आज रात्रीतून चंद्रावर आपल्या इस्रो चे मून लँ डर उतरणार. ट्वि टर वर सर्व माहिती उपलब्ध आहे.
# चांद्र यान २ व # इस्रो फॉलो, करा.
https://www.business-standard.com/article/current-affairs/chandrayaan-2-... इथे पण माहिती आहे.
मी आत्ता पडी मारून रात्री एक दोन ला उठून बघेन. नाही नाही म्हटले तरी देव पाण्यात घालून ठेवलेत. १९६९ मध्ये अमेरिकेने चंद्रावर माणुस उतरवायचे जगप्रसिद्ध घटना घडली तेव्हा मी चार वर्शा ची होते. पण कथा कल्पना कवितां मधून चंद्रावर व अंतरा ळा त जायचे स्वप्न तेव्हा पासून जिवंत आहे. माहिती, मते ह्या त्यात काये एव्ढे अमेरिका क्यानडा तर कधीच जाउन चंद्र जुना झालाय. चायना पण जाउन आलाय. सर्व प्रतिसादांचे स्वागत.
भारतीय मून लँडरचे नाव विक्रम असे आहे. गो विक्रम डू अ गुड जॉब नाव.
तांत्रिक माहिती उद्या अपडेट करीन धाग्यात नाहीतर प्रतिसा दात. पण एक्साइट मेंट इज माउंटिन्ग. रेट्रो थ्रस्टर्स........
.महेश कुमार
.महेश कुमार
तुम्ही विशंभर चोधरी चे मत इथे का देत आहात .
त्यांचे मत शुद्ध नाही त्या मागे राक्षसी भावना आहे .
तुमचे मत काय आहे ते manda
अशा हाईपमुळे अकारण एक ताण
अशा हाईपमुळे अकारण एक ताण वाढतो. हल्ली आपण मीडिया कंझ्युम करतो की मीडिया आपल्याला हेच कळेनासे झाले आहे.>>>>
हाईप करणे हे मीडियाचे काम आहे आणि लोकानी अक्कल गहाण टाकलीय. सगळेच परस्परपूरक आहेत.
चांद्रयान मोहीम यशस्वी झाली
चांद्रयान मोहीम यशस्वी झाली नाही ही बातमी दुःखदायक आहे पण इस्रो प्रमुख भावविवश झाले ही बातमी भितीदायक आहे.>>>>
का बरं ? कष्ट केले. अपेक्षित यश मिळाल नाही. भावनाशील व्हायला झाल. मोदींनी समोरचा भावनाशील झालेला पाहून एका नॉर्मल माणसासारखी हग ची प्रतिक्रिया दिली. इतक यात चुकीच काय आहे ? दोघेही लगेच पुढच्या कामाला लागले पण असतील विसरून सगळ.
मोठ्या माणसांनी अगदी आदर्श ,भावनांच प्रदर्शन न करता वागण का एक्स्पेक्टेड आहे?
ओबामांना आवंढा गिळताना किंवा डोळ्यात पाणी जमा झालेलं बघितल नाही का कधी ?
आणि अपेक्षित असलं म्हणुन काय झाल ? बर्याच वेळा तरी सुद्धा प्रत्यक्षात तस झाल कि भावनाशील व्हायला होतच कि. (आणि मी इथे सिवन आणि मोदी विषयी बोलत आहे. लोक काय कविता/ट्रोलिंग करत असतील त्यांच्याविषयी नाही. त्यांना निवांत बसून बोलायला आणि असले उद्योग करायला काय जातय. डझन्ट मॅटर. )
भावनाविवश होणे वाईट नाही;
भावनाविवश होणे वाईट नाही; सहाजिक आहे. जर नुसते ओब्जेक्टीवली पाहायचे असेल तर पेपर वाचावेत. तिथे भावनारहित वृत्तांत मिळू शकतो.
इथले काही मुद्दे खटकले.
इस्रोला शब्दांनी जिद्द देऊ पहाणारे वेडेपणा करत नसून ते सकारात्मक लिहिण्याचा आणि वातावरण आनंदी ठेवायचा प्रयत्न करत आहेत. इस्रो प्रमुख ज्या पद्धतीने भावूक झाले त्यावरून हे कळाले की त्यांच्या प्रकल्पांना जितकी मेहेनत लागलेली असते, तितक्याच भावना आणि आशाही त्यात गुंफल्या गेलेल्या असतात.
मुळात भावनारहित पणे सगळ्यांनी वागावं ही अपेक्षा का??
प्रत्येकाला स्वतःच्या मनाने व्यक्त होण्याचा अधिकार आहे. मॉडर्न म्हणून इस्त्री फिरवल्यासारखे चेहरे घेऊन फिरायचे सगळ्यांनी?
सीमा +१ चांगली पोस्ट.
सीमा +१ चांगली पोस्ट.
मला यातले फार ग्यान नाही. गती
मला यातले फार ग्यान नाही. गती तर नाहीच नाही. तरी पण एक भाबडा प्रश्न मनात आला वारंवार तो मांडतो. कुणा जाणकाराला उत्तर माहित असेल तर द्यावे: ते जे काय रॉकेटला जोडून त्यांनी चंद्रावर उतरवले (ज्याचे नाव विक्रम होते) तशीच अजून त्यांनी त्याच रॉकेटला दोन-तीन (विक्रम-२, विक्रम-३) जोडता आले नसती का? फारतर रोकेटची थोडी क्षमता वाढवावी लागली असती. पण फायदा असा झाला असता कि एकात बिघाड झाला तरी किमान दुसरे/तिसरे तरी उतरले असतेच ना?
आता पुन्हा नवीन रॉकेट लावण्यापासून सुरवात. तो सगळा पैसा आणि वेळ पुन्हा एकदा खर्च करावा लागणार.
Redundant communication
Redundant communication System mazya manat aale hote pun lahan tondi motha ghaas mhanun post Kele nahi. Aapan je vichar karto tyachya kaik patine pudhe ISRO vichar karte, nakki kaay zale asnar ???
Sivan Sir Bhavna vivaash hoi
Sivan Sir Bhavna vivash hoi paryant khare vaatle navhte, ratri laa ase vaatle hote ki nantar sakali declare kartil.
काय प्रॉब्लेम काय ए? रडला
काय प्रॉब्लेम काय ए? रडला म्हणून, का रडताना मोदीनं धीर दिला म्हणून?
चालले उठसुठ सगळ्यांना सल्ले अन उपदेश करायला?
सीमा, मधुरा छान पोस्ट (Y)
सीमा, मधुरा छान पोस्ट (Y)
आजवरच्या राजकारणी लोकांचे रंग
आजवरच्या राजकारणी लोकांचे रंग बघितले तर लोकांना मोदींवर विश्वास ठेवणं जड जाते. ते कितीही खऱ्यानं वागले तरी हा मोमेंट त्यांनी एन्कॅश केला असं लोकांना वाटतं. माझ्या मनात देखील असे विचार येऊन गेले.
विक्रम locate झालंय. अजून
विक्रम locate झालंय. अजून contact झाला नाहिये.
<< एकीकडे मूर्ख ट्रोलिम्ग तर
<< एकीकडे मूर्ख ट्रोलिम्ग तर दुसरीकडे भावनाविवश कविता !! दोन्ही सारखाच वेडेपणा. >>+1000
संसदेत जाताना पायरीवर डोके
संसदेत जाताना पायरीवर डोके ठेवणे, गोव्यात व अन्य ठिकाणी भाषण करत असताना "देशासाठी माझा मर्डर झाला तरी हरकत नाही" म्हणून रडणे, कॅमेरासमोर झुकरबर्ग बरोबर बोलताना आईची आठवण काढून रडणे, संसदेत भाषण करत असताना रडणे अशी कितीतरी उदाहरणे ज्याच्या नावावर आहेत त्या नेत्याकडून इस्रोच्या प्रमुखांबरोबरचे वर्तन हे अगदी अपेक्षितच होते. तेंव्हा कोणीतरी फक्त कॅमेराच्या आडवे यायला हवे होते बस्स! मग बऱ्याच गोष्टी क्लीअर झाल्या असत्या. असो. हे स्टेज्ड ड्रामे काही नवीन नाहीत. देव धर्म वर्ण वगैरे गोष्टी जिथे प्रबल आहेत अशा भावनाप्रधान लोकांच्या देशात नेता भावनाविवश झाला कि नवीन अनुयायी सहज मिळतात आणि जे आहेत ते घट्ट चिकटतात. रेडिओवर भाषण करताना हिटलर अनेकदा रडत असे.
तात्पर्य: भावनेशी कसलाही संबंध नसलेल्या सपूर्णपणे वैज्ञानिक अशा एका मोहिमेचा उठवळ माध्यमांना हाताशी धरून राजकीय फिल्मी इव्हेंट बनवायच्या नादात इस्रोचे नुकसान झाले खरे, पण त्या शेवटच्या दोनएक मिनिटात यांची कित्येक लाख नवीन मतदारांची कमाईसुद्धा झाली असेल. अर्थातच, रडल्याचे/थोपटल्याचे ठराविक लोकांकडून वारेमाप समर्थन होणारच. जय हो!
जाता जाता: २ जुलै २०१४ रोजी
जाता जाता: २ जुलै २०१४ रोजी सिवन यांची डायरेक्टर पदी आणि जून २०१५ मध्ये इस्रोच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे हे सुद्धा लक्षात घेणे गरजेचे आहे. अत्यंत गरीब शेतकरी घराण्यातून सिवन आलेले आहेत. त्यांची प्रगती वाखाणण्याजोगी आहे. हे सगळे पाहता इतका संघर्ष करून अशा ठिकाणी कोणीही जेंव्हा येते तेंव्हा त्यांना नाईलाजाने काही ऑर्डर्स ह्या फॉलो कराव्याच लागतात. भले त्या त्यांच्या वैज्ञानिक वृत्तीशी विसंगत का असेनात! वाईट वाटते ते यासाठीच.
एक मिनिट. शब्द आवरते घ्या.
एक मिनिट. पंतप्रधान आहेत ते आपले. आणि आपणच निवडून दिले आहे त्यांना. उत्तमरित्या केलयं त्यांनी आजवर काम.
जगात सर्वत्र मोदींचा जयजयकार सुरु असताना असे भारतात राहणारे लोक कसं काय बोलतात स्वतःच्या पंतप्रधानाबद्दल?
मोदींच्या आसपास सतत कॅमेरा घेऊन फिरणारे लोक असतात त्याला ते काय करणार? जर बाजूला राहायला सांगितले तर तुम्हीच गळे काढत फिरणार की 'मिडियाच्या स्वातंत्र्यावर गदा आणलीत.'
विक्रम locate झालंय. >>>>> हो
विक्रम locate झालंय. >>>>> हो. संपर्कही होईल पुन्हा अशी आशा आहे.
Scientist असो किंवा PM आहे तर
Scientist असो किंवा PM आहे तर माणूसच ना. भावनाहीन असायला ते काय Macines आहेत का?
आणि वाटलं कुणाला कवितेतून स्वतः च्या भावना व्यक्त करावंस तर लगेच टोमणे काय मारायचेत त्यात. नाही आवडली कविता, नका ना वाचू तुम्ही.
<< एकीकडे मूर्ख ट्रोलिम्ग तर
<< एकीकडे मूर्ख ट्रोलिम्ग तर दुसरीकडे भावनाविवश कविता !! दोन्ही सारखाच वेडेपणा. >> अगदी अगदी अशा ट ला ट लावणाऱ्यांच्या कविता सुरू झाल्यात हं.
हे सगळे पाहता इतका संघर्ष
हे सगळे पाहता इतका संघर्ष करून अशा ठिकाणी कोणीही जेंव्हा येते तेंव्हा त्यांना नाईलाजाने काही ऑर्डर्स ह्या फॉलो कराव्याच लागतात. भले त्या त्यांच्या वैज्ञानिक वृत्तीशी विसंगत का असेनात! वाईट वाटते ते यासाठीच.
Submitted by इनामदार on 8 September, 2019 - 06:58
>>> सहमत.
@Sharddha प्रतिसाद>>>>>
@Sharddha प्रतिसाद>>>>>+११११११.......
ओ इनामदार वैज्ञानिक वृत्तीशी
ओ इनामदार वैज्ञानिक वृत्तीशी विसंगत म्हणजे काय?
रडू येणे ही नैसर्गिक वृत्ती आहे!! वैज्ञानिक भावनाहींन असावा ह्याचा अट्टाहास लैच!!
रॉनी प्रतिक्रिया>>>+१११
रॉनी प्रतिक्रिया>>>+१११
जेव्हा मेहनत करून अपयश येते
जेव्हा मेहनत करून अपयश येते तेव्हा वाईट वाटतच .
संशोधक असू किंवा गॅंग स्टार सर्वांना भावना असतात .
त्यात चुकीचं काही नाही नैसर्गिक आहे
एडिसन हा हाडाचा वैज्ञानिक
एडिसन हा हाडाचा वैज्ञानिक होता. प्रयोगशाळा आगीत भस्मसात झाली तरी म्हणाला बरं झालं सर्व चूकाही जळून गेल्या. आता नवीन सुरुवात करता येईल. शिवन यांनी इतकं भावनाविवश व्हायची गरज नव्हती. सेनापती हा खंबीर असावा लागतो. विनोद कांबळी सारखं रडूबाई असून उपयोगाचे नाही.
थेट प्रक्षेपण नसते तर कदाचीत
थेट प्रक्षेपण नसते तर कदाचीत ते रडलेही नसते. टीव्ही वरील रिऍलिटी शो मध्ये सहानुभूती मिळवण्याकरिता असे प्रकार सर्रास चालतात. आता हे लोण इस्रो पर्यंत पोचले. ह्या मोहिमेत अनेक इस्रो शास्त्रज्ञांचा सहभाग होता, ते रडताना दिसले नाही.
कॅमेरा.....,साऊंड.....,एॅक्शन
कॅमेरा.....,साऊंड.....,एक्शन...
अरे विक्रम सापडलंय. संवाद
अरे विक्रम सापडलंय. संवाद साधायचे प्रयत्न चालू आहेत.
मी रात्री विक्रम लॅंडर
मी रात्री विक्रम लॅंडर दुरुस्त करायला गेलो होतो. पण जोरात आदळल्याने तुकडे तुकडे झाले आहेत त्याचे. रिपेयर करता येणार नाही म्हणून परत आलो.
रोवर सुखरूप होते का? की तेही
रोवर सुखरूप होते का? की तेही मिठीत असल्याने उध्वस्त झाले?
Pages