उडते पंछी का ठिकाना

Submitted by वावे on 23 July, 2019 - 05:44

या धाग्यात पक्ष्यांची फक्त उडतानाची प्रकाशचित्रे Happy

शेकाट्या (Black-winged Stilt )

मागे या धाग्यात मी या पक्ष्याचा घरट्यावर बसलेला फोटो टाकला होता. आता तळ्यावर गेलं की या पक्ष्याचं अख्खं कुटुंबच्या कुटुंब दिसतं Happy दोन छोटी छोटी पिल्लं तुरूतुरू चालत असतात किंवा पाण्यात पोहत असतात. त्यांचे आईबाबा सतत त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. कुठलाही पक्षी आसपास जरी आला तरी कर्कश्श आवाज करत त्याच्या अंगावर धावून (उडून?) जातात आणि त्याला हुसकावून लावतात.

shekatya.jpg

shekatya1.jpg

shekatya2.jpg

कुदळ्या/ पांढरा शराटी (Black-headed Ibis)

kudalya.jpg

जांभळी पाणकोंबडी ( Purple Swamphen)

हा पक्षी अतिशय सुरेख असतो दिसायला. लालचुटुक चोच, निळा-जांभळा तेजस्वी रंग. उडताना क्वचितच दिसतो.

abc.jpg

राखी बगळा ( Grey Heron)

grey-bagla.jpg

पाणकाड्या बगळा ( Purple heron)
नावात जरी पर्पल रंग असला तरी हा बगळा पर्पल नसतो. जलपर्णीच्या जंजाळात शांतपणे तपस्या करत असल्यासारखा उभा असतो. सावज दिसलं की सापासारखी मान लांब करून सावजावर झडप घालतो. हाही उडताना क्वचितच दिसतो.

purple_bagla.jpg

घार ( Kite)

ब्रेकफास्ट 'ऑन द गो' Wink

ghar.jpg

(कॅमेरा निकॉन D3000 . लेन्स निक्कॉर 200-500 mm.)
पक्ष्यांची मराठी आणि इंग्रजी नावे किरण पुरंदरे यांच्या '' पक्षी पाणथळीतले'' या पुस्तकातून साभार

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई शप्पथ ! तुम्ही आता एक्स्पर्ट झालात !!खूपच सुंदर आलेत सगळे फोटो !!
शेकाट्या तर उडण्याच्या पोझेस हि देतोय तुम्हाला ! Lol
शराटी कस्सला उडतोय !!
शेवटचा ब्रेकफास्ट ऑन द गो तर अफलातूनच !! _/\_
आणखी फोटोस बघायला नक्की आवडतील ! शुभेच्छा !

वाह! एकदम झकास! मस्तच!
सुंदर आलेत फोटो.
दुसरा फोटो तर अगदी खासच. नेहमी बॅकग्राऊंडला निसर्ग असतो. येथे इमारत आहे. ब्लर ब्लॅक विंडोजमूळे फोटोमध्ये वेगळीच जान आलीये. विशेष म्हणजे पर्स्पेक्टिव्ह कुठेही गडबडलं नाही.
खूपच छान.

प्राची, अंजली, किल्ली, हर्पेन, अॅमी , शाली, धनुडी, बोकलत, वर्षा, आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!! Happy

उत्तम प्रकाशचित्रे :thumbs up:

एकूण एक चित्र आवडलं. Breakfast on the go वाला तर एकदम माझाच मैतर. मी पण कित्येक वेळा असाच ब्रेफा करते.

छान!
उडणार्‍या पक्ष्यांचे फोटो काढणे कठीण.