अनेकांना वाटते आहे की देवराई म्हणजे जंगल असेल पण एका शेतकरी कुटूंबाने त्याच्या देवासाठी सोडलेली ती लहानशी जागा आहे. फारशी मोठी नाही. एकमात्र आहे की या जागेत माणसाचा वावर अजिबात नाही. त्यामुळे पक्षी, किडे वगैरे भरपुर दिसतात. देवराईच्या संवर्धनासाठी काय करावे? असा जेंव्हा मला प्रश्न पडला तेंव्हा त्याचे उत्तर या देवराईत मिळाले. देवराईच्या संवर्धनासाठी काहीही न करणे हेच देवराईला लाभदायक ठरते. तिकडे लक्ष देवू नका, फिरकू नका. देवराई आपली आपण समृध्द होत जाते. बहरत जाते. मी फोटो काढताना याची नेहमी काळजी घेतली की कोणत्याही पक्षाला अजिबात त्रास होऊ नये. मिळाला फोटो तर उत्तमच नाहीतर दुरुन मिळालेले दर्शनही काही कमी नाही. पक्षी पहाणे हे महत्वाचे, नशिब असेल तर फोटो मिळेलच हे माझे तत्व. बायको प्रथम माझ्या सोबत आली तेंव्हा हे पक्षीवैभव पाहून चकीत झाली. मग तिने दुसऱ्या दिवशी स्लिंगमधे थोडसं धान्य घेतले पक्षांना टाकायला. आणि मला जाणवलं की हाच हस्तक्षेप नकोय आपला पक्षांच्या जगात. त्यांना मिळेल ते खातात ते. आपण का सवयी बिघडवायच्या? असो. सुरवातीलाच चिऊताईचा फोटो देतोय. गोड दिसणारा हा पक्षी फार वैताग आणतो चिवचिवाट करुन. आणि क्रुरही असतो. माझ्या बाल्कनीत घर बांधायला घेतलय तिने. रोज फुलपाखरे पकडून आणते आणि फार वाईट पध्दतीने खाते.
प्रचि: १ चिमणी
प्रचि: २
प्रचि: ३
ठिपक्यांची मनोली. यांचा थवा चरत असतो रोज बाल्कनीसमोर. पण अगदी गवतात लपलेल्या असतात.
प्रचि: ४
काळी शराटी. ही क्वचीत येते आमच्याकडे. या वर्षी रोज हजेरी लावत आहेत. आपल्याच नादात असतात दोघेही.
प्रचि: ५
प्रचि: ६
प्रचि: ७. ही तांबटची जोडी.
प्रचि: ८
प्रचि: ९. साळूंकी.
प्रचि: १०. साळूंकीचा रुद्रावतार.
प्रचि: ११. शेकाट्या
प्रचि: १२
प्रचि:१३. धनेश
प्रचि: १४. टिटवी
प्रचि: १५. कापशी घार
प्रचि: १६. सुगरण मादी. ही खोपा बांधताना इकडची काडी तिकडे करत नाही. नर घरटे बांधतो. या मॅडम येतात. खोपा पहातात. आवडला तर नरासोबत रहातात नाहीतर दुसरा खोपा पहायला निघून जातात. एक नाही आवडले तर दुसरे असावे म्हणून नर कधी कधी दोन दोन खोपे बांधतो. बिच्चारा.
प्रचि: १७.
.
प्रचि: १८.
प्रचि: १९. हे नर महाशय.
प्रचि: २०
प्रचि: २१. सुगरणींची कॉलनी
प्रचि: २२. घार. ही शक्यतो येत नाही देवराईत. आली की मग मात्र सगळ्या लहान मोठ्या पक्षांची चक्क धावपळ होते.
प्रचि: २३
प्रचि: २४. कोकीळ. ओरडायला लागला की वैताग येतो अक्षरशः
प्रचि: २५. बगळा
प्रचि:२६. पाणकावळाही आजकाल रोज चक्कर टाकून जातो.
प्रचि: २७
प्रचि: २८. याला पाहीले की मला माझे लहानपणचे दिवस आठवतात. मीही असेच कंपाऊंडच्या तारेतून हात घालून फळे किंवा फुले चोरायचो. मज्जा यायची.
प्रचि: २९. मला आवडतो हा बुलबुल.
प्रचि: ३०. मला हा चिरक म्हणजेच रॉबिन फार आवडतो. कारण या जोडीने मला स्विकारलय. मी त्यांच्या नेहमीच्या जागेवर जावून बसलो तरी ते मला घाबरुन उडत वगैरे नाही. एकदोनदा तर माझ्या मांडीवर येवून बसला होता. असा कुणाचा विश्वास मिळाला की भारी वाटते. याचे मी सगळ्यात जास्त फोटो काढलेत. अनेक भावमुद्रा टिपल्यात.
प्रचि: ३१
प्रचि: ३२
प्रचि: ३३. या पाहूण्यांनाही काही जण घेऊन येतात. मग पक्षांची मेजवाणी होते मस्त.
प्रचि: ३४. मला वाटते खुप फोटो झालेत. अजुन खुप आहे. दुसराही भाग काढावा लागणार.
जाता जाता हे काही सातभाईंचे फोटो. मी एकदा घरी येताना देवराईसमोर गाडी लावली आणि एक सातभाई गाडीच्या आरशावर येऊन बसला. त्याला आरशात शत्रू दिसला असावा. त्याने मदत बोलावली आणि दहा पंधरा मिनिटे गाडीच्या आरशावर चक्क युध्द झाले.
प्रचि: ३५
प्रचि:३६. हा सुर्यपक्षी. फार त्रास दिलाय याने मला. कधी एका जागेवर ठरेल तर शप्पथ. कसाबसा कॅमेऱ्यात सापडलाय.
प्रचि: ३७
प्रचि: ३८
प्रचि: ३९. हा सोसायटीचा रस्ता. अनेक फुलांनी बहरलेला असल्याने सनबर्ड सारख्या पक्ष्यांची विशेष वर्दळ दिसते.
प्रचि:४०. देवराईतून दिसणारी आमची सोसायटी.
प्रचि: ४१. ही काठोकाठ भरलेली विहीर.
प्रचि: ४२. आणि ज्याच्यामुळे ही देवराई आहे तो हा देव. शेजारी विहिर दिसते आहे.
फोटो खुप आहेत. देवराईतले सुक्ष्म जग तर थकीत करते. बाजरीच्या दाण्यायेवढी लहान लहान तृणफुले तोंडात बोट घालायला लावेल इतकी सुंदर दिसतात. त्या सगळ्यांचे फोटो पुढच्या भागात.
मस्तच!
मस्तच!
देवराईतले खुप सुंदर आहे
देवराईतले जग खुप सुंदर आहे
खूप छान.
खूप छान.
खूपच मस्त! भाग्यवान आहात.
खूपच मस्त! भाग्यवान आहात.
सुंदर. पोपटी गवताच्या
सुंदर. पोपटी गवताच्या पार्श्वभूमीवर पक्षी मंडळी भारी दिसत आहेत. देव तर जणू मुंजाबा, म्हसोबा वाटतोय. देवराई अपेक्षेपेक्षा फारच विरळ झाडांची वाटली. खूप आडवी तिडवी वाढलेली झाडे सूर्यप्रकाशाला अडवत आहेत असे कल्पनाचित्र रंगवलं होते.
सगळे फोटो सुरेख आहेत.
सगळे फोटो सुरेख आहेत.
शेवटी असलेले तीन ही फोटो तर एकदम झक्कास.
मस्त!
मस्त!
देवराईतुन दिसणारी इमारत, विहिर, देवाचे दगड आवडले.
पुढच्या भागात किडे कीटक पाखरं असतील तर बघायला आवडेल.
पक्ष्यांच्या फोटोत एवढा इंटरेस्ट नाही मला. कदाचित पक्ष्यांच्या फोटोंचा सगळीकडुन मारा होत असतो म्हणून असेल.
वाह, देवराई खरोखरच,
वाह, देवराई खरोखरच,
किती मुक्त पणे संचार करत आहेत निरनिराळे पक्षी
सध्या पावसाळ्यात सर्वांना भरपूर खाद्य मिळत असेल त्यांना,
तुमच्या कॅमे-याला ही भरपूर खाद्य आणी आमच्या डोळ्यांना ही भरपूर
treat
सर्व फोटो एका पेक्षा एक , कॅप्शन्सही भारीच
भारी फोटो!!!
भारी फोटो!!!
मला हा चिरक म्हणजेच रॉबिन फार
मला हा चिरक म्हणजेच रॉबिन फार आवडतो. कारण या जोडीने मला स्विकारलय. मी त्यांच्या नेहमीच्या जागेवर जावून बसलो तरी ते मला घाबरुन उडत वगैरे नाही. एकदोनदा तर माझ्या मांडीवर येवून बसला होता. असा कुणाचा विश्वास मिळाला की भारी वाटते >>>>>> क्या बात है...
देवराई सुंदरच, फोटोही भारीच...
अहाहा! मन आणी डोळे दोन्ही
अहाहा! मन आणी डोळे दोन्ही तृप्त झालेत. धन्यवाद !!
वा वा वा फारच सुंदर. सगळेच
वा वा वा फारच सुंदर. सगळेच फोटो सुंदर. सुगरण, धनेश, शराटी, मुनिया... मस्तच.
ह्यांचं निरीक्षण करताना खूप नव्या, गमतीदार गोष्टी समजतात. वेळही खूप चांगला जातो. पु भा प्र.
मला हा चिरक म्हणजेच रॉबिन फार
मला हा चिरक म्हणजेच रॉबिन फार आवडतो. कारण या जोडीने मला स्विकारलय. मी त्यांच्या नेहमीच्या जागेवर जावून बसलो तरी ते मला घाबरुन उडत वगैरे नाही. एकदोनदा तर माझ्या मांडीवर येवून बसला होता. असा कुणाचा विश्वास मिळाला की भारी वाटते. याचे मी सगळ्यात जास्त फोटो काढलेत. अनेक भावमुद्रा टिपल्यात.>>> मस्त अनुभव असणार !
त्या सुगरण मादी नंतर पंख उघडून कोण साफ सफाई करतंय ?! तो आवडला मला फोटो आणि बगळ्याचा पण .. धनेश चं पिल्लू वाटतंय हे थोडंसं मोठं झालेलं .. काळी शराटी पण भारीच. नाही पाहिलं कधी याला मस्त आहे रंग
पहिल्या प्रतिसादासाठी थॅंक्यू
पहिल्या प्रतिसादासाठी थॅंक्यू ॲमी.
पलक मधूनच उगवतेस का रे?
सुर्यगंगा, वावे, अमर धन्यवाद! थॅंक्यू सिध्दि!
सस्मित लेडी बिटल, कोळी, सुरवंट यांचे खुप फोटो काढलेत. नक्की टाकेन. आवडतील तुम्हाला.
थॅंक्यू वर्षूताई!
थॅंक्यू वर्षूताई!
रॉनी तुमचेही धन्यवाद!
रश्मी
ऋतूराज तुला यातले बहूतेक फोटो अगोदरच पाठवले आहेत. निरिक्षणातून ईतक्या गोष्टी कळतात की विचारू नकोस. कैकदा असे वाटते की याची नोंद अगोदर झाली आहे की आपल्याला हे नव्याने कळते आहे. मी कैकदा क्लिक करायला विसरतो आणि पहात रहातो.
शशांकदा आणि अंजली तो अनूभव
शशांकदा आणि अंजली तो अनूभव भारीच असतो.
सुरवातीला मी अंग अवघडून बसलो होतो. ते उडाले मग! पण नंतर समजलं की शांत राहून नेहमीच्या हालचाली केल्या तरी ते उडत नाही. फोटोही काढावे वाटत नाही अशावेळी.
मस्त मस्त मस्त!!
मस्त मस्त मस्त!!
देवराई अपेक्षेपेक्षा फारच विरळ झाडांची वाटली. खूप आडवी तिडवी वाढलेली झाडे सूर्यप्रकाशाला अडवत आहेत असे कल्पनाचित्र रंगवलं होते.>>>>+111 पण आहे ते पण छान आहे .त्या देवाला माझा नमस्कार सांगा, त्याच्या भयामुळे तेवढी तरी हिरवाई टिकून आहे.
अंजली सांगायला विसरलो. पंख
अंजली सांगायला विसरलो. पंख उघडून साफसफाई करणारी फिमेल सुगरण आहे.
अहाहा मस्त वर्णन आणि फोटो
अहाहा मस्त वर्णन आणि फोटो
खोपा विथ सुगरण फार सुंदर फोटो!
सनबर्डमधल्या पहिल्या फोटोतला सनबर्डही पर्पल सनबर्डच आहे का? चोचीपासून निघून छाती, पोटावरुन काळी रेघ कशी गेलेय!
वर्षा गोंधळ आहे या बाबत. एकतर
वर्षा गोंधळ आहे या बाबत. एकतर मला पक्षी समजत नाही. दिसला की लक्ष ठेवायचं. जमला तर फोटो काढायचा असा मामला असतो. वर दिसणाऱ्या पक्षाला नेहमी तरंगत फुलात चोच घालताना पहातोय.हमींगबर्डसारखं. कॅमेरा ॲडव्हान्स नाही, नाहीतर फोटो काढला असता. दुसरा मात्र फांदीवर बसून चोच फुलात टाकून मध खातो. त्याचे एकदोन फोटो आहेत.
वा काय मस्त वातावरण आहे
वा काय मस्त वातावरण आहे
हेवा वाटतो तुमचा शालीदा!
सगळे फोटो आवडले.
आधीचा भाग वाचला होता..मस्त
आधीचा भाग वाचला होता..मस्त लेख अन फोटो !
सनबर्डमधल्या पहिल्या फोटोतला
सनबर्डमधल्या पहिल्या फोटोतला सनबर्डही पर्पल सनबर्डच आहे का??
>> येस, बहुधा इक्लिप्स प्लुमाजमध्ये.
छान फोटोज
छान फोटोज
देवराईत हस्तक्षेप करू नये हे
देवराईत हस्तक्षेप करू नये हे एकदम बरोबर. मागे भवताल चा एक दिवाळी अंक देवराई वर होता त्यात हेच म्हटलं होतं. मस्त फोटो आहेत एकेक. आणखी टाका ना. आता पहिला भाग शोधून वाचते. मला तुमचे लेख फार आवडतात.
ओके शाली.
ओके शाली.
@रॉनी, ओह अच्छा. असू शकेल. कारण मी अशी रेघ कधीच पाहिली नाहीये पर्पल सनबर्ड्जमध्ये. माझ्या घरच्या झाडावर अनेकदा यायचे सनबर्ड्ज. धन्यवाद
मस्तच !
मस्तच !
फोटोस आणि वर्णन दोन्ही फारच
फोटोस आणि वर्णन दोन्ही फारच सुंदर. आपण राहतो त्याच्या आजूबाजूला असा निसर्ग म्हणजे क्या बात है. आणखी फोटोस पाहायला आवडतील.
लेन्स कोणते?
लेन्स कोणते?
फोटो झकास.
पण त्यांना क्रमांक द्या. क्रमांकाने विचारता येतील प्रश्न.
हे पुण्याच्या कोणत्या भागातले?
सगळ्यांचे धन्यवाद!
सगळ्यांचे धन्यवाद!
Srd फोटोंना क्रमांक देतो आहे.
Camera:
Nikon Coolpix P900
Canon 60D (75-300mm)
Pages