Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23
एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.
- ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
- जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
- जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
- अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
- बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
- काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
- एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
- काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत
-
-
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुम्ही बोलत रहा. माझी काही
प्रकाटाआ
शेवटी नेहरूंनी केलेली घाण साफ
शेवटी नेहरूंनी केलेली घाण साफ झाली
(No subject)
(No subject)
do the end justify the means?
do the end justify the means?
३७०कलम रद्द केल्याने काश्मिरचे कल्याण होईल असे क्षणभर मान्य केले तरी इतक्या महत्वाच्या विषयावर केवळ १ दिवस चर्चा करून कायदा बदलणे न्याय्य आहे का? उद्या एक एक्झिक्युटिव ऑर्डर काढून महाराष्ट्राचे २ भाग केले कुणालाही विश्वासात न घेता, चर्चा न करता तर चालेल का?
परवा बिल ऑफ राइट अॅब्रोगेट केले तर?
काश्मिरमध्ये लोकशाहीमध्ये भाग घेणार्या व दहशतवादासारख्या तरुणांना भुलविणार्या आकर्षक मार्गांच्या विरोधात उभे ठाकणार्या नेत्यांना अटकेत टाकले. कुठल्या गुन्ह्यासाठी? कोणत्या धोक्याविरुद्ध ? आणिबाणीत एका रात्रीत केलेल्या अटकेत व यात काय फरक आहे?
अफगाण एन्ड-गेम आणि अमेरिकेचे अफगाण पाकिस्तान आणि तालिबानच्या ताब्यात देणे याचा या निर्णयाशी अत्यंत घनिष्ट संबंध आहे असे प्रथमदर्शनी दिसते. त्या परिप्रेक्षात हे कलम रद्द करणे व विशेष दर्जा रद्द करणे ही आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या वाढत्या हालचालीने नेसेसरी झाले असे मान्य केले तरी ज्या पद्धतीने ते राबवले आहे हे लोकशाहीच्या स्पिरिटशी सुसंगत नाही.
उद्या एक एक्झिक्युटिव ऑर्डर
उद्या एक एक्झिक्युटिव ऑर्डर काढून महाराष्ट्राचे २ भाग केले कुणालाही विश्वासात न घेता, चर्चा न करता तर चालेल का?
>>
काश्मिरमधे आत्तापर्यंत जे धार्मीक राजकारण झाले, स्थानीक पंडीतांना उध्वस्त केले, बाहेर काढले, शत्रुराष्ट्राच्या हस्तक्षेपाणे दहशतवाद फोफावला, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा झाला, इथल्य राजकारणामुळे भारतात इतरत्र घातपात झाले, ...यातले एक तरी महराष्ट्रात झाले आहे का? मग प्रत्येक समस्येचे वेगळे उत्तर असणार नाही का? मग कशाला करायचे महाराष्ट्राचे विभाजन?
इतक्या महत्वाच्या विषयावर केवळ १ दिवस चर्चा करून कायदा बदलणे न्याय्य आहे का
>>
आणि ही चर्चेची संधी द्यायची कोणाला? विरोधकांना? त्यांना ज्यांनी मागची सत्तर एक वर्षे हा प्रश्न सोडवला नाही कारण त्यांना मतांचे राजकारण करायचे होते? जरी त्यांना आणखी सत्तर वर्षे चर्चेची संधी दिली तरी त्यांची भूमिका तीच असणार आहे.
काश्मिरमध्ये लोकशाहीमध्ये भाग घेणार्या व दहशतवादासारख्या तरुणांना भुलविणार्या आकर्षक मार्गांच्या विरोधात उभे ठाकणार्या नेत्यांना अटकेत टाकले
>>
ओके. कृपया या नेत्यांनी नक्की काय केले त्याचे ठोस पुरावे द्यावे. मग बोलता येईल.
काश्मिरमधे आत्तापर्यंत जे
काश्मिरमधे आत्तापर्यंत जे धार्मीक राजकारण झाले, स्थानीक पंडीतांना उध्वस्त केले, बाहेर काढले, शत्रुराष्ट्राच्या हस्तक्षेपाणे दहशतवाद फोफावला, यातले एक तरी महराष्ट्रात झाले आहे का? मग प्रत्येक समस्येचे वेगळे उत्तर असणार नाही का? मग कशाला करायचे महाराष्ट्राचे विभाजन?+१११११
https://maharashtratimes
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/kashmiri-pandits-hail...
>>ओके. कृपया या नेत्यांनी
>>ओके. कृपया या नेत्यांनी नक्की काय केले त्याचे ठोस पुरावे द्यावे. मग बोलता येईल.<<
जाउ द्या हो. संतुलीत सोंगाच्या आवेशात असा पाय घसरतो कधी कधी...
टवणे सर ,
टवणे सर ,
तरी इतक्या महत्वाच्या विषयावर केवळ १ दिवस चर्चा करून कायदा बदलणे न्याय्य आहे का? मग काय करायचे ? ७० वर्षे वाट बघितलेली कमी आहे ? कोणाशी चर्चा करायची ? ज्यांनी ७० वर्षे काश्मिर हा प्रॉब्लेम आहे हेच मान्य केलेले नाही त्यांच्याशी ? एका रात्रीत ३.५० लाख पंडीतांना आपल्या रहात्या घरातुन फक्त नेसत्या कपड्यावर काश्मिरातुन बेदखल केले तेंव्हा कोणी केलेली चर्चा ?
स्वःताला संतुलित साबित करण्याच्या नादात काहीही बोलत आहात !!
काश्मिरमध्ये लोकशाहीमध्ये भाग
काश्मिरमध्ये लोकशाहीमध्ये भाग घेणार्या व दहशतवादासारख्या तरुणांना भुलविणार्या आकर्षक मार्गांच्या विरोधात उभे ठाकणार्या नेत्यांना अटकेत टाकले.
शुद्धीवर या !!
संतुलीत सोंगाच्या आवेशात असा
संतुलीत सोंगाच्या आवेशात असा पाय घसरतो कधी कधी ........
अगदी बरोबर बोललात !!
त्या परिप्रेक्षात हे कलम रद्द
त्या परिप्रेक्षात हे कलम रद्द करणे व विशेष दर्जा रद्द करणे ही आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या वाढत्या हालचालीने नेसेसरी झाले असे मान्य केले तरी ज्या पद्धतीने ते राबवले आहे हे लोकशाहीच्या स्पिरिटशी सुसंगत नाही.
Submitted by टवणे सर on 5 August, 2019 - 20:35
>>
हे आत्ताच बघितले.
काश्मिर बाबत आत्तापर्यंत जे काही झाले त्यातले काय काय लोकशाहीशी सुसंगत होते?
इतर संस्थानांचा विशेष दर्जा रद्द करुन, फक्त काश्मिरचा विशष दर्जा अबाधित ठेवणे लोकशाहीच्या स्पिरीटशी सुसंगत आहे का?
दुरदृष्टीच्या अभावाने अंतर्गत सुरक्षा मुद्दा युनोत नेने?
एवढ्या मोठ्याप्रमाणावर काश्मिरी पंडीतांवर अन्याय होत असताना, त्यांच्या सुरक्षेसाठी काहीच न करणे? हे लोकशाहीत बसते का? समान न्याय असतो ना सगळ्यांना?
आजपर्यन्त जे काही राजकारण
आजपर्यन्त जे काही राजकारण फुटीरटीवाद्यान्नी केल , अतिरेक्यान्नी कारवाया केल्या , रस्त्यावर तरुणान्नी आन्दोलने केली त्यात कुठलाही विधीनिषेध नव्हता. फुटीरतावाद्यान्नी पुराच्या काळात भारताच्या लष्कराची बोट ढापुन त्यातील वस्तु लोकाना वाटण्याचा पान्चट्पणाही केला. हे असले लोक चर्चा करण्याच्या लायकीचे आहेत?
किन्वा ज्या कश्मीरी नसलेल्या लोकाना वा कश्मीरी राजकारण्याना विधेयक वाचण्यासाठी वेळ द्यायला पाहीजे होता, त्यान्नी कश्मीर प्रश्न "कायमचा" सुटावा म्हणुन काय प्रयत्न केले? इथे मी काही म्हणतोय किन्वा तुम्ही काही म्हणतात म्हणुन एकाही व्यक्तीचे मतपरिवर्तन होत नाही, तर तिथे सरकारी आस्था वा राजकरणी चर्चेतुन किती कश्मिरिन्चे मतपरिवर्तन होईल?
मग भारत सरकारने या लोकान्ना वेळ देण्यासाठी विधीनिषेध का बाळगावा? आन्तररष्ट्रीय समुदायाने स्तुती करावी म्हणुन ?
बळी तो कान पिळी हेच आजचे तत्व आहे, म्हणुनच अमेरिका, रशिया व चीन या देशान्चे बाकीचे दुबळे देश ऐकतात. भारत त्या दुबळ्या समुहातुन बाहेर येतोय ही एक खुप मोठी व महत्वाची गोष्ट आहे.
ज्यांना अजूनही नेहरूंची चूक
ज्यांना अजूनही नेहरूंची चूक नाही असे वाटते त्यांनी खालील विडिओ पहा ...
https://www.facebook.com/313739616231431/videos/733418180411510?s=100000...
इथे दोन विषय वेगळे आहेत .
इथे दोन विषय वेगळे आहेत .
एकतर 370किंवा 35 A hi काही कलम आहेत ती पूर्णतः रद्द न करता त्यातील काही भाग निरस्त केला आहे .
आणि राज्याचे विभाजन केले आहे हा दुसरा विषय आहे .
पंडितांना घालवले तेंव्हा
पंडितांना घालवले तेंव्हा केंद्रात व्हेएपीसिंग होते व त्या सरकारात भाजपेही होते ना ?
विरोधकांनी मताचे राजकारण केले
विरोधकांनी मताचे राजकारण केले अशीं ओकारी काढणार्यांनी , वाजपेयीनि काय केले, मोदीने मागच्या 5 वर्षात काय केले याबद्दलच्या फुसक्या पण सोडाव्यात.
टवणे सर, तुमचा प्रतिसाद आवडला.
नेहरूंना शिव्या घालणारे
नेहरूंना शिव्या घालणारे त्यावेळच्या लोहापुरुषांबद्दल मौन का बाळगतात ?
सरदार पटेलांना डावलुन
सरदार पटेलांना डावलुन स्वतंत्र्य भारताचे पंत प्रधान पद अक्षरशः ओरबाडुन घेणार्या नेहरुंबद्दलचा ईतिहास वाचुन आपला अभ्यास वाढवा मग ओकार्या काढा !!
नेहरु गांधींचा खरा ईतिहास
नेहरु गांधींचा खरा ईतिहास देशा समोर यायलाच हवा !!
सरदार पटेलांना डावलुन
सरदार पटेलांना डावलुन स्वतंत्र्य भारताचे पंत प्रधान पद अक्षरशः ओरबाडुन घेणार्या नेहरुंबद्दलचा ईतिहास वाचुन आपला अभ्यास वाढवा मग ओकार्या काढा !! >>>> +११११११
How did Article 370 come into
How did Article 370 come into existence ?
Dr BR Ambedkar, the principal drafter of the Indian Constitution, had refused to draft Article 370. 4. In 1949, the then Prime Minister Jawaharlal Nehru had directed Kashmiri leader Sheikh Abdullah to consult Ambedkar (then law minister) to prepare the draft of a suitable article to be included in the Constitution.
नेहरुंनी त्यावळेच्या सर्व
नेहरुंनी त्यावळेच्या सर्व मोठ्या नेत्यांना ब्लॅक मेल करुन आपल्याला हवे तसे निर्णय करुन घेतले होते ! हिंदु कोड बिल डॉ आंबेडकरांकडुन जबरदस्तीने करवुन घेतला , पण मुस्लिम कोड करण्याचे टाळले !! त्या पुर्वी डॉ आंबेडकरांकडुन जबरदस्तीने ३७० आर्टिकल करवुन घ्यायचा प्रयत्न नेहरुंनी केलेला होताच !! शेवटी डॉ आंबेडकरांनी राजीनामा दिला !!
गेले ४-५ दिवस बातम्यांमधून
गेले ४-५ दिवस बातम्यांमधून अंदाज येत होता. अजून डीटेल्स वाचत आहे पण जम्मू काश्मीर ला इतर भारतीय राज्यांसारख्याच लेव्हल ला आणण्याकरता जे बदल केले आहेत ते आवश्यक होते. भाजपच्या जाहीरनाम्यात अनेक वर्षे हे होते आणि त्यांनी ते पाळले आहे. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन!
दोन भाग करून केंद्रशासित करण्याचे काय कारण ते अजून समजले नाही. बहुतांश विरोध त्यालाच दिसत आहे.
जे आम्ही करणार आहोत असे अनेक वर्षे एखादा पक्ष सांगत आला आहे त्याला सलग दुसर्यांदा बहुमत मिळाल्यावर जर त्यांनी हे केले नाही, तर ते कधीच करू शकले नसते. भाजप काँग्रेस च्या उमेदवारांना एक दोनदा हरवू शकतो हे अनेकदा दिसले आहे. पण भाजप राजकारणात काँग्रेसच्या एक पाउल पुढे आहे हे गेल्या काही दिवसांत दिसत आहे. सलग दोनदा वादग्रस्त निर्णय राज्यसभेत संमत करून घेतले गेले.
टवणे सर - हा निर्णय बरेच दिवस चर्चा वगैरे करून घेतला असता तर तेथे परिस्थिती अनेक दिवस चिघळली असती असेच वाटते. उलट असे निर्णय झटकन अमलात आणून मग त्याचे डॅमेज कंट्रोल करणे तेथील जनतेच्या दृष्टीने सुद्धा जास्तच सोयीस्कर नाही का? राज्यसभेत आवश्यक बहुमत नसताना संमत झाले आहे. ते पडद्यामागे बर्याच हालचाली करूनच झाले असेल. संस्थाने खालसा करणे व हे यात फारसा फरक नाही.
बाकी मुस्लिमबहुल "ओळख" पुसली जाइल वगैरे कुरवाळण्यात काही अर्थ नाही. मुंबई चे मराठीपण हरवणे आणि हे यात काय फरक आहे. देशातील एक भाग आहे. यापुढे इतरत्र जे डेमोग्राफिक बदल होतात तसे तेथेही होतील.
पटेलना श्वासरोग होता, ते
पटेलना श्वासरोग होता, ते स्वातंत्र्यानन्तर जेमतेम 2 वर्षे जगले, 1950 ला गेले,
त्यांना पंतप्रधानप्रधान करून मग 1950 ला कोण होणार होते? गुरुजी ?
नेहरू इतरांना ब्लॅकमेल करत
नेहरू इतरांना ब्लॅकमेल करत होते, इतरांनी असे काय पाप केले होते की ते ब्लॅकलेलींग सहन करत होते ?
उद्या एक एक्झिक्युटिव ऑर्डर
उद्या एक एक्झिक्युटिव ऑर्डर काढून महाराष्ट्राचे २ भाग केले कुणालाही विश्वासात न घेता, चर्चा न करता तर चालेल का?
नेहरूंनी हेच केलं होतं ना? म्हणून मग संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, १०५ निःशस्त्र मराठीभाषिकांची काँग्रेस सरकारकडून गोळ्या घालून हत्या, सीडी देशमुखांचा राजीनामा- हा सगळा इतिहास कोण विसरेल?
पण महाराष्ट्राची तेव्हाची किंवा आजची स्थिती व काश्मीरमधली स्थिती यात खूप फरक आहे.
लडाख हा जो वेगळा काढलेला भाग आहे तो काश्मीरमध्ये ब्रिटिशांनी जोडला होता, as per their decision. त्याआधी तो सेपरेटच होता. भाषावार प्रांतरचनेप्रमाणे पाहिलं तर त्यांची भाषा वेगळी आहे,लडाखी. ते बिचारे खूप आधीपासून सेपरेट होण्याची मागणी करत होते. त्यांच्यावर निर्णय लादला नाहीये, उलट त्यांना हवं तसंच केलं गेलं आहे.
https://www.tribuneindia.com/mobi/news/jammu-kashmir/community/demand-fo...
ही वरची लिंक २०१७ मधील आहे
वाकई 5 अगस्त ऐतेहासिक दिन है
वाकई 5 अगस्त ऐतेहासिक दिन है डॉलर के मुकाबले रुपया आज 113 पैसे टूटकर 70.73 पर बंद हुआ है
यह अगस्त 2013 के बाद एक दिन की सबसे बड़ी गिरावट है......
मुस्लिम व दलित युनियन चे
मुस्लिम व दलित युनियन चे गोडवै गाणार्यांसाठी !!
१९५६ साली काश्मिरात शेख अब्दुल्ला पंत प्रधान होते ! त्यावेळेला तिथल्या सफाई कामगारांनी संप पुकारला !! कोणीही मध्यस्ती न केल्याने संप चालुच राहीला, ईतका की रोगराई वाढायला लागली ! त्यावर तोडगा काढायला काश्मिर मंत्रीमंडळाची बैठक बोलवली गेली !! त्यात सफाई साठी पंजाबातुन वाल्मिकी लोकांना सफाई कामासाठी बोलवण्याच ठरवले गेले ! त्या प्रमाणे आलेल्या ५०० वाल्मिकी लोकांना कामाच्या बदल्यात काश्मिरची Cityzenship द्यायच शेख अब्दुल्ला यांनी कबुल केल !! हे ५०० वाल्मिकी लोक संख्या वाढुन आता २,००,००० झाली ! ह्या वाल्मिकी लोकांपैकी एक मुलगी भारतात मेडीसिन डॉ शिकुन काश्मिर मध्ये काम करण्यासाठी परत गेली ! त्यावेळेला तिला तीच्या काश्मिर Cityzenship चा पुरावा मागीतला गेला . काश्मिर Cityzenship चा पुरावा नसल्याने तिला जॉब मिळाला नाही . शेवटी ह्याच्या मुळाशी गेल्यावर तीला कळल कि १९५६ साली काश्मिर मधल्या घटनेत त्यावेळेला आलेल्या वाल्मिकी लोकांबद्दल नमुद करण्यात आलेल आहे !! काश्मिरात कामासाठी आलेल्या वाल्मिकि लोकांना Cityzenship देता येणार नाही कारण १९५६ साली काश्मिरमध्ये पास झालेल्या एका कायद्याप्रमाणे १९४४ नंतर काश्मिरमध्ये आलेल्या लोकांना
काश्मिर Cityzenship मिळणार नाही. त्यामुळे ह्या वाल्मिकि लोकांना काश्मिर मध्ये रहाता येईल, हव तस शिक्षण घेता येईल पण ह्या लोकांना काम मात्र भंगीच करता येईल ! दुसर कुठलही काम करायची परवानगी ह्या वाल्मिकी लोकांना नाही !
काश्मिरच्या घटनेत हे स्पष्ट लिहीलेल आहे !!
दलित + मुसलमान युनियनच्या बाजु मांडणार्या लोंकांनी आत्म परीक्षण करण्याची वेळ आलेली आहे !
Pages