Submitted by प्राचीन on 5 September, 2019 - 13:34
सरयूदास महाराजांच्या प्रवचनांना नियमित येणारा हरिराम आज आलेला नव्हता. हरिराम हा अगदी नेहमी प्रवचन मनापासून ऐकणारा परंतु साधा सरळ अशिक्षित मनुष्य. त्याच्या कानांवर जे काही पडत असे, त्यातील कितपत समजले असेल हे महाराजांना
नेहमीच गूढ वाटत असे ;त्याच्या भाबडेपणाची काहीशी कीवही वाटायची.
योगायोगाने प्रवचनाहून परत येताना सरयूदास महाराजांची
हरिरामशी भेट झाली.
"का बरं आला नाहीस आज सत्संगाला?"
"क्षमा असावी. महाराज. पाहुण्यांना निरोप देण्यात गुंतलो होतो."
"कोण एवढे महत्त्वाचे पाहुणे आले म्हणून सत्संग चुकला?" जरा नाराजीनेच महाराज विचारते झाले.
"माझा मुलगा महाराज. गेली पंधरा वर्षे माझ्याकडे तो पाहुणा होता. देवाघरचं बोलावणं आलं त्याला. त्यामुळे त्याला चांगला
निरोप द्यायला नको का? "
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली
आवडली
सुंदर मतितार्थ....
सुंदर मतितार्थ....
वाह!! त्याला खरे अध्यात्माची
वाह!! त्याला खरे अध्यात्माची रहस्य कळले.
छान आहे, महाराज पॉवरफुल
छान आहे, महाराज पॉवरफुल दिसतोय.
कथा आवडली कसे म्हणू? वाचून
कथा आवडली कसे म्हणू? वाचून चर्र झाले मनात.
(नात्यातली १ मुलगी गेल्याच वर्षी वयाच्या ९ व्या वर्षी गेली. तिचा सहवास माझ्या नशीबात तेव्हडाच होता, असे तिची आई म्हणते, ते आठवले.)
Pages