सोळा आण्यांची गोष्ट - पाहुणे - प्राचीन

Submitted by प्राचीन on 5 September, 2019 - 13:34

सरयूदास महाराजांच्या प्रवचनांना नियमित येणारा हरिराम आज आलेला नव्हता. हरिराम हा अगदी नेहमी प्रवचन मनापासून ऐकणारा परंतु साधा सरळ अशिक्षित मनुष्य. त्याच्या कानांवर जे काही पडत असे, त्यातील कितपत समजले असेल हे महाराजांना
नेहमीच गूढ वाटत असे ;त्याच्या भाबडेपणाची काहीशी कीवही वाटायची.
योगायोगाने प्रवचनाहून परत येताना सरयूदास महाराजांची
हरिरामशी भेट झाली.
"का बरं आला नाहीस आज सत्संगाला?"
"क्षमा असावी. महाराज. पाहुण्यांना निरोप देण्यात गुंतलो होतो."
"कोण एवढे महत्त्वाचे पाहुणे आले म्हणून सत्संग चुकला?" जरा नाराजीनेच महाराज विचारते झाले.
"माझा मुलगा महाराज. गेली पंधरा वर्षे माझ्याकडे तो पाहुणा होता. देवाघरचं बोलावणं आलं त्याला. त्यामुळे त्याला चांगला
निरोप द्यायला नको का? "

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण सगळे या पृथ्वीतलावर पाहुणेच त्यामुळे कोणाबद्दलही पझेसिव्ह असू नये हे प्रवचन देणाऱ्या महाराजांना साधा-सरळ-अशिक्षित-भाबडा हरिदासकडून शिकायला मिळालं...

पण आपला मुलगा मेल्यावर पाहुणे गेले म्हणणारा बाप चांगला की वाईट?
हे त्याला स्वतःहूनच वाटलं होतं की महाराज प्रवचनातून असली शिकवण देत होते?

आवडली कथा.

पण आपला मुलगा मेल्यावर पाहुणे गेले म्हणणारा बाप चांगला की वाईट?
हे त्याला स्वतःहूनच वाटलं होतं की महाराज प्रवचनातून असली शिकवण देत होते?
>>>
अ‍ॅमी, आपणच समजून घ्यायचे, शंभर शब्दात अजून किती काय सांगायचे लेखकाने

अ‍ॅमी, अहो महाराजांच्या प्रवचनातूनच हे हरिराम ला उमगलंय व ते त्याने पचवलंही आहे. पण हर्पेन म्हणाले तसंच शंभर शब्दांत बसवता आलं नाही. क्षणभर तरी वाचकाने अंतर्मुख होणं हेही साधलं.
सगळ्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद. पहिलाच प्रयत्न सांभाळून घेतलात. :स्मित :

पण आपला मुलगा मेल्यावर पाहुणे गेले म्हणणारा बाप चांगला की वाईट?>>>

तो रडला असता तर चांगला ठरला असता का?

इतकी वर्षे प्रवचन ऐकून त्याला तत्वज्ञान इतके कळले की पंधराव्या वर्षी अकाली गेलेल्या मुलाचा मृत्यू हा केवळ त्याच्या शरीराचा मृत्यू आहे, त्याचा आत्मा मुक्त झाला, तो अमर आहे हे तो सहज स्वीकारू शकला. 'नाराज' होणारे महाराज केवळ कोरडेपणे शिकवत राहिले, स्वतःची शिकवण कधीच मनाला भिडली नाही, म्हणून ते नाराज होऊ शकले.

इतकी वर्षे प्रवचन ऐकून त्याला तत्वज्ञान इतके कळले की पंधराव्या वर्षी अकाली गेलेल्या मुलाचा मृत्यू हा केवळ त्याच्या शरीराचा मृत्यू आहे, त्याचा आत्मा मुक्त झाला, तो अमर आहे हे तो सहज स्वीकारू शकला. 'नाराज' होणारे महाराज केवळ कोरडेपणे शिकवत राहिले, स्वतःची शिकवण कधीच मनाला भिडली नाही, म्हणून ते नाराज होऊ शकले.>>>>>>>>>> उत्तम विवेचन! Happy Happy शेवटचे वाक्य जास्त आवडले.

Khup Chan lihilay .... Negative comment kde lksh deu nka ... Kahi lok tevdhyasathich mayboli vr yetat... Good luck..m

> तो रडला असता तर चांगला ठरला असता का? > नसता का? मुल गेल्यावर दुःखी होणारे, ते व्यक्त करणारे वाईट असतात?

त्याची बायको काय विचार करत असेल यासगळ्याबद्दल?

> 'नाराज' होणारे महाराज केवळ कोरडेपणे शिकवत राहिले, स्वतःची शिकवण कधीच मनाला भिडली नाही, म्हणून ते नाराज होऊ शकले. > हे आलं लक्षात आधीच मी त्याअर्थाच्या वाक्यानेच प्रतिसादाची सुरवात केली आहे.

परिणामकारक.
कथेत लिहिले नाही म्हणजे तो रडला नसेल असे नाही.

नसता का? मुल गेल्यावर दुःखी होणारे, ते व्यक्त करणारे वाईट असतात?>>>>

आपण इथे कथेच्या अनुषंगाने बोलतोय ना? जगातली सगळी माणसे हरिरामसारखी असती तर आज बाहेर जे काय सुरू आहे ते असते का? मुळात बाहेरची दुनिया जशी आहे तशी असती का?

सख्खं, अति जिवलग कुणी वारलं तर मनापासून रडू येते. नातं लांबचे असलं की मृताच्या जवळच्या लोकांचा आक्रोश पाहून डोळे पाणावतात. पण बऱ्याच वेळा सख्ख्या नातेवाईकांना रडताना पाहिलेले नाही. साधना ताईंच्या प्रतिसादाशी शंभर टक्के सहमत.

> आपण इथे कथेच्या अनुषंगाने बोलतोय ना? >
हो कथेच्या अनुषंगानेच बोलतोय की. सुरवातीपासूनचे प्रश्नप्रतिप्रश्न:
अमी - पण आपला मुलगा मेल्यावर पाहुणे गेले म्हणणारा बाप चांगला की वाईट?
साधना - तो रडला असता तर चांगला ठरला असता का?
अमी - नसता का? मुल गेल्यावर दुःखी होणारे, ते व्यक्त करणारे वाईट असतात?

उत्तरं कुठंयत??

> जगातली सगळी माणसे हरिरामसारखी असती तर आज बाहेर जे काय सुरू आहे ते असते का? मुळात बाहेरची दुनिया जशी आहे तशी असती का? > irrelevant!

अमर99, खूप जवळच्या माणसाच्या जाण्याच्या धक्क्याने बधिरता येते.

पण आपण इथे कथेच्या अनुषंगाने बोलतोय जिथे हरिराम धक्क्याने बधिर झालेला नाही. त्याला आयुष्याचे तत्वज्ञान मनापासून पटले आहे व त्यामुळे तो मुलाच्या मृत्यूकडे निश्चलतेने व तटस्थतेने पाहू शकलाय.

इतकी तटस्थता बाणवणे महाराजांनीही जमलेले नाही, आपल्यालाही शक्य नाही. Happy

असो मीच माझी उत्तरं देऊन टाकते:

> पण आपला मुलगा मेल्यावर पाहुणे गेले म्हणणारा बाप चांगला की वाईट? > वाईट. आणि त्याला असलं कायतर फालतू शिकवणारा (+ ते स्वतः आचरणात न आणणारा) महाराज तर त्याच्याहून जास्त वाईट, ढोंगी

> तो रडला असता तर चांगला ठरला असता का? > हो.

> मुल गेल्यावर दुःखी होणारे, ते व्यक्त करणारे वाईट असतात? > मुल अकाली गेल्यावर दुःखी होणं साहजिक आहे, ते व्यक्त करणंदेखील साहजिक आहे.

घरात कोणाचाही 'अकाली' मृत्यू झाला तर it leaves lifelasting impact on other family members.... I am surprised by the way people trivialize this kinda grief here, कधी धार्मिक आधार घेऊन तर कधी फिलॉसॉफिकल आधार घेऊन (हे पूर्वी दुसऱ्या एक धाग्यावर झालं आहे)

असो. टाटा.

लिहीत रहा ग प्राचीन.

मला एक बहुतेक वसई भागातील एक फादर ( नाव आठवत नाही) यांनी लिहिलेले आठवलं. एकदा परदेशात गेले असता एका स्त्रीनं त्यांना तिचे वडील वारले म्हणून प्रार्थनेसाठी बोलावलं होतं. हे तिकडे गेले तर ती बाहेर शेतात कामाला गेली होती. ती आली व दार उघडले. वडिलांचं शरीर कॉफीन मध्ये ठेवले होते. मग दोघांनी प्रार्थना केली. फादर यांना त्या महिलेचे खूप नवल वाटले होते. शोक करणं नाही. की तणावग्रस्त पण नाही. घरात मृत्यू झाला असून इतकी नॉर्मल वागत होती .

हो कथेच्या अनुषंगानेच बोलतोय की. सुरवातीपासूनचे प्रश्नप्रतिप्रश्न:
अमी - पण आपला मुलगा मेल्यावर पाहुणे गेले म्हणणारा बाप चांगला की वाईट?>>>

कथा वाचल्यावर हरिरामची मानसिक अवस्था लक्षात येते. त्यामुळे तो रडला नाही हे चांगले. तो रडला असता तर कथा लिहिण्यात काहीच अर्थ नव्हता. एक सामान्य महाराज, एक सामान्य श्रोता, एक दिवस आला नाही कारण मुलाचे अंत्यसंस्कार करत होता.

अमी - नसता का? मुल गेल्यावर दुःखी होणारे, ते व्यक्त करणारे वाईट असतात?>>

Irrelevant. कथेत फक्त महाराज व हरीराम आहे. इतर दुःखी लोकांचा स्कोप नाही.

घरात कोणाचाही 'अकाली' मृत्यू झाला तर it leaves lifelasting impact on other family members.... I am surprised by the way people trivialize this kinda grief here, कधी धार्मिक आधार घेऊन तर कधी फिलॉसॉफिकल आधार घेऊन
>>
म्हणजे शोक न करता कोणी इतर उपायांनी सावरायचा प्रयत्न करु नये असं सुचीत होतंय यातुन. लोकांना जबरदस्तीने असं करायला लागले तर चूक पण कोणी स्वतःहून करतंय तर मग चूक कसे?

Pages