ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कवितांची निवड
सर्वप्रथंम ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम कवितांची निवड करायला खूपच उशीर झाला त्याबद्द्ल मनापासून क्षमायाचना!कारणे वैयक्तिक व अपरिहार्य होती.पण त्याचबरोबर सर्व कविता वारंवार वाचणे
हेहि तितकेच आवश्यक तसेच दुसरे परीक्षक श्री.गिरीश कुलकर्णी हे परदेशात असल्याने संपर्कासाठीही
वेळ गेला. असो.
कवितांची निवड करतांना सर्वांत आधी शुद्धलेखन,कवितेचा परिणाम (इम्पॅक्ट) व आशय व तद्नंतर रचनाकौशल्य, गझल सारख्या रचनेत तांत्रिक बाजू अर्थात वृत्ताची (मीटर) अचूकता इत्यादिंबाबतचा विचार निवड करताना केला आहे.आम्हां दोघांच्या मते खालील ३ कवितांची सर्वोत्तम म्हणून निवड
केली आहे. कविता चांगली असून शुद्धलेखन नसेल तर ती बाद ठरवली आहे.
सुरवंट (कौतुक शिरोडकर)
या कवितेत आशय, परीणाम व रचना लक्षणीय आहेत. जास्त सांगत नाही.ही कविता मुळातूनच वाचावी.
ती (सुनील पाटकर)
ही एक छोटी,साधी पण विलक्षण निरागस कविता. दीर्घकाळ मनात रेंगाळणारी.
न्यास (क्रान्ती)
ही गझल तंत्रशुद्ध तर आहेच पण गझलच्या इतर अंगानीसुध्दा परिपूर्ण आहे.
इतर चांगल्या कवितामध्ये:
अजब (उत्साह), अनुराधा म्हापणकर (व्हू केअर्स), हरीश दांगट (शेतकर्याची व्यथा) देवदत्तजी (भेट)
गिरीश कुलकर्णी (आयुष्य),उमेश कोठीकर (पाऊस्,अर्पणपत्रिका), विशाल कुलकर्णी (आईच्यान सांगतु), कौतुक शिरोडकर(मल्ह्रारसांज,क्षेत्र) क्रान्ती (जोगवा,पुन्हा, नकोशी) लिमयेपरेश (उशीर) मानस६(घायाळ हरिणी..) वैद्य (उशीर,नको नको,तू)
पूजा दिवाण (दंश) पुलस्ति (माळ) राधा कुलकर्णी (संवेदना) वेदनगंधा(बांध) ह्या उल्लेखनीय आहेत.
त्या जरूर वाचाव्यात.
सर्व कवींचे अभिनंदन व आभार.
तसेच 'मायबोली' चे आभार.
आपलेच,
जयन्ता५२ , गिरीश कुलकर्णी
आपण घेतलेल्या निर्णयांवर
आपण घेतलेल्या निर्णयांवर लोकांनी असहमती/ नाराजी दर्शविली अथवा पद्धतींवर आक्षेप बोलून दाखवले म्हणून माबो सोडून जाण्याची भाषा करावी लगेच?
ही जबाबदारी घेताना अश्या प्रतिक्रिया येणारच हे गृहीत असायला हवे.
निर्ढावलेली आणि न सरावलेली
निर्ढावलेली आणि न सरावलेली मने यातला हा फरक असावा.
जबाबदारी आणि त्याबरोबर
जबाबदारी आणि त्याबरोबर येणार्या प्रतिक्रियांची जाणीव असणं याला निर्ढावलेलं म्हणणं हा प्रचंड मोठ्ठा विनोद आहे. पण मिलिंदा तुझ्याकडून वेगळी काय अपेक्षा करणार..
तुला त्यातला उपरोधिकपणा कळावा
तुला त्यातला उपरोधिकपणा कळावा अशी माझीही अपेक्षा नव्हतीच, आणि ती तू पूर्ण केलीस याबद्दल धन्यवाद !!
काहीतरी चुकीचं लिहायचं आणि
काहीतरी चुकीचं लिहायचं आणि त्यावर प्रतिक्रिया आली की उपरोध होता म्हणायचं.. टिपिकल मिलिंदा वागणे.
लिंबू भौ च्या थोतांडाला १००१
लिंबू भौ च्या थोतांडाला १००१ पोष्टींच्या समिधा असतील तर कवितांवरील शिमग्याला किमान १०१ तरी का नकोत? त्याशिवाय हवनाचे पुण्य नाही बाबांनो!
-एक धर्मनिष्ठ अपेक्षा-
मिलिंदा पण खरच त्यात उपरोधिक
मिलिंदा पण खरच त्यात उपरोधिक काय होते ते माझ्याही डोक्यावरून गेले रे.
सगळ्या गोष्टींचा खूप उहापोह
सगळ्या गोष्टींचा खूप उहापोह झाला आहेच.
मी येथे उल्लेखनिय कवितांच्या निर्मात्यांचे अभिनंदन करण्यासाठी लिहितेय.
सर्वांचे हार्दिक अभिनंदन. कविता मी बहुधा वाचल्या असणारच. उल्लेखनिय कवितांची लिंक दिली असती तर बरे झाले असते,असे वाटते.
वरील सर्व चर्चेवरून असेही लक्षात येतेय की सर्वच माबोकरांमध्ये परस्पर प्रेम खूप आहे; आपुलकीची भावना असली की आपोआपच हक्क वगैरे भावना निर्माण होतात. त्यामुळे केव्हा केव्हा 'अतिपरिचयात' ही होत असावे.
दिवाळीनंतर मस्तपैकी अतिसुंदर नटलेला माबो दिवाळी अंक वाचण्यात मग्न असता, वास्तवतेची पण आठवण झाली..
असो.
---सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो !
ह्या उपक्रमाची माझ्या मते
ह्या उपक्रमाची माझ्या मते काही गरज नाही. (निदान असे होत असेल तर)
महिन्यातली चांगली कविता म्हणजे काय? अन चांगल्या कवितेचे निकष काय? कविता आवडने हे व्यक्तीबरोबर बदलतेच की.
.
मायबोलीवर जुने असणारे सदस्य म्हणजे काय? कालावधी वरुन त्या व्यक्तीच्या कवितेच्या जाणिवेचा बोध होईल काय? असे जुने कित्येक कवि इथे आहेत, ज्यांचा कविता अगदीच ह्या आहेत, मग परत अश्या कविंना निवड समितीत नेमले तर परत गोंधळच होउ शकतो, दुसरे काही नाही. सगळेच जुने कवी तसे आहेत हे माझे म्हणने नाही.
बाकी मायबोलीवर ज्युनीयर सिनीअर ह्या भ्रामक कल्पना आहेत. (निदान चांगली कविता, कथा, दिवाळी अंक से काही ठरवण्यासाठी तरी, व्यक्तीची त्या विषयातली गती महत्वाची) हां आता जिटीजीत गप्पा मारायसाठी माबोवरचा कालावधी नक्कीच कामाला येतो. पण तेवढेच.
.
सध्या कमिटीत मागच्या महिन्यातील कवी निवडला जातो, हे म्हणजे मनोज प्रभाकर ने कधी तरी वन डेत एक शतक मारले तर तो बॅटिंग बद्दल सारखा बोलणार असे झाले.
.
बरेचदा ती कविता चांगली होती पण वाचली नाही, त्याला अशी प्रसिद्धी मिळाली म्हणून ' वाचायची राहिलीच, अरे इकडे पाहीलेच नाही' अश्या प्रतिक्रिया दिसतात, उद्देश अश्या कवितांना प्रसिद्धी मिळवून द्यायचा आहे का? तशी गरज नाही. आमच्या सारखे कविता वाचणारे, कविता वाचतातच, ज्यांना नाही वाचायची त्यांनी वाचू नये इतके सोपे आहे ते.
.
हा उपक्रम चालू देखील ठेवू शकतो, पण वेगळ्या प्रकारे, जिथे निवडक दोन्-चार कवि समितीवर असतील, व दर दोन एक महिन्यांनी एखादी स्पर्धा घेउन "मायबोली कविता स्पर्धेची सर्वोत्तम कविता" असे म्हणता येईल जेणे करुन समिताला दर महिन्यात ३०० कविता न वाचता केवळ स्पर्धकांच्याच कविता वाचाव्या लागतील. ( सध्याच्या काही कविता वाचून पद्य ह्या प्रकारवरचा माझा विश्वास डळमळीत झालेला आहे. नशीब की काही खरच चांगल्या आहेत. )
शुद्धलेखणावर मला शरदरांवाचे भाष्य आवडले.
सद्य निवडी बद्दल माझी काहीही तक्रार नाही, पण एकुनच मत मांडले. जयंतरावांच्या गझला मला आवडतात.कुळकर्णींच्या कविता मी नेहमीच वाचतो, त्यामूळे वरचे वक्तव्य व्यक्तिशः घेउ नका.
बाकी मायबोलीवर ज्युनीयर
बाकी मायबोलीवर ज्युनीयर सिनीअर ह्या भ्रामक कल्पना आहेत. (निदान चांगली कविता, कथा, दिवाळी अंक से काही ठरवण्यासाठी तरी, व्यक्तीची त्या विषयातली गती महत्वाची) हां आता जिटीजीत गप्पा मारायसाठी माबोवरचा कालावधी नक्कीच कामाला येतो. पण तेवढेच.<<
हव्वे तेवढे मोदक तुला!
बरेचदा ती कविता चांगली होती पण वाचली नाही, त्याला अशी प्रसिद्धी मिळाली म्हणून ' वाचायची राहिलीच, अरे इकडे पाहीलेच नाही' अश्या प्रतिक्रिया दिसतात, उद्देश अश्या कवितांना प्रसिद्धी मिळवून द्यायचा आहे का? तशी गरज नाही. आमच्या सारखे कविता वाचणारे, कविता वाचतातच, ज्यांना नाही वाचायची त्यांनी वाचू नये इतके सोपे आहे ते.<<
खरंतर हो ते तितके सोप्पे आहे असं वरवर पहाता असेलही. पण जेव्हा महिन्याला ३००-४०० कविता येतात तेव्हा कविता प्रेमी लोकही त्या सगळ्या वाचतील असं नाही. बर उत्सुकतेने नवीन वाचायला जावे आणि 'ही कविता आहे? का आहे?' असा वैताग यावा हे प्रकारही नवीन नाहीत. त्यामुळे मला आवडणार्या चार कविचंच मी वाचतो/ते पासून माझ्या कंपूपुरतंच मी वाचतो/ते अशी अनेक पातळ्यांवर चाळण लागत रहाते आपल्याच वाचण्यात. माझ्यासारखे अनेक लोक जे मधेच १०-१२ दिवस माबोवर येऊ शकत नाहीत त्यांना अनेक चांगल्या गोष्टी वाचायला मिळत नाहीत कारण प्रचंड संख्येने इथे रोजचे रोज कविता/ कथा/ लेख इत्यादी येत असल्याने गोष्टी हरवणं अवघड नाही.
अश्या वेळेला कुणी या महिन्यातलं भलं लिखाण हे असं पुरचुंडी बांधून देत असेल तर वाईट काय?
माझ्या मते नुसत्या चांगल्या
माझ्या मते नुसत्या चांगल्या कवितांचीच फक्त निवड नाही तर मायबोलिवर जे काही चांगलं लिखाण होतं तेही निवडलं जावं. जुन्या मायबोलिवर चांगले लिखाण हे लवकर कळायचे पण नविन मायबोलिवर ते लवकर कळत नाही. मला नक्की कारणे सांगता येणार नाही यामागची पण नविन मायबोलिवरचे चांगले साहित्य नजरेतून सुटते असा माझा आपला अनुभव आहे. म्हणून जर कुणी चांगल्या साहित्याची निवड करत असेल तर खूपच बरे होईल. इथे काही वाचक नियमित आहेत आणि त्यांना वाचनाची आवड आहे, चिकाटी आहे. अशी ही मंडळी या उपक्रमासाठी उपयोगी येऊ शकतात.
.
.
केदार, निवड समितीनुसार निकष
केदार, निवड समितीनुसार निकष बदलणार आणि त्यांनी निवडलेली बाकीच्यांना सर्वोत्तम वाटेलच असे नाही हे मान्यच आहे सर्वांना. कवितांना प्रसिद्धी मिळवून देण्याबद्दलचा नीधपचा मुद्दा बरोबरच आहे.
>>सध्या कमिटीत मागच्या महिन्यातील कवी निवडला जातो, हे म्हणजे मनोज प्रभाकर ने कधी तरी वन डेत एक शतक मारले तर तो बॅटिंग बद्दल सारखा बोलणार असे झाले.
हे उदाहरण काही मला पटले नाही. मागच्या महिन्यात ज्याची कविता सर्वोत्तम म्हणून निवडली गेली तो "मनोज प्रभाकर" कशावरुन? त्याने अनेक उत्तमोत्तम कविता लिहिलेल्या असतीलही, आपल्याला काय माहीत? आणि नसतील लिहिल्या तरी काय फरक पडतो? बाकी संदर्भांत हा मुद्दा अनेकवेळा मायबोलीवर आलेला आहे की पारख करता येणे महत्वाचे. तुम्ही स्वतः आयुष्यात कवितेची एकही ओळ खरडली नसली तरी चालेल. तू स्वतः कविता वाचतोसच असं लिहिलं आहेस, मग फक्त वाचक म्हणून एखादी कविता चांगली, वाईट (किंवा 'कळली नाही' ) ठरवण्याचा अधिकार तुला आहे. तुला जी सर्वांत आवडेल ती तुझ्या मते सर्वोत्तम.
कवितांच्या संख्येवर नियंत्रण घालता येणार नाही तेव्हा २००-३०० कविता येतील हे आता सर्वांनी मान्य केले आहे आणि ती संख्या गृहित धरुन हा उपक्रम पुढे चालू ठेवायचा असेल तर उपाय शोधावा लागेल. अनेक स्वयंसेवकांनी पुढे आल्याशिवाय हे शक्य होणार नाही. इथल्या नावाजलेल्या कवींना किंवा आधीच्या महिन्यातल्या सर्वोत्तम कवितेच्या कवीला नेहमी वेळ असेलच असे सांगता येत नाही. तेव्हा नावे मागवावीत. एकंदर करावं लागणारं काम पाहता ज्यांना कवितेची आवड आहे असेच लोक पुढे येतील. नावे सतत अॅड करता येतील म्हणजे नवीन येणार्या लोकांनाही नंतर सहभागी होता येईल.
किती लोक काम करायला तयार आहेत यावर उपक्रम पुढे चालू ठेवायचा की नाही किंवा राहील की नाही हे ठरेल.
किती लोक काम करायला तयार आहेत
किती लोक काम करायला तयार आहेत यावर उपक्रम पुढे चालू ठेवायचा की नाही किंवा राहील की नाही हे ठरेल.<<
साधारण एप्रिल/मे नंतर मी उपक्रमासाठी वेळ देऊ शकेन. उपक्रम चालू राह्यल्यास आणि मी केलेलं लोकांना चालणार असेल तर. तोवर शक्य नाहीये.
अजून एक म्हणजे (कदाचित हा मुद्दा जास्त तांत्रिक आहे आणि इथे असणे योग्य नसेलही..)
लेखन प्रकाशित झाल्याच्या तारखांनुसार (महिन्याप्रमाणे) गट करता येण्याची सोय असावी. सध्या ४ महिन्यापूर्वीच्या लिखाणावर आज प्रतिक्रिया दिली गेली तर ते वरती येऊन नवीन लिखाणात दिसते. त्यामुळे २००-३०० कविता तपासताना गोंधळ होऊ शकतो. जुन्या माबो वर जी मराठी महिन्यांनुसार वर्गवारी होत होती ती गुलमोहर ला परत चालू केली तर फार बरे होईल.
नी, तशी सोय आहे. मी मागच्या
नी, तशी सोय आहे. मी मागच्या पानावर लिहिले होते. गुलमोहोर-कविता(७२ तासातील नव्हे, निळ्या पट्टीवर जी लिन्क येते ती) या पानावर पोस्ट केलेल्या तारखेप्रमाणे कविता दिसतात. लेटेस्ट प्रतिसादाच्या तारखेप्रमाणे नाही.
ह्म्म मला माहीत नव्हते.
ह्म्म मला माहीत नव्हते. माहीतीबद्दल धन्स.
योगेश, 'ते असे होत असेल तर'
योगेश,
'ते असे होत असेल तर' इतके सिरियसली घेउ नका. बिल्डींग रिनोव्हेट करायची आयडीया मी खाली दिली आहे. ती ही वाचून त्यावर टिप्पनी द्या की राव. फक्त मोजकेच नका वाचू.
लालू, प्रभाकरचे उदा. थोडे हार्श आहे ह्याची जाणीव आहे मला. पण दर महिन्यात सर्वोत्तम कविता निवडली गेलीच पाहीजे का? उपक्रम स्पर्धात्मक ठेवू शकतो. उपक्रम चालू ठेवायसाठी शेवटचा मुद्दाही लिहीला आहे.
अश्या वेळेला कुणी या महिन्यातलं भलं लिखाण हे असं पुरचुंडी बांधून देत असेल तर वाईट काय? >> काहीच नाही. पण कविता चांगली असली तर कुण्या दोन मायबोलीकरांनी चांगली आहे, व्वा व्वा म्हणले म्हणजे ती चांगली होईल वा कुण्या एकाने छ्या काही कळत नाही असे लिहीले ती वाईट होईल असे व्यक्तीशः मला वाटत नाही. मग ही पुरचुंडी जी काही मोजक्या व्यक्तीनी तयार केली त्यावरच समाधान माणायचे का? हा मुद्दा. थोड्या वेगळ्या बाजूने लिहायचे झाल्यास उद्या प्रविण दवण्यांना त्यांचा सद्य लेखनावर ज्ञानपिठ पुरस्कार मिळाला तर ते तू मान्य करशील का? हे मांडत आहे. परत एकदा पुरचुंडी असेल तर मला आवडेलच, पण त्यामूळे पुरचुंडी बाहेरच्या चांगल्या कविता वाचल्या जाणार नाहीत. मध्ये एक दोन महिने मी फक्त ही पुरचुंडीच वाचली, सर्व कविता नाही, त्यामुळे कदाचित दोन-पाच चांगल्या कविता निसटल्याची शक्यता आहेच. कारण वाचक म्हणून माझी अभिरुची वेगळी आहे. ती त्या पुरचुंडीत सामील होणार नाही.
स्वतः आयुष्यात कवितेची एकही ओळ खरडली नसली तरी चालेल. >> अगदी. म्हणूनच मी सिनीयर ज्युनीअर मुद्दा मांडला आहे.
ह्या उपक्रमाला माझा विरोध नाही. पण त्याचे सद्यरुप बदलून वेगळे रुपडे दिले पाहीजे. वर लिहीलेच आहे, पुनरुक्तीचा दोष घेउन लिहीतो की २००-३०० कविता दर महिन्यात वाचने व त्यातून योग्य वेळेत, एक दोन निवडने हे सोपे नाहीये. निवड समितीत दोन सदस्य असतील तर निदान १०० ते १२० कविता महिन्यात वाचाव्या लागतात. दिवसाच्या ३.५ ते ३ ४. त्यातून परत गाळने, निवडने, दुसर्या सदस्याला वाचायला यादी देणे, परत त्यातून निवडक १०, मग १-२ निवडने हे मोठे कार्य आहे. त्यातही त्या व्यक्तीचे रोजचे पोटापाण्याचे काम, परदेश प्रवास, घरच्या गोष्टी हे लक्षात घेता हे सर्व दर महिन्यात करने अवघड होते, म्हणूनच ऑगस्टच्या कविता ऑक्टोबर मध्ये निवडल्या जाउ शकतात.
जर जास्त स्वंयसेवक हे काम करत असतील तर तिकडूनही वाचक म्हणायला तयार की, ' ओ निवड समितीच्या लोकांच्याच कवितांना पुरस्कार मिळाला.' मायबोलीवर काही २०-२५ सिद्धहस्त कवि नाहीत की दर महिन्यात जे बदलले जाउ शकतील. शिवाय ते ही कविता करतात. त्यामूळे हे असे उद्गार निघने हे सहज शक्य आहे. तो एक वेगळा गोंघळ निर्मान ह्याही महिन्यात झाला आहेच.
त्यामुळे दर महिन्यात हे कार्य करन्या ऐवजी दर दोन तीन महिन्यांनी स्पर्धा घेउन, ४-५ सदस्यांसहित हे कार्य करने सोपे आहे.
असो. जर ८-१० स्वंयसेवक मिळणार असतील तर हा उपक्रम चालू ठेवावा ही सदिच्छा व्यक्त करुन आवरते घेतो.
काहीच नाही. पण कविता चांगली
काहीच नाही. पण कविता चांगली असली तर कुण्या दोन मायबोलीकरांनी चांगली आहे, व्वा व्वा म्हणले म्हणजे ती चांगली होईल वा कुण्या एकाने छ्या काही कळत नाही असे लिहीले ती वाईट होईल असे व्यक्तीशः मला वाटत नाही. मग ही पुरचुंडी जी काही मोजक्या व्यक्तीनी तयार केली त्यावरच समाधान माणायचे का? हा मुद्दा. थोड्या वेगळ्या बाजूने लिहायचे झाल्यास उद्या प्रविण दवण्यांना त्यांचा सद्य लेखनावर ज्ञानपिठ पुरस्कार मिळाला तर ते तू मान्य करशील का? हे मांडत आहे. परत एकदा पुरचुंडी असेल तर मला आवडेलच, पण त्यामूळे पुरचुंडी बाहेरच्या चांगल्या कविता वाचल्या जाणार नाहीत. मध्ये एक दोन महिने मी फक्त ही पुरचुंडीच वाचली, सर्व कविता नाही, त्यामुळे कदाचित दोन-पाच चांगल्या कविता निसटल्याची शक्यता आहेच. कारण वाचक म्हणून माझी अभिरुची वेगळी आहे. ती त्या पुरचुंडीत सामील होणार नाही.<<
उपक्रमाला कितीही तटस्थ आणि वस्तुनिष्ठ रूप द्यायचा प्रयत्न केला तरी हे रहाणारच. काही दुर्लक्षिले जाणार काही नावाजले जाणार. पण उपक्रमामुळे निदान थोडा गोंधळ कमी व्हायला मदत होईलच.
आता अर्थात आपल्या नजरेतून काही सुटायला नको असेल, दिलेल्या पुरचुंडीवर आपला विश्वास नसेल (माझाही अनेकदा बसलेला नाहीये.) तर त्यावेळेला सगळं वाचणं एवढा एकच उपाय रहातो. पण जेव्हा प्रत्येक वेळेला नवीन निवडणारा/री असतो/ते त्यावेळेला वेगळे दृष्टीकोन बघायला मिळतात जे उपक्रमाशिवाय अशक्य आहे. नाही का?
(No subject)
नी, अनुमोदन. उपक्रम सुरु केला
नी, अनुमोदन.
उपक्रम सुरु केला तेव्हा उद्देश हाच होता. (चूभूदेघे)
आणि केदार तू मांडलेस ते सगळे प्रॉब्लेम त्या स्पर्धेबाबतही उद्भवतीलच.
मलाही निवड समितीत भाग घ्यायला
मलाही निवड समितीत भाग घ्यायला आवडेल जर कुणाचा आक्षेप नसेल तर आणि तरच. पण गझल वगैरे यांची निवड करायला मला जमणार नाही.
२००/३०० कवितांवर टिचकी मारुन ती वाचणे हे देखील जरा अवघडच आहे. यावर एक उपाय म्हणजे ज्यावेळी इथे कवी कविता लिहितो त्यावेळी ती कविता दोन ठिकाणी वाचवून (SAVE) ठेवायची. एक इथल्या वाचकांसाठी आणि दुसरी निवड समितीसाठी. पण निवड समितीसाठी कविता वाचवून ठेवताना सर्व कविता एका पाठोपाठ वाचवायच्या म्हणजे त्या सर्व कविता एकाच पानावर दिसतील. कवितांची ही दुसरी प्रत फक्त निवड समितीलाच वाचता येईल अशी तरतुद करायची. मग निवड करणार्याचा वेळ वाया जाणार नाही आणि श्रम पण कमी लागतील. याचा फक्त एकच तोटा आणि तो म्हणजे मायबोलिवर एक कविता दोनदा लिहिली जाईल. पण यावर एक तोडगा म्हणजे कवितांची निवड करुन झाली की कवितांची दुसरी प्रत उडवून टाकायची.
लालू, त्याची फ्रिक्वेन्सी
लालू, त्याची फ्रिक्वेन्सी अर्ध्याअधिकने कमी होईल हा उद्देश. डॅमेज कंट्रोल.
शिवाय स्पर्धा म्हणले की लोक सटरफटर लिखाण देणार नाहीत असे वाटते. उद्या मी ही एखादी ट ला ट, री ला री लिहीली की सध्याच्या स्कोप प्रमाने ती वाचने भाग पडते, म्हणजे स्कोप निश्चीती नाही. स्पर्धा म्हणले की मग ३०० ऐवजी ७५-१०० कविता दर दोन महिन्यांनी तपासाव्या लागतील. स्वंयसेवकांवर पण जास्त भार राहणार नाही. भविष्याचा विचार करता अश्या निवडक स्पर्धात्मक कवितांचे एखादा इ विशेषांक मायबोली १० वर्षांनंतर प्रकाशीत करु शकते, (ऑफकोर्स मी फारच पुढचा विचार करत आहे हे मान्य करतो.)
कवितांच्या निवड समितीसाठी मी
कवितांच्या निवड समितीसाठी मी काही नावे सुचवितो कारण मला माहिती आहे काही जण खूप भीड आहेत इथे त्यांना विनवणी करुनच ते समितीत येतील=>
१) मैत्रेयी
२) असामि
३) श्यामली
४) अश्विनी
५) अलका काटधरे (आडनाव चुकले असल्यास क्षमा असावी)
६) रार
७) शोनू
८) पुलस्ती
९) झाड
१०) पूनम
११) अज्जुका
१२) पेशवे
१३) फ
१४) श्र
१५) टण्या
१६) टुलिप
१७) केदार
१८) रुनि
१९) परागकण
२०) पेशवे
२१) चिन्मय दामले
आणि कुणी येऊ नये तेही लिहितो.
१) रोजच्या रोज कविता लिहिणार्यांनी मुळीच नावे देऊ नये की त्यांना घेऊही नये
अजून जर काही नावे सुचवता आली तर सोपे जाईल समिती स्थापन करायला. शिवाय मला वाटतं एका समितीने नविन समितीला नेहमी अनुभव सांगावे.
प्रत्येक कथा , ललित , कविता ,
प्रत्येक कथा , ललित , कविता , प्रकाशचित्र इत्यादींखाली प्रतिसाद मधे वोट करण्याची सोय करता येऊ शकते का ?
जसे १) अतिशय आवडली २) आवडली ३) माहीत नाही ४) आवडली नाही
आणि प्रत्येक जण एकदाचं वोट करु शकतील . त्यामुळे सर्वोत्तम लिखाण निवडीवर कुणीही आक्षेप घेण्याचा प्रश्णचं येणार नाही . आणि ही वोट ची सोय १ महिन्यानंतर निकालाच्या वेळेस डिसॅबल करता येऊ शकेल.
श्री१२३, म्हणजे सगळ्यांनी
श्री१२३, म्हणजे सगळ्यांनी सगळीकडचे सगळे वाचून, पाहून मत द्यायचे? दर महिन्याला? गणेशोत्सव वर्षातून एकदा येतो पण तिथल्या मतदानाने निकाल ठरवलेल्या स्पर्धांच्या मतदानाची टक्केवारी पहा.
केदार, फ्रिक्वेन्सी कमी करण्याचे कारण कळले नाही, पुन्हा सध्याही ही एक प्रकारची स्पर्धाच आहे ना, सगळ्याच कविता या स्पर्धेत असतात. पोस्ट करणार्याला सर्वोत्तम कविता निवडीसाठी ती विचारात घेतली जाणार आहे हे माहीतच असते की.
>>उद्या मी ही एखादी ट ला ट, री ला री लिहीली की सध्याच्या स्कोप प्रमाने ती वाचने भाग पडते
हो, पण कोंबडी आणि हंसातला फरक लगेच कळतो त्यासाठी फार वेळ लागू नये. (पक्ष्यांची नावे उदाहरण म्हणून वापरली आहेत, कोणत्याही कवितांकडे बोट दाखवण्याचा उद्देश नाही. )
>>रोजच्या रोज कविता लिहिणार्यांनी मुळीच नावे देऊ नये की त्यांना घेऊही नये
काबरं? त्यांनाच करायला लावलं पाहिजे खरं तर हे काम.
निर्णय अॅडमिन घेणार, नावे मागवणार आहेत किंवा कसे ते अजून माहीत नाही तेव्हा सध्या इथे सूचना म्हणूनच लिहिले आहे.
पुन्हा सध्याही ही एक प्रकारची
पुन्हा सध्याही ही एक प्रकारची स्पर्धाच आहे ना. >>> लालू ही स्पर्धा नाही. तसे गॄहीत असेल तर असे नसायला पाहीजे. कारण हा प्लॅटफॉर्म आहे, कविता प्रसिद्ध करन्याचा. तो तसाच राहावा. त्याला कुठल्याही प्रकारच्या स्पर्धेचे स्वरुप येउ देता कामा नये.
त्यामुळे मी विभागनी सुचवत होतो. जेणे करुन रोज कविता नेहमीच्या प्लॅटफॉर्मवर येतील व ज्यांना कविता काही निकषावर पडताळून पाहायच्या आहेत, ते स्पर्धेत भाग घेतील.
बरं हाच फॉर्मॅट पुढे चालू ठेवायला किती जन परिक्षक व्हायला उत्सूक आहेत. (परिक्षक असन्याचा क्वालिटी सहीत. ) तसे स्वंयसेवक निवड समितीला मिळाले आहेत का? आजपर्यंतचा अनूभव कुणी मांडणार का? (आजपर्यंत एकदा तरी परिक्षक म्हणून कार्य पाहिलेल्यांचे मत अपेक्षित. जयंतरावांनी ते मांडले आहे, पण त्याचे संपूर्ण स्वरुप कळाले तर इथे जी चर्चा चालू आहे तिला नक्कीच दिशा मिळेल. )
निदान गेले ६-८ महिने हा फॉर्मॅट चालू आहे, पण परिक्षक म्हणून २ किंवा ३ जनांचेच नाव पाहीले. तसे एक जनही परक्षिक असायला काहीच हरकत नाही, जो पर्यंत तो ३०० कविता, वाचून, पचवून त्या का आवडल्या हे सांगू शकतो. मला अमूक कविता आवडली हे म्हणने फार सोपे आहे, पण हिच का? हा प्रश्न कळीचा आहे. त्यामुळे कोठीकरांनी त्यांचा पहिल्या पोस्ट मध्ये जो प्रश्न विचारला तो मला योग्य वाटला.
त्यांनाच करायला लावलं पाहिजे खरं तर हे काम>> अनुमोदन.
>>रोजच्या रोज कविता
>>रोजच्या रोज कविता लिहिणार्यांनी मुळीच नावे देऊ नये की त्यांना घेऊही नये
काबरं? त्यांनाच करायला लावलं पाहिजे खरं तर हे काम.>>
हा पण एक छान उपाय आहे २०० कवितांना २० जवळ पोचवायला
जर माझ्यावर विश्वास ठेवायला
जर माझ्यावर विश्वास ठेवायला अॅडमिन तयार असेल; तर मी महिन्यातील कुठल्याही एका आठवड्याच्या सर्व कवितांचे रसग्रहण आणि प्राथमिक निवड करायला तयार आहे.
शरद
शरद, फक्त एका आठवड्याच्या
शरद, फक्त एका आठवड्याच्या कवितांची निवड आणि रसग्रहण उपयोगी नाही ठरणार. रसग्रहन नकोच आहे. फक्त निवड हवी आहे. २००/३०० कवितांचे रसग्रहण म्हणजे किती वेळ हवा असणार मग!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
चर्चा अगदी छान!! फलनिष्पत्ती
चर्चा अगदी छान!! फलनिष्पत्ती काय आहे याची हे कळाले नाही.
खरतर माझ प्रामाणिक मत सर्वोत्तम किंवा टाकाऊ ही व्यक्तीसापेक्ष कल्पना असते...:) माझ्या कविता ज्या मी बर्याच वर्षांपासुन लिहिते.पुर्वी पासुनच म्हणजे आत जवळपास तीन ते चार वर्षे झाली. तरीही मायबोलीवर कधी कविता सर्वोत्तम ठरली नाही पण मला बाहेर राज्यस्तरीय स्पर्धेत पारितोषक मिळालेले आहे. कवितासंग्रहही नावावर आहे . इथल्या समीक्षकांना, परिक्षकांना नसतील आवडल्या याचा अर्थ त्या टाकाऊ आहेत असे होत नाही.
वर सुचवलेले काही पर्याय मला आवडले आहेत. उदा:
श्री चे मत >>> प्रत्येक कथा , ललित , कविता , प्रकाशचित्र इत्यादींखाली प्रतिसाद मधे वोट करण्याची सोय करता येऊ शकते का ?
जसे १) अतिशय आवडली २) आवडली ३) माहीत नाही ४) आवडली नाही
आणि प्रत्येक जण एकदाचं वोट करु शकतील
नीरजा चे हे मत>>>>लेखन प्रकाशित झाल्याच्या तारखांनुसार (महिन्याप्रमाणे) गट करता येण्याची सोय असावी. सध्या ४ महिन्यापूर्वीच्या लिखाणावर आज प्रतिक्रिया दिली गेली तर ते वरती येऊन नवीन लिखाणात दिसते. त्यामुळे २००-३०० कविता तपासताना गोंधळ होऊ शकतो. जुन्या माबो वर जी मराठी महिन्यांनुसार वर्गवारी होत होती ती गुलमोहर ला परत चालू केली तर फार बरे होईल.
असो बरेच लांबतेय माझे लिखाण परंतु वाचुन रहावले नाही म्हणून लिहितेय.
केदार चे हे मत>>>> त्यामुळे दर महिन्यात हे कार्य करन्या ऐवजी दर दोन तीन महिन्यांनी स्पर्धा घेउन, ४-५ सदस्यांसहित हे कार्य करने सोपे आहे.
Pages