तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

Submitted by किल्ली on 28 May, 2019 - 03:32

आपल्या सर्वांचे आंतरजालावरील जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे मायबोली!

येथे आपण कित्येक लेखकांनी लिहीलेल्या कथा, कविता, गझल, लेख आणि बर्‍याच प्रकारचे लिखाण वाचत असतो.
काही लेखक आपल्याला त्यांच्या लिखाणातुन हसवतात, तर काहींचे लिखाण वाचुन डोळ्यांत टचकन पाणी येते.
काही जण अनुभव मांडतात, ते वाचताना आपणही ते क्षण जगतो.
काहींच्या रहस्य आणि भयकथांमध्ये आपण हरवुन जातो आणि थरार अनुभवतो.
कधीतरी असे लिखाण वाचण्यात येते की ते आपल्याला विचार करण्यास भाग पाडते, आपण अन्तर्मुख होतो.

असे वैविध्यपुर्ण लेखन करणारे लेखक येथे नेमाने येत असतात. आपल्याला ते त्यांच्या लिखाणामधुन आणि प्रतिसादांमधुन कळत जातात.

तर अशा गुणी माबोकर लेखकांचे चाहते आणि वाचक ह्या नात्याने, तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

चला तर मग करा सुरुवात!

विशेष सुचना:
एकदा सगळी नावे आली की आपण भेट आयोजित करुया.
गटग करु शकतो किंवा तुनळी वर live podcasts करता येइल.

कोणत्या माबोकरांना भेटायला आवडेल यासाठी वेगळा धागा आहे.
ईथे फक्त लेखक आणि लेखिकांची नावे लिहा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< किरणूद्दीन ही फडतूस आयडी असणाऱ्या फालतू लेखकाला मी स्वप्नात देखील भेटणार नाही. >>
------ तुम्हाला स्वप्नात भेटण्यासाठी तुमची परवानगी असणे गरजेचे नाही. नाहीतरी ९० % स्वप्ने जाग येण्या अगोदरच विस्मृतीत जातात त्यामुळे फरक काय पडतो?

ज्यांना ज्यांना, ज्यांना भेटायचेय त्यांनी त्यांनी त्यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरू केले असतील तर त्याची माहिती इथून पुढच्या प्रतिसादात द्यावी.

पण ज्यांना भेटावासं वाटतं त्यांनाही तुम्हाला भेटावसं वाटतय हे कसे कळणार?
नाही तर दूरून पाहिलं तरी चालेल का?

कुणाकुणाच्या यादीत नाव आलय त्यांना व्यनि केला पाहिजे . ( पुर्वीच्या भाषेत उलट टपाली उत्तर दिलं पाहिजे.) मंत्री लोक ट्विटर संदेश पाठवतात तसं. )

फेसलेस मॅन ऑफ मायबोली / मायबोलीवरील अश्वत्थामा ... फॅन आहे मी त्या साहेबांचा ... त्यांची असंख्य रूपे असल्याने एकच नाव घेतलेलं आवडणार नाही त्यांना ..
1ce479998f22c375d305661008428d051a54d69923e5f29cad3961e2b8a9e5ce
dialogues-from-netflix-series-sacred-games-1531741308

बेफिकीर
बेफिकीर
बेफिकीर
बेफिकीर
बेफिकीर
बेफिकीर
बेफिकीर

अमुक एक व्यक्तीला/ व्यक्तींना भेटायला आवडेल याचा अर्थ इतर व्यक्तींना भेटायला आवडणारच नाही असा नसतो.
पण समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला भेटायला आवडेल पण त्या व्यक्तिला तुम्हाला भेटायला आवडेल की नाही हा मुद्दाही विचारात घेतला पाहिजे. शिवाय माबो किंवा तत्सम संकेतस्थळावर चर्चांमधून वा लेखनामधून तयार होणारी प्रतिमा व प्रत्यक्ष भेटल्यानंतर निर्माण होणारी प्रतिमा यात तफावत असू शकते. कधी अपेक्षभंगही असू शकतो. थोडक्यात जालीय प्रतिमा व वास्तव यात अंतर असू शकते. कधी ते सुसह्य असेल तर कधी दु:सह्य. पण काही असो हा एक मानसशास्त्रीय सराव आहे. Happy

घाटपांडे खरंय तुमचं. आपण नेहमी समोरच्या व्यक्तिविषयी गृहीतके बनवितो. आणि जेव्हा आपण बनविलेली गृहीतके तुटतात तेव्हा दुख आपल्यालाच जास्त होतं.

मला बेफिकीर बोक्या सारखे वाटतात त्यांची पहीली बोका गोष्ट वाचली होती, आणि मला बेफिकीर बोक्या सारखे असतील तरच भेटायला बरे वाटेल

मला बेफिकीर बोक्या सारखे वाटतात त्यांची पहीली बोका गोष्ट वाचली होती, आणि मला बेफिकीर बोक्या सारखे असतील तरच भेटायला बरे वाटेल>>>>> नाही ना ते बोक्यासारखे नाही दिसत (हलके घ्या)
पण भेटण्यासारखी व्यक्ती आहेच (वल्ली पण?) Lol Lol

avi.appa

नो वन. जालिय व्यक्तीमत्व व खरे व्यक्तीमत्व फार वेगळे असते. जालावर तूफान हसवणारी व्यक्ती, प्रत्यक्षात घुमीही असू शकते. सो लेट द इन्ट्रिग स्टे अ‍ॅज इट इज.
__________
हम्म! ऑन अ सेकंड थॉट - अदिश्री व हीरा यांना भेटायला आवडेल. स्वाती२, सनव, अमा - यांनाही. Happy

मला दक्षिणाताई,रश्मीताई,साधनाताई,मनीमोहोर ताई,किल्लीताई,मी_अनु ताई,बोकलत सर,अतरंगी सर,मानव(पृथ्वीकर)काका,सुनिधी ताई,आशुचँप दादा, चिनूक्स दादा या आणि अशा अनेक आयडींना प्रत्यक्ष भेटायला आवडेल.

Movie date with pious and farend. Chhappar phaad ke hasenge

मला दक्षिणाताई,रश्मीताई,साधनाताई,मनीमोहोर ताई,किल्लीताई,मी_अनु ताई,बोकलत सर,अतरंगी सर,मानव(पृथ्वीकर)काका,सुनिधी ताई,आशुचँप दादा, चिनूक्स दादा या आणि अशा अनेक आयडींना प्रत्यक्ष भेटायला आवडेल.

नवीन Submitted by कमला on 30 March, 2020 - 22:01
>>>
मग गटग शिवाय पर्याय नाही

वर्गातील हुशार मुले लक्षात असतात आणि खोडकर
ही यादी प्रत्येकाने आपापल्या सोईनुसार घ्यावी.
परिचित
रश्मी
ऋन्मेश
बोकलत
चीनुक्स
विनिता झक्कास
आणि अर्थात किल्ली
अतुल ठाकुर
कौतुक शिरोडकर
कवठीचाफा
फक्त भेटायचं नाही तर यांच्याशी मैत्रीयांना करायला आवडेल

माझ्या यादीत काही नाव ऍड झालीयेत..
अजय चव्हाण,
मी मधुरा,
सामो,
आनंद (खुशादा),
बिपिन सांगळे,
सिद्धि
अजुनही काही नाव आहेत. लगेच आठवली ती लिहिली..

धन्यवाद सामो, मलाही तुम्हाला भेटायला आवडेल. शिवाय अन्जू, दिनेशदा, बेफिकीर, अवल, दाद, विशाल कुलकर्णी, शशांक पुरंदरे, पाथफाईंडर, दक्षिणा ,साधना, चिनुक्स, कुलू ,हीरा आणि अमा.
रोज कुणी तरी नवीन add होईलच . यादी लांबत जाणार आहे for sure. Happy

Pages