नमस्कार मायबोलीकरहो,
मायबोली गणेशोत्सवाचे हे यंदाचं २० वे वर्ष. जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले मायबोलीकर ज्यांना इच्छा असूनही गणपतीत घरी जाता येत नाही अश्या सर्वांसाठी अगदी आपला घरचा उत्सव. उत्सव ऑनलाइन असला तरी यात आरत्या होत्या, पंचपक्वान्नांचा नैवेद्य होता, आरास सजलेली, विविध उपक्रम होते, पानाफुलांच्या रांगोळ्या सजल्या, स्पर्धा झाल्या. उत्सवात मायबोलीचं वातावरण पण एकदम उत्साहपूर्ण असते आणि म्हणूनच नेहमी उत्सव दणक्यात होतो.
यंदा स्पर्धा आणि उपक्रम काय ठेवावा यासाठी बराच किस पडला. शेवटी भरगच्च उपक्रम असावेत यावर सर्वांचे एकमत झाले. शब्दधन (सोळा आण्याच्या गोष्टी, चंद्र अर्धा राहिला आणि हास्यलहरी), काव्यतरंग (गझल, चित्रकाव्य आणि त्रिवेणी/हायकू), रुचकर मेजवानी (रॉक अँड रोल, आजीचा खाऊ, हॅव अ सूप), सामाजिक उपक्रम (आपत्ती व्यवस्थापन प्रश्न आणि चर्चा, सांस्कृतिक उपक्रम (रांगोळी), बालगोपालांचा मेळावा (करकटवलेली चित्रे, बालमुद्रा, बालवैज्ञानिक), खेळ (ओळखा पाहू- एक गंमत खेळ,झब्बू) असा भरगच्च कार्यक्रम यावेळी ठेवलेला.
सर्व स्पर्धांना कमी जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सोळा आण्याच्या गोष्टी साठी दिलेल्या उदंड प्रतिसादासाठी यंदाचे मंडळ सर्व मायबोलीकरांचे आभारी आहे. बालगोपाळांसाठी यंदा काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले होते पण एकही प्रवेशिका आली नाही याची खंत वाटली. अर्थात यासाठी मंडळ उपक्रम पोहचवण्यात कमी पडले असेल. आपत्ती व्यवस्थापन प्रश्न आणि चर्चा या धाग्याचा भविष्यात मायबोलीकरांना फायदा होईल अशी आशा आहे. ओळखा पाहू खेळामुळे अनेक गावे त्यांच्या एका प्रसिद्ध गोष्टींमुळे लक्षात राहतील तर बरेच लेखकही पुन्हा त्यांच्या खास ओळींमुळे आठवले.
मतदानाऐवजी परिक्षण:
मतदान की परिक्षण याबद्दल मंडळाबाहेर जितक्या चर्चा झाल्या तितकाच किंबहुना थोडा अधिकच काथ्याकूट मंडळात हा निर्णय घेण्यादरम्यान झाला.... बाहेर जसे मतभेद होते तितकीच मतभिन्नता मंडळामध्येही होती पण एक टीम म्हणून काम करताना विविध शक्यतांचा विचार करून एका निर्णयाप्रत यावे लागते आणि एकदा खुप विचारांती एखादा निर्णय घेतला की एकमताने त्या निर्णयावर ठाम राहणे ही मंडळाची जबाबदारी असते!
परिक्षणाचा निर्णय झाल्यावरही, मंडळाबाहेरचा कमीत कमी एकतरी परिक्षक असावा यावर बहुसंख्य सदस्यांचे एकमत होते. परंतु, मंडळाची घोषणा होवून मंडळ स्थापन झाल्यानंतर उत्सवापुर्वी मिळालेल्या अल्पशा वेळेत, बाहेरचे परिक्षक शोधून त्यांचा होकार येईपर्यंत थांबण्याइतका पुरेसा अवकाश नव्हता. त्यामुळे परत एकदा खुप चर्चेअंती मंडळातल्या सभासदांनी परिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आणि या सगळ्या प्रवासात बहुतांश मायबोलीकरांनी मंडळावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मंडळ खरच खुप आभारी आहे!
मायबोली गणेशोत्सवात संयोजक आपापल्या परीने चांगलं काम करत असतात पण हे काम करत असताना, बाप्पांची सजावट आणि इतर जाहिराती व विजेत्यांची प्रमाणपत्रं अशी महत्वाची तसेच विशेष कसब असावी लागणारी कामे केल्याबद्दल मंडळ "अज्ञानी" यांचे आभारी राहील
गणेशोत्सवात काम करण्याची संधी दिल्याबद्दल admin व webmaster यांचे आभार आणि हो ज्यांच्यामुळे हा उपक्रम निर्विघ्न पार पडला अश्या सर्व मायबोलीकर वाचक, लेखकांचे विशेष धन्यवाद.
गणपती बाप्पा मोरया!! पुढल्यावर्षी लवकर या !!
मला आता तुमच्या वागण्याच्या
मला आता तुमच्या वागण्याच्या पद्धतीमुळ वाटत्य कि तुम्हीच संयोजन मंडळात होता.>>>
संयोजकाना बोलु द्या हो.
आणि आता मी काय अपेक्षा करणार हे पण तुम्ही ठरवणार का ? माझ्या साठी डिसिइजन घेवू नका. प्रोफेशनल लाईफ मधला पहिला धडा. तो जमत नाहीये अजुन तुम्हाला.
आणि आता संयोजकाना बोलु द्या. धन्यवाद.
पीआर चा जॉब >>>
पीआर चा जॉब >>>
माझ्या साठी डिसिइजन घेवू नका>>> धन्यचवाद.
अहो ताई संयोजक तुमचे घरगडी
अहो ताई संयोजक तुमचे घरगडी नाहीत किंवा त्यांना तुम्ही पैसे दिलेले नाहीत.
प्रोफेशनल वागण्याबद्दल बोलायचं तर इतकी खुसपट काढून तुम्ही एखाद्या सर्व्हिस प्रोव्हायडरला कटकट केलीत आणि माफी माग म्हणून हट्ट धरलात तर तो तुमचं काम पुन्हा घेणार नाही. पैसा देऊ केलात तरी नाही. एखादं काम करणाऱ्याने प्रोफेशनल असावं तसंच ती सुविधा, उपक्रम ज्यांच्यासाठी केला त्या कस्टमरनेही प्रोफेशनलच वागावं. तर लोकांना तुमच्यासाठी परत काम करावंसं वाटेल. या तमाशामुळे इथले उपक्रम बंद पडतील अशी भीती वाटते. की तेच उद्दिष्ट आहे? अमच्याशिवाय उपक्रम यशस्वी होतातच कसे हा इश्यू आहे का ?
इथे बरेच आयडी असे उगवलेत ज्यांचे सध्या मायबोलीवर काही विशेष लेखन बिखन नाही. काही तर गप्पांच्या बाफवर इतर आयडीजची खिल्ली उडवणे इतकंच करत आहेत. आणि तेच लोक इथे येऊन ज्यांनी स्वतःचा वेळ खर्च करून voluntary काम करून एक उपक्रम पार पाडला त्यांना पिरपीर करून सगळ्यांना पकवत आहेत.
सिरियसली, माफी मागावं म्हणजे
सिरियसली, माफी मागावं म्हणजे काही नाक घासायला सांगत नाहीये. पुर्ण वाक्य वाचा की.
सिनीयर्स जर कंस्ट्रक्टिव्ह क्रिटीसाईझ करत आहे तर ती जगाची रीतच आहे, त्यातुनच ज्युनियर्स शिकत जातात, मला तरी त्यात काही मानभावी पणा दिसत नाहीये.
पुढच्या वर्षी तुम्हीच संयोजक व्हा, सिनीयर्स इथेच असतील आणि मार्गदर्शन मागितल्यास ते देतीलीच, ते कसे मार्गदर्शन करतील हे सर्वस्वी तुमच्या दृष्टीकोणातुन ठरवु नका. सिनीयर्स तसेच असतात.
गणेशोत्सव सगळ्यांचाच जिव्हाळा चा विषय आहे मग तो मायबोली चा असो कि आपला घरचा किंवा चाळी चा .
गणेशोत्स्वात इथे फार मजा आली, त्या साठी संयोजकांचे खुप खुप आभार.
हा धागा मला टिपीकल मराठी कुटुंबातले रुसवे फुगवे सारखे वाटत आहे.
धन्स.
ता. क : हा पोस्ट कुणा ही एका आय डी ला उद्देशुन नाहीये
@ इथे सिनियर्सचं constructive
@ इथे सिनियर्सचं constructive criticism दिसत नसून ragging घेणं दिसतंय.
सो? सिनियर्स or जुनी खोड/धेंड?
आणि हे सिनियर ज्युनियर कल्चर कॉलेजमध्ये ठीक आहे, बट मायबोली?
ग्रो अप!
योग्य प्रतिसाद सीमा.
योग्य प्रतिसाद सीमा.
हायला गंम्मतच आहे सगळी. माफी मागणे, दिलगिरी व्यक्त करणे काहींना मानापमान, नाक घासायला लागले कसे वाटू शकते. वैयक्तिक लेखनावर हेच लोक प्रतिसादांच्या हव्यासापायी शंभरवेळा "धन्यवाद" आणि काही चूक निदर्शनास आणून दिल्यास "माफ करा आता बदल केला आहे" असे लिहितील.
आजकाल लोकांच्या भावना बेजबाबदार आणि टोकदार झाल्या आहेत हेच खरे.
इथे लिहिण्यास उशीर झाल्याबद्दल सर्वप्रथम क्षमस्व. तसेच काही बदल करताना आमच्याकडून मुख्य पानावरून गझल स्पर्धेचा दुवा गेला त्याबद्दलही दिलगीरी व्यक्त करतो.
हे पहा, गणेशोत्सोवाशी थेट संबंध नसतांना अॅडमिन-टीमने किती ग्रेसफुली माफी मागितली सुद्धा. गणेशोत्सोवाची जबाबदारी संयोजकांची आहे अॅडमिन टीमची नाही. कोणीही अॅडमिन टीमकडून त्यांनी माफी मागावी अशी अपेक्षा केलेली नसतांना त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव आहे म्हणून ते दिलगिरी व्यक्त करून मोकळे झाले. त्यावर माझा प्रतिसाद
Too late, too little, पण तरिही आपल्या विनंती आणि सुचनेचा आदर आहे.
दरवर्षी कार्यक्रम ठरवताना त्यावेळचे संयोजक मंडळ एकंदर उपक्रम्/स्पर्धा / परीक्षण याबद्दल चर्चा करून निर्णय घेत असतात. यंदा त्यात काही बदल केले आहेत. त्यावरून इथे बरीच चर्चाही झाली. सर्वांना विनंती आहे की चर्चा थांबवून मायबोलीच्या अपल्या या उपक्रमात नेहेमीप्रमाणे जोरदार भाग घ्या. >> संयोजकांच्या न आवडलेल्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त करत असलो तरी उपक्रमात नेहेमीप्रमाणे जोरदार भाग घेणे चालूच आहे.
गझल स्पर्धेचा दुवा पुन्हा दिल्याबद्दल धन्यवाद.
ह्यानंतर मी पुन्हा ऊत्सव संपेपर्यंत गझलेचा धागा ऊड
विण्याबाबतचा विषय काढला नाही.क्षमस्व आणि धन्यवाद एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मंडळी, त्यात मानापमान काही नाही. ग्रेसफुली "माफ करा" म्हणणे आणि तेवढ्याच ग्रेसफुली "हरकत नाही. पुढे चालू या" म्हणणे एकमेकांवर विश्वास असणे आणि हेल्दी रिलेशनशिपचे प्रतीक आहे.
एकवेळ धागा गायब होणे न होणे ही तांत्रिक बाब आहे आणि ती अॅडमिन टीमच्या अखत्यारित येते हे समजू शकते पण धाग्यातल्या मजकुरासाठी तरी संयोजक जबाबदार आहेत की नाही? सहा दिवस गायबलेली स्पर्धा पूर्ण नियम आणि मजकूर बदलून एका शब्दाचे स्पष्टीकरण न देता आणली जाते आणि त्यावर "आमच्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आभारी आहे" असा ऊद्दाम मानभावीपणा केला जातो तेव्हा लोकांना ह्याबद्दल नाराजी वाटणे स्वाभाविक आहे. जी नाराजीची ठिणगी संयोजक मंडळ अॅडामिन-टीम सारखी एक जबाबदार ओळ लिहून विझवू शकले असते ती त्यांनी मुद्दाम स्पर्धाभर आणि अजूनही ठिणगीचा वणवा होईपर्यंत तेवत ठेवली आहे.
ह्या फिअॅस्कोला संपूर्णपणे ईनएफिशिएंट आणि ईर्रिस्पॉनन्सिबल संयोजन मंडळ जबाबदार आहे.
झाले का सुरु परत? इगो खूप
झाले का सुरु परत? इगो खूप वाईट हेच सत्य .
पुढच्या वेळी ह्या व्यक्तीला संयोजक बनवा बघु काय करतो ते
आजकाल मायबोलीवर काही नवख्या
आजकाल मायबोलीवर काही नवख्या आयडींकडून "फुकट वेळ व श्रम देऊन काम करत आहेत संयोजकांनी", "विना मोबदला काम आहे हे", "घरगडी आहेत का ते" वगैरे टाईप्सचे बरेच ऐकायला मिळते.
मायबोली आणि आपण जिथे वावरतो तिथले एकंदर स्पिरिट न समजल्याचे लक्षण आहे हे. पैसा/मोबदला/मॉनेटरी काँपेनसेशन ही वाह्यात अपेक्षा आणि त्यावर बेतलेले अर्ग्यूमेंटस मायबोलीवर अलिकडेपर्यंत कधीच चर्चेमध्ये आले नव्हते.
ह्याचे ऊत्तम ऊदाहरण अॅडमिन्/वेमा आणि सगळेच संस्थळ चालक. सदस्यांनी अनेक वेळा त्यांच्याही धोरणांवर आक्षेप घेतलेला आहे. पण त्यांनी कधीही "ही सेवा तुम्हाला फुकट मिळते आहे, मिळते तेवढे मिळते तसे घ्या नाही तर फुटा" अशा अर्थाचे चुकूनही कधी काही म्हंटले नाही. ऊलट ही सेवा अजून वापरण्यासाठी प्रोत्साहनच दिले. तरिही आपापली जबाबदारी निभावण्याची अपेक्षा दोन्ही बाजुंनी (सदस्य आणि व्यवस्थापन) असतेच.
अॅडमिन वेमांच्या विपूमध्ये जाऊन लोक त्या बिचार्यांना अनेक वर्षे काय काय ऐकवत आले आहेत त्यांच्यावरही टीका करत आले आहेत.
त्यावेळी आपण एक फुकट सेवा ऊपभोगतो आहोत आणि ईथे कोणीही घरगड्यासारखी तत्पर सेवा आपल्याला देण्यास बांधील नाही हे त्यांचेच अर्ग्यूमेंट त्यांना कळत नसेल का?
एकंदर मायबोलीवर दुटप्पी वागणे वाढीस लागले आहे असे दिसते.
मुद्दा कळला असल्यास ह्यापुढे मोबदला, घरगडी वगैरे गोष्टी कुठल्याही चर्चेत आणल्या जाणार नाहीत अशी अपेक्षा करतो.
कोणत्याही वादात पडण्याची
कोणत्याही वादात पडण्याची ईच्छा नाही - मायबोली सेवा तुम्हाला फुकट मिळते आहे, मिळते तेवढे मिळते तसे घ्या नाही तर फुटा" असे admin कधीही म्हणणार नाहित.
Quid pro quo - मायबोलिवर ट्राफीक आहे म्हणुन मायबोली आहे ,
मायबोलिवर जाहिराती आहेत. सौर्स ऑफ इन्कम आहे. माबो आय फोन app वर दर दहा मिन ला ads आहेत.
संयोजकांची विपूतून मर्जीतल्या
संयोजकांची विपूतून मर्जीतल्या/चाहत्या लोकांसाठी पीआर कॅम्पेन चालू आहे.
संयोजन मंडळाची जनरल मायबोलीकरांसमोर कुठलेही स्पष्टीकरण देण्याची तयारी नसतांना मर्जीतल्या, चाहत्या लोकांसाठी "चुका सांभाळून घ्या" किंवा वॉलंटरीली (समोरच्याने विचारले नसतांना, स्वखुषीने) माहिती देण्याची तयारी? हे कसे एथिकल आहे?
ज्यांना चुका सांभाळण्यासाठी मदत मागितली आहे नेमके तेच सदस्य कसे पूर्ण ताकदीनिशी संयोजकांच्या समर्थनार्थ बोलत आहेत. काय प्रकार आहे हा?
हे मंडळ आणि त्याचे सदस्य नेमके कोणासाठी काम करत आहे?
दुसरे संयोजक वैयक्तिक वैर वगैरे म्हणत आहेत. संयोजकांनी ऊघडलेल्या धाग्यावर एक प्रश्न विचारला तर धाग्यासहित प्रतिसाद गायब केला गेला कोण-कोणावर वैर काढत होते ? असा प्रश्न विचारला तर ते पुन्हा ट्रोलिंग ठरेल का?
"मतदान टाळून परिक्षण का घेत आहेत (जे माझ्यासहित अनेकांनी विचारले)
किंवा
ज्यांना गझल लिहिण्याचा अनुभव नाही, गझल धाग्यावर एखादा प्रतिसादही दिला नाही असे संयोजक गझलेचे परिक्षण कसे करणार आहेत?"
असा प्रश्न विचारण्याला ट्रोलिंग म्हणतात हे नव्यानेच कळाले.
ह्या सदस्या पहिल्याने म्हणत आहेत की "मी संयोजक मंडळात होते म्हणून ट्रोलिंग झाले" नंतर म्हणत आहेत की "मी सोडले तर संयोजक मंडळाचे ट्रोलिंग अजून वाढले"
काय सर्क्यूलर लॉजिक आहे कळत नाही. अनेक मायबोलीकर प्रश्न विचारत आहेत ह्याचा सरळ सरळ अर्थ टीका (ज्याला सोयीस्कर पणे ट्रोलिंग असे म्हंटले आहे) कोणा एकावर होत नसून संयोजक मंडळाच्या कार्यप्रणालीवर होत आहे हे समजणे एवढे अवघड आहे का? (संयोजकांच्या विपूमध्येही मी हे आधीच स्पष्ट केले आहे)
त्याला "ट्रोलिंग" असे नाव देऊन संयोजन सदस्य म्हणून असलेली जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे हा.
संयोजन मंडळाच्या कार्यप्रणालीबद्दलची माहिती जी मिळवण्यास मायबोलीकर (अनेकांनी अनेकदा विचारणा करूनही) प्रिवी नाहीत ती अशी मर्जीतल्या लोकांना वॉलंटरीली सांगता येते का? एथिकल आहे का हे?
संयोजन सदस्य संयोजनाविषयी बोलतांना स्वतःला रिप्रेझेंट करित आहेत की संयोजन मंडळाला ते कळेल का?
आमचे ट्रोलिंग झाले ही संयोजन मंडाळाची सांघिक भावना आहे की एक-दोन संयोजक आपल्या बायस्ड मतांचा प्रचार करीत आहेत?
ट्रोलिंग झाल्याचे कोणीही, संयोजन मंडळाने वा मंडळातील सदस्याने संपूर्ण मायबोलीला दाखवून द्यावे ही विनंती.
माझ्या अंदाजानुसार अॅडमिन-टीमला धाग्यातल्या बदललेल्या मजकुराबाबत अंधारात ठेऊन त्यांच्याकडून धाग्यांची तांत्रिक आदलाबदल करून घेत संयोजकांनी नकळत अॅडमिन-टीमला सुद्धा त्यांच्या अनएथिकल कामात गोवले आहे.
ईनेफिशिएंट आणि ईर्रिस्पॉन्सिबल असण्याबरोबरच मी संयोजन समितीवर अनएथिकल असणे, ग्रुपिझम आणि स्वतःच्या मर्जीतल्या लोकांची अपीझमेंट करण्याबाबतही आरोप ठेवत आहे.
तुम्ही तर सिद्धि च्या हात
तुम्ही तर सिद्धि च्या हात धुवुनच मागे लागलात . मागे तिच्या एका कमेन्ट वर उपहासत्मक प्रतिसाद टाकला . आता महाश्वेता च्या खाजगी विपु मधे डोकावुन त्यांची खाजगी विपु मधुरा आणि सिद्धि बरोबर वाचलित ते वाचलित इथे screenshot टाकताय ?
केवढा मोठा ट्रोल आहात तुम्ही तुम्हाला समजत कसे नाही आहे?
धन्यवाद कटप्पा,
धन्यवाद कटप्पा,
संयोजन मंडळातल्या ईतर सदस्यांचे जुने धागे जाणून बुजून वरती काढून लेखही न वाचता दिलेले नाटकी प्रतिसाद संयोजन मंडळातीलच सदस्या सिद्धी ह्यांचे होते हे स्पष्ट केल्याबद्दल.
आणि अरे हो ते विपू वाचण्याबद्दल

त्याचे असे आहे ना जसे त्या जागेत कोणीही जाऊन लिहू शकते तसे ते कोणीही वाचू शकते.
तुम्ही जरासा तिरस्काराचा चष्मा काढून माझा प्रतिदास वाचला असता तर तुम्हाला त्या स्क्रीनशॉट मध्ये सुद्धा लिहिलेले दिसले असते की "विपू सार्वजनिक असते"
जरा नवीन काही तरी आरोप घेऊन या बरं. घाई नाही विचार करा... रात्रभर हा विषय डोक्यात असू द्या... मग ऊद्या आरामात लिहा.
कितीदा प्रतिसाद एडिट करणार -
कितीदा प्रतिसाद एडिट करणार - तुमचे झाले की सांगा शेवटी - मग बोलुयात |
माबो गणेश उत्सवाचा समारोप
माबो गणेश उत्सवाचा समारोप होवुन आठवडा उलटला तरी धाग्यावर काही समारोप होत नाहीये, माबो गणेश उत्सव हा आतापर्यत मोअर ऑफ कस्टमर/ वाचक फ्रेण्डली अॅटिट्युड ठेवुनच केला गेलाय, सयोजकाना काय आवडते या पेक्षा वाचकाना काय हवय हे इथ महत्वाच, ते शक्य नसल्यास त्याच योग्य ते प्रॉम्ट उत्तरही दिले गेल, सुचवलेले बदल लगेच केले गेले होते.
यावेळेस तसच घडल नाही पण उत्सव आहे तिथे थोड कमी - जास्त चालतच, काहीकाही स्पर्धाना जबरी प्रतिसाद मिळालाच की तो काय त्याच्य मेहनतीशिवाय मिळाला का? त्यानी पुढे होवुन कमी वेळात उत्सव पार पड्लाच ना! मग झाल तर.
हाब! सयोजकानी त्याच समारोपाचे भाषण देवुन कधिच एक्झिट घेतलिये, आता तुम्ही रिकाम्या खुर्च्याना भाषण देताय , तुमचे मुद्दे कितीही बरोबर असले तरी ज्यानी उत्सावातच तुमच्या सुचना एकल्या नाही ते आता तुमचे मुद्दे एकुन काही प्रतिक्रिया देतिल का? त्यानी त्यातुन काय हवा तो लेसन घेतलाही असेलच की तुम्हाला आवडाव म्हणून त्यानी ते जाहिरपणे मान्य कराव अशी अपेक्षा आहे का तुमची?
unfortunately its doesn't feel like constructive criticism anymore
रात गई बात गई! मुव्ह ऑन
प्राजक्ता प्रतिसादाबद्दल
प्राजक्ता प्रतिसादाबद्दल धन्यवाद. विश्वास ठेवा मला १००% कळते आहे तुम्ही आणि ईतरांनी लिहिलेले "आता टीका बास झाली" ह्या अर्थाचे. आणि माझीही हे सगळे थांबावे अशीच ईच्छा आहे.
ह्याबद्दल माझी भुमिका सविस्तर स्पष्ट करण्याआधी एक छोटीशी गोष्ट सांगतो. कदाचित तुम्ही ऐकलीही असेल.
(वाचल्यावर कुठल्या सिनेमातली आहे ते सुद्धा लगेच ध्यानात येईल)
आजन्म कारावासाची शिक्षा झालेल्या अँडीला तुरुंगातल्या कैद्यांसाठी वाचायला नवी पुस्तके हवी आहेत. म्हणून तो सिनेटला आठवड्याला एक असे "पुस्तके मंजूर करा" म्हणून पत्र पाठवतो. शेवटी सहा वर्षांनी ३०० पेक्षा अधिक पत्रे मिळाल्यावर सिनेट वैतागून अँडीला २०० पुस्तके आणि $५० चा चेक पाठवून "घे एकदाचा आणि गप्प बैस" अशा अर्थाचे ऊलटपत्र पाठवते. पुस्तके आणि चेक मिळाल्यावर जेलचा गार्ड अँडीला म्हणतो "झाले ना आता तुझ्या मनासारखे. आता ही पुस्तके ईथून घेऊन जा" त्यावर अँडी म्हणतो "अजून नाही, आता मी सिनेटला आठवड्याला दोन पत्रे पाठवणार आहे" आणि अँडी हे करत राहतो आणि मग अनेक वर्षांनी सिनेट तुरुंगासाठी एक मोठी लायब्ररी मंजूर करते आणि त्याच्या मेंटेनेन्ससाठी वार्षिक भत्ता सुद्धा.
कैद्यांना एक गाणे ऐकवले म्हणून महिनाभर सॉलिटरी (काळकोठडी) मध्ये रहावे लागलेला अँडी तुरुंगातल्या लायब्ररीमध्ये सगळ्या कैद्यांना हवे तेव्हा ऐकण्यासाठी म्युझिक स्टेशन आणून दाखवतो.
मी काही स्वतःला हीरो-बीरो, अँडी-फँडी समजत नाही आणि अनेकांना वरच्या स्टोरीचे प्यारलल हास्यास्पद वाटेल पण न्याय्य मागणीसाठी perseverance जरूरी आहे हे मला माहित आहे आणि तेवढेच सांगायचे आहे.
थोडक्यात मला माझ्या ऊडवलेल्या प्रतिसादाबद्दल स्पष्टीकरण हवे आहे आणि पुढे येणार्या स्पर्धांसाठी मतदानसुद्धा.
संयोजन मंडळाने मेहनत घेऊन ऊत्सव पार पाडला तो बर्याच अंशी यशस्वी सुद्धा केला ह्याबद्दल त्यांचे कौतुक आहेच ते माझ्यासहित अनेकांनी केलेही आहे, पण म्हणून त्यांच्या चुकीच्या गोष्टी स्पष्टीकरण किंवा साधी अॅक्नॉलेजमेंट न मिळताच विसरून कसे चालेल?
प्रतिसाद माझा ऊडवला गेला आहे त्यामुळे त्याचा पाठपुरावा मलाच करावा लागणार आहे. ही काही अॅडमिनची कारवाई नव्हे.... धागे आणि प्रतिसाद ऊडवल्या जाणे ह्याआधी कधीही घडलेले नाही.
त्या ऊडवलेल्या प्रतिसादासासाठीचे स्पष्टीकरण मिळवण्यासाठी सगळ्यांचा रोष पत्करूनसुद्धा मी पुढच्या गणेशोत्सोवापर्यंत हा धागा जिवंत ठेवणार आहे. तोवर "महत्वाचे काही" म्हणून सगळ्यांना रोज हा धागा वरती दिसत राहील.
ह्या दरम्यान स्पष्टीकरण तरी मिळेल किंवा धागा प्रतिसादासाठी बंद होईल किंवा माझ्या आयडीला कायमची सॉलिटरी दिली जाईल
मला हे करतांना आजिबात आनंद होत नाहीये. ऊलट वाद जिवंत ठेवण्याबद्दल गिल्टी आणि दु:खी वाटत आहे.
न्याय्य मागणीसाठी पाठपुरावा करण्यात कसलाही ईगो नाही.
> ग्रुपिझम आणि स्वतःच्या
> ग्रुपिझम आणि स्वतःच्या मर्जीतल्या लोकांची अपीझमेंट करण्याबाबतही आरोप ठेवत आहे. > 'मतदानऐवजी परीक्षण हा बदल का केला गेला आहे?' या प्रश्नाचे उत्तर संयोजक देत नव्हते पण इतर काही सर्वसामान्य सदस्य ज्या हिरारीने या बदलेल्या निर्णयाच समर्थन करत होते तेव्हाच गृपिझमची शंका बाकीच्या सदस्यांना येणे साहजिक आहे.
आतादेखील एका संयोजकाने, तेव्हा या निर्णयाचे समर्थन केलेल्या एकाच आयडीला सेमिवैयक्तीक स्पेसमधे याबद्दल बोलण्याऐवजी सर्व ५-६ संयोजकांनी एकत्र येऊन परत एक टीम म्हणून
• मतदानऐवजी परीक्षण हा बदल का केला गेला
• धागा, प्रतिसाद का उडवले गेले आणि धाग्याचा मजकूर बदलून परत का आणला गेला
या प्रश्नाची उत्तर द्यावीत आणि
• पुढे येणार्या स्पर्धांसाठी मतदान होईल
याची खात्री द्यावी.
आणि या सगळ्यावर पडदा पाडावा असे एक सर्वसामान्य सदस्य म्हणून मला वाटते.
===
हाबच्या चिकटीचे कौतुक वाटले. त्याला शुभेच्छा!!
<<< विश्वास ठेवा मला १००%
<<< विश्वास ठेवा मला १००% कळते आहे तुम्ही आणि ईतरांनी लिहिलेले "आता टीका बास झाली" ह्या अर्थाचे. आणि माझीही हे सगळे थांबावे अशीच ईच्छा आहे. >>
नाही नाही, हायझेनबर्ग. चालू राहू दे. तुमच्यामुळे या धाग्याचे करमणूक मूल्य खूप आहे.
हाब, भरत, ॲमी व इतर यांनी
हाब, भरत, ॲमी व इतर यांनी सगळे मुद्दे लिहिले आहेतच.
हाबच्या चिकटीचे कौतुक वाटले. त्याला शुभेच्छा!! +1
हायझेनबर्ग यांचे सगळे मुद्दे
हायझेनबर्ग यांचे सगळे मुद्दे रास्त आहेत.
गझल स्पर्धेसंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर नाही म्हणून तो धागा गायब करणं , त्याबद्दल विचारणा केल्यावर बदल करून नवा धागा काढणं आणि या प्रक्रियेत हायझेनबर्ग यांचा प्रतिसाद गायब होणं या गोष्टी अनएथिकलच आहेत.
स्पर्धेचे स्वरूप बदलले याचाच अर्थ हाय झेनबर्ग यांनी दाखवून दिलेली त्रुटी मान्य असल्याने सुधारली. मग हे सनदशीर मार्गाने, त्यांचं म्हणणं लक्षात घेऊन केलं आहे, असं सांगून करण्यात नक्की कोणता इगो आड येत होता?
हायझेनबर्ग यांना मुद्दा लावून धरण्याबद्दल बोल लावणार्यांना कोणतंही उत्तर न देता प्रतिसाद आणि तो असलेला धागा गायब करण्यातलं गांभीर्य कळलंय का?
संयोजकांतल्या काहींना हे सगळं आपण केलेल्या चुकीमुळे झालंय हे मान्य नाही किंवा मान्य करायची तयारी नाही. आपल्याबद्दलच्या वैयक्तिक वैरभावनेमुळे हे केलं जातंय अशा ढालीमागे लपणं त्यांना सोयीचं जातंय. पण संयोजन समितीतल्या इतरांना तसं वा टत नसावं अशी आशा आहे.
अॅमी, पुढल्या गणेशोत्सवात विजेते मतदानाने की परीक्षणाद्बारे निवडले जातील, हे त्यावेळचे संयोजक ठरवतील ना?
ऊबो
ऊबो
प्राजक्ता +1
प्राजक्ता +1
हे त्यावेळचे संयोजक ठरवतील ना
हे त्यावेळचे संयोजक ठरवतील ना? >> हे सुद्धा मतदान करून ठरवता येईल. मला खात्री आहे संयोजकांचे परीक्षण हवे आहे की सर्व साधारण मतदान, ह्याचा पोल घेतल्यास संयोजकांच्या बाजूने अत्यल्प प्रतिसाद असेल. अगदी माजी संयोजक सुद्धा मतदान घेण्याच्या बाजूने कौल देतील.
अगदीच काही दुरुस्त न करता येण्यासारखे तांत्रिक कारण असेल तर अॅडमिन किंवा अॅडमिन टीम तसे सांगू शकते. पण तसे काही कारण नसल्यास आजवर चालत आलेली सर्वसमावेशक मतदान प्रक्रियाच डिफॉल्ट धरावी. बाहेरील तज्ञ परीक्षक असल्याशिवाय चार लोकांच्या व्हिम वर हा निर्णय असू नये कारण "संयोजक = परीक्षक" निर्णयाला कुठलाच लॉजिकल बेस नाही.
पुन्हा मतदान हे उत्सव संपल्यानंतर, विसर्जनदिवसा नंतर चार पाच दिवसानी खुले केले जाते. उत्सव चालू होण्याच्या आधी पासूनच मतदान होणार नाही कसे ठरवल्या जाऊ शकते? संयोजकांकडे परस्परांचे जुने साहित्य उकरून नाटकी प्रतिसाद देण्यासाठी वेळ होता, वैयक्तिक कथा साहित्य लिहिण्यासाठी वेळ होता म्हणजे मतदानाची तजवीज करण्यासही पुरेसा वेळ होताच.
एक सर्च मारल्यावर जुन्या
एक सर्च मारल्यावर जुन्या लिंका सापडल्या २०१०-११ च्या. त्यावेळी मतदानाद्वारे परिक्षण नव्हतं. परिक्षक करायचे. त्यावेळी ही अशी इतकी आदळाआपट कोणी केल्याचं दिसलं नाही.
https://www.maayboli.com/node/20055
https://www.maayboli.com/node/14307
सो मायबोलीवर काही यंदा पहिल्यांदाच नवीन लोकांनी येऊन नवीन प्रथा सुरु केली असंही नाहिये. दोन्ही मेथडचे प्लस मायनस पॉईंट्स दिसले आहेत. सो नवीन संयोजकांना ठरवू दे की.
त्याचं काय आहे ना सनव एक
त्याचं काय आहे ना सनव एक अरेबिक म्हण आहे "The devil is in the detail" आता तुम्ही-आम्ही अरेबिक वाचत नसल्याने ही म्हण आपल्याला फारशी ठाऊक नसते.
२०१० च्या गणेशोत्सोवात एकंदर ५ स्पर्धा होत्या. त्यातील ३ स्पर्धांचे निकाल परीक्षकांमार्फत व उरलेल्या २ स्पर्धांचे निकाल जनमत चाचणीने लावण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेत आलेल्या तांत्रिक अडचणीबद्दलही संयोजकांनी मनमोकळेपणाने लिहिले आहे. आता खालचे वाक्य काळजीपूर्वक वाचा.
जनमत न घेतलेल्या स्पर्धांचे परिक्षण संयोजन समितीत नसलेल्या मायबोली सदस्यांनी संयोजकांच्या विनंतीवरून केलेले आहे. त्यातल्या साहित्याशी संबंधित कविता स्पर्धेचे परिक्षण स्वाती आंबोळेंनी केले होते ज्यांची कविता आणि गझलेतली मुशाफिरी, प्राविण्य मायबोलीवर सर्वज्ञात आणि प्रसिद्ध आहे.
दुसरी लिंक तर फारच मस्त ऊदाहरण आहे प्रोफेशनल संयोजनाचे. ह्यातल्या स्पर्धा बाळगोपाळ चमूसाठी होत्या. ज्यात संयोजकांनी "आम्ही परिक्षण करणार" म्हणणे एकदमच सोपे होते. पण त्यांनी तसे न करता वेगळे परिक्षक मंडळ नेमले. एवढेच नाही तर त्यांनी सविस्तरपणे कुठल्या निकषांवर परिक्षण केले गेले आहे ते सुद्धा स्पष्ट लिहिले आहे.
आयोजकांनी परिक्षण करणे एवढे "बेसिक लेवलवरचे कॉन्फ्लिक्ट ऑफ ईंट्रेस्ट" वायोलेशन आहे की कुठलेही सेन माईंड आयोजक 'आम्हीच परिक्षक बनणार' असे म्हणणारर नाही. मला अजूनही कळत नाहीये की हा साधा, बेसिक मुद्दा कसा लक्षात येत नाही लोकांच्या. ती काही चमचा लिंबू किंवा तीन पायांची शर्यत नाही निकाल पाहून विजेता ठरवायला.
ह्यावेळच्या संयोजकांना गझल स्पर्धेचे परिक्षण करण्यासाठी मायबोलीवरच्याच तज्ञ लोकांची मदत घेण्यास कोणी आडकाठी केली होती का?
ऊलट माझ्या प्रतिसादानंतर त्यांनी अशी मदत घेतली असती तर आपल्याला स्पर्धेत गझल वाचायला मिळाल्या असत्या. त्यांनी नियमित गझल लिहिणार्यांना साधी एक विपू किंवा संपर्क सुद्धा केल्याचे दिसले नाही.
वरतून "मला कथांमधले काही कळत नाही असे एक संयोजकच म्हणाले".. खरे तर मी त्यांच्या प्रामाणिक पणाला दाद देतो. संयोजन मंडळातल्या कोणाला "कथेतले कळते" विचारल्यावर त्यांनी "ज्यांना कळते ते परिक्षण करतील" असे म्हणाले. म्हणजे स्पर्धा संपत आली तरी परिक्षण कोण करणार हे फिक्स नव्हते मग "मतदान नाही आणि परिक्षण आम्हीच करणार" हे आधीच ठरवणे कसे झाले? परिक्षणाच्या नावाखाली निव्वळ ऊल्लू बनवले आहे संयोजकांनी मायबोलीकरांना
अनबायस्ड परिक्षक असल्याने काय फरक पडतो तुम्हाला सांगतो.
मी तज्ञ नाही आणि अनबायस्ड ही नसेन पण मी परिक्षक असतो तर "एक विजेती कथा ओरिजिनॅलिटीच्या बेसिस वर बाद केली असती कारण ती विजेती कथा पूर्णपणे स्पर्धेत आधी येऊन गेलेल्या दुसर्या एका कथेवर बेतलेली आहे"
हाब,
हाब,
दरवेळी मतदानाद्वारेच परिक्षण न होता परिक्षकांद्वारेही परिक्षण इथे होतं याचं उदाहरण देण्यासाठी त्या लिंक होत्या.
आता ते परिक्षक कोण असावेत वगैरे गोलपोस्ट चेंज करत राहून तुम्ही बोलत राहालच. तुमचा एक मुद्दा खोडला तर तुम्ही दुसरे नवीन दोन मुद्दे काढता. इट्स अॅक्च्युअली फनी टू वॉच.
अनबायस्ड परिक्षक असल्याने काय फरक पडतो तुम्हाला सांगतो.
मी तज्ञ नाही आणि अनबायस्ड ही नसेन पण मी परिक्षक असतो तर "एक विजेती कथा ओरिजिनॅलिटीच्या बेसिस वर बाद केली असती कारण ती विजेती कथा पूर्णपणे स्पर्धेत आधी येऊन गेलेल्या दुसर्या एका कथेवर बेतलेली आहे">>
कोणती कथा? मला स्वतःला एक कथा हेमिंग्वेच्या सिक्स वर्ड स्टोरीवर बेस्ड वाटली. पण अगेन- याला मी तरी plagiarism म्हणणार नाही. इन्स्पिरेशन म्हणता येईल.
आता ते परिक्षक कोण असावेत
आता ते परिक्षक कोण असावेत वगैरे गोलपोस्ट चेंज करत राहून तुम्ही बोलत राहालच. तुमचा एक मुद्दा खोडला तर तुम्ही दुसरे नवीन दोन मुद्दे काढता. इट्स अॅक्च्युअली फनी टू वॉच. >> तज्ञ परिक्षक का नेमले नाहीत हा मुद्दा खूप आधी मी, भरत आणि अजून काहींनी ह्याच नाही तर ह्या आधीच्या "शशक शब्दधन स्पर्धा" जाहिरातीच्या धाग्यावर जिथे मतदान का नाही म्हणून चर्चा झाली होती तिथे मांडून झाला आहे. गझलेच्या माझ्या ऊडवलेल्या प्रतिसादात सुद्धा तेच लिहिले होते जर तुम्हाला गझलेचा अनुभव नाही तर परिक्षण कसे करणार त्यासाठी तज्ञ गझलकार का बघत नाही?
गोलपोस्ट चेंज होते आहे हे तुम्हाला सोयीस्कर रित्या वाटत असले तरी तसे नाहीये...
कोणती कथा? >> जी तुम्हाला नाव न सांगताही वाटते आहे अगदी तीच.
टू प्रेडिक्टेबल पण ठीक आहे. लेट्स स्टूप बीलो अवर बेसिक लिटररी एटिकेट्स अँड डायसेक्ट दोज स्टोरीज.
मला स्वतःला एक कथा हेमिंग्वेच्या सिक्स वर्ड स्टोरीवर बेस्ड वाटली. पण अगेन- याला मी तरी plagiarism म्हणणार नाही. इन्स्पिरेशन म्हणता येईल. >> आता हे 'गिविंग बॅक टू मी' का?
डिलिवरी मधले कॉम्पोलिकेशन्स, बेबी गर्ल, नवर्याची घालमेल, देवाचा रेफरंस... मी तुमच्या कथेबद्दल बोलतो आहे की माझ्या ते सांगू शकाल का?
माझ्या आणि हेमिंग्वेच्या कथेतले plagiarism / ईन्स्पिरेशन शोधण्याची जबाबदारी आता तुमच्यावर आहे.
परीक्षकांद्वारे परीक्षण आणि
परीक्षकांद्वारे परीक्षण आणि संयोजकांनी स्वतः परीक्षण करणं. - यांतला फरक.
तिथे परीक्षकांची नावं आहेत. त्यांनी निकालाची जबाबदारी घेतली आहे.
इथे संयोजकांतल्या नक्की कोणी कशाचं परीक्षण केलं, ते कळलंय का? परीक्षक म्हणून बसणाऱ्यांचं स्वतःचं त्या त्या प्रकारचं काही लेखन आहे का?
डिलिवरी मधले कॉम्पोलिकेशन्स,
डिलिवरी मधले कॉम्पोलिकेशन्स, बेबी गर्ल, नवर्याची घालमेल, देवाचा रेफरंस... मी तुमच्या कथेबद्दल बोलतो आहे की माझ्या ते सांगू शकाल का?
हाब, हा एक वेल डॉक्युमेंटेड कॉमन ह्युमन experience आहे. आत्ता या क्षणी जगभरातील हॉस्पिटल्समध्ये कपल्स यातून जात आहेत. आणि त्यामुळे अनेक कथा कादंबर्या मुव्हीज टीव्ही शोज मध्ये ही सिच्युएशन येत असते. ही तुम्हाला सुचलेली ओरिजिनल सिच्युएशन असुन त्यावर तुमचा कॉपीराईट आहे असं तुम्हाला वाटतं हे खूप विनोदी आहे.
असो. काय ते स्टूपिंग लो आणि डायसेक्ट करायचं ते तुम्ही करा, आम्ही आपले वाचतो.
जगातले सगळेच्या सगळे अगणित
जगातले सगळेच्या सगळे अगणित "डॉक्युमेंटेड कॉमन ह्युमन experience" वाले विषय सोडून तुम्हाला डिलिवरी मधले कॉम्प्लिकेशन्स, बेबी गर्ल, गुलाबी रंगाचा रेफरंस..नवर्याची घालमेल, देवाचा रेफरंस.
एवढी स्पेसिफिकातील स्पेसिफिक कॉमनॅलिटी असलेल्या त्याच सर्धेतल्या दुसर्या कथेसारखी कथा लिहावी वाटली हे ठीक आहे, निव्वळ योगायोग म्हणून एकवेळ सोडून देऊ (अॅक्चुअली अॅमी ह्यांनी निकालाच्या धाग्यावर ह्या योगायोगाबद्दल आधीच सुतोवाच केले आहे) पण हा योगायोग बघणे आणि तो विचारात घेणे ह्यालाच होलिस्टिक रिव्यू करणे म्हणतात आणि संयोजक मंडळाला तो करता आलेला नाही... त्याबद्दल माझा आक्षेप आहे.
ह्या दोन्ही कथा काही सहा महिन्यांपासून दोन वेगळ्या शहरात तयारी करीत असलेल्या गृप्सनी बसवलेली नाटके नाहीत जी एकाच नाटक स्पर्धेत मंचावर आल्यावर कळाले की अरे ही तर दोन्ही एकाच स्टोरीलाईनवाली नाटके आहेत.
ही तुम्हाला सुचलेली ओरिजिनल सिच्युएशन असुन त्यावर तुमचा कॉपीराईट आहे असं तुम्हाला वाटतं हे खूप विनोदी आहे. >> मी कॉपीराईट वगैरे काही म्हणालो नाही. हा योगायोग विनोदी आहे की कसे ते तुम्ही आणि मी ठरवण्यापेक्षा वाचकांवर सोडून दिलेले बरे. त्यांना बरोबर कळते काय ओरिजिनल आहे आणि काय नाही.
असो. काय ते स्टूपिंग लो आणि डायसेक्ट करायचं ते तुम्ही करा, आम्ही आपले वाचतो. >> हे डायसेक्शन मला करायचे नव्हते, ते करतांना मला रिग्रेट वाटत होते. कुठलेही निकष न पाळता झालेल्या ह्या गलथान परिक्षणाबद्दलचा मुद्दा पटवण्यासाठी काहीसे ईरेला पेटल्याने हे करावे लागले म्हणून 'स्टुपिंग बीलो' म्हणालो, अँड आय स्टिल रिग्रेट मी डुईंग ईट.
हा कथांचा विषय अजून पुढे वाढू नये असे वाटते.
Pages