___________
शब्द गुंफले ओळींमध्ये, अर्थ तयांचे कैक हजार
रदिफ़ काफिया गणिते जुळता, एक शायरी झाली तयार
तर स्पर्धा आहे गझल लिहिण्याची.
अत्यंत सोप्पे नियम खालीलप्रमाणे:
- मराठी, पुर्णत: स्वयंलिखित गझलच पाठवावी.
- पूर्वप्रकाशित गझल नसावी.
चातकरूपी रसिक मने, गझलांचा पाऊस पाडा हो!
हृदयसागरी मंथन करुनी अमृत शब्दी जोडा हो!
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्या :
१. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य-नोंदणीकरता २ सप्टेंबर ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
२. 'मायबोली गणेशोत्सव २०१९' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्या 'मायबोली गणेशोत्सव २०१९' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
३. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१९ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
४. प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे - {स्पर्धेचं नाव} - {प्रवेशिकेचं नाव} - {तुमचा आयडी}
५. प्रवेशिका ०२ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०१९ या वेळेत पाठवता येतील.
अरे वा! धागा दिसला. प्रॉब्लेम
अरे वा! धागा दिसला. प्रॉब्लेम सोडवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद संयोजक.
पण हे काय? स्पर्धा तर सगळी बदलूनच टाकली की तुम्ही? आधी स्पर्धेचे नियम डीटेलमध्ये दिले होते ते सुद्धा दिसत नाहीयेत.
माझा पहिला प्रतिसाद कुठे गेला? गझलेच्या बाराखडीची लिंक का काढून टाकली? किती ऊपयोगी होती ती आमच्या सारख्या नवख्यांसाठी?
म्हणजे आता ही स्पर्धा ज्यांना ऑलरेडी गझल लिहिता येते त्यांच्यासाठीच एक्स्लुझिव केली म्हणायची का? पुर्वीची स्पर्धा सगळ्या हौश्यानवश्यागवश्यांसाठी होती ना?
असा कसा मधूनच स्पर्धेचा धागा गायब होतो...प्रश्न विचारल्यावर संयोजक ऊत्तरे द्यायचे टाळतात... प्रतिसाद गायब करतात...अचानक स्पर्धा बदलली जाते .. नियम बदलले जातात.. अरे काय चाललंय काय?
ही स्पर्धा आहे, तर स्पर्धेचा
ही स्पर्धा आहे, तर स्पर्धेचा निकाल कसा ठरवला जाईल? परीक्षक कोण असणार आहेत?
ही स्पर्धा अजूनही गणेशोत्सोव
ही स्पर्धा अजूनही गणेशोत्सोव २०१९ कार्यक्रमात अंतर्भूत आहे का?
कार्यक्रमाच्या मुख्य पानावरून दुवा काढून टाकलेला आहे.
ईच्छुक स्पर्धकांनी गझल लिहायची की नाही?
स्पर्धेचे परीक्षण कसे केले जाणार आहे?
ड्यु आयडीने गझलेत किती कडवी
ड्यु आयडीने गझलेत किती कडवी हवीत ते विचारा. तरच कदाचित उत्तर मिळेल.
मी नियम सांगू का?
मी नियम सांगू का?
१. मायबोलीवर ज्यांना असं वाटतं, की गझला आम्हालाच जमतात, त्यांच्यासाठीच ही स्पर्धा आहे.
२. गझल अनाकलनीयच असावी, साधी सोपी सरळ गझल चालणार नाही.
३. गझलेच टायटल कमीत कमी पाच शब्दांच असावं, त्याशिवाय गझल ग्राह्य धरली जाणार नाही.
उदा.
अ.विहिरीत उडी मारूनही राहिले कोरडी मी
ब. डोकं फोडून घेतलंस सख्या राहिले बावळट मी
क. हळूहळू पळतो मी, मागे कुत्रा लाव एखादा
ड. उडून गेलो मी बारीक वजनदार तू राहिलीस वादळात
इ. तो जगून कोठे गेला, सखुबाईच्या कोठ्यावरती?
फ. तहान भागवणारा गुत्ता शोध एखादा
४. गझलेत नजर, वादळ, सख्या, हे झालं, ते राहिलं असं काहीतरी यायलाच पाहिजे.
५. गझलेत मागणी किंवा तक्रार हवीच कुणाविषयी, आणि त्यावेळी मी किती चांगला/चांगली किंवा त्याच्यासाठी/तिच्यासाठी कित्ती कित्ती केलं हे लिहिलं पाहिजे.
६. गझल दुःखीच असावी, आनंदी असली, तर काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात येईल.
७. क्रियापदे मुद्दाम आधीच घ्यावीत, जर शेवटी लावलीत तर, हर! हर!
उदा.
विहिरीत उडी मारूनही कोरडी मी राहीले×××××
विहिरीत उडी मारूनही राहिले कोरडी मी√√√√
८. गझल लिहिताना स्त्रियांनी साडी आणि पुरुषांनी कुर्ता घालणे अनिवार्य.
९. कंपूतल्याच गझलेला दाद द्यावी, इतर गझलांना दाद दिल्यास फाऊल.
१०. जगात सगळंच किती वाईट, किंवा सगळ्यांनी आम्हालाच किती वाईट वागणूक दिली, अथवा कुणी किती फसवलं, किंवा गेलाबाजार प्रेमभंग यावरच गजल कराव्यात.
हुश्श!!!!
श्वेताताई
श्वेताताई
महाश्वेता! You nailed it!!!!
महाश्वेता! You nailed it!!!!
किती ते अचूक निरीक्षण!
संयोजकांनी त्यांच्याच ह्या
संयोजकांनी त्यांच्याच ह्या गझल स्पर्धेला पहिल्या दिवसापासून वाळीत का टाकलंय काही कळत नाही. ही स्पर्धा सोडून बाकी एकूण एक स्पर्धेला मुदतवाढ देऊन झाली.
मागच्या वीकेंडला निदान प्रयत्न तरी करून पाहू म्हणून गझल करण्यासाठी खास वेळ राखून ठेवला होता. पण मुळात ही स्पर्धा गणेशोत्सोवाचा भाग आहे की नाही ते सुद्धा वेळेत स्पष्ट करण्याची तसदी न घेतल्याने सगळा मूड गेला. संयोजकांच्या ह्या आडमुठ्या धोरणामुळे एवढ्या दिवसात एकही गझलकार ह्या स्पर्धेकडे फिरकला नाही. गझलकारांनी गुलमोहरात गझल लिहिल्या पण ईथे स्पर्धेसाठी दिल्या नाहीत.
हे संयोजकांच्या पथ्यावरच पडले वाटते कारण गझल आल्या नाहीत तर परिक्षण कोण आणि कसे करणार त्याची योजना ठरवण्याची व सांगण्याची गरजच नाही.
का नकोशी झाली असेल ही स्पर्धा संयोजकांना पहिल्या दिवसापासून?
कदाचित संयोजकाना गज़ल
कदाचित संयोजकाना गज़ल परीक्षणाचा अनुभव नसेल.
मी तरीही माझी एक एन्ट्री
मी तरीही माझी एक एन्ट्री टाकलीय स्पर्धेत, स्पर्धा सुनी नको जायला म्हणून.
मुळात इथेच २ ३च गझलकार असताना खास त्यांच्यासाठी स्पर्धा घेण्याचं प्रयोजन समजलं नाही.
आणि आता त्यांनीच पाठ फिरवल्यावर तोंडघशी पडण्याची वेळ आलेली दिसते.