडवण्याचा आणि अनेक विनंती करूनही पुन्हा न आणण्याचा अभूतपूर्व प्रसंग घडवून आणला. केवळ सिलेक्टिव लोकांच्या शंकांना ऊत्तरे दिली. मतदानावरून नाराज लोकांनी स्पर्धेतून कथा काढून घेतल्या (दोघेच पण तेही मायबोलीकरच आहेत) तरीही त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही. (त्यांनी दखल का घ्यावी असा प्रश्न पडला असेल तर हा प्रतिसाद पुन्हा पहिल्यापासून वाचायला चालू करावा ही विनंती. परिक्षणात गलथानपणा केला तो तर एक मोठा चर्चेचा विषय आहे आणि ह्याऊपर मानभावीपणा करीत समारोपाचे भाषण केले.
एवढे सगळे घडून गेले.... ह्या मंडळाने अँटी मायबोली स्पिरिट वाटावीत अशी कामे सातत्याने केली आणि एवढे सगळे करूनही ते एका शब्दाच्या स्पष्टीकरणाला बांधील नाही? हे पटते का?

हे असे का घडले ह्या सगळ्या साठीचे स्पष्टीकरण मिळवण्यासाठी मी पाठपुरावा करत राहणार आहे.
पण ह्यापुढे वाद नको म्हणून मी प्रतिसाद न लिहिता दर दिवशी ऊत्सव सुरू झाल्यापासूनच्या दिवसाची गणना प्रतिसादात लिहिणार आहे जेणेकरून हा धागा सतत वरती राहिल. संयोजकांना ही आठवण असेल की किती दिवस त्यांचे स्पष्टीकरण/ शंका-नाराजीचे अ‍ॅक्नॉलेजमेंट ड्यू आहे.

हायझेनबर्ग, जाऊ दे. तुमचे मुद्दे सर्वांना नक्की समजलेत. यातल्या संबंधीत व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुमच्यापेक्षा महत्वाच्या आहेत का? नाही. मग त्यांच्यासाठी स्वतःला त्रास करुन का घेता? हे तुम्हीच नाही तर एकुणच सर्वांसाठी आहे. ‘ती व्यक्ती माझ्या आयुष्यात महत्वाची नाही, मग तिच्या वागण्याचा त्रास मी का करुन घेऊ?‘ हे आचरणात आणल्यावर बरं वाटतं खरंच.
राहाता राहिले वरचे तुमच्याबद्दलचे (वा कोणाहीबद्दलचे) एका धाग्यावर झालेले गॉसिप. तसा प्रकार मायबोलीवर कुठेच कोणत्याच धाग्यावर होऊ नये असे वाटते. त्यापेक्षा स्पष्ट त्या व्यक्तीसमोरच बोललेले बरे म्हणजे वाद झाला तरी सहसा कटुता रहात नाही.

राहाता राहिले वरचे तुमच्याबद्दलचे (वा कोणाहीबद्दलचे) एका धाग्यावर झालेले गॉसिप. तसा प्रकार मायबोलीवर कुठेच कोणत्याच धाग्यावर होऊ नये असे वाटते. त्यापेक्षा स्पष्ट त्या व्यक्तीसमोरच बोललेले बरे म्हणजे वाद झाला तरी सहसा कटुता रहात नाही. >>>> +१

२३

कोणतीही कथा लिहिण्याची साधारण प्रोसेस- एक आउटलाईन डोक्यात येणं, त्याचं जर्मिनेशन, आधी ते डोक्यात फिरणं, मग हातात काही काँक्रिट लागलं तर कच्चा खर्डा ते फायनल ड्राफ्ट. हे सगळं फावल्या वेळात करत असल्याने या प्रोसेसला मला वेळ लागतो.
या उपक्रमात तर अधिक बंधनं होती- १. १०० शब्दात कथा 'बसवायची' असल्याने भरपूर रिवर्क, रिराईट करणे. काही वाक्य बदलणे, गाळणे तरीही कथेचा आत्मा हरवू न देणे. २. 'रहस्य' ही अट असल्याने शेवटच्या दोन वाक्यात वाचकांना धक्का देणे. त्याची मजा त्यांना येईल असं पाहाणे. ३. शंभर शब्दांच्या कथेवर आणखी दोनशे शब्दांचं स्पष्टीकरण मला नंतर द्यायचं नव्हतं त्यामुळे वाचकांना कथा वाचून ती क्लिक व्हावी (माझ्या स्पष्टीकरणाची गरज पडू नये) अशा प्रकारेच लिहिणं.

हाब ची ती कथा आली तेव्हा वाचून ऑलमोस्ट कोणालाही कळली नाही. मला तर नाहीच! लोक गेस करत होते. त्यापैकी अश्विनी यांचं उत्तर पटण्यासारखं वाटलं पण नक्की खात्री नव्हती. हाब यांचं स्वतःचं कन्फर्मेशन आल्यावर वाचकांना क्लोजर मिळालं की ओक्के- धिस इज व्हॉट ही वाँट्स टू से.

माझी कथा अश्विनी यांच्या स्पष्टीकरणानंतर सहा तासांनी आली. हाब यांचं स्वतःचं स्पष्टीकरण / कन्फर्मेशन माझ्या कथेच्या नंतर सहा तासांनी आलं. तो वरचा लिहिलेला प्रोसेस मी मधल्या सहा तासांत पूर्ण केला हा हाब व एमी यांचा माझ्याबद्दलचा विश्वास पाहून मला भरुन आलंय. इतका उरका असेल तर काय हवं हो. रोजचे इमेल्स, प्रेझेन्टेशन डेक्स, रिपोर्ट्स मी चुटकीसरशी लिहून हातावेगळे करत आहे अशी स्वप्नं आता मला पडणार आहेत. असोच.

सनव,
I offer you my unconditional apology for dragging you and your work into this. You don't owe me anything of any sorts.
I hope you will help promote the need for general poll.

सनव,
परत आल्याबद्दल धन्यवाद.
तुला (किंवा इतर कोणत्याही लेखकाला) कथा लिहायला किती वेळ लागतो हे मला माहीत नाही.
वाचकासमोर ज्या क्रमाने कथा येत जातील तसा तो त्यात (काही साम्य सापडले तर) लिंक लावत जाईल.
मी चैतन्यच्या आणि अजय चव्हाणच्या धाग्यातदेखील लिंक लावली होती, सायकलस्वारची एक कथा माझ्या अमितवच्या धाग्यावरील प्रतिसादातून सुचलीय का असं विचारलं होतं. दोन्ही ठिकाणी नकार दिल्यावर ते मान्यदेखील केलं.
तसंच तुझा नकारदेखील मान्य करते.
माझ्यामुळे तुला त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते.

संयोजक, समारोपाचा धागा आता निकालांच्या धाग्या सारखा नवीन प्रतिसाद आल्यावर देखील नवीन लेखन मध्ये "काही महत्त्वाचे" सेक्शन मध्ये फ्लॅश होत नाही.
काही तांत्रिक अडचण असल्यास कृपया दुरुस्त करणार का?
की समारोपाच्या धाग्या चे सुद्धा गझलेच्या धाग्या सारखे लाईम लाईट मधून काढण्यासाठी सोयीस्कर demotion केले गेले आहे.

हाब, अ‍ॅमी- sure , no worries.

धिस वॉजन्ट जस्ट अबाऊट मी. इथे उपक्रमात माझी कथा निवडणारे संयोजक - परीक्षक यांच्या इंटिग्रिटीवर , कुवतीवर अकारण बोट रोखलं होतं ते क्लियर झालं.
इथे सपोर्ट करणारे सस्मित, च्र्प्स , स्वाती, हर्पेन , इतरही अनेक जण आहेत सर्वांचे आभार..रियली अप्रिशिएट इट.

तान्त्रिक अडचन संयोजक कसे दुरुस्त करणार - त्याना सर्वर अक्सेस दिलाय का माबो ने.
Admin ला सांगा - जिथे तिथे संयोजक काय Happy

अहो ताई संयोजक तुमचे घरगडी नाहीत किंवा त्यांना तुम्ही पैसे दिलेले नाहीत.
प्रोफेशनल वागण्याबद्दल बोलायचं तर इतकी खुसपट काढून तुम्ही एखाद्या सर्व्हिस प्रोव्हायडरला कटकट केलीत आणि माफी माग म्हणून हट्ट धरलात तर तो तुमचं काम पुन्हा घेणार नाही. पैसा देऊ केलात तरी नाही. एखादं काम करणाऱ्याने प्रोफेशनल असावं तसंच ती सुविधा, उपक्रम ज्यांच्यासाठी केला त्या कस्टमरनेही प्रोफेशनलच वागावं. तर लोकांना तुमच्यासाठी परत काम करावंसं वाटेल. या तमाशामुळे इथले उपक्रम बंद पडतील अशी भीती वाटते. की तेच उद्दिष्ट आहे? अमच्याशिवाय उपक्रम यशस्वी होतातच कसे हा इश्यू आहे का ?
इथे बरेच आयडी असे उगवलेत ज्यांचे सध्या मायबोलीवर काही विशेष लेखन बिखन नाही. काही तर गप्पांच्या बाफवर इतर आयडीजची खिल्ली उडवणे इतकंच करत आहेत. आणि तेच लोक इथे येऊन ज्यांनी स्वतःचा वेळ खर्च करून voluntary काम करून एक उपक्रम पार पाडला त्यांना पिरपीर करून सगळ्यांना पकवत आहेत.>>>

सनव, तुमचे नंतरचे प्रतिसाद रिझनेबल वाटताहेत म्हणुन उत्तर. नाहीतर तुम्ही पण ट्रोल आहात म्हणुन दुर्लक्ष करणार होते.
तुम्ही बरोबर माझ्या विरुद्ध विचार करत आहात. स्वतःचा वेळ खर्च करुन वॉलंटरी काम करून कुणीही कुणावर उप्कार करीत नाही आहे. हेच मला म्हणायच आहे. मी अ‍ॅज अ कस्टमर म्हणुन प्रोफेशनल भाषेतच सांगितल आहे. तुम्हाला कुठे माझी अनप्रोफेशनल भाषा दिसली ते सांगु शकाल का ?
उलट तुमची भाषा बघा :पकवणे , खिल्ली उडवणे वगैरे आरोप तुम्ही करत सुटला आहात.

आपले मुलभुत विचार भिन्न आहेत. असुदेत. हरकत नाही. माझ्या वॉलंटिअरिंग विषयी वेगळ्या कल्पना आहेत आणि तुमच्या वेगळ्या. मी जेव्हा स्वयंसेवकाच काम करते तेव्हा मला ते कधीच मी लोकांच घरगडी म्हणुन काम करत असल्याच फिलिंग देत नाहीत. आणि मी हे पैशा शिवाय काम करती आहे म्हणुन मी त्यांच्यावर काही तरी उपकार करती असही काही वाटत नाही. आणि मी हे निरपेक्ष निस्वार्थीपणान करते असाही माझा दावा नाही. उलट मोठा स्वार्थ आहे. आणि म्हणुन मला ते फुकट काम करती आहे अस वाटत नाही. त्यामुळ माझ ते काम करताना काही चुकल तर जशी मी माझ्या कस्टमरला ऑफिस मध्ये माफी मागेन तशीच माफी मी स्वयंसेवकगिरी करते तिथेही मागेन.
मला अधिक काही लिहायची आता इथे गरज वाटत नाही. धन्यवाद.

> कथा निवडणारे संयोजक - परीक्षक यांच्या इंटिग्रिटीवर , कुवतीवर अकारण बोट रोखलं होतं ते क्लियर झालं. > नाय ब्वा. हे सगळं कुठे क्लिअर झालं?

फक्त तू 'तुझी कथाकल्पना लॉंड्री लिस्ट वरून सुचलेली नाही' असं लिहलंय हे आणि एवढंच मान्य केलंय.
===

हाब,
> पण ह्यापुढे वाद नको म्हणून मी प्रतिसाद न लिहिता दर दिवशी ऊत्सव सुरू झाल्यापासूनच्या दिवसाची गणना प्रतिसादात लिहिणार आहे जेणेकरून हा धागा सतत वरती राहिल. संयोजकांना ही आठवण असेल की किती दिवस त्यांचे स्पष्टीकरण/ शंका-नाराजीचे अॅक्नॉलेजमेंट ड्यू आहे. > चांगला मार्ग आहे.
===

या धाग्यावर अधिक काही लिहण्यासारखे माझ्याकडे नाही असे वाटते. त्यामुळे इथून पुढे वामा.

@एमी, मी ते माझ्या कथेच्या context मध्ये म्हटलं आहे.

@सीमा , तुम्ही स्वतः ही याआधी परीक्षक म्हणून काम केलंय. तेव्हा कोणी डे वन पासूनच तुमचा विरोध करत होतं का? ' पुन्हा संधी द्या' अशी भाषा संयोजक का वापरतील ? त्यांना संधी मुळात हवी असेल का? आणि जर मेजोरीटी लोक त्यांचा असा अपमान करू इच्छित नाहीत तर तुम्ही दोन चार लोक कोण माफ करणारे आणि खासकरून दुसरी संधी देणारे? हे असं humiliation आधीच्या कोणत्याच संयोजकांचं झालं नाहीये. हाब चं बाकी काही असो त्यानी निदान भाग घेतला. एमी लिहीत नाही पण ती खूप वाचते आणि प्रतिसाद देते. I didn't see you around during the event but you still want them to apologize to you??? For an event you were too busy to participate in?

मायबोली आपणा सर्वांची आहे.
संयोजन असो किंवा इतर काही उपक्रम आपण सर्व जमले तसे सहभागी होतो आणि होत राहू. एखादी गोष्ट कुणाला चांगली जमते तर कुणाला नाही. चुकले तर मिळून शिकू या _//\\_
एवढ्या वर्षांच्या कालावधीत एक मात्र नक्की की इथे मदत मागितली तर ती निःसंशय निःस्वार्थपणे मिळाली आहे. एका कुटुंबात जसं डावंउजवं असतं तसंच काहीसं होतं कधीकधी. पण मायबोली आपणा सर्वांची आहे हेही लक्षात ठेवू या प्लिज!

बाकी काही कळत नाही , पण इतक झाल तरी संयोजक का बोलत नाही आहेत ?

माझ तर अजिबात मत नाही आहे की त्यानी माफी मागावी . पण त्यांचा Point of View सांगावा फक्त.

सध्या तरी इथे फक्त हाब ची बाजू दिसतेय .

संयोजकांच गझल स्पर्धेबद्दल , किंवा स्वतःच परिक्षण कर्ण्याबाबत जे मत असेल ते मांडून टाकाव , ते जर त्यांच्या मते बरोबर असेल तर माफी मागण्याचा प्रश्नच कुठे येतो ?

माफी मागणे , चूक(?) कबूल करणे हा एवढा अटी तटीचा मुद्दा झालेला असताना संयोजक माफी मागणार नाहीत आणि त्यानी मागू ही नये. ती वेळ केव्हाच निघून गेली आहे. सामोपचार जाऊन आता जणू समर प्रसंग उभा ठाकला आहे. माफी मागण्यावरून एवढा गदारोळ उठलेला असताना , आपण संयोजक असतो तर काय केलं असत ह्याचा विचार करून बघा एकदा आपल्याच मनाशी. संयोजक झाले तरी ते ही माणसं च आहेत. आत्मसन्मान प्रत्येकालाच असतो.

कोणतेही स्पष्टीकरण देण्यास, त्यांची भूमिका, विचार काय आहे हे सांगण्यास ते बांधील नाहीत. शेवट ते संयोजक आहेत. जेंव्हा अडमीन नी संयोजक टीम जाहीर केली तेव्हा तुम्ही विरोध का नाही केला ? तुम्हाला संयोजक होण्या पासून कोणी रोखलं होत ? एकदा संयोजक मंडळ नेमलं की संयोजकांचा निर्णयच अंतिम . तसे झाले नाही तर कोणताही उपक्रम यशस्वी होणार नाही .

ह्या निमित्ताने नवीन धागे वाचणे, उपक्रमात, स्पर्धेत भाग घेऊन आनन्द मिळवणे ह्या गोष्टी पुरेश्या नाहीयेत का ? ह्या काय नोबेल पारितोषिक स्पर्धा आहेत की काय ? ही ह्या स्पर्धा जीवनमरणाचा प्रश्न आहेत ?

एवढया कमी वेळात इतक्या छान तऱ्हेने गणेशोस्तव साजरा झाला म्हणून मी तरी समाधानी आहे.

ह्या वर्षीच्या ह्या वादळामुळे पुढच्या वर्षी संयोजक म्हणून कोणी पुढे आले नाही तर मला आश्चर्य वाटणार नाही. कोण हा मनस्ताप आपण हुन ओढवून घेईल ? किती ही जीव तोडून कष्ट केले तरी समोरचा बोट दाखवू शकतोच.

ही माझी पहिली आणि शेवटची पोस्ट.

ह्या निमित्ताने नवीन धागे वाचणे, उपक्रमात, स्पर्धेत भाग घेऊन आनन्द मिळवणे ह्या गोष्टी पुरेश्या नाहीयेत का ? ह्या काय नोबेल पारितोषिक स्पर्धा आहेत की काय ? ही ह्या स्पर्धा जीवनमरणाचा प्रश्न आहेत ? >> +१११११११११११११११११११११११११११११११११

२४

संयोजकांपैकी आणि वाचकांपैकी काहींनी हा सगळा personal vendetta चाललाय असा समज करून घेतलाय.
वरच्या एका प्रतिसादातलं - संयोजक टीम जाहीर केली तेव्हा विरोध का केला नाही, हे त्यातलंच.

भरत, काही प्रमाणात personal vendetta चालला आहे असा संशय यायला नक्कीच जागा आहे . पण ते क्षणभर बाजूला ठेवू. कारण वैयक्तिक पातळीवर कुठल्या आयडीचे कुणाशी कसे संबंध आहेत, कुणाचं कुणाबद्दल काय मत आहे, ते तसं का आहे वगैरे आपल्याला संपूर्णपणे कळणं शक्य नाही.
पण मनीमोहोर, समारोपाच्या धाग्यावर एवढा गदारोळ सुरू असताना संयोजकांपैकी एकही जण इथे येऊन एक अक्षरही बोलत नाहीये हे बरोबर आहे का? इथे येऊन मोकळेपणाने आपली बाजू लिहायला काय हरकत आहे? या धाग्यावर संयोजकांपैकी कुणाचाही एकही प्रतिसाद नाही. त्यांच्या बाजूनेही अनेक आयडी बोलत आहेत. (याचा अर्थ त्यांचं काम अनेकांना आवडलेलंही आहे) हर्पेन यांनीही याच धाग्यावर आधी एका ठिकाणी अशाच अर्थाचा एक प्रतिसाद दिला होता. त्यानंतरही वाद वाढत राहिले पण संयोजकांपैकी कुणीही पुढे आलं नाही. तुम्ही जो प्रश्न विचारला आहे (आपण संयोजकांच्या जागी असतो तर) त्याचं उत्तर मी तरी असं देईन की निदान हा वाद मिटवण्याची विनंती मी या धाग्यावर येऊन केली असती.

बाकी काही कळत नाही , पण इतक झाल तरी संयोजक का बोलत नाही आहेत ?
माझ तर अजिबात मत नाही आहे की त्यानी माफी मागावी . पण त्यांचा Point of View सांगावा फक्त.
सध्या तरी इथे फक्त हाब ची बाजू दिसतेय .
संयोजकांच गझल स्पर्धेबद्दल , किंवा स्वतःच परिक्षण कर्ण्याबाबत जे मत असेल ते मांडून टाकाव , ते जर त्यांच्या मते बरोबर असेल तर माफी मागण्याचा प्रश्नच कुठे येतो ?

Lets end this on a good note !!

भरत, काही प्रमाणात personal vendetta चालला आहे असा संशय यायला नक्कीच जागा आहे >> सॉरी. मी लिहिलेला प्रतिसाद न देण्याचा नियम मोडून लिहित आहे. वादासाठी नाही तर माझ्या भुमिकेचे स्पष्टीकरण करणे मला अतिशय निकडीचे वाटत आहे म्हणून.

वावे, हे मी दोन संयोजकांनी विपूत लिहिलेले स्क्रीन शॉट्स आणि नाटकी प्रतिसादाबद्दल लिहिले त्यावरून म्हणता आहात का? कारण त्याआधी मी संयोजकांपैकी वैयक्तिकरित्या कुणालाही पॉईंट आऊट केल्याचे मला आठवत नाही. (दाखवून दिल्यास दुरूस्ती करण्याची तयारी आहे.)

सात-आठ संयोजकांपैकी जर केवळ( दोन + आणि अजून एक) संयोजकांनीच संयोजनाबद्दल मायबोलीवर आपली मते जाहीररित्या मांडली आहेत, तर त्या फॅक्टबद्दल मी काय करू शकतो? माझ्या ऊडवलेल्या प्रतिसादाबद्दल ऊत्तरे/स्पष्टीकरण मिळवण्यासाठी मी ईतर संयोजकांच्या विपू सुद्धा बघितल्या. पण त्यांनी संयोजनाबद्दल तिथे वा ईतर धाग्यावर काहीही लिहिलेले मला दिसले नाही. त्यांनी लिहिले आहे आणि मी तिकडे जाणूनबुजून कानाडोळा केला असता आणि तुम्ही किंवा ईतरांनी ते दाखवून दिले असते तर तुमच्या दाव्यात काही तथ्य असले असते. मी संयोजकांच्या विपूमध्ये फार पूर्वीच लिहिलेले सुद्धा तुम्ही वाचू शकता.
'अजून एका' संयोजकांशी एका कथेच्या धाग्यावर झालेल्या चर्चेचा गोषवारासुद्धा मी आधीच्या प्रतिसादात लिहिला आहे.

तुम्हाला आणि अनेकांना, मी स्पष्टीकरण मागणे personal vendetta वाटतो ठीक आहे तुमचे मत. मायबोलीवर कोणाशीही मला personal vendetta वाटत नाही. आणि जर कधी तो मला वाटला तर त्या अनुषंगाने मी जे काही लिहिल तिथे personal vendetta म्हणून लिहित आहे अशी स्पष्ट टीप लिहिन. मी हे असे 'बोलल्याप्रमाणे चालल्यासारखे' तंतोतंत करू शकतो की नाही ह्याचा तुम्ही माझ्या मायबोलीवरच्या आजवरच्या ईतिहासावरून अंदाज लावू शकता अन्यथा पुढे येणारा काळ सांगेलच. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा की कसे ते मी तुमच्यावर सोडतो.

मी हे आधीच म्हणालोच आहे, पहिल्याने personal vendetta ची सुरूवात माझा प्रतिसाद ऊडवण्यातूनच झाली आहे अन्यथा अनेकदा विनंती केल्यानंतर तो परत आणला असता किंवा त्याबद्दल काहीतरी कारण दिल्या गेले असते.

ईथून पुढे संयोजकांनी धाग्यावर लिहिले तरच मी लिहिन .. अन्यथा गणती चालू आहेच.

वावे, हे मी दोन संयोजकांनी विपूत लिहिलेले स्क्रीन शॉट्स आणि नाटकी प्रतिसादाबद्दल लिहिले त्यावरून म्हणता आहात का?>> नाही.
तुम्हाला आणि अनेकांना, मी स्पष्टीकरण मागणे personal vendetta वाटतो ठीक आहे तुमचे मत.>> नाही, माझं मत तसं नाही.
Personal vendetta चा संशय यायला जागा आहे असं म्हटलं कारण या वादाला फुटलेले फाटे.
हा वाद संपावा अशीच माझी इच्छा आहे त्यामुळे मी personal vendetta चा संशय येण्याबद्दल काहीही लिहू इच्छित नाही. मी वरही म्हटलंय की ते बाजूला ठेवू.

नियमांचा कीस काढणं, वादविवाद हे प्रकार आधीच्या गणेशोत्सवांतही झाले आहेत. पण तिथे संयोजकांनी आपल्याला न रुचणाऱ्या प्रतिसादांची दखलच घ्यायची नाही किंवा ते चक्क गायब करायचे असे प्रकार घडल्याचं आठवत नाही.
मी आधी लिहिलं तसं- संयोजक हे समस्त मायबोलीकरांचे प्रतिनिधी असतात आणि मायबोली गणेशोत्सव हा मायबोलीकरांसाठी असतो, अशी माझी समजूत आहे.

हायझेनबर्ग,
>>पहिल्याने personal vendetta ची सुरूवात माझा प्रतिसाद ऊडवण्यातूनच झाली आहे>> संयोजकांना प्रतिसाद ऊडव्ण्याचा अधिकार नसतो. मी आधिच्या धाग्यावर लिहिल्याप्रमाणे काही बदल करताना तो धागाच उडाला आणि संयोजकांनी तो नंतर पुन्हा प्रकाशीत केला. याब्द्दल मी दिलगीरी व्यक्त केलेली आहे. पुन्हा तेच म्हणेन, चूक माझ्याकडून झाली आहे त्याबद्दल क्षमस्व. हा विषय इथेच थांबवून आता आपण पुढे जाउया.

सोळा आण्यांची गोष्ट या संयोजकांच्या धाग्यावरचा admin team चा प्रतिसाद
इथे लिहिण्यास उशीर झाल्याबद्दल सर्वप्रथम क्षमस्व. तसेच काही बदल करताना आमच्याकडून मुख्य पानावरून गझल स्पर्धेचा दुवा गेला त्याबद्दलही दिलगीरी व्यक्त करतो. तो पुन्हा दिलेला आहे.
दरवर्षी कार्यक्रम ठरवताना त्यावेळचे संयोजक मंडळ एकंदर उपक्रम्/स्पर्धा / परीक्षण याबद्दल चर्चा करून निर्णय घेत असतात. यंदा त्यात काही बदल केले आहेत. त्यावरून इथे बरीच चर्चाही झाली. सर्वांना विनंती आहे की चर्चा थांबवून मायबोलीच्या अपल्या या उपक्रमात नेहेमीप्रमाणे जोरदार भाग घ्या.

Submitted by Admin-team on 9 September, 2019 - 12:40

इथे म्हटलंय, मुख्य पानावरून गझल स्पर्धेचा दुवा गेला.
आता म्हणताय धागाच उडाला.

असो.

तुमचे अनेकानेक धन्यवाद अ‍ॅडमिन. दखल घेतल्याबद्दल आणि धागा तांत्रिक कारणामुळे ऊडाल्याचे स्पष्ट केल्याबद्दल.
माफीची अपेक्षा नाही आणि शब्दखेळही करीत नाही, पण अ‍ॅडमिन टीमच्या आधीच्या प्रतिसादात ऊत्सवाच्या मुख्य पानावरून केवळ दुवा ऊडाल्याचे लिहिले आहे आणि तेच माझ्या डोक्यात होते. मी दिलगिर आहे की धागा-दुवा फरक लार्जर काँटेक्स्ट मध्ये बघू शकलो नाही. तांत्रिक कारणाचे स्पष्टीकरण संयोजकांनी दिलेले सुद्धा चालले असते. काही अनुत्तरित प्रश्न अजून आहेत, पण असो... आता थांबतो.
धाग्याचा प्रश्न सतावत असणार्‍या सगळ्यांनाच तुमच्या प्रतिसादाने नक्कीच समाधान वाटेल.

तुम्ही ईथे आहात तर, पुढच्यावेळी स्पर्धांकरिता मतदानच असावे हा माझा आणि माझ्यासारखाच मतदानाला दुजोरा देणार्‍या सगळ्यांचा आग्रह नम्रपणे पुन्हा नमूद करतो.

ह्या काय नोबेल पारितोषिक स्पर्धा आहेत की काय ? ही ह्या स्पर्धा जीवनमरणाचा प्रश्न आहेत ? >> ह्या आधीही अशा पद्धतीची विचारप्रणाली मांडली होती की हे काय ज्ञानपीठ पुरस्कार आहेत का? अशी विचारधारा असणार्‍या साठी एक दुसरा पर्स्पेक्टीव्ह: सर्वसामान्यपणे लोकांना नोबेल, ज्ञानपीठ याची आसही नसते. त्यासाठी लागणारे प्रयत्न, आकांक्षा, त्याग इ इ आपण करत ही नाही. (अगदी एखादाच असा कार्यमग्न असतो की नोबेलची शर्यत सांभाळून मायबोलीवर ही लिहील). कुठे एखाद्या रेडियो चॅनलवर आपल्याला कुकर मिळणे, कुठे गणेशोत्सवात एखादे सर्टीफिकेट मिळणे ह्याचेच बहुतेकांना अप्रूप असते. आता प्रत्येकजण गीतासार कोळून आयुष्याच्या भेळेवर घालत नाही, त्यामुळे "भाग घे, फळाची चिंता करू नको" इतका विवेक नसतो. जाऊ द्या, त्यापायी स्पर्धेचं महत्त्व कशाला कमी करायचं.

बाकी चर्चा चालू दे. त्यात सुयोग्य भर घालण्याजोगे माझ्यापाशी काही नाही.

Pages