सोळा आण्याच्या गोष्टी- निसर्ग - बिपिन सांगळे

Submitted by बिपिनसांगळे on 10 September, 2019 - 09:26

प्रसन्न सकाळ आहे. हवाही आल्हाददायक. बोराच्या झाडावर साळुंक्या बसल्या आहेत. त्या जोडीचा किलबिलाट चालू आहे . पलीकडच्या झुडपांवर छोटी पिवळी फुलपाखरं उडत आहेत. मध्येच हवेची झुळूक येतीये . पानं डोलत आहेत. झाडावर सरडा कळून येत नाहीये. दिवस पावसाचे पण पाऊस नाहीये.
मलाही छान वाटतंय !
चहाच्या टपरीपाशी पोरापोरींची गर्दी आहे. ती पोरं मजेत चहा पितात आणि कटिंग चायवाले छोटे थर्माकोलचे कप वाढलेल्या झुडपांमध्ये फेकतात .
माणूस निसर्गाचा असा नाश का करतो ?
पण- अशाच एका कपामध्ये माती भरलीये…
त्यामध्येच मी उगवलोय .आता मी लहान आहे ; पण उद्या मी त्या कपापेक्षा उंच होणारच आहे .त्याच्या कडेवरून बाहेर डोकावणार आहे .
त्याला दाखवणार आहे- निसर्ग सगळ्यांपेक्षा मोठाच आहे !

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.

छान

उच्च ! एक नंबर !

बिपीन सांगळे तुम्ही खूप छान लिहिता. हे सुचतच कसं?

उच्च ! एक नंबर !

बिपीन सांगळे तुम्ही खूप छान लिहिता. हे सुचतच कसं?

Submitted by मीरा.. on 11 September, 2019 - 08:43

नम्र स्वीकार आहे .