रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, तुम्ही म्हणताय ते एकदम बरोबर आहे.. त्यामुळे मला त्या मालिकेच्या सेट जाण्याची फार ईच्छा होत असते.. सर्वान्ना एकदा भेटुन यावेसे वाटते.

कुणाला माहित आहे का या मालिकेच्या सेट वर जाण्यासाठी नेमके कोठे जावे लागेल..? तिथे आसपास पाहण्यासारखी इतर कोणती ठिकाणे आहेत..? रहाण्यासाठी चांगले हॉटेल / घरगुती सोय आहे का..??

छायाचा लग्न राजग्याशी न होता कोणाशी होतं? मग विधवा कशी होते?

पाटणकर बायकोची पत्रिका पहात नाही का? इतकी वर्षे लपवून कसे ठेवते.

कुणाला माहित आहे का या मालिकेच्या सेट वर जाण्यासाठी नेमके कोठे जावे लागेल..? तिथे आसपास पाहण्यासारखी इतर कोणती ठिकाणे आहेत..? रहाण्यासाठी चांगले हॉटेल / घरगुती सोय आहे का..??
Submitted by DJ.. on 29 August, 2019 - 13:26

https://goo.gl/maps/7165i8c9HKBNY2x27

Google Map वर हे location 'नायकांचो वाडो' म्हणूनच save केलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आकेरी गावात आहे हा सेट. Google Map वर आकेरी, महाराष्ट्र या नावाने search केलेत तरी या वाड्याचेच फोटो दिसतात. मुंबई - गोवा महामार्गावरील 'श्री ब्राम्हण मंदिर' पासून (जेथे मुंबई-गोवा महामार्ग व वेंगुर्ला - बेळगाव मार्ग एकमेकांना छेदतात) केवळ २.५ किमी वर आहे.

सूचना: वरील सर्व माहिती Google Map वरील माहितीवर आधारित असून मी प्रत्यक्ष भेट दिलेली नाही.

@ विक्षिप्त_मुलगा : अरे वा.. हे तर मालवण - सिन्धुदुर्ग च्या जवळ दिसते.. तिथे राहुन हा परिसर पाहु शकेन. प्लॅन करायलाच हवा.
@झंपी :
छायाचा लग्न राजग्याशी न होता कोणाशी होतं? मग विधवा कशी होते? >> दुसर्‍याच कुणाशी तरी चायाचे लग्न होते जो लग्नाच्या दुसर्‍या दिवशीच मरतो (अ‍ॅक्सिडेंट होतो म्हणे कसलासा..!)

पाटणकर बायकोची पत्रिका पहात नाही का? इतकी वर्षे लपवून कसे ठेवते.>> दिव्याखाली अंधार म्हणतात ते यालाच.. Proud

अंजू Proud

अहो डिजे, जरुर जा तिथे. मागे ह्या सिरीयलचा पहिला भाग चालू होता तेव्हा एक मायबोलीकर ( नाव लक्षात नाही, त्या जुन्या बाफावर आहे) तिथे जाऊन वाडा व शुटिंग बघुन आलाय. प्रत्यक्षात वाडा लहान आहे म्हणे. हो आकेरी गावातच चालू आहे हे सर्व, कारण वाडा तिथलाच ना. हायवेपासुन आत दिसतोय. फॅमिली बरोबर जाण्यापेक्षा मित्रांबरोबर जावा, कारण जवळपास हॉटेल वगैरे नसेल तर उगाच बायका-मुलांची गैरसोय होईल.

कारण जवळपास हॉटेल वगैरे नसेल तर उगाच बायका-मुलांची गैरसोय होईल.>>>> don't worry... बिनधास्त जा तिथुन मालवण ४० किमी आहे, मालवण, वेन्गुर्ला सावंतवाडी अशी बरीचशी छोटी शहरे आहेत आणि भरपूर हॉटेलं आहेत. फिरायला खुप जागा आहेत आणि आता पावसानन्तर वातावरण सुद्धा मस्त असेल.

अरे वा... मग गणपतीनंतर जाऊनच येईन आकेरीला... माई, दत्ता, सरिता, छाया, पांडु, नाना, आबा, वच्छी, शोभा, पाटणकर, पाटणकरीण आणि हो आण्णांना Angry पण भेटुन येईन..!

सिंधुदुर्ग, मालवण, सावंतवाडी पण बघेन. Bw

अरे वा... मग गणपतीनंतर जाऊनच येईन आकेरीला... माई, दत्ता, सरिता, छाया, पांडु, नाना, आबा, वच्छी, शोभा, पाटणकर, पाटणकरीण आणि हो आण्णांना Angry पण भेटुन येईन..!
सिंधुदुर्ग, मालवण, सावंतवाडी पण बघेन. Bw
Submitted by DJ.. on 29 August, 2019 - 15:41

Dj.., येथे selfie upload करायला विसरू नका!

सध्या नक्की काय चाललं आहे सिरीयल मध्ये कोणी सांगेल का? माझं बिगबॉस च्या व्यसनामुळे रोज राहून जातं, आणि याचं पुनरप्रक्षेपण पण नाही येत.

सध्या नक्की काय चाललं आहे सिरीयल मध्ये कोणी सांगेल का?>> काल रात्री सरिता-दत्ता माधवाच्या लग्नाक मुंबैक निघालेलो असत. त्येंका स्टँडवर नेऊक रिक्षा ईली असत. माई दोघांक निरोप देयाक वाड्याचो दर्वाजात ईली अन घात झालो.. पांडुन नाट लावल्यानी Uhoh त्येका पण मुंबैक येऊचा म्हनुन हट्ट धरल्यानी. पण माईन त्याक समजावला. पण पांडुचा नाट असंय.. त्यातुन कोण सुटलाहा..? दत्ता-सरिता पन सुटलो नाय.. त्येंका घेऊन जाणार्‍या रिक्षेक आण्णा अन रघुकाका आडवो येतले.. मग काय... कसनुसं चेहरो करुक दत्ता-सरिता आजच्या भागात परत फिरतले Proud

बाकी थंय पाटणकरणीक चुक उमजली असां.. आता तां आण्णा नाईकाचो बदला घेऊक व्हया..
छायाक पण लग्नाक जाऊचा असा... पण माई नको म्हणतली..
आबान रातराणीचो २ तिकिटांचो रिझर्वेशन करुन आणलाहा.. अन ता तिकिट आल्या-गेल्यालो दाखवुन वच्छी जाहिरात करताहा..! Proud

Dj.., येथे selfie upload करायला विसरू नका!

Submitted by विक्षिप्त_मुलगा on 29 August, 2019 - 13:52>> व्हय.. जाउन ईलो कां अपलोड करतांव ..! Biggrin

अन तां तिकिटं आल्या-गेल्यालो दाखवुन वच्छी जाहिरात करताहा..!

'ती तिकीटा' असं पाहिजे (अनेकवचन आहे म्हणून, एकवचन म्हणजे एकच तिकीट असेल तर 'ता तिकीट' बरोबर आहे.)

सा न्वी@सान्वी : Bw

@ विक्षिप्त्_मुलगा - चुक सुधारल्यानी Bw (एकच तिकिट व्हता)

आज शोभाचो जीव जातंलो..! साशीसाठी आपलो जीव धोक्यात घातंलो..! Uhoh
वच्छीन आधी झीलाक गिळल्यान अन आता सुनेक गिळताहा.. अगो कुठे फेडशान हे पाप..!! Angry

आण्णा एक एक करुन समद्यांचो कलमं लावुक असां.. आता उरलेल्यांचो कलम लागुचो आत आकेरीक सेटवर जाऊक व्हया.. Wink Wink Wink

जीव जातंलो.
जातलां हे स्त्रीलिंगी रूप.

शोभा मेलां नसां.. जित्ता असां. बंदुकीचो गोळ्यो हाताक चाटुन गेल्यान.. तिकां इस्पितळात दाखल केल्यानी.

वच्छी काल जोमात व्हतां. आण्णाचो बखोटीक धरान पोलिस त्येका गाडीत घालुक चौकीत नेतलां.

शोभावर आण्णान गोळ्यो झाडल्याहा तरीपण त्याने पोलिसांक खोटा का सांगितल्यान..? Uhoh

शोभाचो कायतरी प्लान असां.. नायतर तिचां साशी बाजुला बसलेलां असताना आण्णाक असां वाचवण्याचो खेळ खेळुचा नाय..!

मी सध्या राखेचा वन बिंज वॉच करत असल्याने एपिसोड ६८ वर आहे सध्या. घरात भानामति चे प्रयोग होत आहेत. सरिता व ठोकळी कार मध्ये अडकून बसतात तो भाग चालू आहे. सुसल्या आईचे दागिने मागते. माई सुनांमध्ये भेदभाव करते ते आव डले नाही. ठोकळीला चेन व सरिताला कधीच काही नाही. पूर्वा नर्वस होते हे बघुन. दत्ता व सरिता फक्त राबायला आहेत असेच फील येते. पांढर्‍या साडीच्या बाईचे काय रहस्य आहे.

अभिरामालाच आता देविका बद्दल संकोच वाटू लागला आहे असे वाट्ते. ती नाथाची बायको घरात चोर्‍या करते का? माल सर्व नार्वेकराकडे जातोय.

डिजे, शोभाने जर सत्य सांगीतले असते तर तिला नाईकांचा वाड्यात परत कसे येता येईल? नाईकांच्या घरातले दागिने, पैसे, धान्य हे सारे ती हळु हळु लंपास करु शकेल ना परत. आणी माईचा विश्वास व सहानुभूती मिळेल ते वेगळेच. माईच्या घोवाक का एक होऊ दिले नाय ना तिने.

रश्मी.. वयनी, तु बोलतां तां सगळं पटतां गो..! वच्छीक पटल्यान तां माका पन पटुक व्हया ना..? मगे..! Wink
कुडतरकरांक जां पटतां तां सगळ्यांक पटुक व्हया..! Proud

शनवारचो भागात जाम मजा आल्यान.. माई अन दत्तो आण्णाच्या खोलीत पन व्हईत अन खाली ओसरीत पन व्हईत.. तां बघुक माका तर राखेचा२ चो प्रोमोच आठल्यांन..

बाकी माई अन दत्ताक आण्णा घाबरल्यान ह्ये बघुन माझ्या डोळ्यांचो पारणं फिटल्यान..! Proud

आज आबा मरतल्यां असां वाटताहा.. वच्छीन स्वतःच्या इर्षेपायी आधी झीलाचो बळी दिल्यान.. मगे सुनेक अर्धमेला केल्यान... आता घोवाचो मुडदो पाडतलो..! Uhoh

कालचो भागात आण्णा वच्छीच्या घराचो कुंपणाचो दांडका उपसताहा असां दाखावल्यान.. तो दांडका आता कुणाचो वर्मी बसुक व्हईत तां आज दिसतले..! (व्याकरणात चुका असल्यास कृपया सांगावे Uhoh )

आबा मेलो नसां.. वच्छी अन शोभा पन बरा असां. Bw

आण्णा झोक्यावर बसुक च्याय खात असतां त्या टायमाक शोभा वाड्यार जाउक काम मागतले.. तिकां बघुक माई, दत्ता, सरिता सगळ्यांचो पाचावर धारण बसतलो. पण शोभा हुशार आसंय.. आण्णाचो पाय धरुक नाटक करतल्यान अन आण्णान खाली केलेलो च्यायचो कोप घेऊन भुतुर जातलां..! तिकां आण्णान घरात घेतलो हे बघुक आण्णा, दत्ता, सरिताक जाम टेंशान ईलो. :आओ:

(व्याकरणात चुका असल्यास कृपया सांगावे Uhoh ) >>> साध्या मराठीत लिहा ना वाचायला अगदीच विचित्र वाटते तुमची मालवणी, व्याकरण तर बघायलाच नको ........ खऱ्या मालवणी भाषिकाला त्याच्या भाषेची अशी चिरफाड नाही सोसत. प्लीज _/\_

Pages