चंद्रावर भारतीय पाउल पडते पुढे..... चांद्रयान लाइव्ह वॉच.

Submitted by अश्विनीमामी on 6 September, 2019 - 12:36

आज रात्रीतून चंद्रावर आपल्या इस्रो चे मून लँ डर उतरणार. ट्वि टर वर सर्व माहिती उपलब्ध आहे.
# चांद्र यान २ व # इस्रो फॉलो, करा.

https://www.business-standard.com/article/current-affairs/chandrayaan-2-... इथे पण माहिती आहे.

मी आत्ता पडी मारून रात्री एक दोन ला उठून बघेन. नाही नाही म्हटले तरी देव पाण्यात घालून ठेवलेत. १९६९ मध्ये अमेरिकेने चंद्रावर माणुस उतरवायचे जगप्रसिद्ध घटना घडली तेव्हा मी चार वर्शा ची होते. पण कथा कल्पना कवितां मधून चंद्रावर व अंतरा ळा त जायचे स्वप्न तेव्हा पासून जिवंत आहे. माहिती, मते ह्या त्यात काये एव्ढे अमेरिका क्यानडा तर कधीच जाउन चंद्र जुना झालाय. चायना पण जाउन आलाय. सर्व प्रतिसादांचे स्वागत.

भारतीय मून लँडरचे नाव विक्रम असे आहे. गो विक्रम डू अ गुड जॉब नाव.

तांत्रिक माहिती उद्या अपडेट करीन धाग्यात नाहीतर प्रतिसा दात. पण एक्साइट मेंट इज माउंटिन्ग. रेट्रो थ्रस्टर्स........

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ना, होपिंग की कम्युनिकेशन पुन्हा एस्टॅब्लिश होईल!! किती कष्ट, एनर्जी, मॅन अवर्स, रीसोर्सेस, आशा असतील या प्रोजेक्ट मधे!! ऑल द बेस्ट ! इतकेच म्हणू शकतो!
पब्लिकने लाइव टेलेकास्ट व्हिडिओ वर कमेन्ट ची सोय असल्यामुळे आचरट ट्रोलिंग सुरु केले होते. काय लोक असतात Sad

प्रश्नाचे उत्तर मिळाले. म्हणून संपादित.

Lol
अरे बापरे! आता अशाच व्हॉट्य्सअ‍ॅप जोक्सना सामोरं जावं लावणारे पुढचे काही दिवस!

चंद्रावर भारतीय पाऊल पडते पुढे असं शीर्षक हवं होतं. देशी शब्द ' सरकारमान्य देशी दारुचे दुकान' लायसन नं. अमूक तमूक यामुळे मला आवडत नाही.

सिवन आणि टीमचं अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. एकदम रडला बिचारा. पुन्हा एकदा खूप शुभेच्छा.

ISRO च्या पुर्ण टीमने खूप मेहनत केलेली. वाईट वाटणं साहजिकच आहे.पण तरीही खूप मोठी कामगिरी पार पाडली आहे त्यांनी.
खूप अभिमान वाटतो आहे त्या सर्वांचा.

चांद्रयान मोहिमेसाठी संपुर्ण स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले होते त्यामुळे अपेक्षित निकाल आला नाही म्हणून शास्त्रज्ञांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. भारतीय नागरिकांना शास्त्रज्ञांवर विश्वास आहे त्यामुळे भविष्यात ते नक्कीच यश मिळवतील.
पंतप्रधानांनी भाषणात या गोष्टीचा उच्चार केला आहेच. संपुर्ण देश इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या पाठीशी उभा आहे. त्यांनी गतकाळात भारतीयांची मान जगात अनेक वेळा उंचावली आहे आणि भविष्यात याहून अधिक सोनेरी क्षणांनी भारतीय नागरिकांना ते आनंदीत करत राहतील.

Proud of you ISRO

चांद्रयान-२ बाबत जे घडले त्यात वाईट वाटण्यासारखे किंवा धक्कादायक, दु:खदायक असे काही नाही आहे. तसे ते वाटणे हेच माझ्यासाठी धक्कादायक आहे.

हे अपयश आहे असे मी मानत नाही. या घटनेमधून शिकायचे, आणि पुढच्या वेळी झालेल्या चुका दुरुस्त करायच्या. शास्त्रज्ञांना पुढच्या मोहिमेसाठी शुभेच्छा.

संपूर्ण स्वदेशी असल्याने झाले असे समजणे अयोग्य आहे. मंगळयान पण स्वदेशीच होते. आणि ते पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले देखील. यावेळी आपला केवळ संपर्क तुटला आहे. अजूनही आस आहे.

मधुरा, <<<चांद्रयान मोहिमेसाठी संपुर्ण स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यात आले होते त्यामुळे अपेक्षित निकाल आला नाही म्हणून शास्त्रज्ञांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. >>>>
हे आहे ते पुर्ण वाक्य अर्धवट वाक्य कोट करून वेगळाच अर्थ ध्वनित होतो. पुर्ण वाक्य वाचा यात कुठेही स्वदेशी तंत्रज्ञानावर अविश्वास दर्शविलेला नाही. फक्त शास्त्रज्ञांना निराशा का आली त्याचे माझ्या दृष्टीने केलेले विवेचन आहे.

यातले टेक्निकल समजण्याइतपत ज्ञान नाही. पण ज्यांना आहे त्यांच्या मते हे फक्त 5 टक्के अपयश आहे. 95% यश orbiter योग्य ठिकाणी पोचून घिरट्या घालण्यात आहे. तिथे इसरोने यश मिळवले आहे. Orbitor चे आयुष्य वर्षभराचे आहे.

या निमित्ते जेव्हा मानव यानात बसून गेला, तिथे उतरला आणि सुखरूप परतला तेव्हा सर्व संबंधितानी किती ताण सहन केला असणार त्याची झलक मिळाली.

सोशल मिडियावर खूप जण या मुद्द्यावर ट्रोल करत आहेत इस्रोला. त्यांना काय ते सोडून दुसरे जमत नाही. 'ट्रोलिंग' ला बुद्धी लागत नाही. इथे आत्ताच 'या' संबंधी एका जाणकाराचा प्रतिसाद पाहिला.

असो. नरेशजी, मुद्दा पटला. Happy

साधना प्रतिसाद>>>> +१ कदाचित संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला तर १००% यश मिळू शकेल. Happy

या निमित्ते जेव्हा मानव यानात बसून गेला, तिथे उतरला आणि सुखरूप परतला तेव्हा सर्व संबंधितानी किती ताण सहन केला असणार त्याची झलक मिळाली.

खरे आहे

Pages