ती फुलराणी

Submitted by अजय चव्हाण on 10 August, 2019 - 16:15

हल्ली झी मराठीच्या मालिका पांचट झाल्यात..आमच्या शेजारच्या काकू
"माझ्या नवर्याची बायको" ह्रा मालिकेला इतक्या विटल्या आहेत की, मालिका संपल्यावर पेढे वाटणार आहेत म्हणे...बघू आता कधी पेढा मिळतोय ते ...

असो. एकदा असचं काहीतरी पाहाव म्हणून सोनी मराठी चॅनेल लावलं तर ही मालिका अपघाताने पाहण्यात आली आणि तेव्हापासून मी रोज पाहतोय..

कथा साधी आणि सरळ आहे आणि प्रेरणादायीसुद्धा आहे..

एका कामवाली बाईची वकील होण्याची गोष्ट...

सगळी कथा सांगणार नाही मी पण कथेतले पात्रे छान काम करतात...मला पर्सनली देवयानी आणि अनय हे कॅरक्टर खुप आवडतं...

तुम्हीही पाहत असाल तर आपल्या प्रतिक्रिया आणि मते आपण इथे नोंदवू शकता..

आणि हो तुम्ही "सोनी लिव" ह्या App वर सगळे episodes पाहू शकतात.

Ti Fulrani Serial - Mayuri Wagh.png

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला छोटी Ana आवडायची. जिजी आणि मोहन आगाशे??(शौनक त्यांच्याकडे कामाला होता ते.) यांची पात्र आवडली.
देवयानीचा पझेसीवनेस,चिडचिड खरी वाटायची.

आता किती वाजता असते?? टाईमिंग चेंज झाल्यापासुन बघण बंद झालं.

संपली ही सीरीयल. टिव्ही वर शेवट झाला की नाही माहित नाही पण शूटिंग संपले आहे.
सीरियल सुरू झाल्या वर नेमका सोनी चा आणि बहुतेक टाटा स्काय चा वाद झाला.

बदललेल्या वेळेनुसार रात्री 9:30 ला लागते..

@मनस्विता..टीव्हीवर तर चालू आहे पण संपणार असं वाटलचं होत
मंजूने देशमुखाचं घर सोडल्यानंतर लगेचच पाच वर्षानंतरच्या घटना दाखवतायात....

चांगल्या मालिका नेहमी अशाच का गुंडाळल्या जातात...

संपणार.. Sad
भेटी लागी जिवा सिरियलसुद्धा अशीच गुंडाळली. टिआरपी कमी असेल कदाचित अशा सिरिअल्सचा.

कथा पाच वर्षे पुढे नेली आणि काहीच्याकाही दाखवत सुटलेत. संपत असेल तर बरेच आहे. शौनक सारखा विचारी माणूस मंजुवर संशय घेतो आणि ती घर सोडून अनयच्या घरीच राहायला जाते, ती गरोदर आहे हे ही ती शौनकला सांगत नाही, मग कशाला एवढा विरोध पत्करून लग्न केले.

हिंदी मध्ये डब होऊन येतेय 'मंजिरी' म्हणून. 'तुझ्या जीव रंगला' सुद्धा कुठच्या तरी चॅनेलवर हिंदीत येते.

Sony Pal
Monday to Friday 10 pm