महाभारत
ह्या दिवाळित माझि चंगळच झालि. बर्याच दिवसांपासुन वाचायचि असलेलि 'व्यासपर्व' आणि 'युगांत' हि दोन्हि पुस्तके एकाच वेळि हातात पडलित. ह्या दोन्हि पुस्तकांचि हाताळणि सर्वस्वि भिन्न असलि तरिहि दृष्टिकोन मात्र मला एकच वाटला तो म्हणजे ह्यातिल व्यक्तिरेखांचे मानवि पातळिवर मुल्यमापन. 'व्यासपर्व' हे दुर्गाबाइंचे महाभारतावरिल लेखन आहे ह्या व्यतिरिक्त मला ह्या पुस्तकाबद्दल काहिहि माहिति नव्हति पण युगान्त बद्दल बर्याच लोकांकडुन बरच काहि ऐकल होत त्यामुळे ह्या पुस्तका बद्दल अपेक्षाहि जास्त होत्या.
दुर्गाबाईंच लिखाण हे महाभारताला 'लालित' लेखन मानुन त्या अनुशंगाने त्यातिल मुख्य पात्र आणि प्रसंगांच विष्लेशण आहे. अत्यंत नेटक विष्लेशण ह्यात वादच नाहि पण संपुर्ण महाभारत हि निव्वळ एक कवि कल्पना असेल हे मला अजुन तरि पटलेल नाहि. संपुर्ण सत्य नसल तरिहि महाभारत हे सत्य घटना आणि पात्र ह्यांच्यावर आधारित आहे अस माझ मत आहे, जर महाभारत हे खरोखरच ललित लिखाण असेल तर मात्र महर्षि व्यासांच्या कल्पनाशक्तिला तोड नाहि. राखि रंगछटांत रंगवलेलि, जसे स्वभाव आज आपण अवतिभवति प्रत्यक्ष बघतो तश्या स्वभावाचि आणि नैसर्गिक प्रेरणांचि इतकि पात्र निर्माण करुन त्यातुन इतकि सुसंगत अशि कहाणि निर्माण करण्याचि क्षमता असलेले व्यास हे अतिमानवि शक्तिचे (जिनियस ह्या अर्थि) स्वामि असतिल ह्यात शंकाच नाहि.
इरावतिबाई मानववंश शास्त्राच्या अभ्यासक असल्यामुळे ह्या पुस्तकात त्या अनुशंगाने काहि विवेचन असेल (उदा भीम आणि सामान्यपणे 'राक्षस' म्हणवले जाणारे लोक हे सध्याच्या मानवांपेक्षा (Homo sapiens ) वेगळ्या वंशाचे होते काय?), महाभारत हा मुळात इतिहास कि कल्पना ह्याबद्दलच त्यांच मत असे एक दोन वगळता बाकि बर्याच प्रश्नांचि उत्तरे मिळालित आणि बरेच नविन प्रश्न निर्माणहि झालेत.
महाभारताचि संपादित आवृत्ति म्हणजे काय ? आणि हे संपादन नक्कि कश्याप्रकारे केले जाते? ह्या बद्दल मला खुपच उत्सुकता होति. सुदैवाने ह्या बद्दल इरावतिबाईंनि प्रस्तावनेत खुपच विस्ताराने लिहलेय. मुळ 'जय' किंवा 'महाभारत' हे महर्षि व्यासांनि आपल्या पाच शिष्यांना सांगितल आणि प्रत्येकाने आपआपल्या दृष्टिकोनातुन त्याचि मांडणि करुन पुढे त्याचा प्रसार केला. हे मला ठावुकच नव्हत. दुर्दैवानि त्यातिल फक्त एकाच शिष्याचि (वैशंपायन) मांडणि सध्या आपल्याला उपलब्ध आहे. त्यामुळे महाभारतातिल जो भाग नंतर घातलेला (कालमापनाद्वारे) म्हणुन त्याज्य ठरवला आहे तो निव्वळ त्या त्या व्यक्तिचि कल्पना कि ह्या चार शिष्यांचा दृष्टिकोन जो मौखिक परंपरेने चालत आला तो नंतर लिखित आवृत्तित समाविष्ट केला गेला असण्याचि शक्यता असा प्रश्न मला पडला. महाभारताचा काळ हा इ.स. पुर्वि १००० वर्षे आहे अस इरावतिबाई मानतात आणि त्यांनिच म्हंटल्याप्रमाणे महाभारताचि पहिलि लिखित आवृत्ति हि ख्र्रिस्तोत्तर १००० वर्षापुर्विचि आहे. (मुळात ह्या गृहितकाबद्दलच सध्या वाद आहेत. काहि झण तो काळ आणखि मागे म्हणजे इ.स. पुर्वि ३००० वर्षे मानतात). म्हणजे दोन ते चार हजार वर्षांच्या अंतरात नक्कि काय गेल काय राहिल आणि काय मागावुन मिसळल गेल ह्या बद्दल आता फक्त तर्क केले जावु शकतात.
दुसरा एक विचार असा आला कि ह्यातिल बर्याच आवृत्त्यांवर कुठलिहि तारिख नाहि. ह्या पोथ्यांचि (लिखित महाभारताचि आवृत्ति) वय हि कार्बन डेटिंग द्वारे काढलेलि नाहित (कदाचित हे तंत्र त्या वेळि माहिति नसावे/उपलब्ध नसावे), तर सर्वात कमि श्लोक असलेलि आणि हे सर्व श्लोक इतर पोथ्यांतुन पण आहेत ह्या निकषांवर एक आवृत्ति हि सर्वात जुनि म्हणुन गृहित धरलि गेलि. त्यामुळे हे गृहितकच पुरेस विश्वासार्ह नाहि पण समजा कार्बन डेटिंग द्वारे ह्या गृहितकावर शिक्कामोर्तब झाल तरिहि एक प्रश्न उरलाच कि हि त्या काळचि संक्षिप्त आवृत्ति कशावरुन नसेल? म्हणजे मुळ महाभारत हे पाठांतराद्वारे जतन केले जात असताना कुणितरि ते संक्षिप्त स्वरुपात लिहुन ठेवले पुढे डॉक्युमेंटेशन चे महत्व लक्षात आल्यावर ते जसेच्या तसे लिहुन काढण्यात आले हि एक शक्यता उरतेच ना?
अजुन एक महत्वाचा मुद्दा प्रगतिचा. साधारण पणे अस मानण्यात येत कि आपले महाभारत कालिन पुर्वज फारसे प्रगत नव्हते. अत्यंत प्राथमिक स्वरुपाचि शस्त्रे आणि साधने त्या काळि विकसित झालि होति आणि त्यांचाच वापर हे लोक करित असत. इरावति कर्वे (इतिहासाचर्य राजवाडे, लोकमान्य टिळक ह्यांच्याप्रमाणेच) 'आर्यन इन्व्हेजन थिअरि' मानतात. महाभारत कालिन लोकांच रहाणिमान, जीवनशैलि याबद्दलच त्यांच विवेचन हे तदनुषंगाने सुसंगत आहे. पण सध्या आर्य हे इथलेच मुळ रहिवासि होते अस मानले जाते. ते अफ्रिका खंडातुन उत्क्रांतिच्या सुरुवातिच्या काळात स्थलांतरित झाले, त्यावेळि अस्तित्वात असलेल्या आणि तुलनेने अप्रगत असलेल्या मानवि टोळ्यांशि लढुन आणि त्यांना हुसकावुन नाहि तर रोटिबेटि व्यवहारातुन रामायण-महाभारत कालिन आर्य समाज अस्तित्वात आला अस सध्याच गृहितक आहे (निदान ते तस आहे असा माझा समज आहे). मग अस असताना पाच हजार वर्षांपुर्वि जी जमात मोहेंदजारो आणि हडप्पा सारखि तुलनेने प्रगत संस्कृति निर्माण करु शकलि ती कालौघात प्रागतिक दृष्ट्या मागे जाइल हे शक्य वाटत नाहि.
मयसभेतिल जमिन आणि पाण्याचि वर्णने, युध्धप्रसंगि असलेलि भीष्मादिकांचि वय, आणि द्रौपदि वस्त्रहरणाच्या वेळेस कृष्णाने तिला वस्त्र पुरवण्याचा केलेला चमत्कार हे सगळे कपोकल्पित आणि मागाहुन लिहले गेलेले प्रसंग आहेत अस आधि माझ मत होत पण भांडारकर इन्सटिट्युट च्या संपादित आवृत्तितहि हे भाग आहेत अस 'युगांत' च्या प्रस्तावनेतुन लक्षात आल. मयसभे सारखे मोठे आणि वैचित्र्यपुर्ण सभागृह लोखंडाचा शोध लागण्याआधि बांधण शक्य झाले हे काहि पटत नाहि. जर लोखंडाचा शोध लागला असेल तर युध्धातलि यांचि आयुध लाकुड आणि दगडांचि कशि? प्रगतिच्या नेमक्या कुठल्या ट्प्प्यावर हे लोक होते? तसच महाभारातात असलेल्या बाकि चमत्कारांचि संगति कशि लावायचि? म्हणजे कौरवांचा जन्म (जो व्यासांनि मातिच्या घड्यात गर्भाचि वाढ करुन घडवुन आणला), द्रौपदि वस्त्रहरण, युध्धकालि अदमासे १०० वर्षे वय असलेल्या भीष्मांनि गाजवलेला पराक्रम, शिखंडिच्या रुपाने अंबेचा झालेला पुनर्जन्म, इत्यादि अनेक. हे सगळे प्रसंग आज ज्या अर्थाने ध्वनित होतात त्या अर्थाने निश्चित घडले नसणार त्यामागच तर्कशास्त्र फक्त कालौघात निसटल. 'पांडवपिते हे देव नसुन मर्त्य मानव होते आणि समाजाने राजकुमार म्हणुन पांडवांचा स्विकार करावा म्हणुन असा समज पध्धतशिर पणे पसरवण्यात आला' अस पांडवजन्माच तर्काला पटणार विवेचन इरावति बाईंनि केलय त्याचप्रमाणे वरिल चमत्कारांमागे काहितरि लॉजिक असणारच.
ह्या सर्व मुद्दांचि येथे चर्चा व्हावि हा या लिखाणा मागचा हेतु आहे. हि दोन पुस्तके वाचलेले आणि न वाचलेले या दोघांचहि या चर्चेसाठि स्वागत. फक्त एक विनंति आहे कि 'महाभारत कालिन लोक हे महामानव होते, आपल्यापेक्षा कितितरि प्रगत असा हा समाज होता आणि कालौघात त्यांचि संस्कृति मागे कुठलेहि अवशेष न सोडता नष्ट झालि' अश्या प्रकारचि जर तुमचि मते असतिल तर त्याला पुष्टि देणारा पुरावा अवश्य द्या. 'मागचे जिथे थांबतात तेथुन पुढचे सुरुवात करतात' ह्या उत्क्रांतिच्या सिध्धांताप्रमाणे महाभारत कालिन पुर्वज हे (वैज्ञानिक दृष्ट्या) आपल्यापेक्षा प्रगत असण शक्य नाहि असा माझा समज आहे. कुणि पटवुन दिल तर तो बदलण्याचि तयारिहि आहे. एकंदरच महाभारतावर चर्चा होउन काहितरि नविन शिकायला मिळाव हा ह्या खटाटोपामागचा उद्देश आहे. बर्याच ऐतिहासिक चर्चांचा होतो तसा 'आम्हि विरुध्ध तुम्हि' असा आखाडा इथे होउ नये एवढिच नम्र विनंति.
गीतेबद्दल
गीतेबद्दल काय मतं व्यक्त केली आहेत लेखिकांनी या पुस्तकांमध्ये? गीता आणि महाभारत हे समकालीन आहेत का? कारण, गीता ही महाभारतात नंतर समाविष्ट केली गेली असा सुद्धा एक मतप्रवाह आहे...
मुळात याला पुराणकालीन लेखकांची मानसिकता थोडीशी कारणीभूत आहे. त्याकाळी कोणीही काहीही लिहिलं की ते आपल्या गुरूंच्या किंवा कोणत्यातरी आदरणीय व्यक्तिच्या नावे करायची पध्दत असे. नंतर नंतर व्यासांच्या नावावर इतकं लेखन जमा झालं असेल की त्यामुळेच "व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्" असं म्हणायची वेळ आली असेल...म्हणूनच 'व्यास' ही कोणी एक विशिष्ट व्यक्ति नसून ती एक पदवी आहे असं सुद्धा एक मत आहे.
म-हाटमोळी,
म-हाटमोळी, तुम्ही भैरप्पा यांचे उमा कुलकर्णी अनुवादीत 'पर्व' सुद्धा वाचा. त्यात महाभारतातील चमत्कारांचे मानवीकरण करुन लिहिले आहे. अर्थात तेही ललितलेखन ह्याच सदरात मोडते, पण मला ते जास्त पटले. कौरवपांडवांचा जन्म, मयसभा, हिडींबा वगैरे राक्षसलोक इ. गोष्टींची त्यातली स्पष्टीकरणे मला जास्त पटली.
साधना.
Santino आणि
Santino आणि साधना प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
@Santino
गीतेबद्दल इरावति बाईंनि लिहलय कि मुळ गीता (कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलि) हि ३ अध्यायापर्यंतच असावि. म्हणजे अर्जुनाला युध्धासाठि प्रवृत्त करण्याचा भाग. जे उपनिषदांशि मिळत जुळत तत्वज्ञान गीतेत आहे ते मागाहुन समाविष्ट करण्यात आल असाव. तुमचा इतरांनि लिहुन नंतर समाविष्ट केलेल्या भागाबद्दलचा तर्क पटण्यासारखा आहे.
@साधना,
मला 'अहो' च्या ऐवजि 'अग' म्हंटलेल जास्त आवडेल. मी 'पर्व' वाचलय पण ७/८ वर्षांपुर्वि त्यामुळे तुमच्या पोस्ट मध्ये उल्लेख केला आहे त्या गोष्टि म्हणजे 'कौरवपांडवांचा जन्म, मयसभा, हिडींबा वगैरे राक्षसलोक' मला निटश्या आठवत नाहित. त्याबद्दल इथे लिहणार का? म्हणजे बाकिच्यांनाहि कळेल. मला आठवत त्यानुसार हे पुस्तकहि 'आर्यन इन्व्हेजन थिअरि' च्या अनुषंगाने लिहलय म्हणजे 'देव हे मानवांपेक्षा प्रगत अशि माणसे होति त्यांचि वस्ति हि महाभारत कालिन लोकांच्या वस्तिपासुन बरिच लांब होति त्यालाच स्वर्ग म्हणायचे' इत्यादि. त्यामुळे हे पुस्तक तितकस भावल नाहि.
मग अस
मग अस असताना पाच हजार वर्षांपुर्वि जी जमात मोहेंदजारो आणि हडप्पा सारखि तुलनेने प्रगत संस्कृति निर्माण करु शकलि ती कालौघात प्रागतिक दृष्ट्या मागे जाइल हे शक्य वाटत नाहि. > हे मानवी इतिहासात बरेचदा घडलेले आहे. तुलनेने प्रबळ शत्रू किंवा नैसर्गिक आपत्तींमूळे पुरेसा वेळ न मिळता संस्क्रुती उध्वस्त झाल्या आहेत ज्यांचे स्पष्टिकरण अजून मिळत नाही.
पर्व बद्दल चर्चा पुस्तकांच्या BB वर झालेली आहे ती बघू शकता.
thoughts on gita या
thoughts on gita या स्वामी विवेकानंदांच्या भाषणातील सुरूवातीचा भाग खाली copy paste करतोय... त्यामध्ये त्यांनी कृष्ण, अर्जुन, महाभारत यावर आपली जनरल मतं सांगितली आहेत... interesting आहे... गोष्टीसारखं वाचायलासुध्दा मजा येते..
The book known as the Gita forms a part of the Mahâbhârata. To understand the Gita properly, several things are very important to know. First, whether it formed a part of the Mahabharata, i.e. whether the authorship attributed to Veda-Vyâsa was true, or if it was merely interpolated within the great epic; secondly, whether there was any historical personality of the name of Krishna; thirdly, whether the great war of Kurukshetra as mentioned in the Gita actually took place; and fourthly, whether Arjuna and others were real historical persons.
Now in the first place, let us see what grounds there are for such inquiry. We know that there were many who went by the name of Veda-Vyasa; and among them who was the real author of the Gita — the Bâdarâyana Vyasa or Dvaipâyana Vyasa? "Vyasa" was only a title. Anyone who composed a new Purâna was known by the name of Vyasa, like the word Vikramâditya, which was also a general name. Another point is, the book, Gita, had not been much known to the generality of people before Shankarâchârya made it famous by writing his great commentary on it. Long before that, there was current, according to many, the commentary on it by Bodhâyana. If this could be proved, it would go a long way, no doubt, to establish the antiquity of the Gita and the authorship of Vyasa. But the Bodhayana Bhâshya on the Vedânta Sutras — from which Râmânuja compiled his Shri-Bhâshya, which Shankaracharya mentions and even quotes in part here and there in his own commentary, and which was so greatly discussed by the Swami Dayânanda — not a copy even of that Bodhayana Bhashya could I find while travelling throughout India. It is said that even Ramanuja compiled his Bhashya from a worm-eaten manuscript which he happened to find. When even this great Bodhayana Bhashya on the Vedanta-Sutras is so much enshrouded in the darkness of uncertainty, it is simply useless to try to establish the existence of the Bodhayana Bhashya on the Gita. Some infer that Shankaracharya was the author of the Gita, and that it was he who foisted it into the body of the Mahabharata.
Then as to the second point in question, much doubt exists about the personality of Krishna. In one place in the Chhândogya Upanishad we find mention of Krishna, the son of Devaki, who received spiritual instructions from one Ghora, a Yogi. In the Mahabharata, Krishna is the king of Dwârakâ; and in the Vishnu Purâna we find a description of Krishna playing with the Gopis. Again, in the Bhâgavata, the account of his Râsalilâ is detailed at length. In very ancient times in our country there was in vogue an Utsava called Madanotsava (celebration in honour of Cupid). That very thing was transformed into Dola and thrust upon the shoulders of Krishna. Who can be so bold as to assert that the Rasalila and other things connected with him were not similarly fastened upon him? In ancient times there was very little tendency in our country to find out truths by historical research. So any one could say what he thought best without substantiating it with proper facts and evidence. Another thing: in those ancient times there was very little hankering after name and fame in men. So it often happened that one man composed a book and made it pass current in the name of his Guru or of someone else. In such cases it is very hazardous for the investigator of historical facts to get at the truth. In ancient times they had no knowledge whatever of geography; imagination ran riot. And so we meet with such fantastic creations of the brain as sweet-ocean, milk-ocean, clarified-butter-ocean, curd-ocean, etc! In the Puranas, we find one living ten thousand years, another a hundred thousand years! But the Vedas say, "शतायुर्वै: पुरूषः "— "Man lives a hundred years." Whom shall we follow here? So, to reach a correct conclusion in the case of Krishna is well-nigh impossible.
It is human nature to build round the real character of a great man all sorts of imaginary superhuman attributes. As regards Krishna the same must have happened, but it seems quite probable that he was a king. Quite probable I say, because in ancient times in our country it was chiefly the kings who exerted themselves most in the preaching of Brahma-Jnâna. Another point to be especially noted here is that whoever might have been the author of the Gita, we find its teachings the same as those in the whole of the Mahabharata. From this we can safely infer that in the age of the Mahabharata some great man arose and preached the Brahma-Jnâna in this new garb to the then existing society. Another fact comes to the fore that in the olden days, as one sect after another arose, there also came into existence and use among them one new scripture or another. It happened, too, that in the lapse of time both the sect and its scripture died out, or the sect ceased to exist but its scripture remained. Similarly, it was quite probable that the Gita was the scripture of such a sect which had embodied its high and noble ideas in this sacred book.
Now to the third point, bearing on the subject of the Kurukshetra War, no special evidence in support of it can be adduced. But there is no doubt that there was a war fought between the Kurus and the Panchâlas. Another thing: how could there be so much discussion about Jnâna, Bhakti, and Yoga on the battle-field, where the huge army stood in battle array ready to fight, just waiting for the last signal? And was any shorthand writer present there to note down every word spoken between Krishna and Arjuna, in the din and turmoil of the battle-field? According to some, this Kurukshetra War is only an allegory. When we sum up its esoteric significance, it means the war which is constantly going on within man between the tendencies of good and evil. This meaning, too, may not be irrational.
About the fourth point, there is enough ground of doubt as regards the historicity of Arjuna and others, and it is this: Shatapatha Brâhmana is a very ancient book. In it are mentioned somewhere all the names of those who were the performers of the Ashvamedha Yajna: but in those places there is not only no mention, but no hint even of the names of Arjuna and others, though it speaks of Janamejaya, the son of Parikshit who was a grandson of Arjuna. Yet in the Mahabharata and other books it is stated that Yudhishthira, Arjuna, and others celebrated the Ashvamedha sacrifice.
One thing should be especially remembered here, that there is no connection between these historical researches and our real aim, which is the knowledge that leads to the acquirement of Dharma. Even if the historicity of the whole thing is proved to be absolutely false today, it will not in the least be any loss to us........
पर्व बद्दल
पर्व बद्दल चर्चा पुस्तकांच्या BB वर झालेली आहे ती बघू शकता. >> कृपया कोणी इथे ती लिंक देऊ शकेल का ? मी सध्या पर्व वाचतोय , अजुन पुर्ण वाचुन झालेली नाही .
****************************
...... तो कट्टयावर बसतो , घुमतो , शीळ वाजवतो !
अजुन पुर्ण
अजुन पुर्ण वाचुन झालेली नाही . << वाचून झालं की विचारा
इथे आहे ती चर्चा पर्व
१० वर्षा पुर्वी आलेला हा
१० वर्षा पुर्वी आलेला हा धागा वर काढलेला आहे. प्रत्येकाने महाभारत थोडफार वाचलेल असेल, तर इथे चर्चा करूया.
महाभारत म्हणजे कौटुंबिक
महाभारत म्हणजे कौटुंबिक कलहावरच लेखन असाव अस वाटत, ज्यात दोन्ही पक्षांच्या पाहुणेमंङळी, मित्र अशा लोकांनी हातभार घालून ते वाढवलं आणि तसेच महाभारत आज सगळ्यांचा घरात कमी अधिक प्रमाणात घडताना दिसत आहे.
आता महाभारत हे इतक्या पूर्वी
आता महाभारत हे इतक्या पूर्वी घडून गेले आहे की त्यातले किती खरे आणि किती खोटे हे सांगणे कठीण आहे. अजून दोन तीन हजार वर्षांनी हेच शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडू शकेल. काहीजण म्हणतील शिवाजी महाराज नव्हतेच आहेत त्या फक्त गोष्टी. शिवाजी महाराजांच्या काही कथा बदलल्या, वगळल्या किंवा नवीनच सांगितल्यापण जातील. याला इलाज नाही.
परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे. आपल्याकडे वैदिक परंपरा ह्या श्रुती आणि स्मृती परंपरेने चालत आलेल्या आहेत. ज्यावेळी लेखन साहित्य फारसे प्रगत नव्हते तेंव्हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे ज्ञान श्रुती (म्हणजे ऐकून) आणि स्मृती (म्हणजे ऐकलेले लक्षात ठेऊन) पद्धतीप्रमाणे पिढ्यानपिढ्या चालत राहिले. आता हे सर्व सोप्पे व्हावे म्हणून संस्कृतमधील छंदांचा उपयोग केला गेला. तसेच श्लोक हे सूत्र रूपात लिहिले गेले. सूत्र रूपात अत्यंत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ समजावून देण्याची क्षमता आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास पतंजलीची योगसूत्रे जी लिहूनही काही हजार वर्षे झाली परंतु सूत्ररूपात असल्यामुळे अगदी १००% नाही तरीपण खूप जास्त प्रमाणात शुद्ध रूपाने आहेत. या सूत्र आणि छंद रुपी लेखनाने लक्षात राहणे सोप्पे जातेच पण कोणीही मध्ये लुडबुड करून बदलण्याची शक्यता कमी असते कारण असे केलेले लगेच लक्षात येते. हा संस्कृत भाषेचा महिमा आहे. तसेच मूळ लेखनाची एक शैली असते ती मध्ये काहीही मिसळून बदलली तर ओळखली जाऊ शकते.
हे सर्व पाहता महाभारत फारसे बदलले गेले असण्याची शक्यता थोडी कमी आहे. थोड्याश्या संशोधनातून नंतर मिसळण्यात आलेल्या गोष्टी कदाचित ओळखता येतील. परंतु त्यासाठी विद्वान आणि वेळ-पैसा सगळ्यांचीच गरज आहे.
कोहंसोहं१० सहमत
कोहंसोहं१० सहमत
धागा वर काढल्याबद्दल आभार
धागा वर काढल्याबद्दल आभार टग्या.
> महाभारत म्हणजे कौटुंबिक कलहावरच लेखन असाव अस वाटत, ज्यात दोन्ही पक्षांच्या पाहुणेमंङळी, मित्र अशा लोकांनी हातभार घालून ते वाढवलं आणि तसेच महाभारत आज सगळ्यांचा घरात कमी अधिक प्रमाणात घडताना दिसत आहे. > हे भारीय.
लेख चांगला आहे. युगांत १४-१५ वर्षांपूर्वी वाचलं होतं. आता फारसं लक्षात नाही. इंडोनेशियन महाभारतदेखील आहे म्हणे. त्याची आणि भारतीय आवृत्तीचीतुलना केली असेल कोणीतरी.
===
पर्व धाग्यावरचा एक प्रतिसाद:
Chandrakor
Thursday, July 27, 2006 - 8:20 pm:
पर्व हे पुस्तक वाचून पुढिल मते तयार होतात.
१. युधिष्ठिर शेळपट होता.
२. भीम बिनडोक होता.
३. अर्जुन स्त्रीलम्पट होता.
४. कुंती स्वार्थी होती.
अशीच आणि काही मते.
महाभारताला असलेला जो डिव्हाईन टच आहे तो ह्या पुस्तकात काढून टाकला आहे. त्यामुळे होते काय की महाभारताची कथा सम्पूर्णपणे मानवी पातळीवर येते. आणि मग सगळेच संदर्भ बदलतात. पांडव हे सत चे व कौरव हे असत किम्वा वाईटाचे प्रतिक रहात नाहीत. किम्बहुना पांडवांची चीड यायला लागते. युधिष्ठिराची द्रौपदीविषयीची," आम्ही जिंकलेली वस्तू आम्ही कशीही वाटून घेऊ" वगैरे वाक्य संताप आणतात.
आणखी एक म्हणजे लैंगिकतेचा नको इतका उल्लेख. कथा मानवी पातळीवर आणल्यामुळे पांडव व कौरवांचा जन्म व अशा अनेक कथा अक्षरशह अश्लील वाटू लागतात. महाभारतकालीन पात्रांना सेक्स शिवाय काही उद्योग नसावा असे वाटू लागते.
अर्थातच ही माझी वैयक्तिक मते आहेत.
महाभारतातील प्रत्येक पात्र
महाभारतातील प्रत्येक पात्र हे आपल्यासाठी शिकवण आहे, माणसाने कस असाव कस नसावं हे महाभारत आपल्याला शिकवते. महाभारतात षङरिपु अगदि ठासून भरलेले दिसतात, त्या षङरिपुंचा त्याग करायला महाभारत सांगते.
लेखातला विचार आवडला. पण तो
लेखातला विचार आवडला.
भांडारकर संस्थेने संपादित केलेल्या महाभारताच्या कमला सुब्रमण्यम यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादाचा मंगेश पाडगा वकरांनी केलेला मराठी अनुवाद दोन भागांत आहे. मला वाचनालयात यातला पहिलाच भाग मिळाला होता. वाचताना गंमत वाटण्याजोगे अनेक प्रसंग आले.
वरचा एक प्रतिसाद वाचून इरावती कर्व्यांनी दिलेल्या संपादित आवृत्तीबद्दलची वरच्या लेखात आलेली माहिती फुकट गेली, तसंच भां डारकर संस्थेचं कामही असं वाटलं.
कौरवांच्या जन्माबद्दल वाचलेलं
कौरवांच्या जन्माबद्दल वाचलेलं आ ठवतं की . सगळे १०० कौरव गांधारीपुत्र नव्हते.
एकच पुत्र हा गांधारी पुत्र
एकच पुत्र हा गांधारी पुत्र नव्हता ना.....
महाभारतातील पात्रं राग लोभ,
महाभारतातील पात्रं राग लोभ, द्वेष मत्सर, मित्रप्रेमी, शब्दाला जागणारी, कपटी अश्या वेगवेगळ्या गुणांची असली तरी हजारो वर्षे भारतीय जनमानसात कमालीची आदरणीय व लोकप्रिय राहिली आहेत. कौरव असो की पांडव सगळेच आपले जवळचे वाटतात.
हा आपल्यातीलच आहेत ही
हा आपल्यातीलच आहेत ही सगळी पात्र