Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23
एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.
- ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
- जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
- जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
- अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
- बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
- काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
- एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
- काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत
-
-
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
देव करो आणि हा निर्णय
देव करो आणि हा निर्णय देशहिताचा ठरो.
७० वर्षे कोणताही निर्णय न घेता काश्मिर प्रकरणा सारख घोंघड भिजत ठेवणार्या सरकार कडुन देशहिताचे निर्णय होण्याची अपेक्षाच नव्हती !! पण त्याच सरकारच्या पाठिराख्या ना मात्र ह्या सरकार कडुन देशहिताचे निर्णय हवे आहेत ??
उन्माद हा सार्वजनिक साथीसारखा
उन्माद हा सार्वजनिक साथीसारखा असतो
एकाला झाला की लगेच त्याची लागण पसरते
जोवर इंजेक्शन टोचत नाही तोवर आटोक्यात येत नाही
काहींचा तर ते करूनही कमी होत नाही
नागपूरकर सरकारकडून विरोधकांना
नागपूरकर सरकारकडून विरोधकांना नागपंचमीचं गिफ़्ट छान मिळालंय
मा मोदींना निवडुन दिल्या
मा मोदींना निवडुन दिल्या बद्दल आज लोकांना आनंद झालेला असेल !!
जेष्ठ नागरिक ह्यांना मानसिक धक्का बसलेला असल्याने प्रतिक्रिया द्यायला समर्थ नाहीत !!
४०५ सिट जिंकलेल्या राजिव
४०५ सिट जिंकलेल्या राजिव गांधी सरकारला करता आले नाही !!
Submitted by युनिस on 5 August, 2019 - 16:42 >>>
त्या साहेबान्नी "शहाबनो प्रकरण" वगैरे सारखी देशहिताची यापेक्षाही मोठी कामे केली.
उन्माद हा सार्वजनिक साथीसारखा
उन्माद हा सार्वजनिक साथीसारखा असतो !!
पप्पुने राजीनामा दिल्यानंतर राजीनामा देण्याची स्पर्धा सुरु झाली तेंव्हा कळल !!
ते कलम राजा ह्रिसिंग ने
ते कलम राजा ह्रिसिंग ने निर्माण केले , इंग्रजाना जमीन घेता येऊ नये म्हणून , असे ऐकले
चांगल्या निर्णयाच स्वागत
चांगल्या निर्णयाच स्वागत करण्या ईतका मनाचा मोठेपणा दाखवता येउ नये ? जे ह्यांना जमल नाही ते करुन दाखवलेल आहे !
३७० व ३५ A हे दोन्ही नेहरुंनी केलेली घोड चुक होती हे मान्य करता येउ नये ह्या पेक्षा वाईट काही असु शकत नाही !!
तो निर्णय तिथल्या जनतेच्या
तो निर्णय तिथल्या जनतेच्या हिताचा आहे, तर जनतेने ती मागणी का केली नाही, अन मग इतके लष्कर कशाला?
बाकी, 1 काश्मीर केंद्रात मिसळायला इतकी ताकद लागली, गांधी, नेहरू , पटेल, आंबेडकर ह्यांनी 350 संस्थाने किती प्रयत्नाने मिळवली असतील , काँग्रेसबद्दल अभिमान वाढला.
आशुचँप,
कारण यांचे aftershocks जास्त घातक आणि दूरगामी होणार आहेत त्या सर्वांची कल्पना या लोकांना असणारे आणि त्यासाठी ते सज्ज आहेत असा आशावाद आहे
Submitted by आशुचँप on 5 August, 2019 - 15:52
>>
किती वर्षांनी ३७०, ३५अ काढल्यास हे वाईट परिणाम होणार नाहित याची काही शास्त्रीय अकडेवारी आहे का?
ते कलम राजा ह्रिसिंग ने
ते कलम राजा ह्रिसिंग ने निर्माण केले , इंग्रजाना जमीन घेता येऊ नये म्हणून , असे ऐकले
नवीन Submitted by BLACKCAT on 5 August, 2019 - 17:05
सम्विधानात कलम राजा हरिसिन्ग याने निर्माण केले? गान्जा मारलाय की नेहमी प्रमाणे डोक्यावर परिणाम झालाय?
३७० व ३५ A हे दोन्ही नेहरुंनी
३७० व ३५ A हे दोन्ही नेहरुंनी केलेली घोड चुक होती >> यात पटेलांचं नाव देखिल घाला
चांगल्या निर्णयाच स्वागत
चांगल्या निर्णयाच स्वागत करण्या ईतका मनाचा मोठेपणा दाखवता येउ नये ? जे ह्यांना जमल नाही ते करुन दाखवलेल आहे !
३७० व ३५ A हे दोन्ही नेहरुंनी केलेली घोड चुक होती हे मान्य करता येउ नये ह्या पेक्षा वाईट काही असु शकत नाही !!
Submitted by युनिस on 5 August, 2019 - 17:0 >>
भुवनेश्वर कलिता यान्च्यासारखे लोक आता कोन्ग्रेस्मध्ये उरलेले नाहीत. हा एकच माणुन मोठ्या काळजाचा निघाला कोन्ग्रेस्मध्ये. बाकी सगळे डबक्यातले बेडुक...
या निर्णयामुळे तेथील
या निर्णयामुळे तेथील प्रदेशाला अनुकूल असे उद्योगधंदे तेथे सुरू होण्याचा मार्ग खुला होईल. कोण गुंतवणुक करणार? खासगी? सरकारी असेल तर ते आताही खर्च करत आहेतच ना? नकी कसे घडणार हे?
>>
इतर राज्यांत कोणी केली गुंतवणुक? तिथे कसे उभे राहिले उद्योगधंदे? बंगळुरु भारताचे आयटी हब कसे झाले?
इतर ठिकाणी जे जसे होत गेले तसेच इथेही होईल की.
बाकी सगळे डबक्यातले बेडुक...>
बाकी सगळे डबक्यातले बेडुक...>> हेडगेवार पण का ?
बाकी, 1 काश्मीर केंद्रात
बाकी, 1 काश्मीर केंद्रात मिसळायला इतकी ताकद लागली, गांधी, नेहरू , पटेल, आंबेडकर ह्यांनी 350 संस्थाने किती प्रयत्नाने मिळवली असतील , काँग्रेसबद्दल अभिमान वाढला.
नवीन Submitted by BLACKCAT on 5 August, 2019 - 17:13
त्याच कोन्ग्रेस ने काश्मीर चा प्रश्न एवढी वर्शे भिजत ठेवला होता. त्याविशयी काय वाटते?
३७० हटवण्यासाठी केंद्रशासित
३७० हटवण्यासाठी केंद्रशासित करण्यामगचे कारण कोणी विषद करुन सांगेल का?
Submitted by चिवट on 5 August, 2019 - 15:55
>>
३७० हटव्ण्यासाठी केंद्रशासीत केलेले नाही. केंद्रशासीत करने आणि ३७० रद्द करणे असे दोन स्वतःत्र निर्णय आहेत.
त्यांनी भिजत ठेवला ह्यांनी
त्यांनी भिजत ठेवला ह्यांनी पेटवला , दोघेही एकाच माळेचे मणी आहेत.
Through 1927 and 1932
Through 1927 and 1932 notifications, Dogra ruler of the princely state of J&K, Maharaja Hari Singh made a law that defined state subjects and their rights. The law also regulated migrants to the state. J&K then joined India through the instrument of accession signed by its ruler Hari Singh in October 1947.
https://timesofindia.indiatimes.com/india/jammu-kashmir-and-article-35a-...
राजा हरिसिंग ने ते कलम पूर्वीच जारी केले होते, मग ते 47 नंतर भारतीय कायद्याअंतर्गतही सुरू ठेवले.
इतर सर्व राज्यात उद्योग धंदे
इतर सर्व राज्यात उद्योग धंदे आणून दमले असतील तर
Submitted by संजय पगारे on 5 August, 2019 - 16:21
>>
आपण अभ्यासु आहात असे इथे कुठेतरी वाचले. "यांनी हवे तेवढे उद्योगधंदे आणले नाहीत" असे मानुन चालू.
तर "यांनी हवे तेवढे उद्योगधंदे आणले नाहीत" याचा व "म्हणुन ३७०व्३५अ रद्द करु नये" याचा परस्पर संबंध काय , यावर थोडा प्रकाश टाकणार का?
आनंदात कोलदांडा घालणे हे काही
आनंदात कोलदांडा घालणे हे काही नतद्रष्टांचं कामच आहे. पण मी आज सिलेब्रेट करणारच. मोदी हैं तो मुमकिन हैं।
बाकी, 1 काश्मीर केंद्रात
बाकी, 1 काश्मीर केंद्रात मिसळायला इतकी ताकद लागली, गांधी, नेहरू , पटेल, आंबेडकर ह्यांनी 350 संस्थाने किती प्रयत्नाने मिळवली असतील , काँग्रेसबद्दल अभिमान वाढला.
संस्थाने खालसा करण्याचा मान हा लोह पुरूष सरदार वल्लभ भाई प टेलांना जातो. त्यांनी ३५० संस्थाने खालसा केली. काश्मिर खालसा करण्यात खोडा घालण्याचे काम नेहरुंनी केलेले आहे.
350 संस्थाने भारतात शामिल करण्याच्या मह त्वाच्या कामाच्या श्रेयावलीमध्ये गांधी, नेहरूचं नाव कश्याला घुसडताय तुम्ही ?
एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी
एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे ३७० व ३५अ कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे तीन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला.
>> यावरून सरकारच्या कृतीने ज्या ज्या मित्रांना आनंद झाला त्यांनी मस्त सिलेब्रेट करा. दु:खानं जळणाऱ्या लोकांना खुशाल शोक करू द्या. जस्ट इग्नोर.
पाकिस्तान (आणि काँग्रेस
पाकिस्तान (आणि काँग्रेस इत्यादी पण आलेच ) आपल्या संसदेच्या ह्या निर्णयाची निंदा केली आहे, म्हणजे काहीतरी नक्की बरोबर केलं असेल.
संस्थाने खालसा करण्याचा मान
संस्थाने खालसा करण्याचा मान हा लोह पुरूष सरदार वल्लभ भाई प टेलांना जातो. >>
काश्मिर खालसा करण्यात खोडा घालण्याचे काम नेहरुंनी केलेले आहे. >> मग तेव्हा पटेल कुठे होते??
इतर सर्व राज्यात उद्योग धंदे
इतर सर्व राज्यात उद्योग धंदे आणून दमले असतील तर
Submitted by संजय पगारे on 5 August, 2019 - 16:21
>>
आपण अभ्यासु आहात असे इथे कुठेतरी वाचले. "यांनी हवे तेवढे उद्योगधंदे आणले नाहीत" असे मानुन चालू.
तर "यांनी हवे तेवढे उद्योगधंदे आणले नाहीत" याचा व "म्हणुन ३७०व्३५अ रद्द करु नये" याचा परस्पर संबंध काय , यावर थोडा प्रकाश टाकणार का?
Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 07:52 >>>>>>
आजूबाजूचे प्रतिसाद पण कोट करत चला म्हणजे हे असे अधांतरी प्रश्न विचारून तुमचा माझा वेळ वाया जाणे टळेल. ही फक्त सूचना आहे. पटेल न पटेल..
मोदि सरकारचे अभिनंदन!! देशाची
मोदि सरकारचे अभिनंदन!! देशाची एकात्मता आणि सुरक्षितता या दोन्हि मुद्यांच्या दृष्टिकोनातुन घेतलेला एक गटसी निर्णय. लाँगवेटेड, लाँग निडेड...
काश्मीरची समस्या ? नेमकी
प्रकाटाआ
काश्मीरची समस्या ? नेमकी कशी
काश्मीरची समस्या ? नेमकी कशी निर्माण झाली?
Instrument of Accession (Jammu and Kashmir) कोणा कोणात आणि कसा झाला त्याबाबत थोडक्यात.
काश्मीरची समस्या संपलेली आहे आता !! आता पुढच्या समस्या बद्दल बोलु !!
काश्मीरची समस्या संपलेली आहे
काश्मीरची समस्या संपलेली आहे आता !! आता पुढच्या समस्या बद्दल बोलु !!
Submitted by युनिस on 5 August, 2019 - 18:30
>>
पाक व चिन व्याप्त काश्मिर बाकी आहे अजुन.
Pages