Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04
रात्रीक ख्योळ चालल्यान
आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
.
आण्णा - हरी नाईक
माई - इंदु हरी नाईक
छाया - छाया हरी नाईक
माधव - माधव हरी नाईक
दत्ता - दत्ता हरी नाईक
सरिता - सरिता दत्ता नाईक
पांडु
वच्छी - वत्सलाबाई
भिवरी
शेवंता - पाटणकरीण
पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खऱ्या मालवणी भाषिकाला
खऱ्या मालवणी भाषिकाला त्याच्या भाषेची अशी चिरफाड नाही सोसत. >> माका कळता हो तुमचो संताप.. पण माका मालवणी लिवुक-बोलुक शिकुची असां.. मगे तुमी माका मदत करुक व्हया ना..? करतांव ना मदत..??
अण्णोबांच्या मिशीत कुठे कुठे
अण्णोबांच्या मिशीत कुठे कुठे तुरळक पांढरे केस दिसतात. टक्कल तर काय दिसनां झालयं. सकाळी सकाळी अण्णा टाकुन हेलपाटत, भेलकांडत भोवर्यागत गरगरत निघाले की मला भिती वाटते की ना जाणो असे गरगरत ते जर ( अण्णा हो ) रस्त्याने जातांना कडेला झोपलेल्या कुत्र्या मांजरांवर धडपडले तर त्या बिचार्या कोमल जीवांचे काय होईल?
(No subject)
@ रश्मी वयनी, आण्णाने भिवरी,
@ रश्मी वयनी, आण्णाने भिवरी, काशी आणि कुणाकुणाला टपकवले आहे तिथे कुत्र्या-मांजरांसारख्या कोमल जीवांचे काय घेऊन बसलात..!
(No subject)
काल मात्र पाटणाकरीण आण्णा
काल मात्र पाटणकरीण आण्णा पासुन मनाने दूर झाली. आता आण्णा तिला टपकवणार.
राखेचा-२ च्या पहिल्या भागातला सस्पेंस उलगडला असे वाटत आहे.. आण्णाचे मरण बहुतेक शोभाहस्ते झाले असणार असे मला आता वाटु लागले आहे..!
रश्मी
रश्मी
आता आण्णा तिला टपकवणार.>> कसे
आता आण्णा तिला टपकवणार.>> कसे> तिने तर झाडाला लटकावून जीव दिला ना? साडी, गळा भर दागिने मळवट. पहिले आण्णा बदनामी कर णार बहुतेक. कारण शेवंता नाव त्यांचे प्रायवेट होते पण पहिल्या भागात तर शेवंता सर्व गावाला माहिती आहे. बदनामीने दु:खी होउन पाटणकराने सुसाई ड केली असेल.
काही स्टॉक प्रतिक्रिया.
सरिता: कोणी पण अगदी हिटलर आला तरी वाइच चाय पिताव का? गरम करुन आणतंय.
दत्ता भावः हाणा मारा त्याला.
रघु काका: ह्या भयंकर आसा. घरातल्यांना धोका आसां
नीलिमा: मा झा नाही विश्वास.
पांडू: तां माका काय म्हाइत.
माई: काही झाले तरी गे बाय माझे कपाळाला हात लावून जमिनीवर बसून रडायला घेणे.
छाया: मला कोणी काही सांगतच नाही.
आर्चिसः ममा ममा
सुसल्या: माका आयचे दागिने हवंत.
माधवः हो हो.
नेने वकीलः मी घरचाच आहे( सर्व माझेच आहे)
आण्णा: चल नीघ.
देविका: ऑपण लॉग्न कधी कर्रायच्च्च्चं
अभिरामः बटाटे डोळे करून बघायचे एक मिनिट. बस्स.
गणेशः घराबाहेर निघून जाणे डोळे वटारून.
पूर्वा: भात लावते.
@ अमा :
@ अमा :
माई: काही झाले तरी गे माय हे काय कपाळाला हात लावून जमिनीवर बसून रडायला घेणे.>> गे माय नाय गो.. गे बाय माजे...
>>आण्णाचे मरण बहुतेक
>>आण्णाचे मरण बहुतेक शोभाहस्ते झाले असणार असे मला आता वाटु लागले आहे
ह्या सीझनच्या पहिल्या भागात मरायच्या आधी आण्णांना जेव्हढी भूतं दिसतात त्यात काशीसोबत शोभाही असते असं मला वाटतंय. तसं असेल तर आण्णा शोभाला टपकवणार.
>>तिने तर झाडाला लटकावून जीव दिला ना?
ते झाड फार उंच दिसतं. पाटणकरणीने किमान दोन थरांची दहीहंडी लावली तरच तिला जीव देता येईल.
आण्णा बदनामी कर णार बहुतेक.
आण्णा बदनामी कर णार बहुतेक. कारण शेवंता नाव त्यांचे प्रायवेट होते पण पहिल्या भागात तर शेवंता सर्व गावाला माहिती आहे. >>>> हे पुण्यकर्म बहुतेक वच्छी-शोभा सासू-सून करतील. शोभाला पाटणकरांच्या घराची चावी मिळाली आहे आता.
मधले भाग मिसले. नाना गेले काय
मधले भाग मिसले. नाना गेले काय ? दिसत नाही आताशा...
नाना गेले काय ? >>> अहो
नाना गेले काय ? >>> अहो दुसऱ्या भागातल्या बेरी नानांना विसरलात का ?
रश्मी आणि स्वप्ना तुमच्या
रश्मी आणि स्वप्ना तुमच्या comments वाचायला जाम आवडतात.
मधले भाग मिसले. नाना गेले काय
मधले भाग मिसले. नाना गेले काय ? दिसत नाही आताशा...>> आहेत आहेत.. मला पण त्यांची खुप आठवण येत होती..अचानक गायब कसे झाले म्हणुन.. नानांचं कलम-बिलम तर नाही ना लागलं अशी अनामीक हुरहुर लागली होती.. पण ३ दिवसांपुर्वीच्या भागात अचानक दिसले.. नाना त्यांच्या खोलीत झोपलेले होते आणि इकडे दिवाणखान्यात आण्णाने तमाशा सुरु केला होता.. माई, छाया, दत्ता, सरिता आणि पांडुला हाताला धरुन त्यांनी घराबाहेर काढुन आतुन कडी लावली आणि अचानक त्यांच्या लक्षात आले की नाना घरातच राहिले.. म्हणुन पेताड आण्णा नानांच्या खोलीत जाऊन त्यांना पण दम भरुन आला..
मला अजुनही आठवते.. राखेचा२ चा पहिला भाग झाला तेव्हा अभिरामाच्या लग्नात पण नाना होते... अगदी आण्णा मरायच्या आधी त्यांनी काहीतरी भाकीत केलेलं होतं.
माई, छाया, दत्ता, सरिता आणि
माई, छाया, दत्ता, सरिता आणि पांडुला हाताला धरुन त्यांनी घराबाहेर काढुन आतुन कडी लावली आणि अचानक त्यांच्या लक्षात आले की नाना घरातच राहिले.. म्हणुन पेताड आण्णा नानांच्या खोलीत जाऊन त्यांना पण दम भरुन आला..>>>>>>
थॅन्क्यु पिंटी
थॅन्क्यु पिंटी
स्वप्ना खरे तर पाटणकरणी ने
स्वप्ना खरे तर पाटणकरणी ने आधी जेव्हा धमकी दिली होती तेव्हा ती आत्महत्या करेल असे वाटले होते पण जाम ट्विस्ट आला कथेत.
व्हय गो रश्मी वयनी, वच्छी
व्हय तर रश्मी वयनी, वच्छी आता काय गप रवाची नाय. तां आण्णा+पाटणकरणीचो झेंगाट समद्या गावात दवंडी देऊन पसरवतां का नाय त्ये बघत रवा..!
शोभा पन दिसतां तेवडां सुक्का बोंबील नाय हा... तिच्या अंगात बारा हत्तीचो बळ असां.. आता आण्णाक कवा लोळवतां तां बघुक व्हया..!
धन्स DJ
धन्स DJ
काल पाटणकर्+पाटणकरणीचा
काल पाटणकर्+पाटणकरणीचा लग्नाचा वाढदिवस व्हईत. पाटणकरणीन तिच्या घोवाक पिवळ्या रंगाचो कुर्ता घेतल्यानी हे आण्णाक बघवला नसात. त्याने चोंगट्याक सांगुन पाटणकरणीक भेट म्हणुन टी.वी. आणुन दिल्यानी. पण पाटणकरणीक ती भेट पटणां नाय आणि तीने तां टी.वी. घेतलां नाय. ह्या समदा सहन व्हईत तो आण्णा कसला.. आण्णान तां टी.वी. चोंगट्याचो डोक्यावर ठेवान परत नेतालां. चोंगट्या आण्णाक म्हणतलो कां तां टी.वी. त्याच्या घरात ठेवतंला पण आण्णाक काय ह्ये पटणां नाय.. आण्णान त्याक तां टी.वी. जमीनीवर ठेवाक लावल्यान आन एक मोठा दगड त्यावर घालुन फोडुन टाकल्यान..!
त्या ठोकळीचे आणि माधवचे लग्न
त्या ठोकळीचे आणि माधवचे लग्न झाले का?
तिच कलाकार आहे जी एकदम ठोकळा अभिनय करायची.
त्या ठोकळीचे आणि माधवचे लग्न
त्या ठोकळीचे आणि माधवचे लग्न झाले का?>> लग्न झालां.. आबा अन वच्छी लग्नांक जाउन ईलंय पण माधवानो जिच्याशी लगीन केला तां कोण हे काय कोणाक कळळा नाय..!
विक्रम नेहमीप्रमाणे स्मशानात
विक्रम नेहमीप्रमाणे स्मशानात गेला. तिथलं प्रेत उचलून त्याने खांद्यावर टाकलं आणि चालू लागला. पण बरंच अंतर कापलं तरी वेताळ काही बोलेना तेव्हा विक्रमला आश्चर्य वाटलं.
'काय आज मौनव्रत वाटतं?'
'नाही, तसं नाही'
'का टीव्हीवरची चर्चासत्रं ऐकून बोलायचा वीट आलाय?'
'नाही बाबा. मी वेबसिरिज बघतो फक्त'
'अरे मग बोलत का नाहियेस?'
'त्याचं काय आहे.....परवा एका मुंजाच्या घरी गेलो होतो. तो आणि त्याची बायको राखेचा सिझन २चा एपिसोड पहात होते. तो संपतोवर काही जेवायला मिळायची आशा नव्हती. म्हणून बसलो बापडा बघत. सीझन १ पाहिला होता. सीझन २ उत्साहाने पहायला ही घेतला होता. पण पांडोबाने कथेत एव्हढ्या कोलांट्या खाल्ल्यात ना की 'पांडगो इलो रे बा इलो' म्हटलं की माझ्या पोटात धस्स होतंय. म्हणून सलग बघायचं सोडलं होतं. मधूनमधून काही एपिसोड बघतो कथा इंटरेस्टींग झालेय असं वाटलं तर'
'पण त्याचा तुझ्या न बोलण्याशी काय संबंध?'
'सांगतो. खरं तर तो एपिसोड बघून मला खूप प्रश्न पडले.
प्रश्न १. ज्या औषधावरून एव्हढं महाभारत रामायण झालं त्याचा जो उपयोग व्हायचा होता तो झाला की नाही?
प्रश्न २. पाटणकरांचा घुंगरू बांधून शास्त्रीयनृत्य करायलाही विरोध. आणि बायकोने स्लिव्हलेस घातलेलं कसं चालतंय?
प्रश्न ३. अण्णा घरात येऊ नयेत म्हणून पाटणकरीन नवर्याला बाहेरून कुलूप लावायला सांगते. मग त्याच्या घरात पातोळ्या शिकायला जायचं निमित्त करून जाऊन कशाला चोंबडेपणाने चहा द्यायला जाते? त्या मायबोली साईट वर विचारलं असतं तर काय कोणी तिला पातोळ्यांची कृती सांगितली नसती??
प्रश्न ४. अण्णापासून सुटका मिळवायची तर पाटणकरला बदली करून घ्याय्ला सांगायची ना. का हे सगळं 'अग अग म्हशी' सारखं चाललंय?
प्रश्न ५. शोभाने अण्णाच्या घरात चोरलेल्या पेटीचं काय झालं? मर्डर मिस्ट्रीमध्ये लाश गायब होते तशी पेटी गायब झाली.
प्रश्न ६. शोभाने पैसे आणि दागिने चोरलेत हे पाटणकर बाईंच्या लक्षात कसं आलं नाही? नाहीतर एव्हढी शेखी मिरवत असते की.
प्रश्न ७. सगळी वृत्तपत्रं आण्णा आणि शेवंताच्या प्रेम कहाणीचा उल्लेख काय करतात मूर्खासारखी? आण्णाचं प्रेम नाहिये तिच्यावर. बाकी स्त्रियांसारखाच तो तिचा वापर करतोय. आणि पाटणकरणीने बदल्यात पैसे आणि दागिने घेतलेत त्याच्याकडून वट्ट मोजून. कसलं डोंबलाचं प्रेम??? पांडू काय डोक्यावर पडला का शूटींगदरम्यान?'
वेताळाचा त्रागा पाहून विक्रमची हसता हसता पुरेवाट झाली.
'अरे आहेत की एव्हढे प्रश्न तुझ्याकडे. मग गप्प का होतास?'
'माझ्याकडे प्रश्न आहेत रे. पण त्या पांडग्याकडे नाहीत उत्तरं मग तुझ्याकडे कुठून येणार? त्यापेक्षा गपगुमान बसून राहिलेलं काय वाईट. मला त्या पलिकडल्या चिंचेच्या झाडापर्यंत तेव्हढा नेऊन सोड. आजकाल जमिनीवर खड्डे झालेत त्यामुळे ज्यांना चालता येतंय अशीही भुतं उडतच जातात. एयर ट्रॅफिक जाम वाढलाय. इथे मेट्रो कधी आणतात पाहू.' वेताळ एक उसासा टाकत म्हणाला.
विक्रमने मान हलवली आणि समोरचे खड्डे चुकवत अंधारातून चालू लागला.
धन्यवाद pintee
धन्यवाद pintee
स्वप्ना रान
स्वप्ना राज
स्वप्ना
स्वप्ना
अले कुथे आहात ले तुमी सगले? च्यला पतापता इकले युन बगा ना आमचे फोतो.
https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1974122/have-you-s...
स्वप्नाच्या प्रश्नांची उत्तरे नंतर.
आज पाटणकरीण अन आण्णाचो बिंग
आज पाटणकरीण अन आण्णाचो बिंग फुटतां की काय..? तरी शोभान वच्छीक बजावलां व्हतां.. सोन्याचो अंडो देणारी कोंबडी कापुची नाय.. रोज एक सोन्याचो अंडो मिळवुक व्हया. पन वच्छीक डोक्याचो भाग जरा कमीच असा.. वाड्यार जाउन माईक तिका घोवाचो पराक्रम ऐकवल्यान..!
वच्छीच्या बोलण्याक भुलताल ता माई कसला..! तिने शोभाक साक्ष देऊक उभा केल्यान.. आता शोभा काय साक्ष देतंय त्यावर आज काय तां साक्ष-मोक्ष लागुक व्हया..!
शोभा हुशार आसा. सासुलाच
शोभा हुशार आसा. सासुलाच तोंडावर पाडील. चक्क पोलीस स्टेशनात खोटं बोलली ती बया. साशिक घाबरील होय. तिला अण्णाकडून भरपूर पैसे मिळूचे हा
@DJ आम्ही आकेरी गावात जाऊन
@DJ आम्ही आकेरी गावात जाऊन शूटिंग बघून आलो मे मध्ये. गोव्याहून येताना. अण्णा, माई, पांडू, शोभा, माधव दिसले.
-अण्णानी लांबूनच टाटा केला...खूप हँडसम आहे अण्णा.
-माई आणि माधव ला आम्ही हाका मारत होतो पण त्यांनी ढुंकूनही बघीतले नाही.
-शोभा भयंकर शिष्ट आहे..धड बोलली नाही वर उपकार केल्याचे भाव चेहर्यावर.
-पांडू सगळ्यांशी बोलला, फोटो काढू दिले.
कॅमेरा अँगल मुळे वाडा मोठा दिसतो, प्रत्यक्षात लहान दिसतो.
आजूबाजूला असलेल्या तार कंपाऊंडमुळे कोणालाही पुढे जाता येत नाही.
आमच घरदार वेडं आहे ह्या सिरीयल साठी.
Pages