नेट्फ्लिक्स, अ‍ॅमेझॉन, हुलू वर आलेले नवीन मराठी चित्रपट

Submitted by अजय on 3 January, 2017 - 16:38

नेटफ्लिक्स अ‍ॅमेझॉन, हुलू सारख्या अधिकृत , पायरसीमुक्त स्ट्रिमिंग सर्विसेस वर उपलब्ध होणार्‍या मराठी चित्रपटांबद्दलची चर्चा.

नेटफ्लिक्स वर मधूनच मराठी चित्रपट उपलब्ध होत असतात. काही चित्रपटांची टायटल्स इंग्रजीत असल्यामुळे जर चित्रपट माहीती नसेल तर नुसते पोस्टर पाहून तो मराठी असेल याचा पत्ताही लागत नाही. इथे लिहण्याचा आणखी कि उद्देश म्हणजे इंग्रजीत सबटायटल असतील तर परदेशात वाढलेल्या आणि मराठी कच्चे असणार्‍या मुलांबरोबरही पाहता येतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॉटस्टारवर अनेक मराठी चित्रपट आहेत.

शाळा
रंगा पतंगा
मंगलाष्टक वन्स मोअर
कॉफी आणि बरंच काही
लग्न पाहावे करून
बाबूरावला पकडा
& जरा हटके
लालबाग परळ
बकुळा नामदेव घोटाळे
आया सावंत झुम के
पुणे व्हाया बिहार
तुकाराम
इश्कवाला लव्ह
संभा - आजचा छावा
स्वराज्य
बाबांची शाळा
बोकड
बंध नायलॉनचे
रमा माधव
दांडगी मुलं
प्रेमाची गोष्ट
साटंलोटं पण सगळं खोटं
भुताचा हनिमून
अ पेईंग घोस्ट
असा मी तसा मी
शुभमंगल सावधान
तिचा उंबरठा
नारबाची वाडी
राजवाडे अ‍ॅन्ड सन्स
ऑनलाईन बिनलाईन
कुंडमाऊली मळगंगा
बनगरवाडी
काळुबाईच्या नावानं चांगभलं
मसाला
बोल बेबी बोल
चश्मे बहाद्दर
रमाबाई भीमराव आंबेडकर
सुराज्य
आजचा दिवस माझा
माझा नवरा तुझी बायको
मान सन्मान
एक डाव संसाराचा
भारतीय दुर्गा म्हणत्यात मला
धूम २ धमाल
डोंबिवली फास्ट
झाले मोकळे आकाश
शपथ तुझ्या प्रेमाची
एक होता विदुषक
मिशन पॉसिबल
दोघी
कोकणस्थ
डावपेच
गाभ्रीचा पाऊस
निरोप
माता एकवीरा नवसाला पावली
विजय असो
वासुदेव बळवंत फडके
धावाधाव
येरे येरे पैसा
खेळ मांडला
नागरिक
वास्तुपुरुष
ठेंगा
जोशी की कांबळे
भातुकली
जन्म
हरी माझ्या घरी
जेता
संदूक
वी आर ऑन - होऊन जाऊ द्या
लिमिटेड माणुसकी
कथा दोन गणपतरावांची
आधारस्तंभ
मुक्ता
कशाला उद्याची बात

अ‍ॅमेझॉनवर हीरा (heera) नावाची सर्व्हीस सुरू झाली आहे. त्यात हिंदीबरोबर खालील मराठी चित्रपट आहेत सध्या. (4.99$ per month)
अस्तू पाहिला. अतीशय आवडला. नक्की पहावा असा चित्रपट आहे.
१. फुगे
२. बघतोस काय मुजरा कर
३. अस्तु
४. यंदा कर्तव्य आहे
५. शिक्षणाच्या आयचा घो
६. झेंडा
७. मी शिवाजीराजे भोसले
८. ७ च्या आत घरात
९. देऊळ
१०. वळू
११. कळत नकळत
१२. गाभ्रीचा पाऊस
१३. मुक्ता
१४. तू तिथे मी
१५. इरादा पक्का
१६. लिमिटेड माणुसकी

हीरा ट्राय करायला पाहिजे.

यप टीव्हीवर ही यप फ्लिक्स म्हणून एक सर्विस आहे. तेथेही मराठी चित्रपट आहेत. लिस्ट बघून सांगतो. त्याशिवाय त्यांच्या मराठी पॅकेज मधे झी सिनेमा सुद्धा असल्याने अनेक चित्रपट ऑन डिमाण्ड उपलब्ध असतात कायम. साधारण मागच्या ८ दिवसांतले तेथे असतात.

धन्यवाद राज.

'चि. सौ. का' नावाचा मुव्ही यु ट्यूब वर आला आहे. प्रिंट वरून पायरेटेड असावा, पण युट्यूब वर अजून आहे.
एक नंबर बंडल आहे. आपापल्या जवाबदारीवर बघा.

नेटफ्लिक्स वर नुकतेच आलेले मराठी चित्रपट
मुरांबा
YZ
कॉफी आणि बरंच काही
राजवाडे अँड सन्स
मुंबई-पुणे-मुंबई
मुंबई-पुणे-मुंबई २
इश्कवाला Love
अगडबम
फेकाफेकी
वळू
हॅपी जर्नी
शिक्षणाच्या आईचा घो
सुखी संसाराची बारा सूत्रे
सुंबरान
संदूक
शेम टू शेम
देऊळ
क्षणभर विश्रांती
प्रेमासाठी वाट्टेल ते
पोपट
शेजारी शेजारी


नेटफ्लिक्स वर आधीच असलेले मराठी चित्रपट

विटीदांडू
१००० रुपयाची नोट
किल्ला
वक्रतुंड महाकाय
अरुणोदय
फॅण्ड्री

नेटफ्लिक्सवरून गेलेले मराठी चित्रपट

सैराट

हा बाफ वाचल्यावर 1000 Rupee Note हा चित्रपट youtube.com वर बघितला. चित्रपट, व्यक्तिरेखा, छोटेसे बारकावे, अस्सल वर्‍हाडी भाषा सर्वच गोष्टी खुप आवडल्या.

बघावे कुठले हे पण सांगा.

मी 'मुरांबा' बघितला. एका दिवसाची गोष्ट ही कल्पना, सगळी पात्र आणि कलाकार, त्यांची कामं सगळं मस्त आहे. सगळ्यांचं बोलणं-देहबोली एकदम सहज वाटतं.

सचिन खेडेकरनं शेवटी गिफ्ट रॅप करताना कित्ती टेप वापरला Uhoh एवढं करून एक कुठला तरी फ्लॅप तसाच राहिलाय.

वरच्या प्रतिसादाबद्दल माफ करा. इथे फक्त मराठी चित्रपटांची चर्चा आहे हे आधी ध्यानी आले नाही. असाच एखादा धागा वेबसिरीजसाठी असेल तर कृपया कळवावे. शोध सुविधा चालत नाही (किंवा मला अडचण येत असावी).

आल्ट बालाजी नावाची स्ट्रीमिंग सर्व्हिस आहे. ही एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सची वेबसेवा आहे. या ठिकाणी बालाजी टेलिफिल्म्स निर्मित जालमालिका प्रदर्शित होतात. सुरूवातीला पेड सर्व्हिस होती. मात्र आता या वेबसर्व्हिसवर गाजलेल्या जालमालिका जिओसिनेमा या स्ट्रीमिंग सर्व्हिस वर आहेत.

जिओसिनेमा वर सिनेमे आणि मूळ जालमालिका पाहण्यासाठी जिओचं सीम असेल तर मोफत पाहता येतो. अन्यथा जिओ आयडी घेऊन या सेवांचा लाभ घेता येतो.

आल्ट बालाजीवर निम्रत कौर ची गाजलेली द टेस्ट केस ही जालमालिका आली होती. तेव्हां ती पैसे भरून पहावी लागत होती. नंतर जिओसिनेमावर ती प्रदर्शित झाली. जिओसदस्यांसाठी ती मोफत होती.
सध्या आल्टबालाजीच्या सर्वच मालिका जिओ वर मोफत आहेत.

आल्टबालाजी एकता कपूरचे असल्याने तिच्या डेली सोपवरून या मालिकांचा अंदाज येत नाही. बहुतेक मालिका नेटफ्लिक्स किंवा प्राईम वर असलेल्या काही गुन्हेगारी अथवा लैंगिक विषयाशी निगडीत आहेत. प्राईम वर मध्यंतरी रशियन माफियावर एक जालमालिका होती. तशीच एक मालिका आल्ट बालाजी आणि जिओ वर आहे. स्मोक ही ती मालिका. गोव्यातले ड्रग्जमाफिया हा विषय आहे.

या मालिका नवे मापदंड वगैरेंच्या भानगडीत पडत नाहीत. पण उत्कंठावर्धक आणि खिळवून ठेवणा-या असतात. स्मोकमधे शेवटपर्यंत उत्कंठा आहे. धक्के आहेत.

अपहरण ही ताजी मालिका अत्यंत उत्कंठावर्धक आहे. एका अपहरणाचा विषय अनेक धक्के आणि वळणे घेत एका नाट्यमय शेवटापर्यंत येतो. या मालिकांचे शक्यतो ८ किंवा १२ भाग आहेत.

बाकी एकता कपूरला कुठल्याही विषयाचे वावडे नसल्याने गंदी बात आणि ट्रिपल एक्स कहाणिया अशा अश्लील मालिका देखील आहेत. सेक्रेड गेम्सवर टीकेची झोड उठवलेल्यांना या मालिकांबद्दल माहिती नसावी असे दिसतेय.
पण बोस डेड / अलाईव्ह ही चांगली मालिका एकता कपूरने दिलेली आहे. त्यामुळे तिच्या कमर्शियल गणितांकडे दुर्लक्ष करता येऊ शकते.

जिओचे अनुकरण करून एयरटेल आणि आयडिया ने देखील आपल्या ग्राहकांना मोफत स्ट्रीमिंग उपलब्ध करून दिलेले आहे.

अॅमेझॉनवर ' अस्तु' आहे सुमित्रा भावेंचा. खूपच आवडला. ' कासव' मात्र नाहीये अजून. दुसरीकडे कुठे आहे का?

हो.

काशिनाथ घाणेकर नेटफ्लिकस/अमेझॉन वर आला की इथे प्लिज लिहा.
यूएसमध्ये व्यवस्थित रिलीज झाल्यामुळे मी एकदा थेटरमध्ये पाहिला आहे पण परत पाहायचा आहे.

Pages