Submitted by स्पर्शा on 6 September, 2019 - 10:12
स्स... आईग्ग.... त्याला आपल मरण जवळ आल्याची जाणीव झाली ... कळून चुकल होत त्याला की हा माणूस आपल्याला आता सोडणार नाही... तरीही त्याचे जिवंत रहाण्याची धडपड चालूच होती... त्याने आपले प्रयत्न सोडले नव्हते... एवढ्या उष्णतेत त्याचा अंगाची लाही लाही होत होती...जळजळत होत त्याच अंग.. तरीही अत्याचारातन सुटण्यासाठी तो अधिकाधिक उंच उड्या मारून त्या खोलीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता.. पण काही केल्या त्याला ते जमेचना... हळूहळू त्याची सुटून जाण्याची धडपड संथ होत गेली आणि सरतेशेवटी त्याने श्वास सोडला...त्याच्या शरीराचे हाल पाहून सुनीलचा आत्मा सुखावला... निर्दयीपणे त्यावर त्याने दोन्ही बाजूंनी चटणी ओतली आणि शांतपणे बसून वडापावच्या स्वर्गीय सुखाचा आनंद घेतला...
-- स्पर्शा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरदस्त! एका वडापावची कहाणी!
जबरदस्त!
एका वडापावची कहाणी!
भारीये!!
भारीये!!
वडापाव अत्यंत प्रिय, पण
वडापाव अत्यंत प्रिय, पण त्याचा मर्डर काही पचला नाही,
नाही आवडली कथा
Thanks for reply
Thanks for reply
छे नाही आवडली!!
छे नाही आवडली!!
कथा आवडली
कथा आवडली
(पण शीर्षक वेगळं हवं होतं का )
अरे वरे, छान.
अरे वरे, छान.
आता मॅगीची येवु द्या
आता मॅगीची येवु द्या