सोळा आण्याच्या गोष्टी - 'पत्ते' - हायझेनबर्ग

Submitted by हायझेनबर्ग on 8 September, 2019 - 14:20

पूर्वसुचना:- एवढ्यातच माझ्या एका कथेवर ओरिजिनल नसल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. त्यावरून ही कथा ओरिजिनल आहे असा दावा मी करू शकत नाही. कथेवर कोणाही वाचकाचा आक्षेप असल्यास प्रतिसादात नि:संकोच कळावावा.
तोवर माझी ह्या कथेमागची प्रेरणा ईथे नोंदवून ठेवतो. त्याच्याशी वा ईतर कुठल्याही साहित्याशी आक्षेपार्ह साम्यस्थळं वाचकांना जाणवल्यास मी आनंदाने जबाबदारी स्वीकारण्यास कटिबद्ध आहे.

कळावे लोभ असावा.
---------------------------------------------------------------------------------

मोतीबिंदू झाल्यापासून म्हातारा तोंडाने विक्षिप्त बडबडत आणि हातांनी चोपन्नं पत्ते पिसत वाड्यातल्या पलंगावर पडून राही. अशात शहरातून म्हातार्‍याची दोन्ही मुलं मृत्यूपत्रासाठी पोराबाळांसाहित वाड्यावर ऊतरली.
दोन मुलं आणि दोन मुली, म्हातार्‍याच्या शाळकरी नातवंडांची चौकडी विक्षिप्त बडबड ऐकून फिदीफिदी हसे.
एकदा चौकडी म्हातार्‍याजवळ जाऊन म्हणाली,

आजोबा मी कोण?
तू बेट्या ईस्पिकचा राजा! पाताळयंत्री!
मी आजोबा?
तू बदामची राणी! लालची!
मी?
तू चौकटचा राजा! अहंकारी!
आजोबा मी?
तू किलवरची राणी! कारस्थानी!
चौकडी फिदीफिदी हसली.

आणि मी मोठे-मालक?
तुम्ही? जोकर!

चौकडी पुन्हा फसफसली.

बेटेहो! ते हुशार, बहुरूपी! राजा-राणी भिकारी!

***********************************************************************************************************************

संध्याकाळी विहिरित एक शाळकरी प्रेत तरंगतांना सापडले. दोन जिवंत शाळकरी डोळे आईला बिलगून चौकडीकडे त्वेषाने बघत होते.

-------------------------------------------------------------------------------------------------------------
टीपः- संयोजकांनी कथेचे परिक्षण करणे मान्य नसल्याने जोवर सालाबादप्रमाणे लोकशाही पद्धतीने मतदान होत नाही तोवर कृपया ही कथा स्पर्धेतून बाद समजावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणजे नोकराच्या मुलाने मालकाच्या नातवाला मारले का. दोघेही शाळकरी आहेत पण जोकर म्हटल्याचा त्याला राग आला.

पत्ते 52 नाही तर 54 आहेत. म्हणजे दोन जोकर आहेत. ते बहुरूपी म्हणजे जोकर बद्दल बोलत आहेत कारण ते इतर कुठल्याही पत्त्याला रिप्लेस करू शकतात.
चौडकी म्हणजे ती चार मुलं न्हवे तर पत्त्यातील चार पाने.
म्हातारा ब.रा., ई.रा. इत्यादी आपल्या दोन मुलं आणि दोन सुनांना म्हणतोय. पत्त्याय 4 राण्या आणि चार राजे असतात त्यातील दोन दोन वगळण्याच काहीच कारण नाही.
अजून प्रेत आणि डोळे उकललेले नाही... विचार करतोय.

मृत्यूपत्रासंदर्भात गावाकडे आलेले दोन मुलं. त्यांची चार चिल्लीपिल्ली म्हणजे इस्पिकचा राजा, बदामची राणी,चौकटचा राजा आणि किलवरची राणी.

पुढे म्हाताऱ्याला, " आणि मोठे मालक मी कोण" असं विचारणारा नोकराचा मुलगा.
म्हातारा उत्तरतो, " तुम्ही? जोकर!"
'तुम्ही' शब्दप्रयोग म्हणजे नोकराला दोन शाळकरी मुलं आहेत. जोकरही दोनच असतात.
पैकी एकाची वा एकीची हत्या आजोबांचे पाताळयंत्री, लालची, अहंकारी, कारस्थानी असे चार शाळकरी नातवंडं करतात म्हणून नोकराचा दुसरा घाबरलेला मुलगा स्वत:च्या आईला बिलगून त्वेषाने त्या चौघांकडे बघतोय.
आधी 'बापाला बिलगून' लिहीलेलं जे नंतर 'आईला बिलगून' बदललं. हत्या करण्यासाठीचं मोटीव अधिक स्पष्ट होतंय.
म्हातारं रंगेल दिसतंय. आजोबांचं अफेयर वगैरे, प्रॉपर्टीत वाटा वगैरे देणार असतील असं काहीतरी + म्हाताऱ्याची राजाराणी भिकारीवाली कमेंट...
खरं हाबच जाणोत ! Biggrin

त्यातील दोन दोन वगळण्याच काहीच कारण नाही>>>
चौकडी भाऊबहीण आहेत. एकाच प्रकारचे राजाराणी असणार नाहीत म्हणूनवेगवेगळे चार प्रकार घेतलेत.

हो , हेच वाटते

इथे , विदुर विरुद्ध [धृतराष्ट्र +पंडु ] आहे

खरं हाबच जाणोत ! Biggrin >> ब्रावो... मि. आशिक. सगळे पत्ते हुकमी पडले की तुमचे.

म्हातारा बेरकी आहे.. त्याला आता डोळ्यांनी दिसत नाही पण पोरा-सुनांचे आणि नातवांचे गुण तो ओळखू शकतो. मुले शहरात राहतात म्हणजे म्हातार्‍याची काळजी घ्यायला नोकर बाई वा माणूस असावा.
जोकर्स (अनेकवचनी 'तुम्ही' - चोपन्न पत्त्यातले दोन जोकर्स) सुद्धा त्याचेच असतील ( किंवा नसतीलही ). जोकर्स राजा-राणीला भिकारी बनवणार (रेफरंस पत्त्यांचा राजाभिकारी गेम - एक जोकर श्रीमंत राजाला भिकारी बनवू शकतो. कारण तो कोणीही बनू शकतो, कोणतेही रूप घेऊ शकतो) म्हणजे म्हातारा समहाऊ काही किंवा सगळी प्रॉपर्टी त्याची मुलं किंवा अ‍ॅडॉप्टी म्हणून जोकर्सच्या नावावर करणार असेल.

किंवा म्हातारा फक्त चौकडीला म्हणत असेल तुम्ही लाडाकोडाने बिघडलेली मुलं आहात त्यामुळे तुम्ही वायाच जाणार आहात. पण हे जोकर्स साधी आणि हुशार मुले आहेत... ते आयुष्यात पाहिजे ते बनू शकतात आणि तुम्हाला वरचढ होऊ शकतात.

एका जोकरचा काटा मुलांच्या चौकडीनी म्हातार्‍याच्या बोलण्याचा राग येऊन ( किंवा मुलांच्या पालकांनी प्रॉपर्टीसाठी ) काढला आणि हे दुसर्‍या जोकरला माहित आहे. Happy

अमितच्या प्रतिसादावरून तो सुद्धा करेक्ट ट्रॅकवर होता असे दिसते.

ब्लॅककॅट,
महाभारताचा काही संबंध नाही.

मला अंदाज आला २-३ वेळा वाचल्यावर. पण हाडळीच्या आशिकाने (असा आयडी का घेतला असेल? Lol ) लिहिलेलं वाचल्यावर आणखी स्पष्ट झाली.

गेल्या दिवाळीत एका दिवाळी अंकात हृषीकेश गुप्ते यांनी काळजुगारी नावाची एक पत्त्यांवर आधारित कथा लिहिली होती. मला तरी काही खास आवडली नाही. पण ही तुमची कथा मस्त जमली आहे.

हम्म.... चौकडीकडे त्वेषाने बघत होते वर अडकलेलो. एक जोकरचा बळी गेला असं वाटत होतं पण समहाऊ पचत न्हवतं. मुलं खून करतील असं वाटत न्हवतं आणि आई बाप करतील तर तसा काही गोष्टीत धागा सोडलेला न्हवता.
पण मुलंच करतील .. कारण सगळी पाताळयंत्री आणि इव्हील होती
त्यांच्या आई बापांसारखी...
मजा आली विचार करायला.

हाडळीचा आशिक (काय हे नाव) आणि हायझेनबर्ग यांचे प्रतिसाद वाचून कथा कळली व आवडली. पत्यांच्या कॅटचा रेफरन्स चपखल बसला आहे.

@बोका- स्पष्टीकरण १०० + शब्दांचं आहे. सो आपल्याला एका धाग्यात दोन शशक वाचल्याचा आनंद मिळतो आहे. याचा अर्थ कथा गंडली असा नाही.

थोडी कळली होती.
हाडळीच्याआशिक च्या प्रतिसादाने स्पष्ट झाली. कळली असं नाही अजुनपण.
मला ती लाँड्री लिस्ट पण कळली नव्हती. प्रतिसादातुन कळाली. अर्थातच माबुदो.
पण एवढं उलगडुन सांगायला लागल्यावर कथा जमलीये असं म्हणावं का?

ठीक आहे. परत पूर्ण कथा उलगडून सांगायचा प्रयत्न करतो.
म्हातारा अंथरुणाला खिळलेला आहे. मोतीबिंदू मुळे त्याला खूप कमी दिसते. तो दिवसभर हातातल्या पत्त्यांशी खेळत आणि विक्षिप्त बडबड करत पडून असतो. म्हातार्‍याचा स्वतः चा वाडा आहे आणि म्हातारा श्रीमंत आहे किंवा पैसे, प्रॉपर्टी बाळगून आहे. म्हातार्‍याचा सांभाळ करायला एक नोकर बाई माणूस आहे तिला दोन मुलगे आहेत किंवा जुळी मुले आहेत.
(तुंबाड मधला म्हातारा, त्याचा वाडा, त्याची काळजीवाहू बाई आणि तिची दोन मुले आठवली का? गुड)
म्हातार्‍याला स्वत:ची दोन मोठी मुले आहेत, जी शहरात राहतात. प्रत्येक मुलाचे चौकोनी कुटुंब आहे. ही दोन्ही मुले सध्या कुटुंबासहित वाड्यात आलेली आहेत कारण त्यांना म्हातारा मरण्याच्याआधी त्याच्याकडून मृत्युपत्र लिहून घ्यायचे आहे.
म्हातार्‍याला दोन्ही मुलांची मिळून - दोन मुले आणि दोन मुली - अशी चार शाळकरी वयाची नातवंडे आहेत. ही नातवंडे जातायेता म्हातार्‍याच्या विक्षिप्त बोलण्याला आणि वागण्याला फिदीफिदी हसत राहतात.
मग एकदा ते आंधळ्या म्हातार्‍याची अजून गम्मत करायची म्हणून त्याला ' आजोबा मी कोण?' विचारण्याचा क्रूर खेळ खेळतात. म्हातारा बेरकी आहे तो त्यांच्या प्रश्नांना पत्त्यांचा रेफरन्स घेऊन विक्षिप्त उत्तरे देतो. शहरी मुलांना पत्ते कळतात पण बाकी पाताळयंत्री, कारस्थानी वगैरे विक्षिप्त बोलणे काही कळत नाही आणि ते म्हातार्‍याला हासत राहतात. पण म्हातारा त्या बोलण्यातून तुम्ही मुले तुमच्या आई बापांसारखी लालची, कपटी, आतल्या गाठीची आहात असे सुचवतो.
आंधळ्या म्हातार्‍या बरोबरचा हा क्रूर खेळ त्याच्या नोकर बाईचा शाळकरी वयाचाच मुलगा दुरून बघत असतो. तो बिचारा ह्या चौकडीचा गेम प्लॅन न समजून 'मोठे मालक मी कोणता पत्ता? असे विचारतो.
(त्याच्या मनातली त्याच्या existence ची लढाई)

ज्याला म्हातारा' तुम्ही दोन जोकर' असे उत्तर देतो. आपल्याला राजाराणी आणि नोकराच्या मुलाला जोकर म्हणल्यावर चौकडी पुन्हा हसते. तेव्हा म्हातारा म्हणतो,' हसू नका बेटेहो जोकर तुमच्यापेक्षा हुशार आहे आणि तो कुठल्याही रुपात येऊ शकतो. तो तुम्हा राजाराणीला भिकारी बनवणार.' (किंवा तुम्हा बिघडलेल्या मुलांपेक्षा जास्त शिकून तुमच्यापेक्षा जास्त वरचढ बनू शकतो)

ह्याचा राग येऊन मुले एका जोकरला अर्थात नोकराच्या मुलाला विहीरीत ढकलून मारून टाकतात. थोडक्यात म्हातारा जसे त्या मुलांना कारस्थानी, कपटी, खुनशी म्हणालेला असतो तसेच ते वागतात. (इथे हा खून मुलांच्या आईवडीलांनी नोकर बाईच्या मनात भीती निर्माण करून तिने तिच्या आणि म्हातार्‍याच्या अनौरस मुलांसाठी प्रॉपर्टी मध्ये हक्क मागू नये म्हणुन केला असेही घडू शकते.)

पण जसे पत्त्यात नेहमी दोन जोकर असतात आणि फक्त एकच जोकर राजाला भिकारी बनवण्यासाठी पुरेसा असतो, तसे एक जोकर - नोकर बाईचा दुसरा मुलगा अजून जिवंत आहे. आणि आपल्या भावाला कोणी मारले हे त्याला माहीत आहे. मग आता पुढे काय होणार - Django Unchained Lol

जोकरचा अर्थ चांगला वापरलाय कथेत. >> +१ (उलगडून सांगितल्या नंतर Happy )

नोकरांची २ मुलं कळलेलं आणि कदाचित चौकडितल्या कुणी त्यांच्यातल्या एकाला मारले आणि ते दुसर्‍याला समजल्याने तो घाबरलेला हे कळाले. पण "बेटेहो! ते हुशार, बहुरूपी! राजा-राणी भिकारी!" हे पूर्ण डोक्यावरून गेलेले. आणि चौकडी संपत्ती वाटपासाठी आलेले हे शेवटी आठवले नाही (संपत्ती वाटप हे मोठ्या माणसांचे जग, लहान मुलांना त्याचे काही सोयरसुतक असावे असे वाटत नाही) त्यात कथेत बदल करून बापाऐवजी आईला बिलगला हा बदल वाचल्यावर तर आणखीच गोंधळ झाला.
त्यामुळे कथा बर्‍यापैकी समजली तरी खुप आवडली असे म्हणणार नाही. ऑफकोर्स कथेचं नाव आणि कथा ह्यांची सांगड घालायचा बौद्धिक कंटाळा करणे हा माझा प्रॉब्लेम आहे. Happy
लाँड्री लिस्ट छान आहे.

पण एवढं उलगडुन सांगायला लागल्यावर कथा जमलीये असं म्हणावं का? >>> बर्‍याच कथांबाबत हे वाटतय. Happy अगेन कदाचित तो माझा बौद्धिक कंटाळा...

थोडी कळली होती.
हाडळीच्याआशिक च्या प्रतिसादाने स्पष्ट झाली.>> +१

आता समजली Happy

बौद्धिक कंटाळा>>+१

संयोजक, ओळखा पाहु - सोळा आण्याच्या गोष्टींचं रहस्य अशी स्पर्धा ठेवा Happy

Pages