सुख-दुःख

Submitted by मन्या ऽ on 23 August, 2019 - 05:38

सुख-दुःख

आज आनंदीआनंद
झाला,दुःखामागे
सुख धावते; हा
विश्वास ठाम झाला

दुःख असतेच मुळी
पारिजातकाप्रमाणे
मन हळवे करुन जाते
जाता जाता
आयुष्याला आठवांचा
दरवळ देऊन जाते

सुखापेक्षा करावी
दुःखाची आराधना
दुःखाचाच सोबती असे
सुखाचा अनमोल ठेवा

दुःख आहे ते
आभाळ; पण
सुखाच्या
नक्षत्रांनी सजलेले
अन् सुर्याच्या
तेजाने व्यापलेले

(Dipti Bhagat)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह! क सुंदर कविता!
एखाद्याने ब्रेकअप करून पुन्हा पॅच अप करावं या सिच्युएशनला तर नक्कीच सूट होईल... Happy

मस्तच

छान

दु:खा मागे
सुख धावते;>>>>> जगती सारे ज्या आशेवर , तिच गवसली या धाग्यावर !

विषय गहिरा आहे.

Happy