आज रात्रीतून चंद्रावर आपल्या इस्रो चे मून लँ डर उतरणार. ट्वि टर वर सर्व माहिती उपलब्ध आहे.
# चांद्र यान २ व # इस्रो फॉलो, करा.
https://www.business-standard.com/article/current-affairs/chandrayaan-2-... इथे पण माहिती आहे.
मी आत्ता पडी मारून रात्री एक दोन ला उठून बघेन. नाही नाही म्हटले तरी देव पाण्यात घालून ठेवलेत. १९६९ मध्ये अमेरिकेने चंद्रावर माणुस उतरवायचे जगप्रसिद्ध घटना घडली तेव्हा मी चार वर्शा ची होते. पण कथा कल्पना कवितां मधून चंद्रावर व अंतरा ळा त जायचे स्वप्न तेव्हा पासून जिवंत आहे. माहिती, मते ह्या त्यात काये एव्ढे अमेरिका क्यानडा तर कधीच जाउन चंद्र जुना झालाय. चायना पण जाउन आलाय. सर्व प्रतिसादांचे स्वागत.
भारतीय मून लँडरचे नाव विक्रम असे आहे. गो विक्रम डू अ गुड जॉब नाव.
तांत्रिक माहिती उद्या अपडेट करीन धाग्यात नाहीतर प्रतिसा दात. पण एक्साइट मेंट इज माउंटिन्ग. रेट्रो थ्रस्टर्स........
मला तरी तिचा स्टॅण्ड आवडला.
मला तरी तिचा स्टॅण्ड आवडला. तिला जे नाही आवडले ते तिने स्पष्ट लिहिले. स्वतःचे मत पटवून देण्यासाठी कोणाला अंधभक्त म्हटले नाही की मोदींना शिविगाळ केली नाही. >>> +१ आणि तिने पंतप्रधानांना उठसुठ वाईट न ठरवणाऱ्यांना बिनडोक ठरवणारे पॅरेग्राफही लिहिले नाहीत.
ही चर्चा दुसरीकडे नाही का
ही चर्चा दुसरीकडे नाही का करता येणार?
कुठलाही धागा अशा वळणावर येतो त्याचा नाही का कंटाळा येत?
फॅक्ट बेस्ड हा शब्द मोदी
फॅक्ट बेस्ड हा शब्द मोदी समर्थकांकडून आलेला पाहून हसू आलं. मोदींच्या वैयक्तिक आयुष्यापासून, त्यांनी + त्यांच्या पक्षाने केलेल्या प्रचारासह त्यांच्या सरकारच्या कामगिरीबद्दलच्या दाव्यांसाठीही हा फॅक्ट बेस असण्याचा आग्रह कायम असेल याची खात्री आहे.
<परवानग्या मिळाल्या तरी चॅनेलवर दाखवणे हातात असतेच ना?> हे आणि या आधीचे यांचे प्रतिसाद निरागस असतीलच. एका प्रमुख इंग्रजी वाहिनीची मुख्य संपादिका मी रोज सकाळी या भाजप नेत्याला फोन करीत असे, असं म्हणते. सरकारला प्रश्न विचारणार्या पत्रकारांची उचलबांगडी होते, त्यांच्या विरोधात पोलिस केसेस ठोकल्या जातात नाहीतर ट्रोल सेना त्यांना आयुष्यातून उठवण्याचं काम करते. हे माहीत करून घ्यायची गरज नाही.
देशात काहीही विपरीत झालं की त्याबद्दल माध्यमांतल्या काहींकडून सत्ताधार्यांना प्रश्न न विचारता विरोधी पक्ष, जे एन यू, बुद्धिवाद्यांना धारे वर धरलं जातं. प्रसारमाध्यमांचा एक मोठा हिस्सा आणि भाजपची प्रचार यंत्रणा यांच्यातली सीमारेषा कधीच पुसली गेलीय.
आधीच्या सरकारच्या काळात ल्या चोर्यांबद्दल लिहिणार्यांना मुकुल रॉय,येडीयुरप्पा आणि त्यांचे पाच उपमुख्यमंत्री हे सत्संगासाठी बसलेले सज्जन वाटत असणार .
मोदींनी जे प्रॉमिस केलं ते डिलिव्हर करताहेत किंवा ते जी कामं करताहेत ती आम्हांला आवडताहेत, त्यामुळे त्यांच्यातले कोणतेही दोष आम्हाला खटकत नाहीत, हे प्रामाणिकपणाने लिहिलेले प्रतिसाद परवडले, खरंतर आवडले.
फक्त मोदींनी कोणत्या कामांचा पाया रचला, कोणत्या बाबतीत डिलिव्हर केलं आणि त्यां नी धरलेली कोणती दिशा आवडते, हे स्पष्ट मांडलंत की झालं.
मानव, हो ना. मूळ विषय बाजूलाच
मानव, हो ना. मूळ विषय बाजूलाच पडतो. आता विक्रमबरोबर संपर्क प्रस्थापित झाल्याची बातमी येवू दे इथे. त्याची बॅटरी संपायचं लिमिट कधीचं आहे?
1 आठवडा.
1 आठवडा.
त्याच्यावरही सोलर पॅनेल्स आहेत. जास्त दिवसही काम करू शकला असता.
या धाग्याची जी अवस्था आहे तीच
या धाग्याची जी अवस्था आहे तीच देशाच्या प्रश्नांची झाली आहे. तुम्ही मिडीयाला दोष देताय मोदींना प्रसिध्दी देतात म्हणून पण ती केवळ एक बाजू आहे. दुसरी बाजू अशी आहे की मोदींना प्रसिद्धीची आवड आहे. स्वप्रतिमेच्या प्रेमात असणं वाईट नाही पण त्यात इतक्या मोठ्या पदावर असलेल्या माणसाने रममाण होणं फार धोकादायक आहे.
फक्त आणि फक्त क्राऊड प्लिझींग उथळ विधाने करून कारभार चालू आहे. जगाला पण अशी माणसं आवडतात. आपल्या पैकी प्रत्येकाला असा एक मित्र किंवा मैत्रीण माहिती असेल जो/जी फार छान बोलतो/ते, एकदम आदर्शवादी आहे, carries a beautiful facade पण तुम्हाला माहित असतं की ही काही कामाची व्यक्ती नाही. मला मोदींबद्दल असंच वाटतं. Such people are harmless if left on their own but when they are at a power position things can rapidly go south. You only get to see the facade and truth has no place to go. सध्या मला असंच वाटतं. एक उन्मादी आवरण डोळ्यांवर चढलंय लोकांच्या ज्यामुळे काही नकारात्मक ऐकून घेण्याची क्षमताच नष्ट झाली आहे. रवींद्रनाथांच्या कवितेतला clear stream of reason has lost its way into the dreary desert.
देशाची प्रगती होणारच आहे याही परिस्थितीत. कारण आपण youngest nation असणार आहोत पुढची काही वर्षं. But the development will be far from optimal, unsustainable, and will make rich richer and poor poorer.
जिज्ञासा, माझ्या सारख्या
जिज्ञासा, माझ्या सारख्या बऱ्याच लोकांची मन की बात सुंदर शब्दांत लिहिलीय तुम्ही
फक्त प्रसिद्धीची आवड आहे असं
फक्त प्रसिद्धीची आवड आहे असं नाही, तर प्रसिद्धी, कंट्रोलिंग द नॅरेटिव्ह हाच त्यांचा प्लान आहे. (मोदी आणि कॅमेरा यांच्या मध्ये कोणी आलेलं त्यांना खपत नाही हा त्यातला व्यक्तिगत भाग आहेच. झुकरबर्ग पासून सुजय वि खेपर्यंतचे दाखले आहेत. )
मग त्या वृत्तवाहिन्या असोत, सोशल मीडिया असो, आकाशवाणीवरची मन की बात असो की आणखी काही.
सिवन यांचं सांत्वन हाही त्याचाच एक भाग होता. चुकलेल्या खेळीतूनही स्वतःचा डाव कसा साधायचा याचं उत्तम उदाहरण.
त्याला नावं ठेवणा र्यांना मोदीद्वेषाचं लेबल लावणं ही त्यातली नेहमीची पायरी.
किती वर्ष गुजरातचे
14वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते मोदी जी.
काही ही काम न करता इतक्या वर्ष लोकांना मूर्ख बनवता येत नाही .
म्हणजे असेल त्यांना प्रसिद्धीची हौस पण त्यांनी काही लोक उपयुक्त काम केली असतील म्हणूनच 14 वर्ष ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि आता प्रधानमंत्री पदावर 10 वर्ष पूर्ण करतील .
भारतीय जनता एवढी मूर्ख नाही हो ..की काही काम न करणाऱ्या बोलबच्चन व्यक्तीला 14 वर्ष मुख्यमंत्री आणि 10 वर्ष प्रधानमंत्री म्हणून निवडून देईल
अरे हा धागा चंद्रयानाबद्दल
अरे हा धागा चंद्रयानाबद्दल आहे. मोदींबद्दल नाही. विषय भरकटलाय. आपण मूळ मुद्द्यावर येऊ.
मला आता वाटतंय की आता संपर्क होणे कठीण आहे. खूप पैसे लागलेले आहेत आपल्या देशाचे या मिशन मध्ये आणि शास्त्रज्ञांची मेहेनत सुद्धा. निदान म्हणून तरी आपण प्रार्थना करू की काही तरी चमत्कार घडावा आणि संपर्क व्हावा.
Submitted by जिज्ञासा on 11
Submitted by जिज्ञासा on 11 September, 2019 - 09:32 >>> +११११ अगदी अगदी वाटले प्रत्येक वाक्याला.
मोदींनी राजकारणात तून
मोदींनी राजकारणात तून retirement घेतली की अमित शाह पंतप्रधान होतील. नंतर असं नको व्हायला की मोदी कित्ती चांगले होते आता कसे लोकांना (पक्षी : बीजेपी, मोदी विरोधक) वाजपेयी आठवतात
खूप पैसे लागलेले आहेत आपल्या
खूप पैसे लागलेले आहेत आपल्या देशाचे या मिशन मध्ये आणि शास्त्रज्ञांची मेहेनत सुद्धा. >>>> ह्म्म. आणि आपण अश्या टप्प्यावर आहोत की अश्याप्रकारची स्पेस मिशन्स आपल्याला जशी अगदी नवी नाहीत व तशी नासासारखी रेग्युलरही नाहीत. त्यामुळे संपर्क तुटला तर इस्रोचे शास्त्रज्ञ नासाच्या शास्त्रज्ञांसारखे स्थितप्रज्ञ न राहणं (थोड्यावेळापुरते) स्वाभाविक आहे. पण ही सुद्धा एक फेज आहे. आज इस्रो सॅटेलाईट लाँन्चिन्ग प्रोफेशनली करतं पण जेव्हा पहिल्यांदा केलं असेल तेव्हाची ही फेज आहे. समजा संपर्क पुनर्स्थापित नाही झाला तरी आता हा अनुभव घेतला आहे. ह्या अनुभवाची शिदोरी घेवून पुढच्या प्रयासाच्या वेळेस स्थितप्रज्ञता वाढेल.
मला वाटतं देशाचे पैसे ह्यात लागले असले तरी त्याचं undue प्रेशर शास्त्रज्ञांनी घेवू नये. जेव्हा निधी sanction होत असेल तेव्हा मिशन यशस्वी, पार्शियली यशस्वी किंवा अयशस्वी होणे ह्या सर्व शक्यता गृहित धरल्या जातच असतील. प्रत्येक नागरिकाने आपापल्या क्षेत्रात प्रामाणिक राहून काम करणे जसे अपेक्षित असते तेच शास्त्रज्ञांना लागू होते.
त्याची बॅटरी संपायचं लिमिट
त्याची बॅटरी संपायचं लिमिट कधीचं आहे?>>
लँडर आणि रोव्हर चे लाईफ लँड झाल्यापासून १४ दिवस असेल असं लाईव्ह टेलीकास्ट वेळी सांगितलेलं.
म्हणजे अजून १० दिवस आहेत.
१० दिवस अजून हातात असले तरी
१० दिवस अजून हातात असले तरी तिरकं उतरल्यामुळे चॅलेंज वाढले असेल शास्त्रज्ञांपुढचे.
ऑर्बिटर अजून फिरतोय. त्याचा
ऑर्बिटर अजून फिरतोय. त्याचा आता काही उपयोग होणार का?
रोव्हर म्हणजे काय? त्याचे कार्य काय? त्याची स्थिती सध्या काय आहे?
लँडरची स्थिती - सध्या कललेल्या अवस्थेत आहे, संपर्कात नाही. त्याचे काम काय होते?
आता लँडरशी संपर्क झालाच नाही तर या मोहिमेस इथे पूर्णविराम मिळणार असे समजावे का?
जाणकारांनी प्रकाश टाकावा. धन्यवाद.
ऑर्बिटर अजून फिरतोय. त्याचा
ऑर्बिटर अजून फिरतोय. त्याचा आता काही उपयोग होणार का? >>>> तो फोटो पाठवतोय की व्यवस्थित. त्याचे असे स्वतःचे काही कार्य असेलच कारण त्याचे लाईफ खूप जास्त आहे लँडरपेक्षा.
लॅन्डर उतरल्यावर रोव्हर्स रिलीझ होणार व चंद्राच्या पृष्ठभागावर चाकाच्या सहाय्याने फिरून दगड माती गोळा करणार, केमिकल अॅनालेसिस करणार आणि त्याचा डेटा ऑर्बिटरकडे पास ऑन करणार. रोव्हरचा आयुष्य बहुतेक १ महिन्याचं आहे.
खरंच आता मूळ विषयावरील
खरंच आता मूळ विषयावरील प्रतिसाद वाचून बरे वाटले,
कृपया आता तरी राजकारणाचे विषय नका वाढवू इथे
@साधना
@साधना
https://aajtak.intoday.in/story/isro-scientists-salary-deduction-parliam...
इसरो मध्ये वैज्ञानिक संपावर जाणार नाही नासा ला जातील. हे देशभक्ती साठी रिसोर्सेस नसताना काम करणारे लोक. त्यांना बाकी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वागवून उपयोग नाही. पैसे खाणाऱ्या बाबू लोकांना सातवा वेतन आयोग आणि प्रामाणिकपणे देशासाठी काम करणाऱ्या लोकांना वेतनकपात. पैसे वाचवण्यासाठी सरकार ला हजारो जागा आहेत.
अवांतरासाठी क्षमस्व, पण मलाही
अवांतरासाठी क्षमस्व, पण मलाही जिज्ञासा यांची मते पटली. आजकाल मोदीजींची भाषणे ऐकण्याचा कंटाळा येतो. मुद्दे नसतात. रेकून बोलतात. पंप्र म्हणून ऐकताना विषाद वाटतो. धोरणांच्या यशस्वीतेविषयी आणि भ्रष्टाचाराविषयी खूप लिहिता येईल. अवांतर पूर्ण.
मूळ मुद्दा म्हणजे विक्रमचा प्रवास वाखाणण्याजोगाच आहे, पण अतिभावविवशता आणि अतिउन्माद नाही आवडला. त्यापेक्षा धीरोदात्तता आवडली असती. यापूर्वी अनेकदा नेत्रदीपक यशस्वी उड्डाणे तसेच निराशाजनक अपयशे इस्रोने आणि देशाने पाहिली आहेत. आणि इस्रोलाही 'हिम्मत ए मर्दा तो मदद ए खुदा ' हे माहीत आहे. त्यांचे काम सुरूच राहील. यश तर मिळणार आहेच.
अवांतरासाठी क्षमस्व, पण मलाही
अवांतरासाठी क्षमस्व, पण मलाही जिज्ञासा यांची मते पटली. आजकाल मोदीजींची भाषणे ऐकण्याचा कंटाळा येतो. मुद्दे नसतात. रेकून बोलतात. पंप्र म्हणून ऐकताना विषाद वाटतो. धोरणांच्या यशस्वीतेविषयी आणि भ्रष्टाचाराविषयी खूप लिहिता येईल. अवांतर पूर्ण.
मूळ मुद्दा म्हणजे विक्रमचा प्रवास वाखाणण्याजोगाच आहे, पण अतिभावविवशता आणि अतिउन्माद नाही आवडला. त्यापेक्षा धीरोदात्तता आवडली असती. यापूर्वी अनेकदा नेत्रदीपक यशस्वी उड्डाणे तसेच निराशाजनक अपयशे इस्रोने आणि देशाने पाहिली आहेत. आणि इस्रोलाही 'हिम्मत ए मर्दा तो मदद ए खुदा ' हे माहीत आहे. त्यांचे काम सुरूच राहील. यश तर मिळणार आहेच.>>>>>> हिरा, +१
जिज्ञासा +१
इसरो मध्ये असं ऐकलंय की फक्त
इसरो मध्ये असं ऐकलंय की फक्त 15टक्के लोकं sincerely काम करतात. जे काय इसरोमुळे चांगले होते ते ह्या लोकांमुळे; बाकीचे चादर घेऊन झोपायला जातात. त्यामुळे perform केलं तर पैसे हे बाकी ठिकाणी आहे तेच इथेही राबवले तरी चालेल.
हिरा +१
हिरा +१
बाकी गाडी इसरो मधले ८५% वैज्ञानिक कामचुकार आहेत यावर आली.
जिज्ञासा, हीरा +१
जिज्ञासा, हीरा +१
ऑर्बिटर अजून फिरतोय. त्याचा
ऑर्बिटर अजून फिरतोय. त्याचा आता काही उपयोग होणार का?>>>
इथे इसरोमध्ये काम करणारे तज्ञ नाहीत. जे तज्ञ आहेत ते सगळे आर्मचेअर योद्धे आहेत. त्यामुळे जे नेटवर आलेय त्यावर विसंबून राहावे लागते.
पहिल्या दिवशीच नेटवर इसरो/नासाने म्हटले होते की महत्वाचे सगळे प्रयोग ओरबीटर मध्येच होणार आहेत. विक्रमचे आयुष्य आठवड्याचे तर ओरबीटर वर्षभर टिकणार आहे.
सिरीयसली ! मी कुणाचीच भाषणे
सिरीयसली ! मी कुणाचीच भाषणे ऐकत नाही आधीपासुनच ( स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा अपवाद ) . माणुस काम करतोय ना? मग त्याच्या वक्तृत्वाशी काय घेणे देणे? कशाला मग बोअर झालो/ झाले असे फिल करुन घ्यायचे? साधनाची सर्व मते पटली आहेत आणी आवडली पण आहेत. तसेच जिज्ञासा च्या पण मतांचा आदर आहेच. काही बाबतीत जरी मला मोदी ओव्हर वाटले तरी ते मला आवडतात. निर्णय घेण्याची क्षमता आहे या माणसात.
विक्रम आणि प्रज्ञान!
विक्रम आणि प्रज्ञान!
विक्रम लॅंडर आहे. प्रज्ञान हे रोबोटिक सहा चाकांचे रोवर आहे. विक्रमशी संपर्क तुटल्याने प्रज्ञान सुद्धा अजून विक्रमच्या आतच आहे.
पहिल्या दिवशीच नेटवर इसरो
पहिल्या दिवशीच नेटवर इसरो/नासाने म्हटले होते की महत्वाचे सगळे प्रयोग ओरबीटर मध्येच होणार आहेत. विक्रमचे आयुष्य आठवड्याचे तर ओरबीटर वर्षभर टिकणार आहे.
<<< या मोहिमेतून काय काय कार्य होणं अपेक्षित होतं? या संपर्क तुटण्यामुळे त्यातले काय काय बाकी राहणार? की काहीच चालूच होऊ शकणार नाहीच? याबद्दल अधिक वाचायला आवडेल.
गजा, प्रग्यान रोव्हर
गजा, प्रग्यान रोव्हर विक्रमपासून रिलीझ शकला नाही तर चंद्रावरचे दगड माती उचलू शकणार नाही व पुढील प्रयोग करून त्याचा डेटा ऑर्बिटरकडे पाठवू शकणार नाही. हे काम ह्या मोहिमेच्या कार्याचा एक भाग होतं. विक्रम चालू झाला नाही तर ते काम होणार नाही.
https://www.isro.gov.in/chandrayaan2-payloads इथे बघ ऑर्बिटर, विक्रम आणि प्रग्यानचे पेलोड्स दिले आहेत आणि त्यांचे कार्य लिहिले आहे.
तिरकं उतरल्यामुळे चॅलेंज
तिरकं उतरल्यामुळे चॅलेंज वाढले असेल शास्त्रज्ञांपुढचे.>>
हो ना.
काही पडलेले प्रश्न:
तिरकं पडल्यामुळे त्याचे अँटेना भलतीकडे पॉईंट करत असतील. असं मानलं की लँडर मधील सगळी equipments कार्यरत आहेत आणि अँटेना त्याला ठरावीक कोनातूच वळवता येत असतील तर तिरके पडल्यामुळे त्याला ऑर्बिटर कडे ते वळवता येत नसतील.
तेव्हा ऑर्बिटरच्या कक्षेत बदल करून त्याला अशा जागेवरून फिरवता येईल का की त्या कक्षेतून जाताना जिकडे लँडरच्या अँटेना वळले त्या भागा जवळून तो जाईल आणि त्यावेळी संपर्क साधता येईल?
पण लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ आहे. ऑर्बिटर पोलर ऑर्बिटमध्ये फिरत असेल त्यामुळे याची शकत्या कमी असावी.
आणि सम्पर्क झालाच तर मग पुढे काय? लँडरमध्ये असे काही प्रयोजन करून ठेवले आहे का की तिरके झाल्यास सरळ करता येईल किंवा तिरके असले तरी त्याला ओपन करून रोव्हर सरळ स्थीतीत बाहेर काढता येईल?
आणि जर का लँडर मधील ट्रान्मिटर/ रिसिव्हीर च जर काम करत नसतील तर प्रश्नच मिटला.
Pages