Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काल सन्सकृती कला दर्पण अ
काल सन्सकृती कला दर्पण अॅवार्ड लागल होत स्टार प्रवाहवर. मेघा घाडे कोळीगीतावर नाचली जयवन्त वाडकर आणि विजय पाटकराबरोबर. वैशाली माडेला आम्ही दोघी च्या गाण्यासाठी अॅवार्ड मिळाल. आस्ताद काळे आणि किशोरी शहाणेही आली होती. मानसी नाईक कोरसबरोबर स्टेजखाली नाचली तेव्हा किशोरीताई आणि वर्षा उसगावकर कोरसबरोबर नाचल्या.
नेहाने शिवला thank u म्हटलं
नेहाने शिवला thank u म्हटलं आहे. बिग बॉस मुळे तुझ्यासारखा मित्र मिळाला. शिव बरोबर फोटो टाकलेत.
हेच जर त्या दिवशी त्याला बोट दाखवण्यावरून बोलली नसतीस तर टीका झाली नसती. बाहेर आल्यावर नवऱ्याने समजावलं असेल चांगलंच. तसंही तिला फार प्रसिद्धी मिळत नाहीये बाहेर आल्यावर. सगळे शिव वीणाच्या मागे आहेत.
मला नचिकेत आणि नेहाची एकत्र मुलाखत बघायला आवडेल. एकट्या नेहाचा कंटाळा येईल.
https://www.youtube.com/watch?v=1iw-IncYIw4 खास नेहा fans साठी. तिची शितोळे family खूप मोठी आहे. तिथले गौरी गणपती.
Lalbaugcha Raja exclusive
Lalbaugcha Raja exclusive darshan with Shivani Surve: ( हा व्हिडिओ २०१६ चा आहे. तेव्हाही ही रागीट वाटते.)
https://www.youtube.com/watch?v=UeILsHGaXS0&t=9s
Shiv Thakre After winning bigboss marathi || 2019 updates ||:
https://www.youtube.com/watch?v=jOhP5amNOrw
Full Night enjoy with Shiv Thakre on Birthday SHIVEENA || 2019 Updates ||:
https://www.youtube.com/watch?v=R3WP9KwWAOo&t=168s
काल सह्याद्री दूरदर्शन
काल सह्याद्री दूरदर्शन वाहीनीवरील "गणेश वंदना" मध्ये आरतीला स्मिता गोंदकर होती ,छान दिसत होती.
खाली दिलेल्या लिन्कवर मस्त
खाली दिलेल्या लिन्कवर मस्त फोटो आहेत सदस्यान्चे. शिवानीचा ग्रुप आणि शिवचा ग्रुप ह्यान्चे सेपरेट फोटो आहेत.
https://www.indiaforums.com/forum/topic/5107329?pn=108&pc=151243787&pr=1
इथेच मला मेघा घाडेचा इन्टरव्ह्यू सापडला. सिझनच्या सुरुवातीला ती शिवानीची बाजू घ्यायची, आता मात्र तिला शिव आणि किशोरीताई आवडू लागले आहेत.:
https://www.youtube.com/watch?time_continue=1134&v=42XmLAZo0lc
मी पुर्ण इंटरव्युज नाही बघत
मी पुर्ण इंटरव्युज नाही बघत, पाच मिनिटांचे बघते. त्यात राहुल भोजला शिवने, त्याची आणि वीणाची कशी फ्रेंडशीप झाली, नातं कसं पुढे गेलं ते सांगितलं. खरं तर दोन्ही वेळेला तो कॅप्टन वीणामुळेच झाला. पहील्या वेळी ती समर्थक होती, तेव्हा झाला. ते तिने त्याचं समर्थन करणं बघून तो इंप्रेस्ड. दुसऱ्या वेळेचे त्याने नाही सांगितलं पण वीणा छान खेळलेली असून, त्याग केला शिवसाठी तिने
बाकी सध्या शिवानी जळून जळून खाक होत असेल. शिव मस्त खिल्ली उडवतोय सगळ्यांची, गेम मधून तुझा फोकस हललाय सांगत होते ना. मस्त त्याने सर्वांचे ह्या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडलं म्हणून तो आज जिंकला खरंतर. बाहेर आल्यावर तो म्हणे त्याचे आणि वीणाचेच व्हिडीओज बघत राहिला की बाहेर आम्हाला केवढा तुफान सपोर्ट होता.
मेघा वीणाला उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणालेली, त्याच उथळ पाण्याने तुला हरवलं task मध्ये आणि तेच उथळ पाणी तुझ्या खास फ्रेंडला मागे सारून पुढे गेलं गं, मग बोलती बंद, पण ती शिव वीणा लव angle बद्दल चांगलं बोलली होती की सगळीकडे राडा, खुन्नस ह्यात शिव वीणा bonding चांगलं वाटत होतं.
खरंतर मागच्यावर्षी आधी पुष्करपण आवडायचा मला, बरेच दिवस आवडत होता मग मात्र मनातून उतरला. सई कधीच आवडली नाही. मागच्यावर्षीची एक गोष्ट रिपीट म्हणजे सईने स्मितासाठी खड्डा खोदला आणि ती स्वत:च पडली तसंच सेम शिवानी वीणावर सतत जळत राहिली, तिच्यासाठी खड्डे खोदत राहिली आणि स्वत:च पडली.
अन्जु प्लस वन
अन्जु प्लस वन
आज महाराष्ट्र टाईम्ससच्या
आज महाराष्ट्र टाईम्ससच्या मुंबई टाईम्स मध्ये आर्थिक मंदीचा मराठी टीव्ही इंडस्ट्रीला फटका या बातमीमध्ये नुकत्याच संपलेल्या एका मोठ्या रिअँलिटी शोमधील एका कलाकाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितल आहे की शो संपून महिना झाला तरी त्या शोमधील बर्याच कलाकारांना अर्धे पेमेंट मिळायचे बाकी आहे.
आता हा शो म्हणजे बिबॉस असणार,हे नक्की आणि ज्या अर्थी महिना उलटून गेला तरी पूर्ण पेमेंट नाही मिळाल म्हणजे हे कलाकार जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या मध्यावर बाहेर पडलेले कलाकार असतील.
हिऔदी आणि मराठी या दोन्ही बिबॉस चे निर्माते इंडेमॉल असून हिंदीमध्ये करोडो रुपये सलमानला आणि मराठी कलाकारांपेक्षा कैक पटीने निश्चितच जास्त पेमेंट करणार्या इंडेमॉलला मराठी कलाकारांना त्यांचे हक्काचे पैसे देता येऊ नयेत,याच वाईट वाटत.
तसच इतरही मराठी चँनेलवर नव्याने सुरू होणार्या मालिकांना त्यांचे अपेक्षित मानधन न मिळत असल्याने त्यांना त्या मालिकांवर पाणी सोडाव लागत आहे.
पण हिंदीमध्ये एवढ वाईट चित्र दिसत नाही.
आणि या पार्श्वभूमीवर कलर्स मराठी कलर्स मराठी अँवॉर्ड घेऊन येत आहेत.
आणि या पार्श्वभूमीवर कलर्स
आणि या पार्श्वभूमीवर कलर्स मराठी कलर्स मराठी अँवॉर्ड घेऊन येत आहेत. >>> छान, आनंदी आनंद आहे. आधी ज्यांचे पेमेंट राहिलंय, त्याचं पूर्ण करा.
हे वरचं bb साठी असलं तर म मां खोटं बोलले, त्यांनी तर मोठा ढोल पिटून सांगितलं की यावेळेचा trp मागच्यावेळेच्या trp पेक्षा जास्त होता
नसणार हे वाटत होतं, जाहिराती कमी झाल्या आहेत ते दिसत होतं. आठ, दहा लाख कोणी घेतले नाहीत ते पण bb ला हुश्श झालं असेल, शिवानीवर भरोसा नव्हता म्हणून आधीच काढलं बाहेर तिला .
आज महाराष्ट्र टाईम्ससच्या
आज महाराष्ट्र टाईम्ससच्या मुंबई टाईम्स मध्ये आर्थिक मंदीचा मराठी टीव्ही इंडस्ट्रीला फटका या बातमीमध्ये नुकत्याच संपलेल्या एका मोठ्या रिअँलिटी शोमधील एका कलाकाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितल आहे की शो संपून महिना झाला तरी त्या शोमधील बर्याच कलाकारांना अर्धे पेमेंट मिळायचे बाकी आहे.
आता हा शो म्हणजे बिबॉस असणार,हे नक्की आणि ज्या अर्थी महिना उलटून गेला तरी पूर्ण पेमेंट नाही मिळाल म्हणजे हे कलाकार जुलैच्या शेवटच्या किंवा ऑगस्टच्या मध्यावर बाहेर पडलेले कलाकार असतील. >>>>>>> मी सुद्दा हे वाचलय , मलाही बिबॉच वाटलेल.
कलर्स मराठी कलर्स मराठी अँवॉर्ड घेऊन येत आहेत. >>>>>>> कशाला? सन्सकृती कलादर्पण आणि म.टा. देतात ना त्यान्ना अँवॉर्डस. काही नाही, त्यान्ना झीम अँवॉर्डसशी स्पर्धा करायची आहे.
ही किशोरी शहाणे काही थांबायच
ही किशोरी शहाणे काही थांबायच नाव घेत नाही.आता परत वीणाला मी खडसावल वगैरे चालू आहे.एवढ का लागल हिच्या मनाला टॉप 2 मध्ये नाही गेली तर.
अरे ,झिला तो गेम,सगळे लागले आपापल्या कामाला.पण किशोरीच्या मनातून बिबॉस गेलाच नाही,तर हिचच पुढे कठीण होऊन बसेल.
किशोरी अति करतेय, लोकं
किशोरीताई अति करतेय, लोकं निगेटीव्ह कमेंटस टाकतायेत, म्हणे वीणा तुला एक दोनदा बोलली नंतर नाही, ती तुझ्याबद्दल अनसीन अनकट मधे चांगलंच बोललीय, असंही लिहीलंय काहींनी, (म मां नी वीणाला झापल्यावर ती सुधारली बरीच, हे मी म्हणतेय). पण शिवानी कितीदा तरी बोलली तरी तू तिचं नाव घेत नाहीस. काहीही म्हणा शेवटचे तीन आठवडे जनमत वीणाच्या बाजूने गेलं होतं मात्र. त्यामुळे नेहा निसटत्या मताने दुसरी आली असणार हे नक्की. वीणाच्यात आणि तिच्यात फार फरक नसणार, वीणा दुसरी यावी असाच कल दिसला fb वर तरी.
शेवटी कधी नव्हे ते म मां ना पण तिचं कौतुक करायला लागलं आणि शिवानीला खालच्या सुरात का होईना, सुनवायला लागलं.
यु ट्युबवर लोकं ताईला तिच्या व्हिडीओखाली खूप सुनावतायेत. जे तुम्ही कमावलं, ते आता मुलाखतीत असं बोलून गमावताय, असंही म्हटलं आहे. .
किशोरीताईंची जी डंब रडेगिरी,
किशोरीताईंची जी डंब रडेगिरी, कुरकुर चालली आहे लुजर सारखी, त्यांना एकच म्हणावस वाटतं “ताई तू तर बोलुच नकोस”
आता वाट्तय बरं झालं पाचवी आली!
किशोरीताईंची जी डंब रडेगिरी,
किशोरीताईंची जी डंब रडेगिरी, कुरकुर चालली आहे लुजर सारखी, त्यांना एकच म्हणावस वाटतं “ताई तू तर बोलुच नकोस” >>> लय भारी डीजे.
नवरा, मुलगा, पराग यांनी तिला चढवले की काय तिला. ती म्हणत होती शिव आणि मी top 2 असू असं मला वाटत होतं. एकीकडे मी सतत nominate असते आणि danger zone मध्ये असते असं म मां ना शेवटच्या विकेंड डावात म्हणत होती मग अचानक top 2 असू असं हिला कधी वाटायला लागलं हा प्रश्न पडलाय मला. त्या शिवानीने चढवले तुम्ही जिंकायला हव्या आहात, त्यानंतर वाटलं की काय तिला. बाप्पाने पण चढवले होतं बहुतेक top 3 शिव नेहा आणि तुम्ही असं.
हिंदी bb त काय ज्यांच्यावर
हिंदी bb त काय ज्यांच्यावर आधीच गुन्हे आहेत, जामिनावर सुटलेत वगैरे असे काहीजण असतात का कम्पलसरी. आता दोन नावे दिसली करण ओबेरॉय आणि तो बालिका वधू मधला आनंदीचा दुसरा नवरा, तो तर सायको आहे म्हणतात, शिवानीसारखा असं वाचलं, सेटवर शिव्या देत असतो, नीट वागत नाही. दिसायला चांगला आहे, पण अभिनय so so होता, नाव विसरले.
करणबद्दल हल्लीच ऐकलं असं, पूर्वी कधी ऐकलं नव्हतं. स्वाभिमान करणची पहिली सिरीयल बहुतेक, तेव्हा बघितलेला आणि नंतर जस्सीचा bf म्हणून माहिती होता. जस्सी म्हणजे तिची भूमिका करणारी.
उतरणची रश्मी देसाईपण आहे, ती तेव्हा आवडायची मला. पण हिंदी शिव गेला तर बघेन voot वर. नाहीतर मी कलर्स हिंदी channel काढून टाकलंय.
मी अत्ता पुष्कळ आधीचे एपिसोड
मी अत्ता पुष्कळ आधीचे एपिसोड बघत होते, विणा शिव
च्या कॅप्टनसी साठी वोट अपिल करत होती सगळ्यांना कनव्हिन्स करत होती तो ेपिसोड. ५ वा दिवस. किती वेगळं पण छान वाटलं. बिचूकलेंनी नेहा साठी जी बडबड केली ती सगळी निरर्थक नव्हती, नंतर नेहा हरल्यावर तिने बिचूकलेंची शाळा घेतली तेव्हा बिचूकलेंनी जी उत्तरं दिली ती डोकेबाज होती.
मला विणा तेव्हा पण आवडत होती. मजा आली आधीचे एपिसोड बघून
मी अत्ता पुष्कळ आधीचे एपिसोड
रिपीट
Parag Kanhere CALLS Shiv
Parag Kanhere CALLS Shiv Veena Love Story TRUE :
https://www.youtube.com/watch?v=1vZ5J7Kaex4&t=14s
विचार करून गोष्टी करायला शिकले:
https://www.youtube.com/watch?v=YsC2WMsAwak&t=80s
अश्याप्रकारे नेहाने जपली सामाजिक बांधिलकी :
https://www.youtube.com/watch?v=cCAQpGS4Fr0
हो धनुडी, वीणा शिवसाठी जाम
हो धनुडी, मीही बघितला तो एपिसोड. वीणा शिवसाठी जाम लकी आहे, तिच्यामुळेच तो दोन वेळा कॅप्टन झाला. सगळे तिच्या नावाने खडे फोडत होते घरातले, ती तुझा गेम खराब करतेय, तुझा फोकस हलतोय, ती गैरफायदा घेतेय, सर्वांना शेवटी मस्त चपराक मिळाली.
म मां पण शेवटच्या विकेंडला बोलले त्याला की तू वीणाबद्दल वाईट बोलत होते सर्व, तेव्हा ऐकून कसं घेत होतास, तेव्हाच त्यांना खडसावून सांगायचं, तिच्याबद्दल बोलू नका अर्थात तो एका कानाने ऐकायचा, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा. तिला सर्व जाऊन सांगायचा, आधी वैशाली मग रुपाली आणि नंतर शिवानी यांनी जाम वीणाविरोधी कान भरायचा प्रयत्न केला. शिवानीने तर जाम छळ केला वीणाचा, रुपाली पण शेवटपर्यंत जळत राहिली. ,आता बाहेरही रुपाली शिवानी जळत असतील, शीव वीणा प्रेमात आहेत बघून, फक्त आरोह छान बोलला निदान बाहेर तरी की ज्येन्युईन प्रेम होतं त्यांचं आणि त्यांनी लग्न केलं तर आवडेल, मला बोलावलं तर मी जाईन.
शिव वीणा स्पेशल एपिसोड गणपतीबाप्पा आले त्यादिवशी दाखवलेला, तो मी नव्हता बघितला नेमका , त्यांनी voot वर पण नाही टाकला तो एपिसोड.
खरंतर पहिल्या विकमधेच एन्डची झलक होती, नेहा शिव मध्ये शिव सहज जिंकणार शेवटी आणि तो जिंकण्यासाठी वीणापण कारणीभूत ठरणार कारण नंतर रंगलेली शिव वीणा लव्हस्टोरी आणि त्याला अनेक प्रेक्षकांचा असलेला पाठिंबा, हे नक्कीच महत्वाचे ठरले शिवच्या विजयात.
पहिल्यांदा कॅप्टन नाही झाली तेव्हा नेहा किती तणतणत होती, बिचुकले यांनी साफ insult केला तिचा तोंडावर, आता हरली तर जाम मनातून तणतणत असणार पण दाखवू शकली नाही, शेवटच्या आठवड्यात आरोह शिवानीला सांगत नव्हती का मी आधी समजावलं शिवला, आता का समजावून सांगू, आता मला त्याचा फायदा होईल ना, आपण जिंकणार हे गृहीत धरून बसलेली, बाहेर आल्यावर वस्तुस्थिती समजली असेल तिला की voting मध्ये तीच काय कोणीच शिवच्या आसपास पोचू शकलं नाहीये. आता सांगतेय मी काही वाईट नाही, गेमसाठी सर्व केलं पण झुंज मराठमोळी मध्ये ही, मेघा, हेमलता बाणे, आरती सोलंकी, पराग हे सर्वच प्रचंड negative होते. मेघा bb त बरीच positive झाली होती मात्र.
विनायक गायकवाड, स्वप्नील राजशेखर, पॅडी कांबळे, दीप्ती देवी, मनीषा केळकर हे सर्व प्रचंड positive होते, मुलींपैकी मनीषा एकटी होती शेवटी पाचात. दीप्तीचा हात fracture झाला म्हणून तिला बाहेर पडावं लागलं.
आता ह्यापैकी कोण येतंय पुढच्या सिझनला, बघुया.
मूव्ह ऑन मंडळी.
मूव्ह ऑन मंडळी.
ज्यांना रियलिटी शोज आवडतात त्यांनी हिंदी बिग बॉसच्या स्वागताची तयारी सुरू करा. किं वा माशे ऑस्ट्रेलिया बघा.
खरं आहे भरत
खरं आहे भरत
मूव्ह ऑन मंडळी. >>> येस्स,
मूव्ह ऑन मंडळी. >>> येस्स, शुअर भरत.
के बि सी बघतेय सध्या दोन दिवस नेटवर. अमरावतीची बबिता ताडे करोडपती झाली, कसली सही आहे ती. सॉलिड खेळली. तो धागा आहे का, त्यावर लिहायला हवं. आधी पण एक झाला करोडपती पण ते नाही बघितलं अजून.
कुठे बघायला मिळेल तो
कुठे बघायला मिळेल तो करोडपतीचा भाग. दीड हजार महिना पगार आणि खिचडी बनवणारी बाई आहे असं वाचलं काल एफबीवर. किती आणि कशी तयारी केली असेल तिने, एकंदरीत तिचं वाचन आणि आकलनशक्ती अफाट असणार, कमाल आहे. कोणाच्या व्यवसायावरून जज करू नये हेच खरं.
सोनी च्या app वर मिळेल पहायला
सोनी च्या app वर मिळेल पहायला, तिने 7 करोड चं उत्तर पण बरोबर दिलं होतं पण त्या आधी गेम सोडला तिने.. खूपच सुंदर खेळली ती, आणि एवढं जिंकून पण म्हणाली की फक्त मोबाईल माझा आहे बाकी सगळं फॅमिली साठी
मी Sony LIV वर बघितले ते दोन
मी Sony LIV वर बघितले ते दोन एपिसोडस, चंपा. मी desktop वर बघते. मोबाईलवर नाही.
त्या बबिताताई अतिशय साध्यासुध्या पण भन्नाट हुशार आहेत, हसतमुख आहेत. त्या पदवीधर आहेत, त्यांना mpsc exam द्यायची होती पण जमलं नाही. त्यांचं वाचन खूप आहे आणि अपडेट राहतात. सिरियल्स वगैरे बघत नाहीत, news channels बघतात. रोजचे खूप पेपर वाचतात तसेच परीक्षा द्यायची होती competative म्हणून खूप वाचन केलेलं पूर्वी. ते सर्व आठवत होतं त्यांना. ग्रेट, hats off. सात करोडचं उत्तर पण माहिती होतं त्यांना पण रिस्क नाही घेतली आणि एक मुलगा जाम desperate होता, तो निवडला जावा, अजून पंधरा मिनिटं होती असं मुलाखतीत म्हणाल्या. तो मुलगा खरंच निवडला गेला, तो पण फार गरीब आहे. तो किती पुढे जातो ते बघूया पण जायला हवा तोही.
समहाऊ नोकरी नसेल मिळाली एवढं शिकून, त्यामुळे त्यांचे husband ज्या शाळेत प्यून आहेत तिथेच त्या खिचडी करतात.
काल एका मराठी न्यूज चँनेलवर
काल एका मराठी न्यूज चँनेलवर बबिता ताडेंची मुलाखत चालू होती. एबीपी माझा बहुतेक...
पहिला करोडपती हरवषवर्धन
पहिला करोडपती हरवषवर्धन नवाथेने बबितांबद्दल केलेलं ट्वीट पाहिलं. जिंकला तेव्हा तोही स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता.
' सातारचा सलमान' सिनेमात
' सातारचा सलमान' सिनेमात शिवानी सुर्वे थन्डाक्का उर्फ सायली सन्जीवसोबत दिसणार आहे. सुयोग गोऱ्हे ( मानबाच्या शनायाचा सिरियलमधला एक्सबॉफ्रे कुणाल) नायक आहे. हा सिनेमाचा फर्स्ट लूकः
https://www.youtube.com/watch?v=8_e0XU_hFlw
सायली सन्जीव स्पष्टवक्ती आहे अस म. टा. मध्ये वाचल होत. सेटवर या दोघीन्च चान्गलच वाजत असणार.
TRIPLE SEAT - OFFICIAL TEASER:
https://www.youtube.com/watch?v=ryTbcEgKSto
हिंदी बिग बॉस सुरू होतोय
हिंदी बिग बॉस सुरू होतोय त्याचा धागा काढा कोणीतरी
हिंदी बिग बॉस सुरू होतोय
हिंदी बिग बॉस सुरू होतोय त्याचा धागा काढा कोणीतरी >>>>>>>> हा घ्या धागा, बोकलत:
https://www.maayboli.com/node/71779
Pages