आज रात्रीतून चंद्रावर आपल्या इस्रो चे मून लँ डर उतरणार. ट्वि टर वर सर्व माहिती उपलब्ध आहे.
# चांद्र यान २ व # इस्रो फॉलो, करा.
https://www.business-standard.com/article/current-affairs/chandrayaan-2-... इथे पण माहिती आहे.
मी आत्ता पडी मारून रात्री एक दोन ला उठून बघेन. नाही नाही म्हटले तरी देव पाण्यात घालून ठेवलेत. १९६९ मध्ये अमेरिकेने चंद्रावर माणुस उतरवायचे जगप्रसिद्ध घटना घडली तेव्हा मी चार वर्शा ची होते. पण कथा कल्पना कवितां मधून चंद्रावर व अंतरा ळा त जायचे स्वप्न तेव्हा पासून जिवंत आहे. माहिती, मते ह्या त्यात काये एव्ढे अमेरिका क्यानडा तर कधीच जाउन चंद्र जुना झालाय. चायना पण जाउन आलाय. सर्व प्रतिसादांचे स्वागत.
भारतीय मून लँडरचे नाव विक्रम असे आहे. गो विक्रम डू अ गुड जॉब नाव.
तांत्रिक माहिती उद्या अपडेट करीन धाग्यात नाहीतर प्रतिसा दात. पण एक्साइट मेंट इज माउंटिन्ग. रेट्रो थ्रस्टर्स........
सोशल मिडियावर खूप जण या
सोशल मिडियावर खूप जण या मुद्द्यावर ट्रोल करत आहेत इस्रोला. >>>
काहीजण देश सर्वोच्च व बाकी सगळे त्याच्याखाली या पातळीवर पोचूच शकत नाहीत. जे ट्रोल करताहेत ते इसरोपेक्षा निश्चितच जास्त हुशार असणार. असो. जिथे पंतप्रधानानी स्वतः पाठिंबा दिला तिथे इसरोला ह्या ट्रॉल्सचे मनावर घ्यायची गरज नाही.
मी_मधुरा, हो, इसरोलाही आशा असावी, जरी प्रत्यक्ष बोलले नाहीत तरी. Orbitar फोटो पाठवेल तेव्हा कळेल तिथे काय झाले ते. तोवर इसरोने काहीच न बोलायचे ठरवले असेल.
इस्रो प्रमुखांना भावुक झालेले
इस्रो प्रमुखांना भावुक झालेले पाहून कोलंबिया कोसळताना नासा टीमची ती क्लिप आठवली. सेकंदात सर्व चित्र पालटतं.
https://youtu.be/6R4ctaCBapM
जे ट्रोल करताहेत ते
जे ट्रोल करताहेत ते इसरोपेक्षा निश्चितच जास्त हुशार असणार. >>>>>> sarcasm ट्रोल नापाकडे करते आहे.
मी_मधुरा, हो, इसरोलाही आशा असावी, जरी प्रत्यक्ष बोलले नाहीत तरी. Orbitar फोटो पाठवेल तेव्हा कळेल तिथे काय झाले ते. तोवर इसरोने काहीच न बोलायचे ठरवले असेल.>>>>> खरचं तसे झाले तर उत्तम. खरचं खूप अपेक्षा ठेवून आहेत सगळे.
काल रात्री खूप वेळ जागी होते DD News बघत. अगदी जवळ होते यान चंद्रप्रतलाच्या. रफ ब्रेक ऑपेरेशन पण यशस्वी झाले. त्यामुळे सगळे नीटच असणार. केवळ संपर्क तुटला आहे.
आज तकचे पाच जणं पोहचले पण
आज तकचे पाच जणं पोहचले पण चंद्रावर.
जबरदस्त ग्राफिक. :खोखजबरदस्त
जबरदस्त ग्राफिक.
चांद्रयान मोहिमेसाठी संपुर्ण
चांद्रयान मोहिमेसाठी संपुर्ण स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले होते त्यामुळे अपेक्षित निकाल आला नाही म्हणून शास्त्रज्ञांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे.
>> बरोबर. क्रायो इंजिन प्रमाणे विक्रम लॅंडर सुखरूप लॅंड झाले असते तर भारतीय शास्त्रज्ञांना अजून हुरुप आला असता. यश अपयश होतंच. भारताच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला गेला असता. असो. भारतीय शास्त्रज्ञ हे नक्कीच करून दाखवतील. पंतप्रधान आशावादी आहेत. मी तर म्हणेन ९९.९९ टक्के मोहीम यशस्वी झाली आहे.
पूर्ण मोहीम नीट पाहिली तर
पूर्ण मोहीम नीट पाहिली तर शांतपणे सर्व रिसोर्सेस योग्य रित्या, हवे तितकेच वापरून इसरो आजच्या दिवसापर्यंत पोहोचले आहे. आज यश मिळाले असते तर सर्वोच्च आनंद झाला असताच, पण म्हणून जास्त दुःखी व्हायचेही काही कारण नाही. फक्त भारतीय जनताच नाही तर पूर्ण जग काल डोळे लावून बसले होते लँडिंगकडे. सर्व भारतीयांना अभिमानास्पद वाटावी अशीच इसरोची कामगिरी आहे.
सर्व भारतीयांना अभिमानास्पद
सर्व भारतीयांना अभिमानास्पद वाटावी अशीच इसरोची कामगिरी आहे. +1
चांद्रयान चंद्रावर कोसळले
चांद्रयान चंद्रावर कोसळले असण्याची शक्यता खूप आहे. इस्रोची एकंदर प्रतिक्रिया पाहता हि शक्यताच अधिक वाटते.
https://www.technologyreview.com/f/614280/india-s-chandrayaan-2-lander-l...
पण आपले लोक भारी सेंटी वगैरे आणि लगेच मत बनवणारे असल्याने "संपर्क तुटला" वगैरे बातम्या सोडाव्या लागतात.
मोहीम अयशस्वी झालीय असे
मोहीम अयशस्वी झालीय असे म्हणता येणार नाही .
शेवटचे काही मिनिट खूप टेन्शन मध्ये गेले मी live बघत होतो .
आणि विक्रम चा संपर्क तुटला किती वाईट वाटले असेल इस्रो मधील संशोधकांना .
संपर्क तुटण्याची किती तरी कारणे असतील .
Lander क्रॅश झाला असेल .
आणि अशी किती तरी कारणे असतील जी आपल्याला माहीत नाहीत .
पण बाकी सर्व मोहीम जशी ठरवली तशीच पार पडली .
सर्वांचे मनापासून अभिनंदन
"यशस्वी" आणि "अयशस्वी" असे
"यशस्वी" आणि "अयशस्वी" असे शिक्के मारण्याची गरज असते का? मोहीम जशी ठरवली तशी पार पडली नाही हि वस्तुस्थिती आहे. अभिनंदन वगैरे सगळे भावनिक आहे. फारसा अर्थ नसतो. नासा इतकी वर्षे स्पेस प्रोग्राम करती आहे. तरीही अजूनही अनेकदा रॉकेट लॉंचिंग करताना बिघाड होतात. चालायचेच.
२.५ किलोमीटर होते ते केवळ आणि
२.५ किलोमीटर होते ते केवळ आणि वेगही नियंत्रित होता. Rough break operation was successful.
माझ्यामते कारण काही वेगळे असावे.
जर कोसळले असे गृहीत धरले तर ते कोसळल्यानंतर बंद पडायला हवे. म्हणजे ते चंद्रप्रतलावर पोचेपर्यंत सिग्नल मिळायला हवे होते. आधीच संपर्क कसा तुटला?
शक्यता आहे की ते आपल्या शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार नीट पोचले तिथे. पण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून सिग्नल सोडता येत नसतील; काही प्राकृतिक अडथळा असेल.
>>नासा इतकी वर्षे स्पेस
>>नासा इतकी वर्षे स्पेस प्रोग्राम करती आहे. तरीही अजूनही अनेकदा रॉकेट लॉंचिंग करताना बिघाड होतात. <<. +१
या घटने संदर्भात एडिसन साहेबांचं कोट अॅप्ट आहे - आय नेव्हर फेल्ड, आय हॅव जस्ट फाउंड १०.००० वेज दॅट वुडंट वर्क...
अवकाश मोहिमेत शास्त्रज्ञांची, अंतराळवीरांची आणि त्यांच्या कुटुंबियांची काय/कशी घालमेल होत असते त्याचं अतिशय सुंदर चित्रण फर्स्ट मॅन या चित्रपटात केलेलं आहे. आवर्जुन बघा...
शेवटच्या मिनिटाला तांत्रिक
शेवटच्या मिनिटाला तांत्रिक गडबड होऊन कोसळण्याच्या अनेक घटना पूर्वी घडल्या आहेत. मागच्या एप्रिल मध्येच इस्रायेल चे अवकाशयान अगदी अशाच प्रकारे शेवटच्या मिनिटात चंद्रावर कोसळले होते. हि काही फार दुर्मिळ घटना नाही. फक्त आपल्याकडे माध्यमांना हाताशी धरून जो हाईप केला जातो (राजकीय व इतर अनेक फायदे घेण्यासाठी) तो प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. "चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून सिग्नल सोडता येत नसतील" हे कुणी सांगितले?
मी सर्व वाचते आहे. काल
मी सर्व वाचते आहे. काल तब्येत बरी नसल्याने गोळी घेउन झोपले ती सकाळी ५.१२ लाच जाग आली. मग सवयी प्रमाणे इन्स्टाग्राम, ब्रीफिन्ग एन डी टीव्ही वाचल्यावर परिस्थिती कळली. मी पण मोहिम यशस्वीच झाली आहे असे समजते. कारण तिथ परेन्त पोहो चणे पण किती अवघड आहे. अनंत व्हेरिएबल्स चा सामना करावा लागतो. तसेच ह्या अनुभ्वाचा उपयोग पुढील मोहिमेत होईलच. आय अॅम विथ इसरो असे मी ट्वीट केले आहे.
मी नासा, स्पेस एक्क्ष इसरो सर्व फॉलो करते. स्पेस एक्स चे इंजिन ट्रायलस रॉकेट टेस्टिन्ग चे अनुभव बघणीय असतात. चंद्रावर जाणार
आपण. सितारोंसे आगे जहां और भी है.
माबोवरील अंतरीक्ष शास्त्र ज्ञ रॉकेट सायंटिस्ट पीएच्डी लोकांची लर्नेड मते वाचायला आव्ड्तील. प्लीज डू पिच इन. पक्षी लिहा.
"चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून
"चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून सिग्नल सोडता येत नसतील" हे कुणी सांगितले?>>>>> आजपर्यंत तिथे गेलेच कोण आहे हे सांगायला किंवा सिद्ध करायला? मी एक शक्यता मांडली.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारे चंद्रयान-२ पहिलेच.
आणि मला पडलेला प्रश्न अजून तसाच आहे. कोसळल्याने जर संपर्क तुटला असेल तर तो आधीच म्हणजे २.५ किमीवर असतानाच कसा तुटला?
ह्या अशा मोहिमांना यश अपयशाचे
ह्या अशा मोहिमांना यश अपयशाचे लेबल लावण्यात काहीच अर्थ नाही. उबग यावी इतका ड्रामा चालू आहे. टेक्निकली काय झालं, कुठे चुकले, सविस्तर असे वृत्तांकन वगैरे कुठल्याच मिडीयात नाही. साला बाजार भरवला आहे सगळ्याचा.
हे मात्र खरे. इतका इमोशनल
हे मात्र खरे. इतका इमोशनल ड्रामा का चालू आहे! एक तर आधीच मिडिया ने लँडिंग झालेच अशा थाटात आरोळ्या सुरु केल्या होत्या. फेल्युअर गृहित धरलेच नव्हते का या लोकांनी. अमेरिकेने आधी यश मिळवले अस्ले तरी त्यांच्या पण अनेक मोहिमा फेल होतात. पार्ट ऑफ द गेम. ऑब्जेक्टिवली पहावे ना त्याकडे. एकीकडे मूर्ख ट्रोलिम्ग तर दुसरीकडे भावनाविवश कविता !! दोन्ही सारखाच वेडेपणा.
चांद्रयान मोहीम यशस्वी झाली
चांद्रयान मोहीम यशस्वी झाली नाही ही बातमी दुःखदायक आहे पण इस्रो प्रमुख भावविवश झाले ही बातमी भितीदायक आहे. कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेणे वगैरे मिठी संप्रदायातील राजकारण्यांना शोभते, मिठी मारून रडणे एका वैज्ञानिक संस्थेच्या प्रमुखास नक्कीच शोभत नाही. सीवन भावविवश झाले असले तरी आपल्या या भावूकतेचाही प्रचारासाठी उपयोग केला जाऊ शकतो हे भान तरी त्यांनी ठेवायला हवे होते.
नासाच्याही अनेक मोहिमा अयशस्वी झालेल्या आहेत पण नासाप्रमुख अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या गळ्यात पडून रडल्याच्या चित्रफिती पाहण्यात नाहीत.
फार मोठ्या शास्त्रज्ञांनी इस्रो सांभाळली आहे, अनेक अपयशं पचवली आहेत.
मोहीम फत्ते झाली की टाळ्या वाजवून माफक आनंद साजरा करणे आणि मोहीम अयशस्वी झाली तर कारणमीमांसा करून दुसर्या दिवशी पुन्हा कामाला लागणे हीच इस्रो संस्कृती आहे. तीच रहावी.
इस्रो ही वैज्ञानिक संस्था आहे, राजकीय पक्ष नाही. चांद्रयान हे एक जटिल वैज्ञानिक यंत्र आहे, इव्हीएम मशीन नाही. स्वाभाविकच आहे की इस्रोचे यश अनिश्चित असणार.
इस्त्रोला शुभेच्छा. इस्रोने इस्रोच रहावे. ह्रदयानं नाही, मेंदूंनंच विचार करावा. इस्रोचं तेच बलस्थान आहे.
भविष्यात ही मोहीम इस्रो नक्की यशस्वी करणार यात मला कोणतीही शंका नाही कारण इस्रोची स्थापनाच मजबूत पायावर झालेली आहे.
-विश्वंभर चौधरी यांचे फेसबुक वॉल वरून साभार
{सीवन भावविवश झाले असले तरी
{सीवन भावविवश झाले असले तरी आपल्या या भावूकतेचाही प्रचारासाठी उपयोग केला जाऊ शकतो हे भान तरी त्यांनी ठेवायला हवे होते.}
त्यांच्या नावाने फेक ट्विटर अकाउंट उघडला गेला आहे. मोहीम सुरू.
चला धाग्याने अपेक्षित वळण
चला धाग्याने अपेक्षित वळण घेतलेलं आहे. यदाकदाचित मोहिम यशस्वी झाली असती तर ट्रोल्सनी इंटरनेट बंद पाडलं असतं यात शंका नाहि...
https://youtu.be/a_ZXfq6Ajo8
https://youtu.be/a_ZXfq6Ajo8
त्यांच्या नावाने फेक ट्विटर
त्यांच्या नावाने फेक ट्विटर अकाउंट उघडला गेला आहे. >>> ॲड्रेस असेल तर द्या म्हणजे त्या अकाऊंटवरचं काही नजरेस पडल्यास दुर्लक्ष करायला बरं.
<< एकीकडे मूर्ख ट्रोलिम्ग
<< एकीकडे मूर्ख ट्रोलिम्ग तर दुसरीकडे भावनाविवश कविता !! दोन्ही सारखाच वेडेपणा. >>
------ सहमत...
बीबीसी चा 13 minutes to the
बीबीसी चा 13 minutes to the moon हा पॉडकास्ट जमलं तर ऐका असं सुचवेन. खूप छान माहिती आहे moon landing ची. बाकी आपलं भारतीयांचं भावनाविवश होणं ह्यात काही नवं नाही. काही न बोललेलंच बरं.
https://twitter.com/cgbassa
https://twitter.com/cgbassa/status/1170072672266592256
EDL अशक्य अवघड आहे. वातावरण रहित आणि वातावरण असलेल्या ग्रहांसाठी. यात अपयश खूप सामान्य गोष्ट आहे.
मला वाटतंय की खूप आधीपासूनच
मला वाटतंय की खूप आधीपासूनच या मोहिमेला खूप हवा दिली गेली, एखाद्या लँडिंग चे live प्रक्षेपण या आधी इतर देशात दाखवले गेले की नाही याबद्दल मला अजिबात माहिती नाही पण आपल्याइथले बहुधा हे पहिलेच प्रकरण असणार, आता सर्वसामान्य लोकांपर्यंत या विषय अगदी डिटेल मध्ये पोचणार असेल तर चर्चा तर होणारच न.
१९७९ पासून आतापर्यंत SLV आणि
१९७९ पासून आतापर्यंत SLV आणि PSLV चे ३-४ अयशस्वी प्रक्षेपण झाले आहेत ( डॉ.अब्दुल कलाम इस्रोत असताना), परंतू कोणी शास्त्रज्ञ रडत बसले नाही, पुन्हा जोमाने कामाला लागल्याने मंगळ आणि चांद्रयान१ सारख्या यशस्वी मोहिमा होऊ शकल्या. प्रक्षेपण यशस्वी किंवा अयशस्वी झाले हे दूरदर्शन वरील बातम्या किंवा पेपर मधील बातमीतून समजायचे. आता प्रत्येक गोष्टींचा इव्हेंट बनवला जातो, त्यामुळे अपयश ना जनतेला पचवता येत, ना इस्रोच्या शास्त्रज्ञांना. मोदींच्या जागी कुठलाही प.प्र. असता तरी त्याने शास्त्रज्ञांना धीरच दिला असता.
मीडिया हाईपचा खरोखरीच उबग आला
.
मीडिया हाईपचा खरोखरीच उबग आला
मीडिया हाईपचा खरोखरीच उबग आला.
खरंतर वर म्हंटल्याप्रमाणे यात यशस्वी अयशस्वी असं काही नाही. आपली मोहीम अगदी इकोनॉमिकल होती. यापेक्षा कितीतरी जास्त गुंतवणूक असलेल्या एक्सपेडिशन फेल झाल्या आहेत.
अशा हाईपमुळे अकारण एक ताण वाढतो. हल्ली आपण मीडिया कंझ्युम करतो की मीडिया आपल्याला हेच कळेनासे झाले आहे.
Pages