Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04
रात्रीक ख्योळ चालल्यान
आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.
.
आण्णा - हरी नाईक
माई - इंदु हरी नाईक
छाया - छाया हरी नाईक
माधव - माधव हरी नाईक
दत्ता - दत्ता हरी नाईक
सरिता - सरिता दत्ता नाईक
पांडु
वच्छी - वत्सलाबाई
भिवरी
शेवंता - पाटणकरीण
पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान वाटले काल-परवाचे भाग.
छान वाटले काल-परवाचे भाग.
आज पाटणकरीण आण्णाचे कान भरवुन छायाच्या प्रियकराचा नंबर लावणार असे दिसते.
पहिल्या सिझनमध्ये छायाचा
पहिल्या सिझनमध्ये छायाचा बाहुला होता त्याची ह्या सिझनमध्ये बाहुली कशी झाली बुवा आणि ती बाहुली पण बेडवर अगदी आण्णासारखीच पोझ घेउन झोपली होती. शेवंताने आण्णाला कर्ता म्हटल्यावर हसू आलं. काहीही काम न करता दारु ढोसत बायकोपोराना गुरासारख्ं वागवनारा माणुस कर्ता?? धन्य आहे!! आता छायाची ज्योती बने ज्वाला खरंच झालेय का आण्णाला जास्त झाल्याने भास होताहेत ते कळेल उद्या. छायाचा नवरा कसा गेला ते कोणी विचारलंच नाही की. आण्णा पाटणकरला त्या ब्रिजबद्दल विचारत होते तो पडला काय. पण मग पाटणकराला तर काहिच माहित नाहिये की.
इतके दिवस मालिका तिथल्या तिथेच घोटाळत होती म्हणुन पाहायचं बंद केलं होतं. सरिताची व्यक्तिरेखा आता इतकी समजुतदार आणि नंतर इतकी आक्रस्ताळी दाखवलेय. माणुस एव्हढा बदलतो?
बाकी एक माई सोडली तर
बाकी एक माई सोडली तर सिरियलीतल्या तमाम बाया जहांबाज....थोडक्यात माझ्या आजीच्या शब्दात सांगायच तर 'नवर्याला फुटाण्याला विकुन येतिल' असल्या ढालगज भवान्या दाखवल्यत. मग ती वच्छी असो, वा शेवन्ता किंवा छायाची सासू. आणि नवरे एकजात सुक्के बोंबील
बाकी माधवाला त्या आडगावात
बाकी माधवाला त्या आडगावात फोनला स्पष्ट रेंज येते ते पाहुन आश्चर्य वाटलं. वच्छी आणि शोभा एकदम हिन्दी पिक्चरच्या शेवटी बेड्या पडायच्या एक मिनिट आधी उपरती होणार्या व्हीलनसारख्या चांगल्या वागू लागल्यत की.
चांगली चाललीय मालिका.. मी
चांगली चाललीय मालिका.. मी एकही भाग सोडत नाही.. एकजरी भाग चुकला तरी रीपीट टेलीकास्ट नाही रे बाबा.. आणि टेलीकास्ट चुकलं म्हणुन कवातरी नंतर झी५ वर पहाण्यात ती मज्जा नाय..!!
मला हा दुसरा भाग फारसा
मला हा दुसरा भाग फारसा आवडलेला नाहिये. पहिल्यचा शेवट गंडला असला तरी बाकीची मालिका बरीच बरी होती. आताही इंटरेस्ट वाटतोय तोवर पाहणार. मग स्विच ऑफ़.
पहिल्या भागातली सांगड या
पहिल्या भागातली सांगड या भागात जाणवते. पहिल्या भागात असे का घडले असेल याची उत्तरे या भागात मिळत आहेत.. काही बारीक-सारीक बाबीत चुका आहेत पण कोकणी खेडवळ बाज पक्का टिकवुन ठेवण्यात मालिकेला यश मिळाले आहे हे खुप अभिनंदनीय आहे.
मी पहिला भाग पहिला नव्हता .
मी पहिला भाग पहिला नव्हता . अण्णाला कसा मरण येतं ते पहायचं आहे ते पहिल्या भागात दाखवलंय का?
मी पहिला भाग पहिला नव्हता .
मी पहिला भाग पहिला नव्हता . अण्णाला कसा मरण येतं ते पहायचं आहे ते पहिल्या भागात दाखवलंय का?>> आभिरामचं लग्न असतं. सगळे घरी कामात असतात. अचानक नानांना काहितरी दिसतं.. ते बरळतात.. आज काहितरी घडाणारच.. आणि आण्णा गप्प्कन मरतो.. माईच्या हातुन हळदी-कुंकवाचं ताट दण्कण फरशीवर आदळतं.. बस्स...... एवढंच होतं पहिल्या भागात.
मला वाटतं हार्ट एटेक येउन ते
मला वाटतं हार्ट एटेक येउन ते बसल्या जागीच जातात......घरातल्या लोकाना फारसं काही करता येत नाही
छाया आणि माधव सोबत माईला काही
छाया आणि माधव सोबत माईला काही दिवस मुंबईला जाता आलं नसतं का? कारण पटल्ं नाही
छायाची बाहुली कसली क्यूट आहे.
छायाची बाहुली कसली क्यूट आहे. मला फार आवडते ती. बाकी आता छायाच्या घोवाचं भूत आलंय का नाईकान्च्या घरात?? ह्यांच्या घरात माणसं कमी, भूतंच जास्त दिसतात.
धन्स dj
आभिरामचं लग्न असतं. सगळे घरी कामात असतात. अचानक नानांना काहितरी दिसतं.. ते बरळतात.. आज काहितरी घडाणारच.. आणि आण्णा गप्प्कन मरतो.. माईच्या हातुन हळदी-कुंकवाचं ताट दण्कण फरशीवर आदळतं.. बस्स...... एवढंच होतं पहिल्या भागात.>> धन्स dj
काल छायाच्या भुमिकेचे वेगळेच
काल छायाच्या भुमिकेचे वेगळेच कंगोरे समोर आले. छान अॅक्टिंग करते ही छाया.
आण्णा आणि पाटणाकरीण काल पासुन
आण्णा आणि पाटणाकरीण काल पासुन पाटणकर हाउस मधे जाम धिंगाणा घालत आहेत.. बाहेरुन दाराला कुलुप.. आतमधे नुसता धुडगुस.. त्यात पाटणाकरीण चांगली डांसर निघाली मग काय.. आण्णासाठी तर हे एकावर एक फ्री बोनांझा..!
आणि अशात आज दत्ता कुलपाची चावी घेऊन तिथे येतोय.. पहायला विसरु नका..
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/57443
माझ्या मुलीला यु ट्युबवर
माझ्या मुलीला यु ट्युबवर कुठल्याही आवडत्या मालिकेचे जुने भाग पहायची सवय लागलीय. परवा ती राखेचाचे जुने एपिसोड पहात होती. त्यात दत्ता टाकुन आला होता. मग अभीराम त्याची समजूत काढतांना म्हणत होता की तू सर्वांकरता खूप केलेस. छायाचा नवरा गेला तेव्हा मी तुझ्या डोळ्यातले अश्रु बघीतलेत. आँ ! छायाचे लग्न झाले तेव्हा तर अभीराम लहान होता व दुसर्या गावी होता ना? या नवीन राखेचा मध्ये छायाच्या लग्नात तर अभीराम माका खयं दिसला नाय, मगे अभीरामांक हे सगळा कसां ठावक? पांडु इसरला काय ?
डिजे, त्या अण्णाचे एवढे मनावर घेऊ नका. हा पांडु प्रत्येक वेळेस काहीतरी सस्पेन्स ठेवतो, पण घडत तर काहीच नाही.
व्हंय तर.. तु बोलतां तां खरं
व्हंय तर.. तु बोलतां तां खरं असंय बघ रश्मी वयनी.. माका खुळ लागल्या अन मी त्या आण्णावर इस्वास ठेवल्यान.. पांडु लिवतां अन आण्णा बोलतां हे मी कसा काय ईसारलं..!
छायाचो लग्नात माका पण अभिराम खंय दिसलां नाय.. मगे मागल्या खेपेक दत्ताचो समजुत काढुक व्हया त्या टायमाक अभिरामान पन ताक पिऊक व्हतां काय..?
पाटणकरणीक आता आण्णाचो खरो रुप कळळा असां.. आता काय ती आण्णाक अंगाक हात लावु देऊची नाय.
पाटणाकरीण इतकी रुपवान खंय
पाटणाकरीण सारखा रुपवान बायली खंय घावचो नाय पण आण्णावांगडा रासलीला करुक पार रया घालवलीन.
अनौरस प्वॉर जल्माला घालुक व्हया नको म्हनुन रघुकाकान दिल्यालो औषध खाउन पाटणकरणीचो गोरा मुखडो पार काळवंडलो गे बाय..
काय अवस्था करुन घेतल्यान.. आता तिचो चेहरा पाहुचो धाडस होऊचा नाय
पाटणकराक समजाल काय ह्यो सगळा
पाटणकराक समजाल काय ह्यो सगळा
अजुन नाय.. इतक्या लवकर कळंल
अजुन नाय.. इतक्या लवकर कळंल असा वाटत नाय.
माक तर वाटतां वच्छी आता जासुस होतली. नाईकांचो दागिनो वाड्यासनं पाटणाकरणीचो घरात कसो जातो याचा शोध घेतली असां वाटतां.
माधवाचो लगीन ठरल्यान.. माईन थोरल्या सुनेसाठी (ठोकळीक ) दागिनो काडुन ठेवल्यान..
माक तर वाटतां वच्छी आता जासुस
माक तर वाटतां वच्छी आता जासुस होतली, ----
शोभा पन भारी अॅक्टिंग करतांव
शोभा पन भारी अॅक्टिंग करतला...... तिका दिलेलो रोल मारुतीच्या शेपट्यागत वाडतलां.. बघुक मज्जा येत आसंय..!
वच्छीपेक्षा शोभीच महान आहे.
वच्छीपेक्षा शोभीच महान आहे. उंदरासारखी तुरुतुरु पळुन चोर्या करते. आधी मला शोभा आणी वच्छी विषयी सहानूभूती वाटत होती, पण ती माईला फसवतेय हे लक्षात आल्यावर तिचा राग येतोय. पाटणकरणीला अण्णाची कवळी कालच दिसली. अण्णा जाम ढेकुणतोंड्या आहे. ( साभार : योगेश शिरसाठ, चला हवा येऊ द्या ) अण्णाच्या ताडीत मला जमालगोटा घालावासा वाटतो, अण्णाच्या अंगावर खाजकुयली टाकाविशी वाटते, अण्णाच्या कपड्यात मला ऊवा, ढेकणे, चिचुंद्र्या, उंदीर, पिसवा, गोचीड, विंचु, खेकडे सोडावेशे वाटतात.
अण्णाच्या ताडीत मला जमालगोटा
अण्णाच्या ताडीत मला जमालगोटा घालावासा वाटतो, अण्णाच्या अंगावर खाजकुयली टाकाविशी वाटते, अण्णाच्या कपड्यात मला ऊवा, ढेकणे, चिचुंद्र्या, उंदीर, पिसवा, गोचीड, विंचु, खेकडे सोडावेशे वाटतात.>>> रश्मी वयनी.. लय रागावली दिसतां..
माईक कोणी किती पन फसवुक व्हया.. तिकां काय फरक पडणां नाय.. तिकां फसवनार्याक पन तां 'बसाहां.. चाय करतंय' म्हणान चुलीपुढं जातलंय
पाटणकरीण आज घोवाची माफी मागुक
माधव घरी ईलंय.. बैठकीचो खोलीत सारी आनंदाने माधवाचो गोष्टी ऐकताहा.. तां येताना मिठाई घेऊन ईलंय पण छायाचो चेहर्यावरचा रेष हललो नाय.. पांडु माधवान आणलेली मिठाई घेऊन तीवर 'थु थु' करत छायाकडे पाहताहा... पन ती तशाच बसताहा.. सुन्न.. असुन नसल्यागत..! गेल्या टाईमाक माधवान मिठाई आणली तेव्हा छायान 'थु थु' केल्यां तें आठवुक जीव तीळतीळ तुटलो माझा..
पाटणकरीण आज घोवाची माफी मागुक आसंय. तिचो आण्णावांगडा कारभार कळ्ळा तं पाटणकर जीव देऊचा नाय का?
आबान एस.टी.चो रिझर्वेशन करुक ठेवल्यान. तां वच्छीवांगडा मुंबईक जातंलंय.. माधवाचो लगीन मुंबईक असां ना..!
रात्रीस खेळ चाले पहिल्या
रात्रीस खेळ चाले पहिल्या सीझनचा बाफ कुठे आहे. प्लीज लिम्क द्या ना. मी तो रोज बघून कॅचप करते आहे. आण्णा वारल्यावर प्रॉपर्टी संबंधाने
वकील फॅमिलीला फसवतो आहे ते बघून कसे तरीच झाले. ती सुसल्या चांगली आहे का वाइट. शेवंताची सु षमा च आहे ना ती.
आणि दत्ता सरिता अगदीच कसे तरी गाव ठी झाले आहेत. माधवाची शहरी बायको व मुलगा बरे व ओळखीचे वाटतात. गुरव व नेने शेवटी काय करतात.
अभिरामाचे लग्न होते का देविकाशी
@ अमा, हे घ्या : https://www
@ अमा, हे घ्या : https://www.maayboli.com/node/58998
अरे वा धन्यवाद डिज्जे मला
अरे वा धन्यवाद डिज्जे मला पण एकूण सीरीअल दोन व एक सीझन फार आव्डते. संगीत, वातावरण एकदम मस्त. एकेक पात्र आव्डते.
शेवंता व पाटणकर पण. चोंगट्या व वच्छीचा नवरा पण. एकदा तो व काशी चाटून पुसुन काहीतरी गोड खात असतात माझे देखील अगदी काळीज तुटले. किती साधे गरीब लोक पण काय त्यांच्या नशीबाने ते पण जगता येत नाही. छायाचे पण राजग्याशी लग्न झाले असते तर काय बिघ ड ले असते असे वाट्ते.
रश्मी, स्मायली आणि पोस्ट लय
रश्मी, स्मायली आणि पोस्ट लय भारी एकदम
एकही भाग बघितला नाहीये, वाचायला येते कधीतरी.
Pages