नेट्फ्लिक्स, अ‍ॅमेझॉन, हुलू वर आलेले नवीन मराठी चित्रपट

Submitted by अजय on 3 January, 2017 - 16:38

नेटफ्लिक्स अ‍ॅमेझॉन, हुलू सारख्या अधिकृत , पायरसीमुक्त स्ट्रिमिंग सर्विसेस वर उपलब्ध होणार्‍या मराठी चित्रपटांबद्दलची चर्चा.

नेटफ्लिक्स वर मधूनच मराठी चित्रपट उपलब्ध होत असतात. काही चित्रपटांची टायटल्स इंग्रजीत असल्यामुळे जर चित्रपट माहीती नसेल तर नुसते पोस्टर पाहून तो मराठी असेल याचा पत्ताही लागत नाही. इथे लिहण्याचा आणखी कि उद्देश म्हणजे इंग्रजीत सबटायटल असतील तर परदेशात वाढलेल्या आणि मराठी कच्चे असणार्‍या मुलांबरोबरही पाहता येतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे वाचून ' गंध' मधली शेवटची नीना कुलकर्णीची गोष्ट पाहिली. खरंच छान आहे. म्हणजे नीना कुलकर्णी आणि रेखा कामत ( ना?) यांचा अभिनय, वातावरणनिर्मिती, चार दिवस अव्याहत पडणारा पाऊस, एकीचं बाळंतपण आणि बाजूला बसलेल्या बाईची एकाच वेळी सुट्टी पण आणि शिक्षा पण, हे सगळं छान दाखवलंय.
मिलिंद सोमणची गोष्ट फॉरवर्ड करताना ' रावी के उस पार' गाणं ऐकलं. ते मात्र सहीच आहे. त्यानेच गायलंय का?
पण शेवटची गोष्ट सोडली तर आधीच्या दोन गोष्टी काही ' गंध' या कल्पनेचा जितका विस्तार करू शकत होत्या तितका करत नाहीत. कंटाळवाण्या झाल्या.

मिलिंद सोमणची गोष्ट फॉरवर्ड करताना ' रावी के उस पार' गाणं ऐकलं. ते मात्र सहीच आहे. त्यानेच गायलंय का? >>>> भारी आहे ते गाणं .
नीना कुलकर्णी च्या गोष्टी बद्दल अनुमोदन. पावसाळी वातावरण , अभिनय सगळं मस्तच

मी सध्या पाहिलेले नवीन मराठी सिनेमा

नेटफ्लिक्स - पोस्टकार्ड, बोगदा, कृतांत
प्राईम - मुंबई पुणे मुंबई 2 & 3 यापेक्षा नवीन मला काही दिसलं नाही

मला बऱ्याच दिवसांपासून सई चा सौ शशी देवधर हा सिनेमा बघायचा आहे. नेफ्लि व prime वर नाहीये यूट्यूब वर पण नाही कोणाला माहिती असल्यास सांगा.

प्राईम - मुंबई पुणे मुंबई 2 & 3 यापेक्षा नवीन मला काही दिसलं नाही

Submitted by मीरा.. on 28 July, 2019 - 15:03>>मीरा, प्राईम वर मोगरा फुलाला नावाचा overhyped सिनेमा होता. पण आता दिसत नाहीय. बहुतेक काढून टाकला असावा. मी 15 जुलै ला पहिला होता. मलाही अश्यात कोणते नवे मराठी movies दिसले नाही प्राईम वर.

मोगरा फुलला सुरुवातीला १० मिनिटं पाहिला. काहीच्या काही आहे. अजिबात आवडला नाही.
प्राईमवर वेडिंगचा शिनेमा आहे. तो आवडला. छान वाटला.

मोगरा फुलला आणि वेडिंगचा सिनेमा हे दोन्ही पाहिले आहेत. पण मी नेटफ्लिक्सवर काय पाहिलं आणि प्राईमवर काय हे नेहमी विसरत असते. Happy

मोगरा फुलला खरंच वाईट बनवला आहे

बरेच मराठी चित्रपट कुठेच आलेले दिसत नाहीत. Dr. आनंदीबाई जोशींवरचा जो सिनेमा आला होता तो आम्ही चित्रपट गृहात जाऊन बघू शकलो नाही. माझ्या मुलाला (वय वर्ष 8) तो पाहायची खूप इच्छा होती. पण तो चित्रपट आजतागायत कुठेही आलेला नाहीय. असे बरेच चित्रपट आहेत. मराठीच्या तुलनेत हिंदी चित्रपट release नंतर 4-5 महिन्यात लगेच ऍमेझॉन किंवा netflix वर आलेले दिसतात. पण तिचं गोष्ट मराठी चित्रपटांना लागू होत नाही. ह्या मागे आर्थिक गणित हे कारण असावे का?
सान्वी, तुम्ही जो सौ. शशी देवधर सिनेमा सांगताय त्यात सई ता. सोबत तुषार दळवी आहे का? तस असेल तर मलाही तो पाहायचाय.

कासव आणि आनंदी गोपाळ www.fimotimo.comवर आहेत.>>धन्यवाद चिनूक्स. लिंक वर गेल्यानंतर आनंदी गोपाळ वर क्लिक केल्यावर मेसेज येतोय कि, This film is available to watch on other parts of world. भारतातून हा चित्रपट कुठल्या साईट वर पाहता येईल?

आनंदी गोपाळ झीमचा आहे ना, मग झी५ वर येईल की काही महिन्यान्नी.>> हो मलाही असंच वाटत होतं. पण अजुन पर्यंत तरी आला नाहीय.

आनंदी गोपाळ अजूनही महोत्सवांमध्ये दाखवला जातोय. त्यामुळे तो इतक्यात झी5 वर येईल, असं वाटत नाही. इफफी, केरळ, कोलकाता, बंगलोर हे भारतातले महोत्सव व्हायचे आहेत.

नेटफ्लिक्स् वर "द ग्रेट हॅक" हा अतिशय उत्तम डॉक्यु ड्रामा आहे ...

केम्ब्रिज अनॅलॅटिका आणि फेसबुक डाटा लीक बद्दल इन्सायडर्स व्ह्यू !

अंजली आणि divinita खरच खूप आभार. परंतु झी5 चं subscription असेल तरच पाहता येईल. आणि divinita तुम्ही दिलेल्या लिंक वर कुठेच दिसत नाहीये तो मुव्ही. Merucha माझ्यामते हो तुषार दळवीच आहे

मला बऱ्याच दिवसांपासून 'ती आणि इतर' (गोविंद निहलानी, सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी) सिनेमा पाहायचा आहे. कुठे बघता येऊ शकेल? मी भारताबाहेर आहे.

झी5 चं subscription >> व्होडाफोन च पोस्टपेड कनेक्शन असेल तर झी५ फुकटात आहे. प्लेस्टोर मधून माय व्होडाफोन डालो करा >> इथून अनबॉक्स माय रेड बेनेफिट्स वर जा (अर्थात तुम्ही आधी रेड पोस्टपेड प्लॅन वर हवेत) > ते पुन्हा प्लेस्टोर ला जऊन व्होडाफोन प्ले डालो करेल >> तिथून झी५ अ‍ॅक्टिव्हेट करा. झी५ चं प्राइम एकदा अ‍ॅक्टिव्हेट झालं की तेच युजर नेम + पासवर्ड टीव्ही अ‍ॅप ला वापरून झी५ टिव्हीवर (पक्षी मोठ्या स्क्रीन) वर पाहाता येइल.
प्रोसेस जरा किचकट वाटेल पण मिनिटभरात होते. फक्त व्होडाफोनच्याच डेटा प्लॅन वर कराअ‍ॅक्टिव्हेशन्स् लवकर होतात.

आनंदी गोपाळ झीमचा आहे ना, मग झी५ वर येईल की काही महिन्यान्नी.>> हो मलाही असंच वाटत होतं. पण अजुन पर्यंत तरी आला नाहीय.>>>
world premiere on zee on 18 th August!!

हो

काशिनाथ घाणेकर - प्राईम>> >>>>>>> काशिनाथ घाणेकर कलर्स चॅनेलने प्रोडयूस केलाय मग तो वूटवरती सुद्दा असेल ना? Uhoh

Pages