Submitted by पुरंदरे शशांक on 16 July, 2019 - 23:47
श्री पंढरीनाथ महाराज
परब्रह्म दिव्य । भले साकारले ।
सुंदर सावळे । पंढरीत ।।
कटीवरी कर । विटेवरी उभे ।
रखुमाई शोभे । वामांगी ती ।।
मस्तकी किरीट । मकर कुंडले ।
गळा माळ रुळे । तुळशींची ।।
अर्ध उन्मिलित । नयने न्याहाळी ।
मांदियाळी भली । भक्तांची की ।।
झळके बरवे । स्नेह मुखावरी ।
सस्मित अधरी । श्रीहरीच्या ।।
नाभी नाभी ऐसे । भक्तांसी कौतुके ।
आश्वासित देखे । प्रेमभरे ।।
भाव देखोनिया । अति शुद्ध एक ।
होतसे पाईक । भक्त काजि ।।
सद्गुरु कृपेने । घडते दर्शन ।
संसार निर्शन । होवोनिया ।।
..................................................................
अर्ध उन्मिलित.... अर्धोन्मिलित.. थोडे मिटलेले, थोडे उघडे
अधरी..... ओठांवर
मांदियाळी....समुदाय
नाभी... भिऊ नकोस
पाईक...सेवक
भक्त काजि .... भक्तांकरता
निर्शन... निरसन
जय जय विठोबा रखुमाई
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सु...रे...ख...!
सु...रे...ख...!
सुंदर
सुंदर
सुंदर
सुंदर
फारच छान...!!!
फारच छान...!!!
श्री पंढरीनाथ महाराज की जय...
खुपच सुंदर
खुपच सुंदर
नाभी नाभी ऐसे । भक्तांसी
नाभी नाभी ऐसे । भक्तांसी कौतुके ।
आश्वासित देखे । प्रेमभरे ।।
भाव देखोनिया । अति शुद्ध एक ।
होतसे पाईक । भक्त काजि ।।
विशेष आवडले....
सुरेख.
सुरेख.
सुंदर
सुंदर
सुंदर !
सुंदर !